धार्मिक विभाजित कुटुंबामध्ये ईश्वरी आज्ञाधारकता
“कोणत्याही शारीरिक तडाख्यापेक्षा यामुळे फारच वेदना होते. . . . माझ्या सर्वांगाला इजा झाल्यासारखे मला वाटते आणि तरीही कोणीसुद्धा माझ्याकडे लक्ष देत नाही.” “काहीवेळा तर मला जीवन नकोसे वाटून त्यास तोंड देण्याच्या प्रयत्नांना सोडून द्यावे . . . किंवा घर सोडून जावे आणि पुन्हा कधीही येऊ नये, असे मला वाटते” “काहीवेळा सकारात्मक विचार करणे कठीण होते.”
हे भावनापूर्ण शब्द निराशा आणि एकांकीपणाच्या भावनेला प्रगट करतात. हे शब्द अपशाब्दिक दुर्व्यवहार—आरोप, धमक्या, मानखंडना, अबोला—आणि वैवाहिक सोबती तसेच कुटुंबांच्या सदस्यांच्या दुर्व्यवहाराला बळी पडलेल्यांकडून येतात. या लोकांना इतक्या वाईटपणे वागणूक का दिली जाते? केवळ धार्मिक मतभेदाच्या कारणामुळे. अशा परिस्थितीमध्ये, धार्मिक विभाजित कुटुंबात राहणे, यहोवाच्या उपासनेला एक आव्हानच बनवते. तरीदेखील या गोष्टीस बळी पडलेले अनेक ख्रिश्चन ईश्वरी आज्ञाधारकता यशस्वीपणे दाखवत आहेत.
याप्रकारचा मनस्ताप आणि तणाव सर्वच धार्मिक विभाजित घरांमध्ये आढळत नाही, हे कृतज्ञतेचे आहे. तथापि, तो अस्तित्वात आहे. हे वर्णन तुमच्या घराशी जुळते का? तर मग, तुमच्या साथीदाराचा किंवा तुमच्या पालकांचा आदर करण्यास तुम्हाला अवघड जात असेल. अशा परिस्थितीतील तुम्ही एक पत्नी आहात किंवा याप्रकारच्या वातावरणातील मुले आहात, तर मग धार्मिक विभाजित घरामध्ये ईश्वरी आज्ञाधारकता दाखवण्यात तुम्ही कसे यशस्वी होऊ शकता? इतरजण कोणता आधार देऊ शकतात? आणि देव या गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो?
आज्ञाधारक असणे इतके कठीण का आहे?
जगाचे स्वहीत आणि कृतघ्नता, तुमच्या स्वतःच्या अपरिपूर्ण प्रवृत्त्यांसह तुमच्यावर प्रभाव टाकतात आणि ईश्वरी आज्ञाधारकपणाला एक नित्याचा संघर्ष बनवतात. सैतानाला याची जाणीव आहे आणि तुमच्या दृढनिश्चयाला तोडण्याच्या प्रयत्नात तो आहे. ईश्वरी दर्जांबद्दल थोडी किंवा थोडीसुद्धा कदर आणि आदर नसणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचा तो वारंवार वापर करतो. तुमची उच्च आध्यात्मिक आणि नैतिक मूल्ये ख्रिस्ती विश्वासात नसणाऱ्या तुमच्या कुटुंबापासून अनेकदा फारच वेगळी असतात. वर्तणूक आणि कार्य यावर परस्परविरोधी दृष्टिकोन, असा याचा अर्थ होतो. (१ पेत्र ४:४) “अंधाराच्या निष्फळ कर्मांचे भागीदार होऊ नका,” या आज्ञेचे तुम्ही पालन केल्यामुळे ख्रिस्ती दर्जापासून तुम्हाला वळविण्याचा कदाचित फारच दबाव असेल. (इफिसकर ५:११) तुम्ही जे काही करता ते त्यांच्या दृष्टिकोनातून कधीही उचित नसते. या सर्वासाठी तुमचा धर्म कारणीभूत आहे. आजारी मुलामुळे एका आईने हतबल होऊन तिच्या पतीची मदत मागितली तेव्हा त्याने उपरोधिक उत्तर दिले, “तुझ्या धर्मासाठी तुझ्याकडे वेळ आहे; मग तुला मदतीची काही आवश्यकता नाही.” याप्रकारच्या अभिव्यक्ती आज्ञाधारक होण्यासाठी आव्हान उभे करतात.
कदाचित शास्त्रवचनाचे थेटपणे उल्लंघन न होणाऱ्या गोष्टींशी तुम्ही असहमत होण्याचे अनेक प्रसंग असतात. तरीदेखील तुम्हाला याची जाणीव होते की, तुम्ही कुटुंबाचा एक भाग आहात आणि यामुळे तुमच्यावर काही बंधने येतात. “माझे वडील आमच्याशी कसे वागतात, याचा विचार करून मी फारच अस्वस्थ होते कारण त्यांना एकटे वाटते, हे मला समजते,” कॉनी म्हणते. “माझ्या वडिलांच्या विरोधामुळे हताश होऊ नये, याची मला स्वतःला आठवण करून द्यावी लागते. सत्यासाठी असणाऱ्या आमच्या भूमिकेबद्दल वडिलांनी प्रतिकूल प्रतिक्रिया दाखविण्याचे किंवा त्यास नापसंत करण्याचे एक प्रबळ कारण आहे, हे मला स्वतःला सांगण्याची गरज पडते. सैतान या व्यवस्थीकरणाचा अधिपती आहे.” ख्रिस्ती विश्वासात नसणाऱ्या एका व्यक्तीशी विवाहबद्ध असलेली स्त्री, सुजान म्हणते: “माझ्या पतीपासून वेगळे व्हावे असे मला सुरवातीला वाटत होते—परंतु आता नाही. माझी परीक्षा घेण्यासाठी सैतान त्यांचा वापर करत असल्याचे मला ठाऊक होते.”
तुम्हाला निकामी करण्याचे सैतानाचे प्रयत्न जवळजवळ अविरत वाटतील. आपल्या सोबत्यासह अबोला असताना अनेक दिवस जाऊ शकतात. जीवन फारच एकाकी बनू शकते. यामुळे आत्मविश्वास आणि स्वाभिमान यांचा ऱ्हास होतो आणि तुमच्या ईश्वरी आज्ञाधारकपणाची परीक्षा होते. शारीरिक आणि मानसिक रिक्तपणा मुलांना देखील जाणवतो. एका वेळी, पालकांनी विरोध केलेला असतानाही देवाचे तीन तरुण सेवक विश्वासूपणे ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिले. त्यापैकी सध्या पूर्ण-वेळेचा सेवक असणाऱ्याने कबूल केले: “आम्हाला मानसिकरित्या बधिर आणि थकलेले वाटत असे; आम्ही झोपू शकत नव्हतो; आम्ही फारच खेदीत होतो.”
देव तुमच्यापासून काय अपेक्षितो?
देवाला आज्ञाधारकता ही बाब नेहमी प्रथम येते आणि पतीच्या मुख्यपदाला सापेक्ष आज्ञाधारकता नेहमी यहोवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे असली पाहिजे. (प्रेषितांची कृत्ये ५:२९) कदाचित हे अवघड असेल, तरीदेखील ते शक्य आहे. मदतीसाठी देवाकडे पाहत राहा. “उपासना आत्म्याने आणि खरेपणाने” करणे आणि त्याचे मार्गदर्शन ऐकणे आणि त्याच्या अधीन होणे, अशी त्याची तुमच्याबाबतीत इच्छा आहे. (योहान ४:२४) देवाच्या वचनाचे ज्ञान, योग्यरीतीने हृदयात भरले जाते तसे स्वैच्छिक आज्ञाधारकपणा प्रेरित होतो. तुमच्या व्यक्तिगत परिस्थिती बदलू शकतात, परंतु यहोवा आणि त्याचे वचन बदलत नाही. (मलाखी ३:६; याकोब १:१७) यहोवाने मस्तकपदाची नियुक्ती पतीला दिली आहे. मग तो ख्रिस्ती मस्तकपदाचा स्विकार करो अगर न करो, तरीदेखील हे सत्य कायम राहते. (१ करिंथकर ११:३) तुम्ही कायम स्वरूपी दुर्व्यवहार आणि मानखंडना यांना तोंड देत असल्यास ख्रिस्ती विश्वासात नसणाऱ्या पतीच्या मस्तकपदाचा स्वीकार करणे आणि सहन करणे कदाचित कठीण होईल. तरीदेखील शिष्य याकोब म्हणतो: “वरून येणारे ज्ञान . . . आज्ञेचे पालन करण्यास तत्पर असते.” (याकोब ३:१७, NW) निश्चितार्थाने या मस्तकपदाला ओळखण्यासाठी आणि त्याचा स्विकार करण्यासाठी देवाच्या आत्म्याची विशेषतः प्रीती या आत्म्याच्या फळाची आवश्यकता आहे.—गलतीकर ५:२२, २३.
