वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 १/१ पृ. ३-४
  • सत्वनिष्ठा राखून जिवंत राहा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सत्वनिष्ठा राखून जिवंत राहा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • खरेपणा टिकवून ठेवा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • इयोबाची सचोटी—ती कोणास अनुसरता येईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • आपण तर यहोवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवू!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • ईयोबाने यहोवाच्या नावाचे गौरव केले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 १/१ पृ. ३-४

सत्वनिष्ठा राखून जिवंत राहा!

“देवाच नाव साडून द्या आणि मरून जा!” आमच्या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर ईयोबाच्या पत्नीचा चित्र आहे जिने वरील शब्दांनी त्याच्यावर शाब्दिक हा केला. ही गोष्ट सुमारे ३,६०० वर्षांपूर्वी घडली. तरीही देवाच्या या विश्‍वासू सेवकावर झालेला हा शाब्दिक हल्ला आपल्या दिवसापर्यंत मानवजातीसमोर एक वादविषय ठळकपणे मांडतो. विश्‍वासू ईयोबाने—त्याची गुरेढोरे, त्याचे घर, त्याची दहा मुले यांची भयंकर हानी सहन केली होती. आता त्याला असा एक असाध्य रोग जडला, जो त्याच्या सहनशीलतेच्या मर्यादेची परीक्षा घेत होता. त्याचे कारण? देवाचा आणि मानवाचा आद्यशत्रू दियाबल सैतान, मानव कडक परीक्षेत असताना देवाशी सत्वनिष्ठ राहू शकत नाही या आव्हानाचा पिच्छा पुरवत होता.—ईयोब १:११, १२; २:४, ५, ९, १०.

ईयोबाच्या दिवसाप्रमाणे, आजही “सगळे जग त्या दुष्टाला,” दियाबल सैतानाला “वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) निश्‍चितच, हे आज अधिक प्रमाणात खरे आहे, कारण आता “सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे” त्याला स्वर्गातून ह्‍या पृथ्वीवर खाली टाकण्यात आले आहे. (प्रकटीकरण १२:९) यामुळेच आपल्या काळात मानवजातीला तीव्र पीडा त्रास देत आहेत. १९१४ मध्ये उसळलेल्या पहिल्या जागतिक महायुद्धाने, या २० व्या शतकापर्यंत चालू असलेल्या “वेदनांचा प्रारंभ” याला चिन्हित केले.—मत्तय २४:७, ८.

या क्रूर, निष्कृट जगात तुम्हाला कधी असे वाटते का की तुम्ही मानवी सहनशीलतेच्या मर्यादेपर्यंत येऊन पोहंचला आहात? ‘जीवनात काही उद्देश आहे का?’ असा तुम्ही कधी विचार केला का? ईयोबाला असेच वाटले असावे, परंतु त्याने चुका केल्या असल्या तरी, देवाठायी असलेला विश्‍वास त्याने कधीच गमावला नाही. त्याने त्याचा दृढनिश्‍चय या शब्दांनी व्यक्‍त केला: “माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन सोडणार नाही!” त्याला हा आत्मविश्‍वास होता की देवाला त्याची ‘सात्विकता कळून येईल.’—ईयोब २७:५; ३१:६.

देवाचा स्वतःचा पुत्र, येशू ख्रिस्त याला देखील येथे पृथ्वीवर असताना परीक्षांचा सामना करावा लागला. सैतानाने येशूवर वेगवेगळ्या मार्गांनी हल्ला केला. सैतानाने येशूला मोहात पाडले व मग त्याच्या शारीरिक गरजांचा फायदा घेऊन, देवाच्या वचनावर त्याचा किती भरवसा आहे त्याची डोंगरावर परीक्षा घेतली. (मत्तय ४:१-११) सैतानाने धर्मत्यागी शास्त्री, परुशी आणि त्यांनी फुसलावलेल्यांकडून येशूला छळले, दुर्भाषण केल्याचा त्याच्यावर आरोप केला शिवाय त्याला ठार मारण्याचा कट रचून त्याला त्रास दिला. (लूक ५:२१; योहान ५:१६-१८; १०:३६-३९; ११:५७) ईयोबाला त्याच्या तीन खोट्या सांत्वनदात्यांनी जितके छळले त्याहीपेक्षा अधिक त्यांनी येशूला त्रास दिला.—ईयोब १६:२; १९:१, २.

