राज्य घोषकांचा वृत्तांत
राज्याच्या सुवार्तेचा प्रचार केला जाईल
अनेक शतकांपासून, देवाचा मुख्य शत्रू, दियाबल सैतानाने खऱ्या ख्रिस्ती विश्वासाच्या फैलावाला अटकाव घालण्याच्या प्रयत्नात राजकीय सरकार व खोटा धर्म यांचा धूर्तपणे उपयोग केला आहे. परंतु ह्या पद्धती अपयशी ठरतील. येशूने भाकीत केले की, “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल [“कदाचित प्रचार केला जाईल” किंवा “प्रचार केला जाऊ शकेल” असे नाही].”—मत्तय २४:१४.
सैतानाचे अपयश ग्रीसमध्ये शाबीत झाले. त्या प्रदेशात, ग्रीक कर्मठ चर्चने यहोवाच्या साक्षीदारांना राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यास बंदी घालण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढील अनुभवात ठळकपणे मांडल्याप्रमाणे, कालांतराने, बायबलचे सत्य कठोर विरोध असताना देखील प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांपर्यंत पोहंचते.
सुमारे ३० वर्षांपूर्वी, एका ग्रीक कर्मठ पाळकांने सुवार्तेचा स्वीकार केला आणि यहोवाचा एक साक्षीदार होण्याची इच्छा देखील दर्शवली. परंतु, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांनी घेतलेल्या पावलाचा कडक विरोध केला आणि साक्षीदारांबरोबर असलेला त्यांचा सहवास सोडून देण्यास त्यांच्यावर दबाव आणला. त्यांच्या कुटुंबाला खूष करण्यासाठी, त्यांनी पाळक या नात्याने त्यांचा पेशा कायम ठेवला; तरीही, त्यांनी नेहमी हे जाणले की यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांना सत्य शिकण्यास मदत केली होती परंतु त्यांनी खोट्या धर्मातील उच्च पदासाठी त्या सत्याला सोडले होते.
तरीदेखील, संधी होती तेव्हा काहीवेळा ते यहोवाच्या साक्षीदारांच्या बाजूने बोलत असत. अनेक प्रसंगी तर त्यांनी लोकांना अशी शिफारस देखील केली, की त्यांना बायबलचे सत्य शिकून घ्यावयाचे आहे तर त्यांनी साक्षीदारांसोबत अभ्यास करावा. अनेक वर्षांसाठी पुष्कळांनी त्यांची ही शिफारस खरोखर अनुसरली.
अलीकडेच, ते फार आजारी पडले व त्यांना वाटले की ते अधिक काळ जगणार नाहीत. इस्पितळात असताना, त्यांनी त्यांच्या मुलांना बोलावले, आणि ते सर्व त्यांच्या बिछान्याच्या सभोवती जमा झाले.a मग त्यांनी त्यांना समजावून सांगितले, की ते जरी मरण पावले तरी ते त्यांना कदाचित पुन्हा भेटू शकतील. त्यांनी त्यांच्या मुलांसोबत, पृथ्वीवरील नंदनवनात जगण्यासाठी यहोवाद्वारे मनुष्यांचे पुनरूत्थान होण्याच्या बायबलच्या शिकवणीबद्दल बोलणी केली परंतु ते घडत असल्याचे पाहण्याची त्यांची इच्छा होती तर त्यांनी बायबलमधून सत्य शिकले पाहिजे व खोट्या धर्मापासून स्वतःचे संबंध तोडले पाहिजेत हे त्यांना सांगितले. त्यांनी त्यांना यहोवाच्या साक्षीदारांसोबत सहवास राखण्याची आणि खरे ख्रिस्ती कसे व्हावे हे त्यांच्याकडून शिकून घेण्याची विनंती केली.
काही दिवसातच ते मरण पावले. परंतु, त्यांच्या मुलांना त्यांनी दिलेल्या शेवटल्या सल्ल्याने उत्तम प्रतिफळाची कापणी केली. त्यांची मुलगी, त्यांच्या इतर नातेवाईकांप्रमाणेच यहोवाचे साक्षीदार आणि त्यांच्या कार्याचा खूपच विरोध करीत होते. परंतु तिच्या मरणोन्मुख वडिलांच्या कळकळीच्या आर्जवाला ती टाळू शकली नाही, म्हणून तिने लगेचच यहोवाच्या साक्षीदारांसोबत संपर्क साधून बायबलचा अभ्यास सुरू केला. अलीकडेच तिने यहोवा देवाला तिचे जीवन समर्पित केले आणि तिच्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याने बाप्तिस्मा घेतला व ती एक साक्षीदार बनली.
ग्रीस आणि २३० पेक्षा अधिक अशा इतर राष्ट्रांमध्ये, यहोवाचे साक्षीदार देवाच्या पवित्र आत्म्याच्या शक्तिवर अवलंबून राहतात. “परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल” या येशूच्या भविष्यवाणीच्या पूर्णतेत ते पवित्र आत्म्याच्या पूर्ण पाठिंब्याने भाग घेतात.—प्रेषितांची कृत्ये १:८.
[तळटीपा]
a ग्रीक कर्मठ चर्च त्याच्या पाळकांना विवाह करण्याची परवानगी देते.