वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ९/१५ पृ. ७
  • हेवा करणारा मनुष्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हेवा करणारा मनुष्य
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • ईर्ष्येवर मात करून शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • मनात विष कालवणारा दुर्गुण ईर्ष्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • ईर्ष्येविषयी तुम्हाला काय माहीत असले पाहिजे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • तुम्ही इतरांबरोबर स्वतःची तुलना करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ९/१५ पृ. ७

हेवा करणारा मनुष्य

इब्री भाषेत “ईर्ष्या” या शब्दासाठी केवळ एकच मूळ शब्द आहे. पापी मानवांना सूचित करताना, इब्रीचे भाषांतर “हेवा” किंवा ‘चढाओढ’ असे केले जाऊ शकते. (उत्पत्ति २६:१४; उपदेशक ४:४) तथापि, ग्रीक भाषेत “ईर्ष्या” यासाठी एकापेक्षा अधिक शब्द आहेत. झेʹलोस हा शब्द, त्याच्या इब्री समानार्थी शब्दाप्रमाणेच, नीतिमान व पापी ईर्ष्या या दोन्ही ईर्ष्यांना सूचित होऊ शकतो. दुसरा ग्रीक शब्द, प्थोʹनोस याचा पूर्णपणे नकारात्मक अर्थ आहे. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन बायबलमध्ये त्यास नेहमी “हेवा” असे भाषांतरीत केले आहे.

प्थोʹनोस हा शब्द प्राचीन ग्रीकमध्ये कसा वापरण्यात येत होता? द ॲन्कर बायबल डिक्शनरी म्हणते: “लोभी मनुष्याप्रमाणे नव्हे, तर प्थोʹनोस वाटत असलेल्या मनुष्याला दुसऱ्‍याकडे काही वस्तू असल्याचे आवडत नसेल, पण त्या वस्तू त्याला हव्या असे नाही; केवळ दुसऱ्‍या व्यक्‍तीकडे त्या नसाव्यात असे त्याला वाटते. तो स्पर्धात्मक मनुष्यापेक्षा अशा प्रकारे वेगळा आहे की, त्याचा हेतू स्पर्धात्मक मनुष्याप्रमाणे जिंकण्याचा नव्हे तर इतरांना जिंकू न देण्याचा असतो.”

आपली स्वतःची मनोवृत्ती आपल्या समस्यांचे मूळ कारण आहे याची जाणीव हेवा करणाऱ्‍या मनुष्याला नसते. तोच शब्दकोश स्पष्टीकरण देतो, “प्थोʹनोसचे एक वैशिष्ट्य म्हणजे, व्यक्‍तीची अजाणता होय. प्थोʹनोस करणाऱ्‍या मनुष्याला त्याच्या वागणुकीची सफाई देण्यास सांगितले, तर तो ज्यांची टीका करतो त्या व्यक्‍ती यासाठी पात्र आहेत व अयोग्य परिस्थिती त्याला टीका करण्यास प्रवृत्त करते, असे तो स्वतःला तसेच इतरांना सांगेल. तो त्याच्या मित्राविषयी संभवतः असे कसे बोलू शकतो हे विचारल्यास, त्याच्या टीका त्याच्या मित्राच्या कल्याणासाठीच आहेत असे तो म्हणेल.”

येशूचा वध करण्यास जबाबदार ठरलेल्यांच्या हेतूचे वर्णन देण्यास मत्तय व मार्क हे शुभवर्तमानाचे लेखक, प्थोʹनोस या ग्रीक शब्दाचा उपयोग करतात. (मत्तय २७:१८; मार्क १५:१०) होय, ते हेव्याने प्रवृत्त झाले होते. याच हानीकारक भावनेमुळे धर्मत्यागी त्यांच्या पूर्वीच्या बांधवांचे दुष्ट द्वेष करणारे बनले आहेत. (१ तीमथ्य ६:३-५) म्हणूनच, हेवा बाळगणाऱ्‍यांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही! जे “हेवा” प्रदर्शित करत राहतात ते “मरणास पात्र आहेत” असा यहोवा देवाने त्यांच्याबद्दल निर्णय घेतला आहे.—रोमकर १:२९, ३२; गलतीकर ५:२१.

[७ पानांवरील चित्रं]

हेव्याला तुमचे जीवन उद्‌ध्वस्त करण्यास वाव देऊ नका

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा