यहोवा समंजस आहे!
“वरून येणारी बुद्धी . . . समंजस आहे.”—याकोब ३:१७, NW.
१. काहींनी देवाचे वर्णन असमंजस म्हणून कसे केले आहे, व देवाविषयीच्या या दृष्टिकोनाबद्दल तुम्हाला कसे वाटते?
तुम्ही कोणत्या प्रकारच्या देवाची भक्ती करता? तुम्ही त्या देवाविषयी, तो एक ताठर, न्यायात कडक, करारी व स्वभावाने कडक आहे असा विश्वास बाळगता का? प्रॉटेस्टंट सुधारक जॉन कॅलविनल यांना, देव अशाच प्रकारचा वाटला असावा. कॅलविन यांनी दावा केला की, प्रत्येक व्यक्तीबद्दल “देवाकडे अनंतकाळ व न बदलणारी योजना” आहे. प्रत्येक व्यक्ती आनंदात सर्वकाळ जगेल किंवा नरकाग्नीत सर्वकाळ यातना भोगत राहील याबद्दलच्या पूर्वयोजना करतो. कल्पना करा: हे खरे असल्यास, तुम्ही काहीही करु शकत नाही, कितीही प्रयत्न केला असला तरी, त्यामुळे तुम्हाबद्दल व तुमच्या भवितव्याबद्दल देवाच्या दीर्घकालीन योजना न बदलणाऱ्या आहेत. अशा असमंजस देवाकडे तुम्ही आकर्षिले जाणार का?—पडताळा याकोब ४:८.
२, ३. (अ) आम्हाला मानवी प्रशिक्षण संस्था आणि संघटना यांच्या असमंजसपणाचे स्पष्टीकरण कसे देता येऊ शकते? (ब) यहोवाच्या स्वर्गीय रथाबद्दलचा यहेज्केलचा दृष्टांत यहोवाच्या जुळवून घेण्याविषयी काय प्रकट करतो?
२ पवित्र शास्त्रातील देव विलक्षणीयरित्या समंजस आहे, हे आम्ही शिकणे किती विरंगुळा देणारे आहे! देव नव्हे तर, मानवच कडक आणि ताठर आहेत, स्वतःच्या अपूर्णतांनी जखडलेले आहेत. मानवी संघटना, मालगाडीप्रमाणे सुलभपणे हाताळू न शकणाऱ्या आहेत. ही प्रचंड अवजड मालगाडी धावत असताना रुळावर काही अडथळा असल्यास, वळणे तर अशक्य कोटीतले असते व थांबणे इतके सोपे नसते. काही रेल्वेंची गती इतकी असते की, ब्रेक लावल्यानंतर एक किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापल्यावर त्या थांबतात! अशाचप्रकारे, प्रचंड मालवाहू जहाजाचे इंजिन बंद केल्यावर ते आणखी आठ किलोमीटरपर्यंत चालते. त्यांना दुसऱ्या दिशेला वळवले असतानाही, पाण्यात तीन किलोमीटरपर्यंत चालू शकते! परंतु, आता या दोन्हीपेक्षाही अधिक अद्भुत असणाऱ्या वाहनाचा विचार करा, ते देवाच्या संघटनेचे प्रतिनिधीत्व करणारे वाहन आहे.
३ जवळ जवळ २,६०० वर्षांपूर्वी, यहोवाने यहेज्केल संदेष्ट्याला त्याच्या आत्मिक प्राण्यांच्या स्वर्गीय संघटनेला चित्रित करणारा दृष्टांत दिला. हा भयप्रेरक प्रमाणबद्ध रथ होता, यहोवाचे हे “वाहन” नेहमीच त्याच्या नियंत्रणात असते. त्याने कशाप्रकारे वाटचाल केली हे अधिक चित्तवेधक आहे. चार बाजूला प्रचंड चाके होती व ती डोळ्यांनी भरलेली होती. यामुळे ते सर्वत्र पाहू शकते व न थांबता किंवा न वळता त्वरित आपली दिशा बदलू शकत होते. या प्रचंड वाहनाला मालवाहू जहाजासारखे किंवा मालवाहू रेल्वेप्रमाणे मंद गतीने चालण्याची जरुरी नाही. काटकोनी वळण घ्यावयाचे असले तरी ते विजेसारख्या गतीने धावू शकते! (यहेज्केल १:१, १४-२८) यहोवाचा रथ मानव निर्मित बोजड यंत्रापेक्षा जसा वेगळा आहे, तसाच, कॅलविनने शिफारस केलेल्या देवापासून यहोवा वेगळा आहे. तो पूर्णपणे जुळवून घेणारा आहे. यहोवाच्या व्यक्तिमत्त्वाच्या या पैलूची गुणग्राहकता बाळगल्याने जुळवून घेण्यास व हटवादीपणाचा मोह टाळण्यास आम्हाला मदत केली पाहिजे.
यहोवा—विश्वातील सर्वात अधिक जुळवून घेणारी व्यक्ती
४. (अ) प्रत्यक्ष यहोवाचे नावच त्याला तो जुळवून घेणारा देव आहे हे कोणत्या मार्गाने प्रकट करते? (ब) यहोवा देवाला काही कोणत्या पदव्या लागू होतात, व त्या का उचित आहेत?
४ यहोवा हे नावच जुळवून घेण्याला सूचित करते. “यहोवा” याचा शब्दशः अर्थ “तो घडवून आणतो” असा होतो. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, यहोवा त्याचे सर्व भविष्यवाद पूर्ण करण्यासाठी, घडवून आणणारा ठरतो. मोशेने देवाला त्याचे नाव विचारले असताना, यहोवाने त्याच्या नावातील अर्थाचे स्पष्टीकरण याप्रकारे दिले: “मी जो असावयाचा तोच असणार.” (निर्गम ३:१४, NW) पंडिता रमाबाई भाषांतर मार्मिकपणे असे म्हणते: “जो मी आहे तो मी आहे.” यहोवा त्याच्या धार्मिक उद्देशांना व अभिवचनांना पूर्ण करण्यास काहीही आवश्यक असल्यास तो कारणीभूत ठरतो किंवा घडवून आणणारा ठरतो. याप्रमाणे, तो सृष्टीकर्ता, पिता, सार्वभौम प्रभू, मेंढपाळ, सेनाधीश यहोवा, प्रार्थना ऐकणारा, न्यायाधीश, महान शिक्षक, पुनः विकत घेणारा या पदव्यांनी स्वतःला विभूषित करतो, ज्यांची अप्रतिम छाप आम्हावर पडते. हे सर्व घडविण्यासाठी, यापेक्षा अधिक म्हणजे त्याच्या प्रेमळ उद्देशांना पूर्ण करण्यासाठी तो कारणीभूत ठरला.—यशया ८:१३; ३०:२०; ४०:२८; ४१:१४; स्तोत्र २३:१; ६५:२; ७३:२८; ८९:२६; शास्ते ११:२७; तसेच न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन, अपेन्डिक्स १जे.
५. यहोवाचे जुळवून घेणे हे त्याचे स्तर व दर्जे बदलण्याचे सूचित करते असा निष्कर्ष आम्ही का काढू नये?
५ यास्तव, याचा अर्थ, देवाचा स्वभाव किंवा त्याचे दर्जे बदलले असा होतो का? नाही; याकोब १:१७ (मराठी कॉमन लँग्वेज बायबल) मध्ये सांगितल्यानुसार, “त्या जनकात फरक पडत नाही तो छायेसारखा बदलत नाही” असा तो आहे. येथे विसंगतता आहे का? कदापि नाही. उदाहरणार्थ, प्रेमळ पालक मुलांच्या लाभाकरता त्यांच्या भूमिका बदलत नाहीत काय? दिवसभरातील कामात, पालक सल्लागार असेल, आचारी, घरकाम पाहणारा, शिक्षक, शिस्त लावणारा, मित्र, कारागिर, परिचारिका इत्यादि असू शकतो. पालक या भूमिका बजावताना, त्यांचे व्यक्तिमत्त्व बदलत नाही. तो किंवा ती सध्याच्या गरजांनुरूप कार्य करतात. अशाचप्रकारे, मोठ्या प्रमाणात यहोवाच्या बाबतीत देखील आहे. तो त्याच्या प्राण्यांच्या फायद्यासाठी काय घडवून आणील याला काही मर्यादा नाही. खरोखर त्याची बुद्धी अगाध आहे!—रोमकर ११:३३.
समंजसपणा, ईश्वरी बुद्धीचे ओळखचिन्ह
६. ईश्वरी बुद्धीचे वर्णन करताना याकोबाने वापरलेल्या ग्रीक शब्दाचा अक्षरशः अर्थ व ध्वनित केलेले अर्थ कोणते आहेत?
६ शिष्य याकोबाने या सर्वोच्च जुळवून घेणाऱ्या देवाच्या बुद्धीचे वर्णन करण्यासाठी चित्तवेधक शब्दाचा वापर केला. त्याने लिहिले: “वरून येणारी बुद्धी . . . समंजस आहे.” (याकोब ३:१७, NW) त्याने येथे वापरलेला ग्रीक शब्द (इ·पि·ई·केसʹ) भाषांतर करण्यास अवघड आहे. भाषांतरकारांनी त्यासाठी “सौम्य,” “सदय,” “संयम,” व “विचारी” असे शब्द वापरले आहेत. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन त्याचा अनुवाद “समंजस” असा करुन खरा अर्थ “नमते घेणे” असे तळटीपेत देते.a हा शब्द, कायद्याच्या प्रत्येक अक्षराचा आग्रह न धरण्याचा, तसेच अतिशय कडक वा करारी न राहण्याचा देखील अर्थ देतो. विल्यम बार्कले, हे विद्वान न्यू टेस्टमेंट वर्डस् यामध्ये विवेचन मांडतात: “इपिईकेया याविषयीच्या मूळ व मूलभूत गोष्टीचा उगम देवापासून असल्याचा दिसतो. देवाने त्याच्या अधिकारांना आवर्जून सांगितले असते, त्याच्या देवाने फक्त नियमाच्या कडक दर्जांना आमच्यावर लागू केले असते तर आम्ही कोठे असतो? देव इपिईकेस असल्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे व तो इतरांसोबत इपिईकेया यासह वागतो.”
७. यहोवाने एदेन बागेत समंजसपणा कसा प्रदर्शित केला?
७ मानवजातीने यहोवाच्या सार्वभौमतेविरूद्ध बंडाळी केली त्यावेळेचा विचार करा. देवाने आदाम, हव्वा, व सैतान या तीन कृतघ्न बंडखोरांना देहान्त शासन देणे त्याच्यासाठी किती सोपे होते! असे करण्यामुळे स्वतःला हृदयव्यथा न होण्यापासून तो दूर ठेवू शकला असता! शिवाय, असा कडक न्याय करण्याचा अधिकार त्याला नाही, असा वाद कोण करु शकला असता? असे असतानाही, यहोवाने त्याच्या रथासमान स्वर्गीय संघटनेला न्यायाच्या कडक, जुळवून घेता न येणाऱ्या दर्जात जखडून ठेवले नाही. यामुळे तो रथ मानवी कुटुंबावर व मानवजातीच्या आनंदी भवितव्याकरता असणाऱ्या सर्व आशांना निर्दयीपणे चिरडून पुढे गेला नाही. याउलट, यहोवाने त्याच्या रथाला विजेसारख्या गतीने कुशलतेने कार्य करायला लावले. बंडाळीनंतर लगेचच यहोवा देवाने, आदामाच्या सर्व वंशजांना दया व आशा देणाऱ्या त्याच्या दीर्घकालीन उद्देशांना स्पष्ट केले.—उत्पत्ती ३:१५.
८. (अ) समंजसपणाबद्दल ख्रिस्ती धर्मराज्याचा चुकीचा दृष्टिकोन यहोवाच्या अस्सल समंजसपणाच्या विरोधात कसा आहे? (ब) यहोवा त्याच्या ईश्वरी तत्त्वांची हातमिळवणी करील, हे त्याचा समंजसपणा सूचित करीत नाही, असे आम्ही का म्हणू शकतो?
८ तथापि, यहोवाच्या समंजसपणामुळे, तो ईश्वरी तत्त्वांबरोबर हातमिळवणी करु शकतो, हे सूचित होत नाही. आज ख्रिस्ती धर्मराज्याचे चर्चेस त्यांच्या स्वच्छंदी कळपासह केवळ खुशामत करुन मर्जी संपादण्यासाठी अनैतिकतेकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा ते समंजस आहेत असे त्यांना वाटत असेल. (पडताळा २ तीमथ्य ४:३.) यहोवा त्याच्या नियमांचा कधी भंग करत नाही, किंवा तो त्याच्या तत्त्वांची हातमिळवणी देखील करीत नाही. उलटपक्षी, तो, त्या तत्त्वांना न्याय्यपणे व दयाशीलपणे लागू करता येण्यासाठी परिस्थितीनुरूप जुळवून घेण्यासाठी नमते घेण्याची स्वेच्छा प्रदर्शित करतो. तो त्याच्या न्याय व सामर्थ्याचा समतोल त्याच्या प्रीती व बुद्धी या गुणांसोबत राखण्यावर अधिक लक्ष देतो. यहोवा ज्या तीन मार्गांनी समंजसपणा प्रदर्शित करतो त्यांचा आपण विचार करु या.
“क्षमा करण्यास तत्पर”
९, १०. (अ) समंजसपणासोबत “क्षमा करण्यास तत्पर” याचा काय संबंध आहे? (ब) यहोवा, क्षमा करण्यास तत्पर आहे याचा दाविदाला कसा लाभ झाला, व का?
९ दाविदाने लिहिले: “हे यहोवा तू उत्तम व क्षमा करण्यास तत्पर आहेस; आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस.” (स्तोत्र ८६:५, NW) इब्री शास्त्रवचनांचे ग्रीक भाषेत भाषांतर केले तेव्हा, “क्षमा करण्यास तत्पर” याचा अनुवाद इ·पि·ई·केसʹ, किंवा “समंजस” असा केला होता. खरोखर, समंजसपणा प्रदर्शित करण्याचा कदाचित प्रमुख मार्ग, क्षमा करण्यास तत्पर आणि दया दाखविणे हा आहे.
१० यहोवा याबाबतीत किती समंजस आहे याबरोबर स्वतः दावीद चांगल्याप्रकारे परिचित होता. दाविदाने बथशेबाबरोबर व्यभिचार केला व त्याने तिच्या पतीला ठार मारले जाण्याची योजना केली तेव्हा, दावीद व बथशेबा दोघेही मृत्युची शिक्षा मिळण्याच्या पात्रतेचे होते. (अनुवाद २२:२२; २ शमुवेल ११:२-२७) जर हा खटला कडक मानवी न्यायाधीशांनी हाताळला असता, तर दोघांनाही आपल्या प्राणांस मुकावे लागले असते. परंतु, यहोवाने समंजसपणा (इ·पि·ई·केʹस), दाखविला, त्याविषयी वाइन्स् एक्सपोझिटरी डिक्शनरी ऑफ बिब्लिकल वर्डस् असे मांडते, “‘दयाशील व वाजवी वाटणाऱ्या एखाद्या गोष्टीच्या वस्तुस्थितीचा विचार करुन तो व्यक्त करतो.’” यहोवाच्या दयाशील निर्णयांवर परिणाम करणाऱ्या वस्तुस्थितीत, अपराध करणाऱ्याच्या प्रामाणिक पश्चात्तापाचा समावेश असण्याची शक्यता असते. स्वतः दाविदाने देखील पूर्वी इतरांना अशीच दया दाखविली. (१ शमुवेल २४:४-६; २५:३२-३५; २६:७-११; मत्तय ५:७; याकोब २:१३) तथापि, निर्गम ३४:४-७ मधील यहोवाच्या स्वतःबद्दलच्या वर्णनानुसार, यहोवा दाविदाला शासन करील हे योग्य होते. त्याने नाथान संदेष्ट्याला दाविदाकडे जोरदार संदेशासह पाठविले. यामुळे यहोवाच्या वचनाला तुच्छ लेखल्याची छाप दाविदावर पडली. दाविदाने पश्चात्ताप केला व यामुळे आपल्या पापामुळे तो मृत्यू पावला नाही.—२ शमुवेल १२:१-१४.
११. यहोवाने मनश्शेच्या बाबतीत, क्षमा करण्यास तत्परता कशी दाखविली?
११ याबाबतीत यहुदाचा राजा मनश्शे याचे उदाहरण अधिक उल्लेखनीय आहे. कारण मनश्शे बराच काळ दाविदापेक्षा फारच दुष्ट होता. मनश्शेने देशात, मानवी बलिदानासहित घृणित धार्मिक प्रथांना वाढविले. तो, विश्वासू संदेष्टा यशयाला ‘करवतीने चिरण्यासाठी’ देखील जबाबदार असेल. (इब्रीयांस ११:३७) मनश्शेला शिक्षा देण्यासाठी, बाबेलला त्याला कैद करुन नेण्यास यहोवाने परवानगी दिली. परंतु, मनश्शेने तुरुंगात असताना पश्चात्ताप केला व दयेची याचना केली. त्याच्या या मनःपर्वूक पश्चात्तापाकरता अशा या पराकोटीला गेलेल्या प्रकरणात देखील—यहोवा त्याला “क्षमा करण्यास तत्पर होता.”—२ इतिहास ३३:९-१३.
नवीन परिस्थिती उद्भवताना कार्यात बदल करणे
१२, १३. (अ) निनवेच्या बाबतीत कोणत्या परिस्थितीने यहोवाला त्याचा मार्ग बदलण्यास प्रवृत्त केले? (ब) योना, यहोवा देवापेक्षा कमी समंजस असल्याचे कसे शाबीत झाले?
१२ यहोवाचा समंजसपणा, नवीन परिस्थिती उद्भवतात तेव्हा, आधी ठरवलेल्या कार्यहालचालीत बदल करण्याच्या त्याच्या स्वेच्छेत दिसतो. उदाहरणार्थ, योना संदेष्ट्याने प्राचीन निनवेमध्ये पदयात्रा काढली तेव्हा त्याचा प्रेरित संदेश फारच सरळ होता: हे बलाढ्य शहर ४० दिवसात नष्ट होईल. परंतु, परिस्थिती नाट्यमयरित्या बदलली! निनवेकरांनी पश्चात्ताप केला.—योना, अध्याय ३.
१३ या बदल झालेल्या परिस्थितीत यहोवा आणि योनाने कशी प्रतिक्रिया दाखवली तो फरक बोध घेण्याजोगा आहे. यहोवाने याच्या परिणामस्वरुपात, त्याच्या स्वर्गीय रथाच्या कार्यात फेरफार केला. या घटनेत त्याने जुळवून घेतले, त्याने “रणवीर” असण्याऐवजी, पापाची क्षमा करणारा असे स्वतःला कारणीभूत केले. (निर्गम १५:३) दुसऱ्या बाजुला पाहता, योनाजवळ लवचीकता फारच कमी होती. यहोवाच्या रथासोबत मजल राखण्याऐवजी, त्याने आधी उल्लेख केलेल्या मालगाडीसारखे किंवा मालवाहू जहाजासारखे कार्य केले. त्याने नाशाचा संदेश घोषित केला, तर नाश आलाच पाहिजे! कदाचित त्याने विचार केला असेल की, या कार्यात झालेला कोणताही बदल म्हणजे निनवेकरांच्या दृष्टीने त्याची मानखंडना करण्यात होईल. असे असले तरी, यहोवाने त्याच्या कठोर संदेष्ट्याला सहनशीलतेने समंजसपणा व दया याचा संस्मरणीय धडा शिकवला.—योना, अध्याय ४.
१४. यहोवाने यहेज्केल संदेष्ट्याविषयी त्याच्या कार्यात का बदल केला?
१४ यहोवाने इतर प्रसंगी त्याच्या मार्गात—सापेक्षपणे क्षुल्लक गोष्टीच्या बाबतीत देखील बदल केला. उदाहरणार्थ, एके प्रसंगी त्याने यहेज्केल संदेष्ट्याला भविष्यवादित नाटकात भूमिका करण्याचे बजावले तेव्हा, यहोवाच्या निर्देशनात, यहेज्केलने मानवी विष्ठेचा इंधन म्हणून स्वयंपाकासाठी वापर करण्याचा समावेश यात होता. संदेष्ट्याकरता हे अति होते, कारण त्याने म्हटले, “अहा! प्रभू परमेश्वरा!” [यहोवा, NW] व इतकी तिरस्करणीय गोष्ट करण्यासाठी सांगू नको म्हणून त्याने याचना केली. यहोवाने संदेष्ट्याच्या भावनांना असमंजस समजून त्या काढून टाकल्या नाहीत. उलटपक्षी, अनेक देशात आजही वापरण्यात येणारे शेण त्याने यहेज्केलला वापरण्यास परवानगी दिली.—यहेज्केल ४:१२-१५.
१५. (अ) यहोवा मानवप्राण्यांचे ऐकण्यास व त्यांना प्रतिसाद देण्यास इच्छुक असल्याची कोणती उदाहरणे दाखवितात? (ब) हे आम्हाला कोणता धडा शिकवू शकते?
१५ आमचा देव यहोवा याच्या लीनतेवर मनन करणे हर्षदायक नाही का? (स्तोत्र १८:३५) तो आमच्यापेक्षा अतिउच्च आहे; तरीही, तो अपरिपूर्ण मानवांचे धीराने ऐकतो व कधीकधी त्यानुसार तो त्याच्या कार्यात बदल देखील करतो. त्याने अब्राहामाला सदोम आणि गमोराच्या नाशासंबंधी अधिक काळ विनंती करण्यासाठी परवानगी दिली. (उत्पत्ती १८:२३-३३) तसेच, बंडखोर इस्राएलांचा नाश करण्याची व त्यांच्याऐवजी मोशेमधून एखाद्या राष्ट्राची निर्मिती करावी या यहोवाच्या योजनेला, त्याने मोशेला आक्षेप घेऊ दिला. (निर्गम ३२:७-१४; अनुवाद ९:१४, १९; पडताळा आमोस ७:१-६.) अशाप्रकारे, त्याने त्याच्या मानवी सेवकांसाठी परिपूर्ण उदाहरण मांडले, ज्यामुळे त्यांनीही समंजस व ते करण्यास शक्य असल्यास, इतरांचे ऐकण्यासाठी त्याच्याप्रमाणेच तत्परता दाखवली पाहिजे.—पडताळा याकोब १:१९.
अधिकाराच्या वापरात समंजसपणा
१६. यहोवा ज्याप्रकारे त्याचा अधिकार चालवतो त्यात तो अनेक मानवांपेक्षा वेगळा कशाप्रकारे आहे?
१६ वैयक्तिकांना अधिक अधिकार मिळतो तेव्हा, ते कमी समंजस होतात हे तुमच्या निदर्शनाला कधी आले का? उलटपक्षी, यहोवाजवळ विश्वातील सर्वोच्च अधिकाराचे स्थान आहे, तरीही तो समंजसपणाचे मूलभूत उदाहरण आहे. तो त्याचा अधिकार अक्षय समंजस मार्गाने चालवतो. अनेक मानवांप्रमाणे, यहोवाला त्याचा अधिकार गमावला जाण्याचे भय वाटत नाही. यास्तव, इतरांना काही प्रमाणात अधिकार दिल्यावर स्वतःचा अधिकार कमी होण्याचा धोका त्याला वाटत नाही. या कारणामुळे, स्वतःच्या अधिकाराला मत्सराने सुरक्षित ठेवण्याची जरुरी त्याला वाटत नाही. वस्तुतः, विश्वामध्ये त्याच्याशिवाय दुसरा केवळ एक व्यक्ती होती तेव्हा, यहोवाने त्याला मोठ्या प्रमाणात अधिकार दिला. त्याने लोगॉस याला त्याचा “कुशल कारागीर” केले. त्यानंतर या प्रिय पुत्राद्वारे त्याने सर्व गोष्टी बनविण्यास आरंभ केला. (नीतीसूत्रे ८:२२, २९-३१; योहान १:१-३, १४; कलस्सैकर १:१५-१७) नंतर त्याने “स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार” त्याला दिला.—मत्तय २८:१८; योहान ५:२२.
१७, १८. (अ) यहोवाने सदोम आणि गमोरात देवदूतांना का पाठविले? (ब) यहोवाने, अहाबाला कसे फसवावे याबद्दल देवदूतांना सल्ला का विचारला?
१७ अशाप्रकारे, यहोवा स्वतः उत्तम रीतीने काम करु शकत असताना देखील त्याने त्याच्या अनेक प्राण्यांवर ती कामगिरी सोपवली. उदाहरणार्थ, अब्राहामाला त्याने सांगितले, “त्याच्याविषयीची जी ओरड माझ्या कानी आली आहे, तशीच त्यांची करणी आहे की काय हे पाहावयास मी खाली [सदोम व गमोराला] जातो; तसे नसेल तर मला कळून येईल” असे त्याने म्हटले तेव्हा, तो व्यक्तीशः तेथे जाईल असा त्याचा अर्थ होत नव्हता. उलटपक्षी, यहोवाने त्याच्यासाठी माहिती गोळा करावी म्हणून, देवदूतांना नियुक्त करुन तो अधिकार प्रातिनिधिकरित्या सोपवण्याचे पसंत केले. त्याने वस्तुस्थितीचा शोध घेण्याच्या कार्याकरता तसेच परत येऊन तो अहवाल सांगण्याचा अधिकार त्यांना दिला.—उत्पत्ती १८:१-३, २०-२२.
१८ दुसऱ्या एके प्रसंगी, यहोवाने दुष्ट राजा अहाबावर दंडाज्ञा बजावण्याचा निश्चय केला तेव्हा, त्या धर्मत्यागी राजाला युद्धाला पाठवून त्यात त्याचे पतन घडण्यासाठी कोण त्याला “मूर्ख” बनविल, याविषयी प्रस्ताव मांडण्यासाठी त्याने स्वर्गीय सभेतील देवदूतांना बोलावले. यहोवा सर्व बुद्धिचा उगम असल्यामुळे, सर्वोत्तम हालचालीबद्दल त्याला कोणाच्या सल्ल्याची गरज नव्हती! तरीही, त्याने देवदूतांना त्यांचा अभिप्राय मांडण्याचा विशेषाधिकार प्रदान करुन त्यांना मोठेपणा दिला व ज्यांची त्याने निवड केली अशांवर कार्य करण्याचा अधिकार दिला.—१ राजे २२:१९-२२.
१९. (अ) यहोवा जे नियम बनवितो त्यांना तो मर्यादित का ठेवतो? (ब) यहोवा आमच्याकडून ज्याची अपेक्षा करतो या अनुषंगाने तो स्वतः समंजस असल्याचे कसे दाखवतो?
१९ यहोवा त्याच्या अधिकाराचा वापर इतरांवर अयोग्यपणे नियंत्रण ठेवण्यासाठी करत नाही. यामध्ये देखील तो अतुलनीय समंजसपणा दाखवतो. त्याने बनविलेल्या नियमांच्या संख्येची तो काळजीपूर्वक मर्यादा ठेवतो. तसेच, त्याच्या सेवकांना त्यांनी स्वतः बनविलेल्या नियमांचा भार वाढवून ‘शास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये’ म्हणून तो मनाई करतो. (१ करिंथकर ४:६; प्रे. कृत्ये १५:२८; ची तुलना मत्तय २३:४ करा) तो मानवप्राण्यांकडून अंध आज्ञाधारकपणाची कधीही अपेक्षा करीत नाही. तर तो त्यांना मार्गदर्शित करण्यासाठी नेहमीच पुरेशी माहिती पुरवत असतो. आज्ञापालन करण्याचे लाभ तसेच आज्ञाभंग करण्याचे परिणाम त्यांना माहीत होऊ देण्यासाठी त्यांच्यापुढे तो निवड ठेवतो. (अनुवाद ३०:१९, २०) अपराध, लज्जा, किंवा भय याद्वारे लोकांना भाग पाडण्याऐवजी, तो त्यांच्या हृदयाप्रत पोहंचण्याचा शोध घेतो. लोकांनी त्याची सेवा जबरदस्तीने नव्हे तर अस्सल प्रेमामुळे करावी अशी त्याची इच्छा आहे. (२ करिंथकर ९:७) अशी पूर्ण जिवाने केलेली सेवा देवाच्या अंतःकरणाला आनंदित करते यास्तव, तो असमंजस, “कठोर” नाही.—१ पेत्र २:१८; नीतीसूत्रे २७:११; पडताळा मीखा ६:८.
२०. यहोवाच्या समंजसपणाचा परिणाम तुम्हांवर कसा होतो?
२० यहोवाजवळ सृष्टीतील कोणाही व्यक्तीपेक्षा अधिक सामर्थ्य असताना देखील, तो त्याच्या सामर्थ्याचा वापर असमंजसपणे, इतरांना घाबरविण्यासाठी कधीही करत नाही हे उल्लेखनीय नाही का? तथापि, त्याच्या तुलनेत मानव अतिशय क्षुद्र असतानाही, एकदुसऱ्यांवर सत्ता गाजविण्याचा त्यांचा इतिहास आहे. (उपदेशक ८:९) समंजसपणा हा खरोखर मोलवान गुण असल्याचे उघड आहे. हा असा गुण आहे जो यहोवावर अधिक प्रीती करण्यास आम्हाला चालना देतो. त्याच्या परिणामात या गुणाचा विकास आम्हामध्ये करण्यासाठी कदाचित चालना मिळेल. हे आम्ही कसे करु शकतो? पुढील लेख हा विषय हाताळील.
[तळटीपा]
a मागे १७६९ मध्ये, शब्दकोशकार जॉन पॉर्कहर्स्ट यांनी या शब्दाची “नमते घेणे, नमते घेण्याच्या योग्यतेचा, सौम्य, मनमिळाऊ, सहनशील” अशी व्याख्या केली. इतर विद्वानांनी देखील “नमते घेणे” याला एक व्याख्या म्हणून सादर केले.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ यहोवाचे नाव व स्वर्गीय रथाबद्दलचा त्याचा दृष्टांत त्याच्या जुळवून घेण्यावर कसा जोर देतो?
▫ समंजसपणा काय आहे, व तो ईश्वरी बुद्धीचे चिन्ह का आहे?
▫ यहोवा “क्षमा करण्यास तत्पर” आहे, हे त्याने कोणत्या मार्गांनी दाखवून दिले?
▫ यहोवाने विशिष्ट परिस्थितीत, अपेक्षा केलेल्या मार्गात बदल करण्याची निवड का केली?
▫ यहोवा ज्याप्रकारे त्याचा अधिकार चालवतो त्यामध्ये तो त्याचा समंजसपणा कसा दाखवतो?
[१० पानांवरील चित्रं]
यहोवाने दुष्ट राजा मनश्शेला क्षमा का केली?