घातक शेजाऱ्यांमध्ये तुम्ही कसे टिकून राहू शकता?
“मला नेहमीच भीती वाटत असे. मला लिफ्टमध्ये भीती वाटायची. मोटारगाडीत बसल्यावर भीती वाटायची. माझ्या घरात असतानाही भीती वाटायची. सगळीकडे गुन्हेगारी होती. लोकांना नेहमीच लुटले जात होते,” असे मारिया म्हणते. तुम्हालाही ब्राझीलच्या या स्त्रीप्रमाणेच तुमच्या शेजाऱ्यांची, खासकरून अंधाराची भीती वाटते का?
हेर कथा वाचावयास मनोरंजक असतील, पण वास्तविक जीवनात त्यांचा शेवट बहुधा आनंदी नसतो. एखादा गुन्हा कदाचित कायम राहील. किंवा खून प्रकरणांमध्ये, कोणा ना कोणाला तरी पती, पिता, किंवा मुलगा, पत्नी, किंवा आई वा मुलगी गमवावी लागते. तुमच्या क्षेत्रातही हिंसात्मक गुन्हे वाढत चालले आहेत का? तुमचे कुटुंब सुरक्षित राहील अशा ठिकाणाची तुम्हाला तीव्र इच्छा आहे का? किंवा जर तुम्हाला तुमच्या मुलांचे संगोपन हिंसा-पीडित क्षेत्रात करण्याशिवाय पर्यायच नसेल तर, तेथे टिकून राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
काही शहरांमध्ये हिंसेचे प्रमाण कमी आहे हे कबूल आहे. अनेक देशांमध्ये, लोक अजूनही ग्रामीण भागातील शांततेत किंवा सुखकर गावांमध्ये राहतात. परंतु, पूर्वी हिंसा-मुक्त समजल्या जाणाऱ्या क्षेत्रांमधील परिस्थिती झटपट बदलत चालल्या आहेत. उदाहरणार्थ, ब्राझीलमध्ये ५० वर्षांपूर्वी, ७० टक्के लोक खेडेगावांत राहत होती. आता ७० टक्के लोक शहरांमध्ये राहतात. नोकरीच्या संधींसोबत, ग्रामीण समस्यांमध्ये जसे की, गुन्हे आणि हिंसा यामध्ये देखील वाढ होत आहे. तुम्ही धोकेदायक क्षेत्रामध्ये राहत असला किंवा नसला तरीही, तुम्हाला घराबाहेर पडून कामाला किंवा शाळेला जावे लागते किंवा अनेक कार्ये करावी लागतात.
“पॅनिक सिन्ड्रोम” सर्वत्र असल्याचे कबूल करून, सामाजिक अन्याय आणि संघटित गुन्हेगारी, याला हातभार लावणारी कारणे असल्याचा, रीउ दे झानेइरू येथील पोलिसांचे एक प्रमुख उल्लेख करतात. वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी फैलावलेल्या भयामध्ये आणखी भर घालतात, “दुःखदायक बातम्यांनी लोकांना नाउमेद करतात” असेही त्यांना वाटते. मादक पदार्थांचे व्यसन, मोडकळीस आलेली कुटुंबे आणि चुकीचे धार्मिक शिक्षण या गोष्टी देखील वाढत्या स्वैराचाराला हातभार लावतात. पण भवितव्यात काय होईल? पुस्तके आणि चित्रपटांमध्ये मनोरंजनाच्या नावाखाली क्षुल्लक गोष्ट म्हणून सादर केलेल्या हिंसात्मक दृश्यांची एकसारखी भरवणूक, इतर लोकांबाबत संवेदनाशून्य होण्यास लोकांवर प्रभाव पाडेल का? हिंसा-मुक्त समजली जाणारी क्षेत्रे देखील घातक होऊ शकतात का?
बळी पडणाऱ्याला हिंसा, मौज वाटत नसल्यामुळे, आपल्याला सुरक्षित राहण्याची प्रबळ इच्छा असते. म्हणूनच तर चिंतातुर नागरिक रस्त्यांवर आणखी पोलिस अधिकाऱ्यांची व होता होईल तितक्या कडक तुरुंवासाच्या शिक्षा किंवा देहांत शिक्षा देखील देण्याची मागणी करतात! धोके असतानाही काही जण स्व-संरक्षणासाठी बंदुका घेतात. अधिकाऱ्यांनी दारूगोळा हत्यारांच्या विक्रीवर बंदी आणावी अशी इतरांची इच्छा असते. गुन्हेगारी फोफावत चालली आहे अशा वाईट बातम्या ऐकायला मिळाल्या तरी, निराश होण्याची काही गरज नाही. खरे पाहता, जोहान्सबर्ग, मेक्सिको शहर, न्यूयॉर्क, रीउ दे झानेइरू आणि साउं पाउलु यासारख्या शहरांमधील अनेक रहिवाशांना चोरीचा कधीच अनुभव आलेला नाही. अशा घातक शेजाऱ्यांमध्ये लोक गुन्हेगारीला कशाप्रकारे तोंड देतात त्याचे आपण परीक्षण करू या.
सकारात्मक मनोवृत्ती राखणे
गुन्ह्याने पीडित असलेल्या एका क्षेत्राच्या बाबतीत, एक लेखक “ब्राझीलच्या हजारो लोकांच्या कल्पकतेवर आणि चिकाटीवर” विवेचन करतो, “जे इतक्या वाढत्या कठीण परिस्थितही काही प्रमाणात प्रतिष्ठेने आणि सभ्यतेने जीवन व्यतीत करत आहेत.” रीउ दे झानेइरू मध्ये ३८ वर्षे राहिल्यानंतर झॉर्झा म्हणतो: “मी काही रस्त्यांवरून आणि क्षेत्रातून जाण्याचे टाळतो आणि रस्त्यावर होणाऱ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता दाखवत नाही. तसेच रस्त्यावर रात्रीचे उशिरापर्यंत येणेजाणे टाळतो व धास्ती प्रकट होऊ देत नाही. मी जरी सावध असलो तरी, लोकांना ते जणू ईमानदार आहेत असे लेखतो व त्यांना प्रतिष्ठेने व आदराने वागवतो.”
होय, अनावश्यक संकटे टाळा. आपल्याच कामात लक्ष घाला. प्रचंड धास्तीचा चेतासंस्थेवर प्रभाव होतो व ते सुवर्तनी लोकांनाही असमंजसपणे वागवण्यास लावते या वस्तुस्थितीला कमी लेखू नका. घातक क्षेत्रामधील नोकरीविषयी ओडर निरीक्षितो: “मी नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो. वाईट गोष्टी घडतील या भीतीने मन भरवत नाही कारण त्यामुळे विनाकारण डोक्याला ताप होतो आणि भीती निर्माण होते. मी सर्व लोकांना आदर दाखवण्याचा प्रयत्न करतो.” जागृत व संशयित व्यक्तींपासून दूर राहण्याव्यतिरिक्त, एखाद्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याच्या आणखी एका मदतीविषयी तो पुढे म्हणतो, “या सर्वांहून अधिक म्हणजे मी यहोवा देवावरील आत्मविश्वास विकसित करतो तसेच, त्याच्या नजरेतून कोणतीही गोष्ट निसटणार नाही व जे काही घडते ते सर्व त्याच्याच परवानगीनुसार होते हे मी आठवणीत ठेवतो.”
तरीही, कोणालाही सतत भयभीत अवस्थेत जीवन व्यतीत करावेसे वाटत नाही. शिवाय, प्रचंड धास्ती आणि तणाव भावनिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हानीकारक आहे हे कोण नाकारेल? यास्तव, कोणत्याही वेळेला आपल्यावर हल्ला केला जाऊ शकतो अशी भीती असणाऱ्या लोकांसाठी कोणती आशा आहे? भवितव्यात गुन्हेगारी आणखीनच बिकट होईल अशी भीती अनेकांना असल्यामुळे, आपण हिंसेचा अंत पाहू शकू का? आम्ही आपल्याला, “भयाचा अंत कधी होईल?” हा पुढील लेख वाचण्याचे निमंत्रण देत आहोत.