बायबल समजण्याकरिता बनवलेले पुस्तक
काही लोकांचा असा विश्वास आहे की, बायबल हे देवाचे स्पष्ट वचन आहे ज्याचे अनुकरण शब्दाशः केले पाहिजे. इतर जणांसाठी, “बायबलचा संदेश अधिकच द्व्यर्थाचे आहे,” असे कॅनडाच्या संयुक्त चर्चच्या १२ सदस्यांची विश्वास आणि सिद्धांत समिती म्हणते. संयुक्त चर्चचे पाळक क्लिफोर्ड इल्योईट यांना असे वाटते की, काहींसाठी “बायबल कल्पित, कोणालाही उद्देशून लिहिलेले नाही व असंबद्ध आहे.”
अशाप्रकारचे दृष्टिकोन प्रसंगोचित प्रश्न उभे करतात ज्यांना उत्तरे मिळालीच पाहिजेत. त्यांच्यापैकी काही महत्त्वपूर्ण आहेत जसे की, बायबल कशासाठी लिहिण्यात आले? ते समजणार नाही इतके गोंधळून टाकणारे व गुंतागुंतीचे आहे का? साधारण मनुष्य ते समजू शकतो का? शास्त्रवचनांच्या अर्थाचे आकलन होण्यासाठी कोणत्या मदतीची गरज आहे? आणि या प्रक्षुब्ध काळात बायबलच्या अचूक ज्ञानाची का गरज आहे?
बायबल का लिहिण्यात आले?
देवाच्या वचनाचा अभ्यास नेहमीच, सर्वोच्च देव यहोवाची पसंती व त्याची स्वीकृती प्राप्त करतात त्यांच्यासाठी एक पूर्वाकांक्षा ठरला आहे. राजे, याजक, पालक, पुरूष, स्त्रिया आणि मुले—श्रीमंत आणि गरीब सर्वांना—देवाच्या लिखित वचनाचा गंभीरपणे व प्रार्थनापूर्वक विचार करण्यासाठी नित्यक्रमातून वेळ काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.—अनुवाद ६:६, ७; १७:१८-२०; ३१:९-१२; नहेम्या ८:८; स्तोत्र १:१, २; ११९:७-११, ७२, ९८-१००, १०४, १४२; नीतीसूत्रे ३:१३-१८.
उदाहरणार्थ, यहोशवाला असे निर्देशन देण्यात आले होते: “हे नियमशास्त्राचे पुस्तक नेहमी तुझ्या उपासनेत वाचले जाईल याची तू खात्री कर. रात्रंदिवस तू त्यावर ध्यान कर, व त्यात लिहिलेल्या सर्व गोष्टी पाळशील याची खात्री कर. म्हणजे तू समृद्ध व यशस्वी होशील.” (यहोशवा १:८, टुडेज इंग्लिश वर्शन) देवाच्या नियमांचा अशाप्रकारचा काळजीपूर्वक अभ्यास आणि पालन केल्याने यश आणि आनंद मिळाला असता. यहोवाचा असा उद्देश होता की, ‘सर्व प्रकारच्या माणसांनी’ त्याचे वचन, बायबल हे नुसते समजून घेऊ नये तर, जीवनाचे बक्षीस प्राप्त करण्याच्या आशेसह त्याचे पालनही करावे.—१ तीमथ्य २:३, ४; योहान १७:३.
समजता येणार नाही इतके गुंतागुंतीचे?
येशूचे स्वर्गारोहण होण्याआधी, भूतलावर बायबलचा एक विस्तृत शैक्षणिक कार्यक्रम कायम चालू राहावा असे मनोगत त्याने स्पष्ट सांगितले. (प्रेषितांची कृत्ये १:८) त्याला हे ठाऊक होते की बायबल समजण्याकरता बनवलेले आहे. यहोवाने आपल्याला स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व अधिकार दिल्याचे विवरण केल्यानंतर त्याने एक थेट आज्ञा दिली: “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस [किंवा, शिकणाऱ्यांस] शिष्य करा; त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.”—मत्तय २८:१९, २०.
बाप्तिस्म्याच्या आधी नव्या शिष्यांना यहोवा, त्याचा पुत्र, आणि पवित्र आत्म्याच्या कार्याविषयी शिकवण्याची गरज होती. यासोबतच, त्यांना ख्रिस्ती व्यवस्थेच्या नियमांनुसार प्रशिक्षित करणे आवश्यक होते. (१ करिंथकर ९:२१; गलतीकर ६:२) हे साध्य करण्यासाठी, पात्र असणाऱ्यांना पहिल्यांदा, बायबल हे यहोवाकडून मिळाले आहे आणि दुसरे, की ते समजण्याकरिता बनवलेले आहे असा विश्वास ठेवावा लागला.—मत्तय १०:११-१३.
बायबल समजून घेण्यासाठी तुमच्या वतीने कशाची गरज आहे? देवाच्या पुत्राने शास्त्रवचनांचे स्पष्टीकरण देण्यासाठी खास प्रयत्न केला. ही पवित्र लिखाणे खरी आहेत व त्यामध्ये यहोवाच्या इच्छेविषयीची माहिती आहे हे त्याला माहीत होते. (योहान १७:१७) येशू ख्रिस्ताने त्याच्या कार्याच्या नेमणूकीबद्दल, म्हटले: “मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” (योहान १८:३७; लूक ४:४३) येशूने ग्रहणक्षम अंतःकरणाच्या व मनाच्या लोकांना शिकवण्याचे टाळले नाही. लूक २४:४५, मध्ये आम्हाला सांगितले जाते की: “तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने [ख्रिस्त येशू] त्यांचे मन उघडले.”
येशूच्या सेवाकार्यादरम्यान, त्याने लिखित वचनातून वारंवार संदर्भ घेतला, “मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे” यातील शास्त्रवचनांचे विवरण करून त्यांचा मुक्तपणे उल्लेख केला. (लूक २४:२७, ४४) त्याने दिलेले शास्त्रवचनांचे स्पष्टीकरण ज्यांनी ऐकले त्या सर्वांना, त्याची स्पष्ट समज तसेच शिकवण्याची क्षमता पाहून आश्चर्य वाटले. (मत्तय ७:२८, २९; मार्क १:२२; लूक ४:३२; २४:३२) त्याच्यासाठी शास्त्रवचने सहज समजण्यालायक होती.
बायबल आणि येशूचे अनुयायी
येशू ख्रिस्ताची नक्कल करणाऱ्या प्रेषित पौलाला, शास्त्रवचनात जे काही लिहिले आहे ते इतरांना शिकवण्याची गरज आहे असे वाटले. त्यालाही हे माहीत होते की, ही शास्त्रवचने समजण्याकरिता आहेत. याचकारणास्तव त्याने जाहिररीत्या त्याची शिकवण दिली व ज्या लोकांना ते समजून घ्यायची इच्छा आहे अशांच्या घरी जाऊन काहीही संशय न बाळगता शास्त्रवचनांचे विवरण दिले. पौलाने आपली भूमिका काय आहे याबद्दल असे सांगितले की: “जे हितकारक ते तुम्हाला सांगण्यात आणि चार लोकात व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही हे तुम्हाला ठाऊक आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:२०, टीईवी) चर्चा करताना तो शास्त्रवचनातून तर्क करीत असे व त्याच्या मुद्यांना संदर्भासहित विवरण देऊन शाबीत करीत असे. (प्रेषितांची कृत्ये १७:२, ३) शास्त्रवचनांचा अर्थ समजावून सांगण्यासाठी इतरांना मदत करण्याची त्याची इच्छा होती.
येशूने आणि त्याच्या शिष्यांनी शिकवलेल्या गोष्टी समजून घेण्याची तुमची उत्कट इच्छा आहे का? (१ पेत्र २:२) प्राचीन बिरुयातील रहिवाश्यांना अशी इच्छा होती आणि प्रेषित पौल त्यांना ख्रिस्ताविषयी जे शिकवत होता त्यावर विश्वास ठेवण्यास ते आतुर होते. यास्तव त्यांना शास्त्रवचनांचा दररोज अभ्यास करून ते जी सुवार्ता ऐकतात तीच सत्य आहे याची खात्री करून घेण्याचे उत्तेजन देण्यात आले. त्यांचे मन ग्रहणक्षम असल्यामुळेच, ‘अनेकांनी विश्वास ठेवला.’—प्रेषितांची कृत्ये १७:११, १२.
बायबल समजून घेण्यासाठी एखाद्याच्या अंतःकरणाची स्थिती योग्य असली पाहिजे, शिकण्याची प्रामाणिक इच्छा व ‘त्याच्या आध्यात्मिक गरजांविषयी जागृत’ असले पाहिजे. (मत्तय ५:३, NW) “आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता?” असे येशूला विचारण्यात आले, तेव्हा त्याने उत्तर दिले की: “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हास दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.” ‘तो आपले तोंड उघडून दाखले देईल व जे गुप्त ते प्रगट करील’ असे त्याच्याविषयी भाकीत केले होते. (मत्तय १३:१०, ११, ३५) या कारणास्तव, प्रामाणिकपणे विचारपूस करणाऱ्यांना, विशेष आतुरता नसलेल्या व केवळ उत्सुक असलेल्यांपासून वेगळे करण्यासाठी येशू दाखल्यांद्वारे बोलला. एके प्रसंगी येशूचे शिष्य त्याच्यासोबत एका घरात गेल्यावर, “शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा” असे म्हणून त्यांनी त्यांची प्रामाणिकता दाखवली.—मत्तय १३:३६.
बायबल समजून घेण्याची इच्छा असल्यास आपल्याला मदतीची गरज आहे हे स्पष्ट आहे. संयुक्त चर्चचे धर्मशास्त्र, विश्वास आणि इक्युमिनीझमचे अध्यक्ष पाळक, हॅल लिवेलीन म्हणाले: “बायबल आपल्यासाठी काय अर्थ राखून आहे आणि त्याचे वाचन व स्पष्टीकरण कसे करावे हे स्पष्ट करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.” परंतु सर्वांनी हे जाणले नसले तरी, वस्तुस्थिती ही आहे की, आपल्याला स्वबुद्धीने बायबल समजणार नाही. आपल्याला मदतीची आवश्यकता आहे.
कोणती मदत उपलब्ध आहे?
बायबलमध्ये गोंधळविणारे काही बोल, गुंतागुंतीचे प्रश्न व अशी काही गहन विधाने आहेत ज्यांना स्पष्टीकरणाची गरज आहे. ते कदाचित हेतूपुरस्सर दुर्बोध असतील, ती जेव्हा लिहिले होती तेव्हा त्यांचा उलघडा व्हावयाचा नव्हता या उद्देशाने अर्थपूर्ण तुलनेचे होती. परंतु त्यामध्ये यहोवाचे उद्देश गोवलेले होते. उदाहरणार्थ, प्रकटीकरण १३:१८ म्हणते की ‘श्वापदाची संख्या’ “सहाशे सहासष्ट” आहे. “येथे अकलेचे काम आहे” असे ते वचन म्हणते, तरीसुद्धा त्या संख्येचा अर्थ काय होतो याचे ते स्पष्टीकरण देत नाही. परंतु, यहोवाने त्याच्या संघटनेद्वारे त्याच्या निष्ठावान सेवकांना आज, त्याचा अर्थ समजण्याची अनुमती दिली आहे. (“बायबल समजून घेण्याचा मार्ग,” हा चौकोन पहा.) तुम्ही देखील ही समज, “सत्याचे वचन नीट” सांगण्यात अनुभवी असलेल्यांच्या साहाय्याने प्राप्त करू शकता.—२ तीमथ्य २:२, १५, २३-२५; ४:२-५; नीतीसूत्रे २:१-५.
येशूने काही वेळा, राज्य संदेशाला मिळालेला प्रतिसाद किंवा त्याची उणीव दाखवण्यासाठी दाखल्यांचा उपयोग केला. त्याने हे सूचित केले की, काही लोक, मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून आलेल्या विरोधामुळे निरुत्साहित होऊन प्रगती करणार नाहीत. इतर जण राज्य संदेशाबद्दल असलेल्या त्यांच्या गुणग्राहकतेला नष्ट करण्यास ‘संकट आणि छळाला’ अनुमती देतील. आणखी इतर, सुवार्तेविषयी त्यांना जी प्रीती आहे तिला, दररोजच्या जीवनाच्या बाबी म्हणजेच, ‘संसाराच्या चिंता व द्रव्याच्या मोहांनी’ दाटवून टाकतील. दुसऱ्या बाजूला पाहता, असेही काही लोक आहेत जे आनंदाने प्रतिसाद देतात व मौल्यवान वचन ऐकण्यास तसेच त्याचा अर्थ समजून घेण्यास इच्छुक आहेत. ते, ख्रिस्ती धर्मजगतात, येशू ख्रिस्ताच्या नावाखाली होणाऱ्या “सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत.” असे लोक यहोवाच्या मार्गात प्रशिक्षण मिळवण्यास व अशाप्रकारे, बायबलमधून वाचत असलेल्या गोष्टी समजून घेण्यास उत्सुक असतात.—मत्तय १३:३-९, १८-२३; यहेज्केल ९:४; यशया २:२-४.
जे कोणी व्यक्तिगतरीत्या यहोवाच्या उद्देशांविषयीचे सूक्ष्मज्ञान प्राप्त करू इच्छितात, त्यांना आवश्यक ते साहाय्य पुरवले जाईल याची यहोवा खबरदारी घेईल. याचे उदाहरण द्यावयाचे झाले तर, यहोवाच्या आत्म्याने सुवार्तिक फिलिप्पाला एका इथियोपियन माणसाला मदत देण्यास निर्देशन केले असा अहवाल बायबलमध्ये आहे. हा षंढ जरुशलेममधून रथात बसून त्याच्या घरी परत जाताना बायबलमधील यशयाचा ग्रंथ वाचत चालला होता. यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार, फिलिप्प रथाकडे धावत गेला आणि त्याला विचारले: “आपण जे वाचीत आहा ते आपल्याला समजते काय?” तो माणूस नम्र होता व त्याला मदतीची गरज आहे हे त्याने प्रामाणिकपणे कबूल केले. फिलिप्पाने या आध्यात्मिक भुकेलेल्या व शिकवता येण्याजोग्या व्यक्तीला आनंदाने शिकवले. त्याला दिलेल्या या प्रशिक्षणाने शास्त्रवचने समजण्यास मदत केली. आता त्याला कळाले की अनंतकालिक जीवन मिळवण्यासाठी यहोवासोबत अनुकूल नातेसंबंध ठेवायचा असेल तर त्याला काय करण्याची गरज आहे. तो यहोवाचा एक आनंदी, बाप्तिस्माप्राप्त सेवक झाला आणि देवाला आवडणाऱ्या जीवनी मार्गाचा त्याने पाठलाग केला.—प्रेषितांची कृत्ये ८:२६-३९.
तुमच्या घरी कदाचित बायबल असेल आणि तुम्ही ते अनेकवेळा वाचलेही असेल. त्या प्रामाणिक, नम्र इथियोपियनने अनुभवल्यानुसार तुम्हाला देखील तीच समस्या आली असेल. तो जे वाचत होता ते त्याला समजले नाही. त्याला मदतीची आवश्यकता होती आणि यहोवा देवाला जी मदत पुरवण्यात आनंद वाटत होता ती स्वीकारण्यास तो कचरला नाही. फिलिप्पाप्रमाणे, यहोवाच्या साक्षीदारांना, देवाविषयी त्याच्या वचनात म्हणजे बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींची समज तुम्हाला देण्यास आनंद वाटतो. त्यांना माहीत आहे की, यहोवाने बायबल पुरवले आहे व ते समजून घ्यावे हा त्याचा उद्देश आहे.—१ करिंथकर २:१०; इफिसकर ३:१८; २ पेत्र ३:१६.
बायबल का आवश्यक आहे?
आपण मानवी इतिहासाच्या सर्वात निकडीच्या समयात जगत आहोत. बायबल याचा ‘युगाची समाप्ती’ असा उल्लेख करते. (मत्तय २४:३) १९१४ पासून ज्या पुष्कळ घटना बायबलच्या भविष्यवाणीनुसार घडत आहेत त्या दाखवतात की, फार लवकरच देवाचे स्वर्गीय राज्य ‘सर्व सरकारांचे चूर्ण करून त्यास नष्ट करील.’—दानीएल २:४४.
मत्तय २४ वा अध्याय, मार्क १३ वा अध्याय, आणि लूक २१ व्या अध्यायात काय भाकीत केले आहे ते तुम्ही स्वतः वाचून पाहावे. तुम्हास दिसून येईल की, त्यात वर्णिलेल्या घटना सार्वत्रिक चिंतेच्या आहेत. त्यामध्ये जागतिक महायुद्धांचा समावेश आहे जी इतर युद्धांपासून वेगळी आहेत. पहिल्या महायुद्धापासून आपण, अन्न टंचाई, भूमिकंप आणि अनीतीच्या असामान्य काळाबद्दल जे भाकीत केले होते ते प्रत्यक्षात पाहिले आहे. आता रा फार लवकरच असा दावा करतील जे बिनचूक याचे चिन्ह पुरवते की जगाचा नाश अगदी जवळ येऊन ठेपला आहे. प्रेषित पौलाने याविषयी असे लिहिले: “रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा [यहोवा, NW] दिवस येतो. शांति आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात तेव्हा . . . त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.” (१ थेस्सलनीकाकर ५:२, ३) कोणते लोक वाचणार नाहीत? पौल स्पष्टीकरण देतो: “जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत.” (२ थेस्सलनीकाकर १:७-९) संयुक्त चिन्हाचा काही भाग, मत्तय २४:१४ मधील “राज्याची ही सुवार्ता सर्व जगात” प्रचार करण्याच्या आज्ञेचे पालन करणाऱ्या लोकांना पूर्ण करावयाचे होते.
यहोवाचे लाखो साक्षीदार, २३१ राष्ट्रांमध्ये आणि समुद्राच्या बेटांवर ह्या आज्ञेचा प्रचार करीत आहेत. ते लोकांच्या घरी जातात व त्यांना यहोवाच्या राज्य सरकाराविषयी शिकण्याचे व्यक्तिगतरीत्या आमंत्रण देतात. या व्यवस्थीकरणातून बचावणाऱ्यांमध्ये असण्यासाठी व शोक, विलाप, दुःख, मृत्यू नसलेल्या एका नंदनवनमय पृथ्वीवर जगण्यासाठी प्रत्येकाने कशाप्रकारे कार्यहालचाल करावी ते प्रेमळपणे त्यांना दाखवून देतात.—प्रकटीकरण २१:३, ४.
या दुष्ट जगाच्या अंताचा वेळ वेगाने घटत चालला आहे, यास्तव ज्यांना या जगाच्या अंतापासून बचावून निघायचे आहे त्या सर्वांनी ‘सुवार्तेच्या पालनात’ काय काय गोवलेले आहे ते शिकून घेणे अत्यंत जरूरीचे आहे आणि अशाप्रकारे ते नाशापासून निभावतील. पुढील वेळी जेव्हा यहोवाचे साक्षीदार तुमच्या घरी येतील, तेव्हा साप्ताहिक बायबल अभ्यास करण्याचे निमंत्रण तुम्ही का स्वीकारू नये? याहूनही अधिक म्हणजे, तुम्हाला बायबल समजून घ्यायचे आहे यासाठी तुमच्यासोबत त्याचा अभ्यास करण्यास त्यांना का सांगू नये?
[चौकट]
बायबल समजून घेण्याचा मार्ग
येशूने आम्हाला खात्री दिली आहे की, त्याच्या मरण व पुनरूत्थानंतर, तो “विश्वासू आणि बुद्धिमान दास” वर्ग तयार करील जो त्याचा दळणवळणाचा मार्ग या नात्याने कार्य करील. (मत्तय २४:४५-४७) प्रेषित पौलाने इफिसमधील ख्रिश्चनांना या मार्गाची ओळख करून दिली जेव्हा त्याने लिहिले की, “जो युगादिकालाचा संकल्प त्याने आपल्या प्रभु ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गांतील अधिपति व अधिकारी ह्यांना मंडळीद्वारे आता कळावे.” (इफिसकर ३:१०, ११) सा. यु. पेंटेकॉस्ट ३३ रोजी जन्मलेली अभिषिक्त ख्रिश्चनांची ती मंडळी होती जिला “प्रकट केलेल्या गोष्टी” बहाल केल्या होत्या. (अनुवाद २९:२९) अभिषिक्त ख्रिस्ती समूह या नात्याने विश्वासू आणि बुद्धिमान दास कार्य करतात. (लूक १२:४२-४४) ‘प्रकट केलेल्या गोष्टींची’ आध्यात्मिक समज पुरवणे ही देवाकडून त्यांना दिलेली नेमणूक आहे.
बायबल भविष्यवाणीने मशीहाविषयी पुढे जसे दर्शविले आहे, त्याचप्रमाणे एकतेने आज विश्वासू आणि बुद्धिमान दास म्हणून कार्य करणाऱ्या अभिषिक्त ख्रिश्चन साक्षीदारांच्या वर्गाकडे ते निर्देशन करते.a ते आपल्याला देवाचे वचन समजण्यास साहाय्य करते. जे कोणी बायबल समजून घेऊ इच्छितात त्या सर्वांनी याची गुणग्राहकता बाळगली पाहिजे की, “देवाचे नानाविध ज्ञान” विश्वासू आणि बुद्धिमान दास या यहोवाच्या दळणवळणाच्या मार्गाद्वारेच प्रकट होईल.—योहान ६:६८.
[तळटीपा]
a मार्च १, १९८१ चे द वॉचटावर, पृष्ठे २४-३० पहा.