गेथशेमाने बागेत, येशू त्याच्या परीक्षेच्या कळसाला पोहंचत असताना त्याने त्याच्या शिष्यांना सांगितले: “माझा जीव मरणप्राय, अति खिन्‍न झाला आहे.” मग, तो “पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली: ‘हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो; तथापि, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.’ ” शेवटी यातनास्तंभावर, स्तोत्र २२:१ च्या भविष्यसूचक शब्दांना पूर्ण करत येशू मोठ्याने ओरडून म्हणाला: “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला?” परंतु सरतेशेवटी, देवाने येशूचा त्याग केला नाही कारण येशूने त्याला पूर्ण सत्वनिष्ठा राखली होती व सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी अनुसरावे म्हणून त्यांच्यासाठी एक कित्ता घालून दिला होता. येशूने सत्वनिष्ठा राखल्याबद्दल यहोवाने त्याला पुनरूत्थित करून सर्वोच्च स्वर्गात उंचावून प्रतिफळ दिले. (मत्तय २६:३८, ३९; २७:४६; प्रेषितांची कृत्ये २:३२-३६; ५:३०; १ पेत्र २:२१) जे देवाला अशाचप्रकारची सत्वनिष्ठा राखतात त्या इतरांना तो प्रतिफळ देईल.

येशूने सत्वनिष्ठा राखूनच केवळ सैतानाच्या आव्हानाला पूर्ण उत्तर दिले नाही तर, त्याच्या परिपूर्ण मानवी जीवनाच्या बलिदानाने खंडणी पुरवली. या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवल्यामुळे सत्वनिष्ठा राखणारे मानव सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतात. (मत्तय २०:२८) सर्वप्रथम, येशू स्वर्गाच्या राज्यात त्याच्याबरोबर सहवारीस होणाऱ्‍या अभिषिक्‍त “लहान कळपाला” एकत्र करतो. (लूक १२:३२) त्यानंतर, पृथ्वीवरील देवाच्या राज्यात सार्वकालिक जीवनाचा वारसा मिळवण्यासाठी “मोठ्या संकटातून” निभावण्यास ‘मोठ्या लोकसमुदायाला’ एकत्र केले जाते.—प्रकटीकरण ७:९, १४-१७.

सत्वनिष्ठा राखणारा ईयोब, शांतिदायक ‘नव्या पृथ्वीच्या’ समाजाचा एक भाग होण्यासाठी ज्या मरण पावलेल्या कोट्यावधी लोकांना पुनरूत्थित करण्यात येईल त्या लोकांपैकी एक असेल. (२ पेत्र ३:१३; योहान ५:२८, २९) आमच्या नियतकालिकाच्या मागील पृष्ठावरील चित्रात वर्णन केल्याप्रमाणे, ईयोबाला त्याच्या सत्वनिष्ठेचे प्रतिफळ देण्यात आले. त्यावेळी यहोवाने “ईयोबाचे उतारवय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्‍न केले.” त्याला आध्यात्मिक बल देखील प्राप्त झाले कारण त्याने “आपल्या वाचेने काही पाप केले नाही.” देवाने त्याची जीवनमर्यादा आणखी १४० वर्षांपर्यंत वाढवली. भौतिकरीत्या त्याने ईयोबाला त्याच्याकडे पूर्वी जितके होते त्याच्या दुप्पट दिले आणि ईयोबाला “आणखी सात पुत्र व तीन कन्या झाल्या,” त्याच्या कन्यांइतक्या सुंदर स्त्रिया सगळ्या देशात नव्हत्या. (ईयोब २:१०; ४२:१२-१७) ही सर्व समृद्धता, ‘नव्या पृथ्वीच्या’ नंदनवनात सत्वनिष्ठा राखणारे सर्वजण जे आशीर्वाद उपभोगतील त्याची केवळ एक झलक होती. पुढील पाने स्पष्टीकरण देतील त्याप्रमाणे तुम्हीही त्या आनंदात सहभागी होऊ शकता!

[४ पानांवरील चित्रं]

येशूने सत्वनिष्ठा राखणारा या नात्याने एक परिपूर्ण उदाहरण मांडले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा