वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 १२/१ पृ. ३-५
  • नास्तिकवादाची मुळे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नास्तिकवादाची मुळे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मुळांना जाणून घेणे
  • बिया पेरल्या जातात
  • संशयवादाला अंकुर फुटतो
  • नास्तिकवाद शिगेला पोहंचतो
  • विसाव्या शतकात देवाचा नकार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 १२/१ पृ. ३-५

नास्तिकवादाची मुळे

आपण आणीबाणीने पीडित असलेल्या ग्रहावर राहत आहोत; वर्तमानपत्रातील ठळक बातम्यांवर क्षणभर नजर टाकली तर आपल्याला दिसून येईल की ह्‍या बातम्या त्या वस्तुस्थितीची दररोज खात्री देतात. आपल्या जगाच्या दयनीय स्थितीमुळे अनेकांना देवाच्या अस्तित्वाची शंका वाटते. स्वतःला नास्तिकवादी म्हणवून घेण्याचा दावा करणारे, त्याच्या अस्तित्वालाच नाकारतात. तुमच्याही बाबतीत असेच आहे का?

देवावर विश्‍वास किंवा अविश्‍वास, भवितव्यातील तुमच्या दृष्टिकोनावर तीव्र परिणाम करू शकतो. देवाशिवाय, मानवजातीचा बचाव पूर्णपणे मनुष्याच्या हातात आहे—मानवाच्या प्रचंड नाशकारक क्षमतेचा विचार करत असताना ही कल्पना किती भयाण वाटते. देव अस्तित्वात आहे असा तुम्ही विश्‍वास करत असाल, तर तुम्ही नक्कीच मानाल की या ग्रहावरील जीवनाचा काहीतरी उद्देश आहे—असा एक उद्देश जो शेवटी हळूहळू जाणला जाईल.

देवाच्या अस्तित्वाची नाकबुली संपूर्ण इतिहासात अधूनमधून दिसणारी असली, तरी अलिकडच्या शतकांमध्येच नास्तिकवादाची लोकप्रियता फैलावली आहे. असे का हे तुम्हाला माहीत आहे का?

मुळांना जाणून घेणे

एका उत्तुंग वृक्षाचे दृश्‍य प्रभावकारी आहे. तरीही, आपले डोळे त्या वृक्षाची केवळ पाने, फांद्या आणि त्याचा बुंधा पाहू शकतात. परंतु त्याची मुळे—त्या वृक्षाचा जीवन स्रोत—जमिनीत खोलवर लपलेली असतात.

नास्तिकवादाच्या बाबतीतही असेच काहीसे आहे. एका उत्तुंग वृक्षासारखे, देवाच्या अस्तित्वाची नाकबुली १९ व्या शतकापर्यंत प्रभावकारी उंचीला पोहंचली. जीवन आणि हे विश्‍व एका अलौकिक आदिकारणाविना अस्तित्वात येऊ शकते का? अशाप्रकारच्या विश्‍वकर्त्याची उपासना करणे निव्वळ वेळ वाया घालवण्यासारखे आहे का? १९ व्या शतकातील प्रमुख तत्त्वज्ञानी लोकांनी या प्रश्‍नांना दिलेली उत्तरे जोरदार आणि स्पष्ट होती. “आपल्याला ज्याप्रकारे नैतिक नियमांची गरज नाही त्याचप्रकारे धर्माचीही नाही,” असे फ्रेड्रिक निच्य यांनी म्हटले. “धर्म मानवी मनाचे एक स्वप्न आहे,” असे लुटवींग फिअरबॉख यांनी ठासून सांगितले. तसेच कार्ल मार्क्स ज्यांची लिखाणे येणाऱ्‍या दशकांमध्ये खोलवर परिणाम पाडणार होती, त्यांनी अगदी धैर्याने म्हटले की, “मला लोकांच्या मनातील स्वातंत्र्याला धर्माच्या बंधनापासून आणखी वाढवयाचे आहे.”

अगणित लोकांवर याचा प्रभाव पडला. परंतु त्यांनी नास्तिकवादाची केवळ पाने, फांद्या आणि बुंधाच पाहिला. मुळे जागच्या जागी होती आणि १९ व्या शतकाच्या आधीपासूनच त्यांना अंकुर फुटू लागले होते. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, नास्तिकवादाच्या आधुनिक वाढीला ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मांनी पोसले होते! ते कसे? त्यांच्या भ्रष्टतेमुळे, ह्‍या धार्मिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात भ्रम आणि विरोध चेतविला होता.

बिया पेरल्या जातात

मध्य युगादरम्यान, कॅथलिक चर्चची तिच्या प्रजाजनावर भयंकर पकड होती. द एन्सायक्लोपिडिया अमेरिकाना नोंद करते, की “धर्माधिकाऱ्‍यांना लोकांच्या आध्यात्मिक गरजांविषयी कमी काळजी होती असे दिसत होते. उच्च पद असलेल्या पाळकवर्गाचे सदस्य, विशेषकरून बिशप, यांना उच्च श्रेणीतील लोकांतूनच निवडले गेले आणि त्यांचे पद हे प्रतिष्ठा व सत्तेचा उगम आहे असे मानले जात होते.”

काही, जसे की जॉन कॅल्वीन व मार्टिन लूथर यांनी चर्चची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या पद्धती नेहमीच ख्रिस्ताप्रमाणे नव्हत्या; असहिष्णुता व रक्‍तपात ही धर्मसुधारणेची चिन्हे आहेत. (पडताळा मत्तय २६:५२.) काही हल्ले इतके दुष्ट होते की तीन शतकांनंतर अमेरिकेचे तिसरे राष्ट्रपती थॉमस जेफरसन यांनी लिहिले: “कॅल्वीनच्या राक्षसी गुणधर्माद्वारे देवाची निंदा करण्यापेक्षा, त्याच्यावर विश्‍वास न करणे तरी क्षम्य असू शकते.”a

स्पष्टपणे मग, धर्मसुधारणेच्या चळवळीमुळे शुद्ध उपासनेची पुनर्स्थापना झाली नाही. तरीही, तिने कॅथलिक चर्चची सत्ता कमी केली. तेथून पुढे वॅटिकनची धार्मिक विश्‍वासावर मक्‍तेदारी राहिली नाही. अनेक लोक नव्याने प्रस्थापित झालेल्या प्रोटेस्टंट पंथांचे सभासद झाले. इतरांचा धर्मामुळे भ्रमनिरास झाल्याने त्यांनी मानवी मनालाच उपासनेचे एक प्रतीक बनवले. परिणामी, अनेकांची निसंकुचित मनोवृत्ती बनल्यामुळे देवाबद्दलची निरनिराळी मते उद्‌भवली.

संशयवादाला अंकुर फुटतो

१८ व्या शतकापर्यंत, तर्कशुद्ध विचार जगाच्या समस्यांचा एकमात्र उपाय आहे असे सर्वसामान्यपणे कीर्तिले जात होते. जर्मन तत्त्वज्ञानी इम्मॅन्युएल कॅन्ट यांनी दावा केला की मानव मार्गदर्शनासाठी राजकारणावर व धर्मावर अवलंबून राहिल्यामुळे त्याची प्रगती खुंटवली जात होती. पुढे त्यांनी आर्जविले की “सुजाण असण्यासाठी निदान थोडे तरी धैर्यवान व्हा! तुमच्या स्वतःच्या बुद्धिचा वापर करण्याचे धाडस करा!”

ह्‍या मनोवृत्तीने, १८ व्या शतकातील ज्ञानप्रसार चळवळ ज्याला युक्‍तीवादाचे युग असेही म्हटले जाते त्याची विशेष लक्षणे स्पष्ट केली. १८ व्या शतकापर्यंत टिकून, ह्‍या काळाला ज्ञानाच्या शोधाने पछाडलेला काळ असे चिन्हित केले गेले. “निर्विवादपणे, विश्‍वासाची जागा संशयवादाने घेतली. सर्व जुन्या कर्मठतेविषयी शंका उपस्थित करण्यात आली,” असे इतिहासातील संस्मरणीय प्रसंग (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते.

धर्म, या ‘जुन्या कर्मठतेची’ पूर्ण छाननी होणार होती. जगाचा सार्वत्रिक इतिहास (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते, “लोकांनी धर्माकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला. स्वर्गातील बक्षिसाच्या अभिवचनांनी ते आता समाधानी नव्हते; ते पृथ्वीवर एका उत्तम जीवनाची मागणी करत होते. विश्‍वकर्त्यावरील त्यांचा विश्‍वास कमी होत चालला होता.” होय, ज्ञानप्रसाराच्या अनेक तत्त्वज्ञानांनी धर्माला तुच्छ लेखले. त्यांनी विशेषकरून सत्तेसाठी हपापलेल्या कॅथलिक चर्चच्या नेत्यांवर लोकांना अज्ञानात ठेवल्याचा आरोप लावला.

धर्माने असमाधानी झालेले हे अनेक तत्त्वज्ञानी आस्तिक बनले; त्यांनी देवावर विश्‍वास ठेवला परंतु असे प्रतिपादन केले की त्याला मानवामध्ये काहीच आस्था नाही.b काही जण, जसे की तत्त्वज्ञानी पॉल हेन्री, थिरी ओलबाक निर्भीड नास्तिकवादी बनले. त्यांनी असा दावा केला, की धर्म हा “मतभेद, मूर्खता आणि गुन्हेगारीचा स्रोत” होता. कालांतराने, अनेकांना ख्रिस्ती धर्मजगताचा कंटाळा येऊ लागला आणि मग तेही ओलबाकच्या विचारांशी सहमत झाले.

ख्रिस्ती धर्मजगताने नास्तिकवादाच्या वाढीला उत्तेजन दिले हे किती उपरोधक आहे! ईश्‍वरशास्त्रवेत्तेचे प्राध्यापक मायकल जे. बक्ले लिहितात, “चर्च, नास्तिकवादाला आधार देणारे व वाढवणारे होते. सर्वसामान्य तत्त्वे असलेल्या धर्मांनी, युरोप आणि अमेरिकेतील लोकांच्या नैतिक संवेदनाक्षमतेला अत्यंत दुःखित केले व घृणा उत्पन्‍न केली. चर्च आणि पंथांनी युरोपाचा पूर्ण विध्वंस केला, असंख्य लोकांच्या कत्तलीच्या योजना आखल्या, धार्मिक विरोध किंवा क्रांत्यांची मागणी केली, बादशहांना वाळीत टाकण्याचा किंवा पदच्युत करण्याचा प्रयत्न केला.”

नास्तिकवाद शिगेला पोहंचतो

१९ व्या शतकापर्यंत, निर्बंधाविना व अगदी जोमाने देवाचा नकार व्यक्‍त करण्यात आला. तत्त्वज्ञान्यांना व शास्त्रज्ञांना त्यांचे विचार धैर्याने व्यक्‍त करण्यास मुळीच रूखरूख वाटत नव्हती. एका स्पष्टवक्त्या नास्तिकवाद्याने म्हटले, “देव आमचा शत्रू आहे. परमेश्‍वराचा द्वेष हा ज्ञानाचा आरंभ होय. मानवाला जर खरी प्रगती करायची आहे तर ती नास्तिकवादाच्या आधारावरच केली जाऊ शकते.”

परंतु, २० व्या शतकादरम्यान, एक मार्मिक बदल झाला. देवाचा नकार कमहल्लेखोर झाला; एका वेगळ्याच प्रकारच्या नास्तिकवादाचा फैलाव होऊ लागला, ज्याचा परिणाम देवावर विश्‍वास असण्याचा दावा करणाऱ्‍यांवर देखील होऊ लागला.

[तळटीपा]

a धर्मसुधारणेच्या चळवळीमुळे तयार झालेल्या प्रोटेस्टंट पंथांनी पुष्कळ अशास्त्रवचनीय शिकवणी आचरण्याचे चालू ठेवले. सावध राहा! नियतकालिकेचा ऑगस्ट २२, १९८९, पृष्ठे १६-२० आणि सप्टेंबर ८, १९८९, पृष्ठे २३-७ अंक पहा.

b आस्तिकांनी दावा केला, की एका घड्याळजी प्रमाणेच, देवाने त्याच्या निर्मितीला गती दिली आणि मग आस्थाशून्य होऊन त्याने त्याची पाठ फिरवली. आधुनिक वारसा (इंग्रजी) या पुस्तकानुसार, आस्तिकवाद्यांचा “असा विश्‍वास होता की लोक निराश झाल्यामुळे नास्तिकवाद उत्पन्‍न झाला. परंतु कॅथलिक चर्चची हुकूमशाही रचना व त्याच्या शिकवणींचा कडकपणा आणि असहिष्णुता त्याहूनही अधिक खेदजनक होती.”

[३ पानांवरील चित्रं]

कार्ल मार्क्स

[३ पानांवरील चित्रं]

लुटवींग फिअरबॉख

[३ पानांवरील चित्रं]

फ्रेड्रिक निच्य

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा