वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ३/१५ पृ. २८-३१
  • योसेफसचा अत्यंत मोहक कालवृत्तांत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • योसेफसचा अत्यंत मोहक कालवृत्तांत
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • त्याचे आरंभीचे जीवन
  • रोमकडे व परत
  • फ्लेवियस जोसेफसने केलेली लिखाणे
  • देववचनातील अंतर्दृष्टी
  • रोम्यांविरुद्धची मोठी बंडाळी
  • युद्धानंतर
  • हे विधान जोसिफसनेच केले होते का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • तुम्हाला माहीत होते का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • देव कार्य करील तेव्हा तुमचा बचाव होईल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ३/१५ पृ. २८-३१

योसेफसचा अत्यंत मोहक कालवृत्तांत

इतिहासाच्या विद्यार्थ्यांना योसेफसच्या लिखाणाची बऱ्‍याच काळापासून भुरळ पडली आहे. तो ख्रिस्ताच्या मृत्युच्या केवळ चार वर्षांनी जन्मला, येशूने पहिल्या शतकाच्या यहूदी राष्ट्राबद्दल दिलेल्या भविष्यवाण्यांच्या शहारक पूर्णता त्याने पाहिल्या. योसेफस हा लष्करी अधिकारी होता, तो चतुर, परुशी व प्रामाण्य होता.

योसेफसची लिखाणे आकर्षक वर्णनांनी भरलेली आहेत. ही वर्णने पॅलेस्टाईनची स्वाभाविक रचना व भूगोल याबाबतीत खरे मार्गदर्शन देत असता, पवित्र शास्त्राच्या अस्सलपणाला उजळवितात. त्यामुळे पुष्कळ जण त्याच्या लिखाणांना आपल्या संग्रही ठेवून आहेत यात काही नवल नाही!

त्याचे आरंभीचे जीवन

योसेफ बेन मत्थिया किंवा योसेफस याचा जन्म, रोमी सम्राट कॅलिगुला याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी म्हणजे, सा. यु. ३७ मध्ये झाला. योसेफसचा पिता याजकीय घराण्यातील होता. त्याची आई, त्याच्या मते योनाथान प्रमुख याजकाच्या हासमोनन कुळातील होती.

किशोरावस्थेत असताना योसेफस मोशेच्या नियमशास्त्राचा गाढ अभ्यासक होता. त्याने परुशी, सदूकी व एस्सेनस्‌ या यहूदी धर्मातील तीन पंथांचे सूक्ष्म परीक्षण केले. यातील शेवटल्या पंथाबद्दल आपले अनुकूल मत दाखवून त्याने बानस या एस्सेनस्‌ पंथाच्या वाळवंटात राहणाऱ्‍या संन्यासासोबत तीन वर्षे घालवण्याचा निर्णय घेतला. मग, १९ व्या वर्षी हे सोडून तो यरुशलेमेस आला व तो परुशांच्या गटास येऊन मिळाला.

रोमकडे व परत

योसेफस रोमला सा. यु. ६४ मध्ये गेला व तेथे त्याने यहूदी याजकांच्या तर्फे मध्यस्ती केली. या याजकांना यहूदी प्रांताधिकारी फेलिक्स याने सम्राट निरोकडे चौकशीसाठी पाठवले होते. प्रवासात जहाज फुटण्याचा अनुभव घडला व योसेफस जवळजवळ मृत्युतून वाचला. जहाजावरील ६०० प्रवाश्‍यांपैकी केवळ ८० वाचू शकले.

योसेफस रोमला भेट देते वेळी तेथील एका यहूदी अभिनेत्याने त्याला निरोची बायको सम्राज्ञी पॉपिआ हिची ओळख करून दिली. तिने योसेफसच्या यशाच्या कार्यात प्रमुख भूमिका बजावली. शहराचे दैदिप्यमान वैभव योसेफसच्या मनात कायमचे घर करून बसले.

योसेफस यहूदीयात परतल्यावर, यहूद्यांनी रोमविरुद्ध बंडाळी करण्याचा चांगलाच चंग बांधला होता असे त्याला दिसले. त्याने आपल्या देशवासियांना रोमविरुद्ध उठाव करण्यात केवढी व्यर्थता आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांना आवर घालण्यात आलेले अपयश तसेच, आपण फितुर आहोत असा लोकांनी विचार करण्याची भीती, यामुळे त्याने गालीलात यहूदी सैन्यामध्ये अधिकारी होण्याची नेमणूक पत्करली. योसेफसने आपल्या सैनिकांना संघटित केले, त्यांना तालीम दिली आणि रोमी सैन्याविरुद्ध लढत देण्यासाठी तयारी करताना त्याने अन्‍नसाठाही जमविला. पण सर्वकाही व्यर्थ ठरले. गालील व्हेस्पासियनच्या सैन्यापुढे पडले. साधारण ४७ दिवस पडलेल्या वेढ्यानंतर, योसेफसचा योतपता येथील किल्ला सर करण्यात आला.

शरणागती घेत असताना योसेफसने अगदी चाणाक्षपणे भाकीत केले की, व्हेस्पासिन लवकरच सम्राट होणार. त्याला कैदेत टाकण्यात आले, पण त्याच्या भाकीतामुळे त्याची शिक्षा टळली, आणि भाकीत खरे ठरल्यावर त्याला सोडण्यात आले. हे त्याच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले. मग, बाकीच्या युद्धात त्याला रोममध्ये दुभाषी किंवा मध्यस्तीने बोलणारा अशी सेवा मिळाली. व्हेस्पासिन आणि त्याचे टायटस व डॉमितीयन या मुलांचा आश्रय मिळाल्यावर योसेफसने आपल्या नावापुढे फ्लेवियस हे कुळनाव लावले.

फ्लेवियस जोसेफसने केलेली लिखाणे

योसेफसचे सर्वात जुने लिखाण यहूदी युद्ध हे आहे. त्याने हे सात खंडाचे लिखाण यहूद्यांना रोमच्या श्रेष्ठ बळाची चांगली वर्णनात्मक कल्पना करून द्यावी, आणि भविष्यकाळातील अपेक्षिलेल्या सर्व बंडाळ्यांना बांध घालता यावा म्हणून केले असल्याचे समजले जाते. ही लिखाणे यरुशलेमेला अँटीओक इपिफनीस याने (सा. यु. पू. दुसऱ्‍या शतकात) जिंकून घेण्यापासून ते सा. यु. ६७ च्या प्रक्षुब्ध बंडाळीपर्यंतच्या यहुदी इतिहासाचे परीक्षण करतो. मग स्वतः साक्षीदार या नात्याने जोसेफस सा. यु. ७३ मध्ये त्याचा कळस गाठेपर्यंतची माहिती देतो.

योसेफसचे आणखी एक लिखाण, यहूद्यांचा प्राचीन काळ (इंग्रजी) जे २० खंडाचे आहे, त्यात यहूद्यांचा इतिहास आढळतो. उत्पत्ती व निर्मितीपासून याची सुरवात होऊन, रोमसोबत भडकलेल्या युद्धापर्यंतची माहिती यात आहे. योसेफस पवित्र शास्त्राने दिलेल्या वर्णनाचे जवळून निरिक्षण करतो, व त्यात सांप्रदायिक उलगडा व बाहेरील परीक्षणांची भर घालतो.

जीवन (इंग्रजी) हे आणखी एक योसेफसने व्यक्‍तिगत रुपाने केलेले लिखाण आहे. यात तो, युद्धासंबंधाने घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करतो व तिबिर्यच्या जस्टसने त्याच्या विरुद्ध लावलेल्या दोषारोपाचे निरसन करतो. चवथे लिखाण दोन खंडाचे स्पष्टीकरण आहे, त्याचे नाव एपियन विरुद्ध (इंग्रजी) असे आहे व यात चुकीचे प्रतिनिधित्व होण्यापासून यहूद्यांचे समर्थन केलेले आहे.

देववचनातील अंतर्दृष्टी

योसेफसने लिहिलेला इतिहास हा बहुतेक अचूक आहे यात काही संशय नाही. एपियन विरुद्ध (इंग्रजी) असे शीर्षक असणाऱ्‍या त्याच्या लिखाणात तो दाखवतो की, यहूद्यांनी खरेपणाचा संशय वाटणाऱ्‍या पुस्तकांना प्रेरित शास्त्रवचनांचा भाग कधीच होऊ दिले नाही. ईश्‍वरी लिखाणाची अचूकता व अंतर्गत मेळ याबद्दल तो साक्ष देतो. तो म्हणतो: “आम्हा यहूद्यांना, एक दुसऱ्‍यांविरुद्ध मतदर्शक असणारी अगणित पुस्तके नाहीत, . . . पण केवळ बावीस पुस्तके [शास्त्रवचनात सध्याच्या विभाजनानुसार असणारी ३९ पुस्तके] आहेत, ज्यामध्ये गतकाळाचा सर्व अहवाल उपलब्ध आहे; व तो सर्व खरेपणाने ईश्‍वरी असा मानण्यात येतो.”

यहूद्यांचा प्राचीन काळ (इंग्रजी) या लिखाणात योसेफस पवित्र शास्त्र अहवालाला मनोरंजक माहिती जोडतो. तो म्हणतो की, अब्राहामाने आपल्या मुलाचे बलिदान करण्यासाठी त्याचे हातपाय बांधले तेव्हा “इसहाक पंचवीस वर्षांचा होता.” यज्ञाची वेदी बांधण्याची मदत दिल्यावर योसेफसच्या मते इसहाकाने असे म्हटलेले आहे की, “‘देवाची व पालकाची इच्छा धुडकावून लावणे आहे तर, ज्येष्ठपणा काही उपयोगाचा नाही.’ . . . यासाठी तो वेदीवर स्वतःचे बलिदान व्हावे म्हणून त्वरेने जाऊन निजला.”

प्राचीन मिसरातून इस्राएलने केलेल्या निर्गमनाच्या शास्त्रवचनीय अहवालास जोसेफस ही खास वर्णने जोडतो: “त्यांच्या मागोमाग सहाशे रथ, पन्‍नास हजार स्वार आणि दोन हजार पायदळ आपल्या शस्त्रानिशी मागे लागली.” योसेफस असेही म्हणतो की, “शमुवेल बारा वर्षांचा असताना संदेशकथन करू लागला; आणि एकदा तो झोपलेला असता देवाने त्याला नावाने हाक मारिली.”—पडताळा १ शमुवेल ३:२-२१.

योसेफसची इतर लिखाणे कर, नियम, व घटनांबद्दलची अंर्तदृष्टी देतात. हेरोदाच्या उत्सवप्रसंगी नाच केलेल्या व बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाचे शीर मागणाऱ्‍या मुलीचे नाव तो सलोमी असे देतो. (मार्क ६:१७-२६) आपल्याला हेरोदाबद्दल जी माहिती आहे ती सर्व योसेफसने दिली. तो असे देखील म्हणतो की, “आपले वय लपवता यावे यासाठी [हेरोद] आपले केस काळे करीत असे.”

रोम्यांविरुद्धची मोठी बंडाळी

येशूने यरुशलेम व त्याच्या मंदिराबद्दल दिलेल्या भविष्यवाणीची पूर्णता केवळ ३३ वर्षानंतर होण्यास आरंभ झाला. रोमचे जू उडवून द्यावे असा, जहाल यहूदी गटाचा निश्‍चय ठरला. ही वार्ता ऐकून सा. यु. ६६ मध्ये सिरियाचा प्रांताधिकारी सेस्टीयस गॅलसच्या नेतृत्त्वाखाली रोमी तुकड्यांची जमावजमव व त्यांना यरुशलेमेकडे पाठवणे सुरु झाले. बंड मोडावे व बंडखोरांना शिक्षा करावी हा त्या कार्याचा हेतू होता. यरुशलेमेच्या उपनगरात थोडी नासधूस केल्यावर सेस्टीयसच्या सैन्याने तटाबाहेर तळ दिला. शत्रूपासून संरक्षण मिळावे म्हणून रोमी सेनेने कासवाच्या पाठीसारख्या मोठ्या ढालीचा वापर केला. या पद्धतीच्या यशाचे वर्णन करताना योसेफस म्हणतो: “फेकण्यात आलेले जळते बाण त्यांना काहीही इजा न करता बाजूला पडले; आता सैनिकांना स्वतःला कसलीही इजा होऊ न देता तटाला खचवता आले आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराला आग लावता यावी म्हणून सर्व सामग्री सज्ज ठेवली गेली.”

योसेफस म्हणतो, “मग असे झाले की, सेस्टीयसने . . . सैनिकांना त्या ठिकाणाहून परत बोलावले . . . कसल्याही प्रकारचे कारण नसताना तो त्यांच्यासह त्या शहरातून निघून गेला.” तर मग हे स्पष्ट आहे की, देवाच्या पुत्राचे गौरव करण्याचा मानस न राखता योसेफसने त्या कृत्याची नोंद करवली, ज्याच्यासाठी ख्रिश्‍चनांनी वाट पाहिली होती. ही तर येशू ख्रिस्ताच्या भविष्यवाणीची पूर्णता होती! काही वर्षांआधी देवाच्या पुत्राने असा इशारा दिला होता: “यरुशलेमेस सैन्याचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. त्या वेळेस जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे व जे शिवारात असतील त्यांनी तिच्या आत येऊ नये; कारण शास्त्रलेखातल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे सूड घेण्याचे दिवस आहेत.” (लूक २१:२०-२२) येशूने सूचना दिल्याप्रमाणे त्याचे विश्‍वासू अनुयायी लगेच शहराबाहेर पळून गेले व दूर राहिले, आणि शहराला जी नंतर पीडा सहन करावी लागली तिच्यामधून ते वाचले.

सा. यु. ७० मध्ये रोमी सैन्य परतले तेव्हा जे परिणाम घडले त्याचे, डोळ्यांसमोर चित्र उभे करील, असे सविस्तर वर्णन योसेफसने लिहिले. यरुशलेम व त्याचे भव्य मंदिर काबीज करण्यासाठी व्हेस्पासियनचा ज्येष्ठ पुत्र सेनापती टायटस आला. शहरात लढणाऱ्‍या गटाने नियंत्रण ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अतिरेकी प्रमाणांचा वापर करून खूप रक्‍तपात घडवला. काही “तर अंतर्गत विपत्तींमुळे इतके हैराण झाले होते की, रोम्यांनी येऊन स्वारी करावी” व त्याद्वारे “आपल्याला आतील त्रासापासून सुटका मिळावी असे इच्छिले,” असे योसेफस म्हणतो. त्याने शहराच्या आतील भागात बंड निर्माण करणाऱ्‍यांना “लुटारू” म्हटले, ज्यांनी धनवान लोकांच्या मिळकतींचा नाश घडवला आणि रोम्यांसोबत हातमिळवणी करू पाहण्याची इच्छा धरणाऱ्‍या प्रतिष्ठित लोकांबद्दल शंका वाटून त्यांचा खून केला.

मुलकी युद्धात शहरातील जीवनमान विचार करता येणार नाही इतक्या खालच्या पातळीला गेले, आणि तेथील मृतांना तर दफन करण्याचेही राहून गेले. राजद्रोह्‍यांनी “आपसात लढत असता मृत देहांच्या पडलेल्या खचाला आपल्या पायाखाली तुडवले.” त्यांनी लोकांची पिळवणूक सुरु केली आणि अन्‍न व संपत्तीसाठी त्यांचा खून केला. पिडीतांचा आकांत सतत चालू होता.

टायटसने यहूद्यांना शरणागती पत्करून स्वतःचा जीव वाचवण्याचे आव्हान केले. त्याने “योसेफसला त्यांच्याकडे त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी पाठवले; कारण स्वदेशवासियाच्या आग्रहापुढे ते नमतील असा त्याने विचार केला.” पण त्यांनी योसेफसची निंदा केली. मग, टायटसने सबंध शहराभोवती सूक्ष्म कोन असणारे मोर्चे उभारले. (लूक १९:४३) आता सुटकेची सर्व आशा निवळल्यामुळे आणि सर्व हालचाल ठप्प झाल्यामुळे दुष्काळाने “घरोघरी व कुटुंबांवर झडप घातली व लोकांना गिळले.” सतत चाललेल्या लढाईमुळे मृतांची संख्या वाढतच गेली. टायटसने यरुशलेम जिंकून पवित्र शास्त्र भविष्यवाणीची अजाणतेत पूर्णता केली. नंतर, त्याच्या प्रचंड भिंती व मजबूत बुरूज बघून तो उद्‌गारला: “या मजबूत बांधकामातून यहूद्यांना देवाशिवाय कोणीही बाहेर घालवले नाही.” दहा लाख यहूद्यांचा संहार घडला.—लूक २१:५, ६, २३, २४.

युद्धानंतर

युद्धानंतर योसेफस रोमला गेला. रोमच्या फ्लेवियन कुटुंबाच्या जोखमदारीवर राहून त्याने रोमी नागरिक म्हणून व्हेस्पासियनच्या जुन्या राजवाड्यात आपले जीवन व्यतित केले. येथे त्याला बादशाही सेवानिवृत्तीचे वेतन आणि टायटसकडून विविध बक्षिसे मिळाली. यानंतर जोसेफसने साहित्य लिखाणाच्या कामात हात घातला.

जोसेफसनेच “ईश्‍वरसत्ताक” या शब्दाची घडण केली हे जाणणे मोठे मनोरंजक आहे. यहूदी राष्ट्राच्या बाबतीत त्याने लिहिले: “आमचे सरकार . . . ईश्‍वरसत्ताक पद्धतीचे आहे असे म्हणता येईल. त्याचा अधिकार व सामर्थ्य देवाकडेच आहे.”

योसेफसने ख्रिस्ती असल्याचा दावा कधीच केला नाही. त्याने ईश्‍वरी प्रेरणेने लिखाण केले नाही. तरीही, त्याच्या अत्यंत मोहक कालवृत्तांतामध्ये बौद्धिकदृष्ट्या प्रज्वलित स्वरुपाचे ऐतिहासिक मोल आहे.

[३१ पानांवरील चित्रं]

यरुशलेमेच्या तटापुढे असलेला योसेफस

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा