वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 २/१ पृ. ४-७
  • निर्णय घेण्याची हीच वेळ का आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • निर्णय घेण्याची हीच वेळ का आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • इस्त्राएलला का धिक्कारण्यात आले
  • ख्रिस्ती धर्मजगताचा मोठा धर्मत्याग
  • सुधारणा अशक्य?
  • ‘तिच्यामधून निघण्याची’ वेळ आताच आहे
  • मोठी बाबेल पडली, तिचा न्याय करण्यात आला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • “धर्मत्यागी पुरुष” याजविरुद्धचा देवाचा न्यायदंड
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • कुप्रसिद्ध “वेश्‍या” तिचे पतन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 २/१ पृ. ४-७

निर्णय घेण्याची हीच वेळ का आहे?

सा. यु. पू. १६ व्या शतकात, देवाने इस्त्राएलांना ‘सर्व लोकांपेक्षा त्याचा खास निधी, . . . एक पवित्र राष्ट्र’ म्हणून निवडले. (निर्गम १९:५, ६) त्यांनी शेजारच्या राष्ट्रांच्या मूर्तीपूजा आणि भ्रष्ट चालीरीतींनी स्वतःला दूषित करून फार लवकर त्यांची पवित्रता, त्यांची धार्मिक शुद्धता गमावली. अशाप्रकारे त्यांनी स्वतःला “ताठ मानेचे लोक” असे दर्शवून दिले. (अनुवाद ९:६, १३; १०:१६; १ करिंथकर १०:७-११) यहोशवाच्या मृत्यूनंतर तीनशे वर्षांपेक्षा अधिक काळादरम्यान, यहोवाने शास्ते आणि विश्‍वासू मार्गदर्शकांना तयार केले ज्यांनी इस्त्राएलांना खऱ्‍या उपासनेकडे पुन्हा वळवायचे होते. परंतु लोकांनी ‘आपला दुराचार व दुराग्रह सोडला नाही.’—शास्ते २:१७-१९.

त्यानंतर, लोकांना खऱ्‍या उपासनेसाठी पुन्हा प्रवृत्त करण्यास देवाने विश्‍वासू राजे आणि संदेष्ट्यांना तयार केले. संदेष्टा अजऱ्‍याने, आसा राजा आणि त्याच्या राष्ट्राच्या सहपुरूषांना यहोवाचा शोध करण्याचे उत्तेजन दिले. तो म्हणाला: “जर तुम्ही त्याला शोधाल तर तो तुम्हाला सापडेल, परंतु तुम्ही त्याला सोडले तर तो तुम्हाला सोडील.” आसाने यहुदा राज्यात धार्मिक सुधारणा अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. (२ इतिहास १५:१-१६, प. र. भाषांतर) नंतर, देवाला त्याचा संदेष्टा योएल याच्याद्वारे हे आमंत्रण पुन्हा द्यावे लागले. (योएल २:१२, १३) त्याहूनही पुढे, सफन्याने यहुदाच्या रहिवाश्‍यांना ‘यहोवाला शोधण्यास’ आवर्जून सांगितले. तरुण राजा योशियाने मूर्तीपूजा आणि भ्रष्टतेचे उच्चाटन करण्यासाठी सुधारणेच्या मोहिमांमध्ये तीच गोष्ट केली.—सफन्या २:३; २ इतिहास ३४:३-७.

पश्‍चात्तापाच्या अशा घटना असून देखील, लोकांची धार्मिक परिस्थिती अधिकाधिक बिकट होत होती. (यिर्मया २:१३; ४४:४, ५) यिर्मयाने मूर्तीपूजक चालीरीतींनी दूषित झालेल्या व्यवस्थेचा धिक्कार करून तिची सुधारणा होऊ शकणार नाही असे वर्णन केले: ‘कूशी माणसाला आपली कातडी, चित्त्याला आपले ठिपके पालटता येतील काय? दुष्टतेला सवकलेल्या तुम्हास चांगले आचरण करिता येईल.’ (यिर्मया १३:२३) याकारणास्तव, देवाने यहुदा राज्यावर कडक शिक्षा ठोठावली. सा. यु. पू. ६०७ मध्ये यरूशलेम आणि त्याच्या मंदिराचा नाश झाला व त्यातून बचावलेल्यांना बॅबिलॉनमध्ये दास म्हणून नेण्यात आले. तेथे ते ७० वर्षांसाठी होते.

ती कालमर्यादा संपली तेव्हा देवाने दया दाखवली. त्याने कोरेश राजाला, इस्त्राएलांना बंधनमुक्‍त करण्यास प्रवृत्त केले. त्यांच्यातील शेषांनी यरुशलेमेत परतून मंदिराची पुनर्बांधणी केली. या सर्व गोष्टींवरून धडा शिकण्याऐवजी पुन्हा एकदा ते खऱ्‍या उपासनेपासून दूर गेले व यहोवाला त्याच्या आमंत्रणाचे नूतनीकरण करावयास भाग पाडले: “मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन.”—मलाखी ३:७.

इस्त्राएलला का धिक्कारण्यात आले

येशूच्या समयात इस्त्राएलांची धार्मिक स्थिती काय होती? दांभिक धार्मिक पुढारी “आंधळे वाटाडी” होते, जे ‘शास्त्र म्हणून मनुष्याचे नियम’ शिकवत होते. ते ‘आपले सांप्रदाय करून देवाची आज्ञा मोडत होते.’ लोकांनी त्यांच्या “ओठांनी” देवाचा सन्मान केला, परंतु त्यांचे अंतःकरण त्याच्यापासून दूर होते. (मत्तय १५:३, ४, ८, ९, १४) राष्ट्र या नात्याने त्यांना पश्‍चात्ताप करण्याची आणखी एक संधी मिळणार होती का? नाही. त्याने पुढे म्हटले: “देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल.” येशूने म्हटले: “तुमचे घर,” जरुसलेम येथील मंदिर “तुम्हांवर सोडले आहे.” (मत्तय २१:४३; २३:३८) त्यांची फार मोठी चूक होती. त्यांनी जुलमी रोमी कैसराला त्यांचा राजा निवडून येशूला मशीहा म्हणून नाकारले आणि त्याला ठार मारले.—मत्तय २७:२५; योहान १९:१५.

येशूने त्याची सेवा ज्या काळादरम्यान केली तो काळ न्यायाचा समय होता हे समजून घेण्याची इस्त्राएलांनी इच्छाच दाखवली नाही. जरुसलेमच्या अविश्‍वासू रहिवाश्‍यांना येशूने म्हटले: “तुझ्यावर कृपादृष्टि केल्याचा समय तू ओळखला नाहीस.”—लूक १९:४४.

सा. यु. पेंटेकॉस्ट ३३ मध्ये, देवाने एक नवे राष्ट्र किंवा “लोक,” त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या आत्म्याने अभिषिक्‍त शिष्यांना एकत्र केले. यांना प्रत्येक जाती व राष्ट्रातून निवडण्यात येणार होते. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५; १५:१४) यहुदी धार्मिक व्यवस्थेची एकदाची सुधारणा होण्याची काही आशा होती का? रोमी सैन्याने सा. यु. ७० मध्ये जरुसलेमास धुळीस मिळवून याचे उत्तर दिले. देवाने त्या धार्मिक व्यवस्थेला पूर्णपणे त्यागले होते.—लूक २१:५, ६.

ख्रिस्ती धर्मजगताचा मोठा धर्मत्याग

आत्म्याने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी देखील एक “पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक” संघटित केले. (१ पेत्र २:९; गलतीकर ६:१६) परंतु प्राचीन ख्रिस्ती मंडळीने देखील तिची धार्मिक शुद्धता जास्त काळासाठी टिकवून ठेवली नाही.

शास्त्रवचनांनी एका मोठ्या धर्मत्यागाविषयी किंवा खऱ्‍या विश्‍वासातून मागे पडण्याविषयी भाकीत केले. येशूच्या दाखल्यातील लाक्षणिक निदण, म्हणजेच खोटे ख्रिस्ती लाक्षणिक गव्हाला किंवा देवाच्या आत्म्याने अभिषिक्‍त केलेल्या खऱ्‍या ख्रिश्‍चनांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करतील. देवाचा आद्य शत्रु, दियाबल याने चेतवलेल्या खोट्या ख्रिस्ती विश्‍वासाचा फैलाव “लोक झोपेत असताना” सुरू होणार होता असे तो दृष्टांत प्रकट करतो. हे ख्रिस्ताच्या विश्‍वासू प्रेषितांच्या मृत्यूनंतर म्हणजे आनुषंगिक आध्यात्मिक निद्रेच्या काळादरम्यान घडले. (मत्तय १३:२४-३०; ३६-४३; २ थेस्सलनीकाकर २:६-८) प्रेषितांनी भाकीत केल्याप्रमाणे, अनेक खोटे ख्रिस्ती कळपामध्ये चतुराईने शिरले. (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०; १ तीमथ्य ४:१-३; २ तीमथ्य २:१६-१८; २ पेत्र २:१-३) प्रेषितांमध्ये योहान हा शेवटी मरण पावला. सा. यु. ९८ या वर्षी त्याने लिहिले की “शेवटली घटका,” प्रेषितीय काळाचा शेवटला भाग केव्हाच सुरू झाला होता.—१ योहान २:१८, १९.

रोमी शासक कॉन्स्टंटाईनने धर्म आणि राजकीय शक्‍तींच्या संघटनेला मंजूर केल्यामुळे ख्रिस्ती धर्मजगताची आध्यात्मिक, धर्मतत्त्वासंबंधीची आणि नैतिक परिस्थिती नाट्यमयरीत्या बिकट झाली. अनेक इतिहासकार मान्य करतात, की ख्रिस्ती दृष्टिकोनातून “चवथ्या शतकादरम्यान चर्चने मिळवलेला विजय, एक अनर्थ होता.” ‘ख्रिस्ती धर्मजगताने त्याची उच्च नैतिक पातळी गमावली’ व “मरियेची उपासना” आणि “संतांची” पूजा तसेच त्रैक्याची कल्पना यासारख्या अनेक चालीरीती व तत्त्वज्ञान मूर्तीपूजेतून आपल्यात घेतले.

तिच्या खोट्या विजयानंतर, ख्रिस्ती धर्मजगताची परिस्थिती खालावत गेली. पोप आणि चर्चमंडळांनी दिलेले नियम आणि धर्मतत्त्वासंबंधीच्या व्याख्या यासोबत धर्मसभा, धर्मयुद्धे व कॅथलिक आणि प्रोटेस्टंट लोकांमध्ये झालेली “पवित्र” युद्धे या सर्वांनी सुधारणा करता न येण्याजोगी धार्मिक व्यवस्था निर्माण केली.

केवळ अग्नीनेच प्रकाशित केलेले जग (इंग्रजी) या पुस्तकात विल्यम मॅनचेस्टर लिहितात: “पंधराव्या आणि सोळाव्या शतकातील पोप रोमी शासकांप्रमाणे जीवन व्यतित करीत होते. ते जगातील सर्वात धनाढ्य लोक होते व त्यांनी आणि त्यांच्या कार्डिनल यांनी पुढे पवित्र पदे विकून स्वतःला धनवान बनवले.” मोठ्या धर्मत्यागादरम्यान, लहान गट किंवा वैयक्‍तिकांना, लाक्षणिक गव्हाची गुणलक्षणे दर्शवून खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासाचा पुनर्शोध लावण्याचा प्रयत्न केला. त्यांना बहुतेकवेळा कडक छळाचा सामना करावा लागला. तेच पुस्तक पुढे म्हणते: “काही वेळा असे दिसले की ख्रिस्ती विश्‍वासाचे प्रोटेस्टंट आणि कॅथलिक खरे संत अग्निने काळवंडून हुतात्मे बनले.” सुधारक म्हणवून घेणारे इतर, जसे की मार्टिन लुथर आणि जॉन कॅल्विन ह्‍यांना, कॅथलिक चर्चपासून वेगळ्या तरीही त्याचे मूळ धर्मतत्त्व असलेली कायमस्वरूपी धार्मिक व्यवस्था निर्माण करण्यात यश मिळाले. ते राजकीय बाबींमध्ये देखील खूप गोवलेले होते.

प्रोटेस्टंट क्षेत्रात, धार्मिक पुनर्जागृतीकरण साध्य करण्याचे प्रयत्न केले होते. उदाहरणार्थ, १८ व्या आणि १९ व्या शतकांदरम्यान, या प्रयत्नांमुळे विदेशी मिशनरी कार्य अगदी जोमाने होऊ लागले. परंतु, धार्मिक मेंढपाळ स्वतः कबूल करतात त्यानुसार आज प्रोटेस्टंट कळपाची आध्यात्मिक स्थिती मुळीच उत्तेजनकारक नाही. प्रोटेस्टंट ईश्‍वरशास्त्रवेत्ता ऑस्कर कुलमॅन यांनी अलीकडेच स्वीकारले, की “चर्चमध्येच विश्‍वासाचे गंडांतर आहे.”

कॅथलिक चर्चमध्ये सुधारणा आणि प्रति-सुधारणा देखील चेतवली आहे. ११ व्या शतकापासून १३ व्या शतकापर्यंत, सर्वत्र असलेली भ्रष्टता व पाळकांचे अफाट धन असतानाही दारिद्‌य्राच्या प्रतिज्ञेचे काटेकोरपणे पालन करणारे मठवासी लोकांचे समूह तयार झाले. परंतु या समूहावर जवळून पाळत ठेवण्यात आली आणि विद्वानांच्या मते, त्यांना धर्मोपदेशकासंबंधी अधिकारश्रेणीने दाबून टाकले. त्यानंतर ट्रेंट मंडळाने चेतवलेल्या १६ व्या शतकाची प्रति-सुधारणा आली आणि मोठ्या प्रमाणात प्रोटेस्टंट प्रति-सुधारणेचा प्रतिरोध करण्याचा आदेश देऊ लागली.

एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात, धर्मोपदेशकासंबंधी पुनर्स्थापनेच्या काळादरम्यान, कॅथलिक चर्चने सत्तावादी व पुराणमतवादी पावित्रा अंगीकारला. परंतु, खरा ख्रिस्ती विश्‍वास पुनर्स्थापण्यासाठी कोणत्याही वास्तविक सुधारणा करण्यात आल्या असे म्हणता येत नाही. उलट, जगाचे धार्मिक, राजकीय आणि सामाजिक बदल होत असताना देखील पाळकांच्या अधिकाराला दृढ बनवण्यासाठी हे सर्व निव्वळ प्रयत्न होते.

एकदम अलीकडे म्हणजे, १९६० च्या दशकात, असे दिसत होते, की कॅथलिक चर्चला वॅटिकन दुसऱ्‍या एक्युमेनिकल मंडळासोबत मोठ्या बदलाची प्रक्रिया सुरू करण्याची इच्छा होती. परंतु, चर्चच्या प्रगतीशील सदस्यांच्या उत्साहाला दाबून टाकण्यासाठी अधिकारपदावर असलेल्या चालू पोपनी मंडळाचे तथाकथित नूतनीकरण अचानक थांबवले. ही अवस्था, जिला काही जण वॉईटीवॉचे पुनर्स्थापन असे म्हणतात तिची व्याख्या एका कॅथलिक गटाने, “कॉन्स्टंटाईनवादाचे नवे रूप” अशाप्रकारे केली. ला सिविल्टा कॅटोलिका या जेसूएट नियतकालिकात विशेषपणे उल्लेखिल्यानुसार, इतर धर्मांप्रमाणे कॅथलिक चर्च “मूलभूत आणि विश्‍वव्यापी संकटाचा सामना करीत आहे: मूलभूत ह्‍यासाठी कारण त्यामध्ये विश्‍वासाची आणि ख्रिस्ती जीवनाची मुळे गोवलेली आहेत; विश्‍वव्यापी ह्‍यासाठी, कारण त्यामध्ये ख्रिस्ती धर्माचे सर्व पैलू गोवलेले आहेत.”

ख्रिस्ती धर्मजगताचे धर्म, सुधारणेच्या प्रक्रियेतून खरेपणाने गुजरलेले नाहीत व ते तसे करूही शकत नाहीत, कारण लाक्षणिक गव्हाला एका शुद्ध मंडळीत गोळा करूनच ‘कापणीच्या वेळी’ खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासाची पुनर्स्थापना होणार होती. (मत्तय १३:३०, ३९) एखादा ख्रिस्ती असण्याचा दावा करत असला किंवा नसला तरी गुन्ह्यांची लांबलचक यादी आणि धर्माच्या नावाखाली केलेली दुष्कर्मे त्याला असा प्रश्‍न विचारण्यास प्रवृत्त करतात की, ख्रिस्ती धर्मजगताकडून खऱ्‍या सुधारणेची अपेक्षा करणे यथार्थपणाचे आहे का?

सुधारणा अशक्य?

प्रकटीकरणाचे पुस्तक किंवा ॲपोकॅलिप्स, “मोठी बाबेल” हे गूढ नाव धारण करणाऱ्‍या एका लाक्षणिक मोठ्या कलावंतीणीविषयी बोलते. (प्रकटीकरण १७:१, ५) अनेक शतकांपासून बायबलच्या वाचकांनी या चिन्हाच्या गूढतेचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. अनेकांना पाळकांची धनसंपत्ती व भ्रष्टता पाहून किळस आली. काहींना वाटले, की मोठी बाबेल धर्मोपदेशकासंबंधीच्या अधिकारश्रेणीला चित्रित करते. असा विचार करणाऱ्‍यांमध्ये एक बोहेमियन कॅथलिक पाळक यान हस ज्यांना सन १४१५ मध्ये जिवंत जाळण्यात आले व एक इटालियन मानववादी ऑन्यो पॉलेऑरयो ज्यांना १५७० मध्ये गळफास लावला आणि मग जाळण्यात आले यांचा समावेश होता. या दोघांनी कॅथलिक चर्च “त्याच्या मूळच्या प्रतिष्ठेपर्यंत” पुन्हा येईल ही आशा बाळगून त्याची सुधारणा करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु त्यांना त्यात यश प्राप्त झाले नाही.