तुम्ही एखाद्यावर प्रीती करता तेव्हा ईश्वर प्रस्थापित अधिकारास ईश्वरी आज्ञाधारकपणा दाखवण्यास सोपे जाते. इफिसकर ५:३३ सल्ला देते: “तुम्हापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी; आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.”
येशूचा विचार करा. त्याच्याशी शाब्दिकरित्या आणि शारीरिकरित्या दुर्व्यवहार करण्यात आला असतानाही त्याने कोणाविषयी कधीही अपशब्द काढले नाहीत. त्याने निर्दोषपणाचा वृतांत कायम ठेवला. (१ पेत्र २:२२, २३) एवढी मोठी अप्रतिष्ठा सहन करण्यासाठी त्याला प्रचंड धैर्याची आणि त्याचा पिता, यहोवा याबद्दल निग्रही प्रीतीची गरज होती. म्हणूनच, प्रीती “सर्वांसंबंधाने धीर धरते.”—१ करिंथकर १३:४-८.
पौलाने त्याचा सहकारी तीमथ्य याला आठवण करून दिली आणि तो आज देखील आपल्याला याचे स्मरण देतो: “देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.” (२ तीमथ्य १:७) यहोवा आणि येशू ख्रिस्तासाठी सखोल प्रेम, असह्य परिस्थितीमध्ये ईश्वरी आज्ञाधारकपणासाठी स्फूर्ती देऊ शकते. संतुलित दृष्टिकोन राखण्यास तसेच यहोवा आणि येशू ख्रिस्त यांच्याबरोबरचा तुमचा नातेसंबंध यावर लक्ष केंद्रित करण्यास मनाचा संयमीपणा तुम्हाला मदत करील.—पडताळा फिलिप्पैकर ३:८-११.
ईश्वरी आज्ञाधारकता दाखविण्यात सफल झालेले सोबती
यहोवा तुमच्या समस्या कशा सोडवतो, हे पाहण्यासाठी काहीवेळा तुम्हाला दीर्घकाळ थांबले पाहिजे. परंतु त्याचा हात कधीही तोकडा पडत नाही. “यहोवा ज्या गोष्टींचा अधिकार आणि विशेषाधिकार देतो—सभांमध्ये आणि संमेलनांमध्ये त्याची सेवा करणे, अभ्यास करणे, सेवेला जाणे आणि प्रार्थना करणे, या गोष्टी नेहमी करा,” असा सल्ला ईश्वरी आज्ञाधारकपणा प्रदर्शित करण्यात यशस्वी झालेली एक व्यक्ती देते. २ करिंथकर ४:१७ मध्ये प्रेषित पौलाने म्हटले की, ‘हे संकट तात्कालिक आहे, परंतु ते आपल्यासाठी सार्वकालिक गौरव निर्माण करते.’ यावर मनन करा. हा तुमच्यासाठी स्थिर होण्याचा घटक होईल. एक पत्नी आठवून सांगते: “माझे कौटुंबिक जीवन व्यवस्थित होत नाही आणि यहोवा माझ्या बाबतीत खूश आहे की नाही, असा काहीवेळा मी विचार करते. परंतु या वास्तविकतेला मी आशीर्वाद मानते कारण माझ्या पतीपेक्षा माझी मानसिक स्थिती उत्तम आहे. यहोवा आपल्या कार्यांबद्दल आनंदी आहे हे जाणल्यामुळे अशा प्रकारचा संघर्ष साहजिकच आहे.”
तुम्ही सहन करू शकणार नाही अशा परिस्थितीचा तुम्हाला अनुभव येऊ देणार नाही, असे अभिवचन यहोवा देतो. त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमच्यापेक्षा त्याला जास्त माहिती आहे आणि तुम्ही स्वतःला जाणत नाहीत इतक्या उत्तमपणे तो तुम्हाला जाणतो. (रोमकर ८:३५-३९; ११:३३; १ करिंथकर १०:१३) कठीण परिस्थितींमध्ये यहोवाला प्रार्थना करणे मदतदायी ठरते. विशेषतः कोणत्या मार्गाने जावे किंवा अशा परिस्थितीला कसे तोंड द्यावे, हे तुम्हाला ठाऊक नसते तेव्हा स्वतःस मार्गदर्शित करण्यास्तव त्याच्या आत्म्यासाठी प्रार्थना करा. (नीतीसूत्रे ३:५; १ पेत्र ३:१२) तुमच्या जीवनात अधिकाराचे आज्ञापालन करण्यासाठी सहनशील, आत्मसंयमी आणि नम्रता यासाठी सतत त्याला विनंती करा. स्तोत्रकर्त्याने म्हटले: ‘परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा आहे.’ (स्तोत्र १८:२) याचे स्मरण ठेवणे, धार्मिक विभाजित घरांमध्ये राहणाऱ्यांना सामर्थ्य पुरवणारी मदत आहे.
विशेषतः, तुमच्या विवाहाला एक आनंदी विवाह बनविण्याचा सर्वकष प्रयत्न करा. होय, सुवार्ता विभाजन करील, हे येशूला आधीच माहीत होते. तरीदेखील, तुमची प्रवृत्ती किंवा वर्तणूक हे विभाजनाचे कारण होऊ नये म्हणून प्रार्थना करा. (मत्तय १०:३५, ३६) हे लक्षात ठेवून सहकार्य केल्याने वैवाहिक समस्या कमी होतात. संघर्ष आणि भिन्नमत टाळण्यासाठी तुम्ही केवळ प्रदर्शित केलेली योग्य प्रकारची ही मनोवृत्ती पुष्कळ काही करू शकते. सहनशीलता आणि प्रीती अतिशय महत्त्वाची आहे. “सौम्य” आणि “सहनशील” व्हा.—२ तीमथ्य २:२४.
प्रेषित पौल “सर्वांना सर्व काही” बनला. (१ करिंथकर ९:२२) त्याचप्रमाणे, ख्रिस्ती दर्जांशी हातमिळवणी न करता काहीवेळा तुम्हाला तुमचा सोबती आणि कुटुंबासह अधिक वेळ खर्च करण्यासाठी तुमच्या वेळापत्रकात फेरफार करण्याची गरज भासेल. जीवनाची सहभागिता करण्यास्तव निवडलेल्या तुमच्या सोबत्यासाठी शक्यतो जास्तीत-जास्त वेळ द्या. ख्रिस्ती कदर प्रदर्शित करा. ईश्वरी आज्ञाधारकपणाची ही एक अभिव्यक्ती आहे.
देव-भिरू आणि अधीन असणारी पत्नी जी नम्य आणि सहानुभूतीपूर्ण आहे तिला ईश्वरी आज्ञाधारकपणा दाखविणे सोपे जाते. (इफिसकर ५:२२, २३) कृपायुक्त आणि “मिठाने रूचकर” असलेले शब्द संभाव्य तंट्याची पुनरावृत्ती कमी करण्यास मदत करतात.—कलस्सैकर ४:६; नीतीसूत्रे १५:१.
मतभेद लवकरात लवकर मिटविण्यासाठी आणि “रागात असताना” झोपी जाण्याऐवजी उभारणीकारक उत्तम शब्दांनी शांतीची पुनःस्थापना करण्यासाठी ईश्वरी बुद्धी तुम्हाला समज देते. (इफिसकर ४:२६, २९, ३१) यासाठी नम्रतेची गरज आहे. सामर्थ्यासाठी यहोवावर पूर्णपणे विसंबून राहा. एका ख्रिश्चन पत्नीने नम्रपणे कबूल केले: “उत्कटतेने प्रार्थना केल्यानंतर, माझ्या सोबत्याबद्दल अधिक प्रेमळ प्रवृत्ती विकसित करण्यासाठी यहोवाने मला सामर्थ्य दिल्याचा मी अनुभव घेतला आहे.” देवाचे वचन सल्ला देते: “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची परतफेड करू नका. . . . तर बऱ्याने वाइटाला जिंक.” (रोमकर १२:१७-२१) ईश्वरी आज्ञाधारकपणाचा हा बुद्धिमान सल्ला आणि मार्ग आहे.
ईश्वरी आज्ञाधारकपणा दाखविणारी मुले
धार्मिक विभाजित कुटुंबातील तुम्हा मुलांना यहोवाचा सल्ला आहे: “सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा; हे प्रभूला संतोषकारक आहे.” (कलस्सैकर ३:२०) येशू ख्रिस्ताचा येथे उल्लेख केला आहे, हे लक्षात घ्या. म्हणूनच पालकांची आज्ञा पूर्णपणे पाळता येत नाही. प्रेषितांची कृत्ये ५:२९ मधील सल्ला “मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा पाळली पाहिजे,” हा एका अर्थी, ख्रिश्चन युवकांशी संबंधित आहे. शास्त्रवचनानुसार काय उचित आहे हे तुम्हाला ठाऊक असण्याच्या आधारावर तुम्हाला काय करायचे याचा निर्णय घेण्याचे प्रसंग उद्भवतील. खोट्या भक्तीच्या कार्यात सहभागी होण्यास नकार दिल्याने होणारा परिणाम कदाचित काही अंशी शिक्षेचे स्वरूप असेल. ही असुखावह शक्यता असताना देखील तुम्हाला सांत्वन मिळू शकते आणि तुम्ही देवाच्या दृष्टीने योग्य ते करत असल्यामुळे तुमचा छळ होत आहे, या वास्तविकतेमुळे देखील तुम्ही आनंद करू शकता.—१ पेत्र २:१९, २०.
बायबलच्या तत्त्वानुरूप तुमचे विचार मार्गदर्शित होत असल्यामुळे काही बाबींमध्ये तुमच्या पालकापासून तुम्ही भिन्न व्हाल. यामुळे ते तुमचे शत्रू होत नाहीत. ते यहोवाचे समर्पित सेवक नसले तरी देखील ते योग्य आदराच्या पात्रतेचे आहेत. (इफिसकर ६:२) शलमोनाने म्हटले: “तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नको.” (नीतीसूत्रे २३:२२) त्यांना विचित्र वाटणाऱ्या विश्वासाचा तुम्ही पिच्छा पुरवता तेव्हा त्यांना होणाऱ्या मनस्तापाला समजावून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी दळणवळण राखा आणि अशा प्रकारे “तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो.” (फिलिप्पैकर ४:५) तुमच्या भावनांची आणि चिंतेची सहभागिता करा. ईश्वरी तत्त्वांशी दृढ राहा, तरीही “शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.” (रोमकर १२:१८) पालकांच्या आज्ञेचे तुम्ही आता पालन करता या वास्तविकतेद्वारे तुम्ही यहोवाला दाखवून देता की, त्याच्या राज्याला देखील अधीन राहण्याची तुमची इच्छा आहे.
इतर काय करू शकतात
धार्मिक विभाजित कुटुंबामध्ये राहणाऱ्या ख्रिश्चनांना सह-उपासकांकडून पाठिंब्याची आणि समजूतदारपणाची आवश्यकता आहे. एका व्यक्तीने म्हटलेल्या शब्दावरून याचे प्रमाण पटते: “कोणीही काही सुद्धा करू शकत नाही आणि मी देखील बदल घडवून आणण्यासाठी काही करू शकत नाही यामुळे मला अगदी आशाहीन आणि असाहाय्य असल्यासारखे वाटते. आमच्या कुटुंबामध्ये यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी त्याच्यावर भरवसा ठेवतो.”
ख्रिस्ती सभांमधील आध्यात्मिक बंधू आणि भगिणीं यांच्याबरोबरचा सहवास आश्रयस्थान आहे. याच व्यक्तीने पुढे असे वर्णन केले की, त्याचे जीवन “दोन वेगळ्या विश्वांप्रमाणे होते. एकामध्ये त्याला राहावे लागत होते आणि दुसऱ्यामध्ये त्याला राहण्याची आवड होती.” बंधुत्त्वाच्या प्रेमामुळे अशाप्रकारच्या पीडित लोकांना सर्व परिस्थितीमध्ये सहन आणि सेवा करण्यास शक्य होते. तुमच्या प्रार्थनांमध्ये त्यांचा समावेश करा. (इफिसकर १:१६) नियमितपणे, प्रत्येक प्रसंगी त्यांच्याशी उत्तेजनत्पर, सकारात्मक आणि सांत्वनदायक शब्द बोला. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) व्यवहार्य आणि उचित आहे तेव्हा तुमच्या ईश्वरशासित आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांना सहभागी करा.
ईश्वरी आज्ञाधारकतेचे आशीर्वाद आणि लाभ
धार्मिक विभाजित घरात ईश्वरी आज्ञाधारकता प्रदर्शित केल्याने मिळणाऱ्या आशीर्वादांवर आणि लाभांवर दररोज मनन करा. आज्ञाधारक होण्यासाठी कार्य करा. ‘खचून जाऊ नका.’ (गलतीकर ६:९) “देवाचे स्मरण ठेवून” प्रतिकूल परिस्थिती आणि अन्याय सहन करणे “देवाच्या दृष्टीने उचित आहे.” (१ पेत्र २:१९, २०) यहोवाची धार्मिक तत्त्वे आणि नियमांबरोबर हातमिळवणी होणार नाही तोपर्यंत आज्ञाधारक असा. यामुळे यहोवाच्या व्यवस्थेला एकनिष्ठा प्रकट होते. तुमच्या ईश्वरी वागणूकीमुळे तुमच्या सोबत्याचे, मुलांचे किंवा पालकांचे जीवन देखील बचावले जाऊ शकते.—१ करिंथकर ७:१६; १ पेत्र ३:१.
धार्मिक विभाजित कुटुंबाच्या मागण्या आणि अपेक्षा या विरुद्ध संघर्ष करत असताना यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांच्याशी सचोटी राखण्याच्या महत्त्वाला लक्षात ठेवा. तुम्ही अनेक संघर्षांशी नमते घ्याल; परंतु सचोटीच्या बाबतीत नमते घेणे म्हणजे सर्वच बाबतीत नमते घेणे आहे आणि यात जीवनाच्या बाबतीत देखील नमते घेण्याचा समावेश होतो. प्रेषित पौलाने म्हटले: “देव . . . ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे; त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेविले आहे आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले आहे.” ‘मोठ्या तारणाला’ जाणून घेतल्याने आज्ञाधारक होण्यासाठी तुम्हाला मजबूती मिळेल.—इब्रीयांस १:१, २; २:३.
उचित नीतीमूल्यांबरोबर हातमिळवणी न करता दाखविलेला आज्ञाधारकपणा आणि दृढता तुमच्यासाठी आणि ख्रिस्ती विश्वासात नसणाऱ्या तुमच्या सोबत्यासाठी सुदृढ संरक्षण आहे. एकनिष्ठेमुळे कुटुंबाचे बंधन मजबूत होते. नीतीसूत्रे ३१:११ एका लायक आणि एकनिष्ठ पत्नीबद्दल म्हणते: “तिच्या पतीचे मन तिजवर भरवसा ठेवते.” तुमची पवित्र वागणूक आणि सखोल आदर यामुळे कदाचित ख्रिस्ती विश्वासात नसणाऱ्या तुमच्या पतीचे डोळे उघडतील. यामुळे तो देवाचे सत्य स्विकारील.
ईश्वरी आज्ञाधारकपणा खरोखरच मौल्यवान आणि जीवन रक्षक आहे. त्याकरता तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये प्रार्थना करा. यामुळे मनःशांती मिळेल आणि देवाचे गौरव होईल.