त्याच्याविरूद्धतेत, प्रकटीकरणाचा १७ वा आणि १८ वा अध्याय सूचित करतो की मोठी बाबेल सर्व खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचे प्रतिनिधीत्त्व करते.a ही संयुक्‍त ‘मोठी कलावंतीण’ सुधारण्याजोगी नाही कारण “तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत पोहंचली आहे.” वास्तविक पाहता, या २० व्या शतकात केवळ ख्रिस्ती धर्मजगतातीलच नव्हे तर वस्तुतः सर्व धर्म, रक्‍ताचे पाट वाहणाऱ्‍या युद्धांसाठी आणि मानवजातीला पिडित करणाऱ्‍या तीव्र नैतिक अवनतीला जबाबदार आहेत. परिणामतः, देवाने ‘बाबेलच्या’ नाशाविषयीचा हुकूमनामा जाहीर केला आहे.—प्रकटीकरण १८:५, ८.

‘तिच्यामधून निघण्याची’ वेळ आताच आहे

बायबलच्या भविष्यवाण्यांची पूर्तता प्रकट करते की आपला दिवस या दुष्ट ‘युगाच्या समाप्तीशी’ जुळतो. (मत्तय २४:३) जो कोणी देवाची उपासना खरेपणाने करू इच्छितो तो त्याच्या स्वतःच्या कल्पना किंवा आवडीनुसार चालू शकत नाही. त्याने ‘परमेश्‍वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधले पाहिजे’ होय, आताच केले पाहिजे, कारण येशूने भाकीत केलेले “मोठे संकट” उंबरठ्यावर आहे. (यशया ५५:६; मत्तय २४:२१) इस्त्राएल लोकांच्या बाबतीत जे घडले त्याप्रमाणे देव एखादा धर्म त्याच्या प्राचीनतेची बढाई मारतो म्हणून त्याच्या भ्रष्टतेला सहन करणार नाही. जे जहाज नक्कीच बुडणार आहे त्याला दुरूस्त करण्यास झटण्यापेक्षा, जे सर्व देवाची स्वीकृती आणि तारण प्राप्त करू इच्छितात त्या सर्वांनी, “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडातील कोणतीहि पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा” ही प्रकटीकरण १८:४ मधील प्रेरित आज्ञा विलंब न लावता पाळली पाहिजे.

परंतु कोठे जाण्यासाठी बाहेर ‘निघाले’ पाहिजे? तारण आणखी कोठे प्राप्त करता येऊ शकते? चुकीच्या ठिकाणी आश्रय घेण्याचा धोका असू शकतो, हो ना? देवाची स्वीकृती प्राप्त असलेला एकमात्र धर्म कसा ओळखता येऊ शकतो? या प्रश्‍नांची भरवसादायक उत्तरे देवाच्या वचनातच सापडू शकतात. (२ तीमथ्य ३:१६, १७) यहोवाचे साक्षीदार तुम्हाला बायबलचे अधिक जवळून परीक्षण करण्याचे आमंत्रण देतात. देवाने ‘आपल्या नावाकरिता ज्या लोकांना’ निवडले आहे व ज्यांना तो जवळ येऊन ठेपलेल्या त्याच्या क्रोधाच्या दिवसादरम्यान संरक्षण देईल ते कोण आहेत हे तुम्ही समजू शकाल.—प्रेषितांची कृत्ये १५:१४; सफन्या २:३; प्रकटीकरण १६:१४-१६.

[तळटीपा]

a लाक्षणिक मोठ्या बाबेलला शास्त्रवचनीयरीत्या योग्यपणे ओळखण्यासाठी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने १९८८ मध्ये प्रकाशित केलेल्या प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! ह्‍या पुस्तकातील ३३ ते ३७ अध्याय पाहावे.

[७ पानांवरील चित्रं]

तुमचे धार्मिक जहाज बुडत चालले आहे तर, खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासाच्या बचावणाऱ्‍या जहाजाकडे वळा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा