तुमचा संयम राखा व तो भरपूर होऊ द्या
“तुमच्या विश्वासात . . . इंद्रियदमनाची [संयम] भर घाला.”—२ पेत्र १:५, ६.
१. कोणत्या असामान्य परिस्थितीत एखादा ख्रिस्ती साक्ष देऊ शकतो?
येशूने म्हटले: “तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्यापुढे नेण्यात येईल . . . आणि तुम्ही त्यांना साक्ष व्हाल.” (मत्तय १०:१८) तुम्हाला देशाधिकारी किंवा राष्ट्राध्यक्षापुढे बोलावल्यास, तुम्ही काय बोलाल? कदाचित सर्वप्रथम, तुमच्यावर हा दावा का लावण्यात आला आहे की ज्यामुळे तुम्ही तिथे आहात याविषयी विचारणा करणार. देवाचा आत्मा तसे करण्यास तुम्हाला मदत करील. (लूक १२:११, १२) परंतु इंद्रियदमनाविषयी [संयम] बोलण्याची कल्पना तुम्ही कराल का? तो तुमच्या ख्रिस्ती संदेशाचा महत्त्वाचा भाग आहे असा तुम्ही विचार करता का?
२, ३. (अ) पौल, फेलिक्स आणि द्रुसिल्ला यांना साक्ष देऊ शकला हे कसे घडून आले? (ब) पौलाला, त्या प्रसंगी बोलण्यासाठी संयम हा उचित विषय का होता?
२ एका खऱ्या घडलेल्या उदाहरणाचा विचार करा. यहोवाच्या एका साक्षीदाराला अटक करुन त्याला चौकशीला आणले गेले. त्याला बोलण्याची संधी दिली असता, साक्ष व्हावी म्हणून, व ख्रिस्ती या नात्याने त्याला त्याचा विश्वास स्पष्ट करावयाचा होता. त्या अहवालाचे परीक्षण तुम्ही करु शकता व तुम्हाला कळेल की त्याने “नीतिमत्त्व, इंद्रियदमन [संयम] व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी” न्यायालयीन रसाक्ष दिली. आम्ही कैसरीयातील प्रेषित पौलाच्या अनुभवाचा उल्लेख करीत आहोत. तेथे प्रथम त्याची चौकशी झाली. “काही दिवसानंतर फेलिक्स त्याची पत्नी द्रुसिल्लाबरोबर आला, तो यहुदी होता, व त्याने पौलाला पाठवून येशू ख्रिस्तावरील विश्वासाविषयी त्याचे ऐकले.” (प्रे. कृत्ये २४:२४) इतिहास अहवाल देतो की, “फेलिक्सने सर्व प्रकारची क्रुरता आणि सुखविलास केला व आपल्या राजशक्तीचा वापर दासाच्या गुणासारखा केला.” द्रुसिल्लाने तिच्या पतीला घटस्फोट देण्यासाठी (देवाच्या नियमाचे उल्लघंन करुन) व त्याची तिसरी पत्नी होण्यासाठी तिचे मन वळविण्यापूर्वी त्याचा दोनदा विवाह झाला होता. कदाचित तिला या नव्या धर्माबद्दल, म्हणजे ख्रिस्ती धर्माबद्दल शिकायचे होते.
३ पौल, “नीतिमत्त्व, इंद्रियदमन [संयम] व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी” भाषण करीत राहिला. (प्रे. कृत्ये २४:२५) याने देवाच्या प्रामाणिकपणाच्या दर्जाला व क्रुरता आणि अन्यायातील भाग असलेले फेलिक्स व द्रुसिल्ला यातील फरक उघड केला असेल. फेलिक्स त्याचा खटला न्यायीपणाने हाताळील अशी पौलाने कदाचित आशा केली असावी. परंतु “इंद्रियदमन [संयम] व पुढे होणारा न्याय” ह्या विषयासंबंधाने का बोलणी करावी? फेलिक्स व द्रुसिल्ला, हे अनैतिक जोडपे “ख्रिस्त येशूवरील विश्वासा”विषयी विचारणा करण्यास भाग पाडीत होते. यास्तव त्यांना याची माहिती असण्याची गरज होती की, त्याचे अनुकरण करण्यात, एखाद्याच्या विचारापासून, बोलण्यात आणि कार्यात ताबा मिळवला पाहिजे, हाच इंद्रियदमनाचा [संयम] अर्थ होतो. सर्वच मानव त्यांचे विचार, शब्द आणि कार्यासाठी देवाला जबाबदार आहेत. अशाप्रकारे, पौलाच्या बाबतीत फेलिक्सकडील कोणत्याही न्यायापेक्षा देशाधिकारी आणि त्याच्या पत्नीला देवाकडील अत्यंत महत्त्वाच्या न्यायाचा सामना करावा लागणार होता. (प्रे. कृत्ये १७:३०, ३१; रोमकर १४:१०-१२) पौलाचा संदेश ऐकल्यावर साहजिकच, “फेलिक्स घाबरला.”
हे महत्त्वाचे आहे परंतु सोपे नाही
४. संयम खऱ्या ख्रिस्ती धर्माचा एक महत्त्वपूर्ण भाग का आहे?
४ प्रेषित पौलाने ओळखले की ख्रिस्ती धर्माचा महत्त्वाचा घटक इंद्रियदमन [संयम] आहे. येशूचा एक निकटचा सोबती, प्रेषित पेत्राने याला पुष्टी दिली. जे स्वर्गात, “ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी” होतील त्यांना लिहिताना पेत्राने आवश्यक असलेल्या गुणाचे, विश्वास, प्रीती व इंद्रियदमन [संयम] प्रदर्शित करण्याविषयी आर्जवले. ह्याकारणास्तव, इंद्रियदमन [संयम] या हमीमध्ये समाविष्ट होते: “हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढले असले तर, आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हास करतील.”—२ पेत्र १:१, ४-८.
५. संयमाविषयी आम्ही अधिक काळजी का केली पाहिजे?
५ तथापि, तुम्हाला माहीत आहे की, आम्ही इंद्रियदमनाचा [संयम] उपयोग आमच्या दैनंदिन जीवनात खरेपणाने करण्यापेक्षा, त्याविषयी बोलणे अधिक सोपे आहे. एक कारण आहे इंद्रियदमन तुलनात्मक दृष्ट्या दुर्मिळ गुण आहे. २ तीमथ्य ३:१-५ मध्ये पौलाने आमच्या दिवसात, “शेवटल्या काळात” वाढणाऱ्या मनोवृत्तीचे वर्णन केले. आमच्या काळाचे वैशिष्ट्य दाखविणारे एक लक्षण म्हणजे, अनेक लोक “असंयमी” होतील हे आहे. व ते आमच्या सभोवती खरे शाबीत होत असल्याचे दिसून येत नाही का?
६. आज संयमाची उणीव कशी दिसत आहे?
६ अनेक लोक विश्वास करतात की, “तुमच्या भावनांवर कसलाही ताबा न ठेवता त्या व्यक्त करा” असे करणे हितकारक आहे. किंवा तीव्र भावना व राग व्यक्त करा.” त्यांच्या दृष्टिकोनाला अधिक प्रचलित असलेल्या एखाद्या व्यक्तिच्या गुणाचे अनुकरण करणाऱ्याकडून बळकटी आणली जाते, व ते कसल्याही प्रकारच्या इंद्रियदमनाकडे [संयम] दुर्लक्ष करतात व आपलाच आवेश तृप्त करतात. उदाहरणार्थ: ज्या अनेकांना धंद्याच्या दृष्टिने आवडत असलेल्या खेळात भावनांची हिंस्रपणाची सवय, इतकेच नव्हे तर तीव्र राग देखील दिसून येतो. छापखान्याकडून, खेळाच्यावेळी क्रुर मारमारी झालेल्या किंवा जमावाचे दृश्य तुम्हाला आठवत नाही का? संयमाची उणीव असलेल्यांच्या उदाहरणांची पुन्हा आठवण करुन वेळ घालविण्याचा आमचा हेतू नाही. अनेक अशी क्षेत्रे आहेत की ज्यात आम्ही संयम दाखविण्याची गरज आहे—खाणे आणि पिणे, विरुद्ध लिंगी व्यक्तिसोबत आमचे वर्तन, व छंदासाठी खर्च केलेला वेळ आणि पैसा. परंतु उलटपक्षी, अशा क्षेत्राचे वरपांगी परीक्षण करण्यापेक्षा, ज्यात आम्ही इद्रिंयदमन [संयम] राखले पाहिजे अशा एका क्षेत्राचे आपण परीक्षण करु या.
आमच्या भावनाबद्दल संयम
७. संयमाच्या कोणत्या घटनांकडे आम्ही विशेष लक्ष देण्याची गरज आहे?
७ आमच्या कार्यांना नियमित किंवा ताब्यात ठेवण्यात अनेकांना वाजवीरीतीने यश मिळाले आहे. आम्ही चोरी करीत नाही, अनैतिकतेला वश होत नाही, किंवा खून करीत नाही; कारण देवाचा नियम अशा वाईट गोष्टीसाठी काय आहे तो आम्हाला माहीत आहे. तर मग आमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात आम्ही किती यशस्वी आहोत? जे भावनांवर संयम ठेवण्यात अपयशी ठरले त्यांच्या कार्याद्वारे त्यांनी अनेकदा संयम गमावला. म्हणून तर आपण भावनांवर आपले चित्त एकाग्र करु या.
८. आमच्या भावनांच्या बाबतीत यहोवा आम्हाकडून कशाची अपेक्षा करतो?
८ आम्ही भावनारहित किंवा भावना व्यक्त न करणाऱ्या स्वयंचलित यंत्राप्रमाणे असावे अशी यहोवा अपेक्षा करत नाही. लाजराच्या कबरेजवळ असताना, येशू “आत्म्यात खवळला व विव्हळ झाला.” नंतर “येशू रडला.” (योहान ११:३२-३८) त्याच्या परिपूर्ण नियंत्रणाच्या कार्यासोबत त्याने अगदी वेगळीच भावना प्रकट केली, आणि मंदिरात क्रयविक्रय करणाऱ्यांना त्याने बाहेर घालवून दिले. (मत्तय २१:१२, १३; योहान २:१४-१७) त्याच्या शिष्यांनी देखील तीव्र भावना प्रकट केली. (लूक १०:१७; २४:४१; योहान १६:२०-२२; प्रे. कृत्ये ११:२३; १२:१२-१४; २०:३६-३८; ३ योहान ४) तथापि, त्यांच्या भावना पाप करण्याप्रत जाऊ नये यासाठी त्यांनी संयमाची आवश्यकता ओळखली. इफिसकर ४:२६ हा मुद्दा स्पष्ट करते: “तुम्ही रागावा, परंतु पाप करु नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये.”
९. आमच्या भावनांवर नियंत्रण राखणे महत्त्वाचे का आहे?
९ एखाद्या ख्रिश्चनाला वाटेल की तो संयम प्रकट करीत आहे परंतु वास्तविकपणे त्याच्या भावना ताब्यात राहात नसल्यास त्यात धोका आहे. देवाने हाबेलचे बलिदान स्वीकारले तेव्हा त्या प्रतिक्रियेची आठवण करा: “काइनाला फार राग आला, व त्याचे तोंड उतरले. आणि यहोवा काइनाला म्हणाला, तुला राग का आला? आणि तुझे तोंड का उतरले? तू जर बरे करशील तर तू मान्य केला जाणार नाही काय? आणि जर तू बरे करणार नाहीस, तर पाप दाराशी टपून बसले आहे; आणि त्याची इच्छा तुझ्यावर होईल, परंतु तू त्यावर अधिकार कर.” (उत्पत्ती ४:५-७, पं. रमाबाई भाषांतर.) काइनाला त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले व त्याचे पर्यवसान त्याने त्याच्या भावाला ठार करण्यात झाले. अनियंत्रित भावना एक अनियंत्रित कृत्य करण्याकडे निरवतात.
१०. हामानच्या उदाहरणाद्वारे तुम्ही काय शिकता?
१० मर्दखय आणि एस्तेर यांच्या दिवसातील उदाहरणाचा देखील विचार करा. मर्दखय त्याला वाकून मुजरा करीत नाही यामुळे हामान नावाच्या या अधिकाऱ्याला राग आला. स्वतःला कृपापसंती मिळेल असा हामानने चुकीचा विचार केला. “त्या दिवशी हामान आनंदित व प्रसन्नचित्त होऊन बाहेर निघाला, पण राजवाड्याच्या दरवाज्याजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कापला नाही हे हामानाने पाहिले तेव्हा त्याचा त्याला फार क्रोध आला; तरी आपला क्रोध आवरुन हामान घरी गेला.” (एस्तेर ५:९, १०) आनंदाच्या भावनात तो त्वरीत उतावळा झाला होता. तथापि, ज्याच्या विरुद्ध त्याच्या कटूतेच्या भावना आहेत अशांना केवळ पाहून सुद्धा त्याला लगेचच राग येत होता. पवित्र शास्त्र, “आपला क्रोध आवरुन” असे जेव्हा हामानाविषयी म्हणते तेव्हा हामान संयमात उदाहरणशील होता असा तुम्ही विचार करता का? क्वचितच. काही काळापर्यंत हामानाने त्याच्या भावनांवर व कृत्यांवर व भावनांच्या कोणत्याही प्रदर्शनावर नियंत्रण ठेवले, परंतु, द्वेषयुक्त रागावर नियंत्रण ठेवण्यात त्याला अपयश आले. त्याच्या भावनांनी त्याला खून करण्याचा कट करण्यापर्यंत निरवले.
११. फिलिप्पैच्या मंडळीत, कोणती समस्या होती व तिला तिने कशापर्यंत नेले असते?
११ अशाचप्रकारे, आजही भावनांवर नियंत्रणाची उणीव असल्यास ख्रिश्चनांना त्याचा मोठा अपाय होऊ शकतो. परंतु काहींना असे वाटेल की ‘मंडळीत तर अशी काही समस्या होऊ शकत नाही.’ परंतु ती उद्भवलेली आहे. फिलिप्पैमधील दोन अभिषिक्त ख्रिश्चनांत गंभीर मतभेद होता, त्याचे वर्णन पवित्र शास्त्रात दिलेले नाही. ही शक्यता असू शकते याची कल्पना करा: युवदियाने, काही बंधू आणि बहिणींना जेवणासाठी किंवा हितकारी सहवासासाठी बोलावले होते. परंतु तिने सुंतुखेला बोलावले नव्हते. यामुळे सुंतुखेला वाईट वाटले. यास्तव नंतरच्या प्रसंगी युवदियाला न बोलावून सुंतुखेने जशास तसे केले. त्यानंतर दोघी एकमेकींच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करु लागल्या; काही काळानंतर एकदुसरीबरोबर त्या फारच कमी बोलू लागल्या. अशा या प्रसंगामध्ये, जेवणाला निमंत्रण दिले नाही ही मूळ समस्या होती का? नाही. ती तर केवळ एक ठिणगी होती. या दोन अभिषिक्त बहिणी भावनांवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी झाल्या तेव्हा, ती ठिणगी जंगल जाळणारी आग बनली. ही समस्या प्रेषित येऊन त्यांची मध्यस्थी करुपर्यंत तशीच राहिली.—फिलिप्पैकर ४:२, ३.
तुमच्या भावना आणि तुमचे बांधव
१२. देव आम्हाला उपदेशक ७:९ मध्ये मिळणारा सल्ला का देत आहे?
१२ एखाद्याला कमी लेखले, इजा पोहचली किंवा कलुषितपणानुसार त्याच्यासोबत वर्तन केले तर, भावनांवर नियंत्रण ठेवणे सोपे नाही हे आम्हाला मान्य करावे लागेल. यहोवाला हे माहीत आहे, कारण मानवी नातेसंबंधाचे त्याने मनुष्याच्या सुरूवातीपासून निरिक्षण केले आहे. यामुळे देव आम्हाला सल्ला देतो: “मन उतावळे होऊ देऊन रागावू नको; कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो.” (उपदेशक ७:९) देव, प्रथम कृत्यांकडे नव्हे तर भावनांकडे लक्ष पुरवितो ते लक्षात घ्या. (नीतीसूत्रे १४:१७; १६:३२; याकोब १:१९) स्वतःला विचारा, ‘मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याकडे जास्त लक्ष द्यावे का?’
१३, १४. (अ) भावनांवर नियंत्रण राखण्यात अपयश आल्यामुळे जगात सर्वसामान्यपणे कशाची वाढ होऊ शकते? (ब) कोणत्या गोष्टी एखाद्या ख्रिश्चनाला द्वेष करण्याप्रत निरवू शकतात?
१३ जगातील अनेक लोक भावनांवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी झाले आहेत यामुळे त्यांच्यात जन्मापासूनचे वैर—कटुता, हिंसकपणा, त्यांच्याबाबतीत किंवा नातेवाईकांच्या बाबतीत खरे किंवा कल्पना केलेले वैमनस्य. एकदा का भावना आवाक्याबाहेर गेल्या, की त्या दीर्घ काळासाठी हानीकारक प्रभाव आणू शकतात. (पडताळा उत्पत्ती ३४:१-७, २५-२७; ४९:५-७; २ शमुवेल २:१७-२३; ३:२३-३०; नीतीसूत्रे २६:२४-२६.) ख्रिश्चन, कोणत्याही राष्ट्रातील किंवा संस्कृतीतील असले तरी त्यांनी असे कटु वैरभाव आणि द्वेष, चुकीचे व वाईट आहेत म्हणून टाळले पाहिजेत. (लेवीय १९:१७) भावनांच्या बाबतीत, द्वेष टाळणे हे तुमच्या संयमाचा भाग आहेत या दृष्टिने तुम्ही पाहता का?
१४ युवदिया आणि सुंतुखेच्या बाबतीत जसे झाले, तसे आतादेखील भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्यावर समस्यांकडे निरवले जाऊ शकते. विवाहाच्या समारंभास निमंत्रण न दिल्यामुळे एखाद्या बहिणीला कमीपणाचे वाटेल. किंवा तिच्या मुलाला किंवा भाच्याला बोलावले नसेल. किंवा कदाचित एखाद्या भावाने समविश्वासू ख्रिश्चनाकडून एक वापरलेली मोटारगाडी घेतली, व काही काळातच ती बिघडली. याचे कोणतेही कारण असले तरी, यामुळे भावना दुखावल्या गेल्या, भावनांवर नियंत्रण राहिले नाही आणि ज्यांचा यात सहभाग होता ते यामुळे फार अस्वस्थ झाले. नंतर काय घडू शकते?
१५. (अ) ख्रिश्चनांमधील द्वेषामुळे कोणते दुःखद परिणाम घडले आहेत? (ब) द्वेष करण्याच्या प्रवृत्तीबद्दल पवित्र शास्त्राचा कोणता सल्ला साक्ष देतो?
१५ एखाद्या अस्वस्थ व्यक्तीने त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्य करुन त्याच्या बांधवाबरोबर शांती केली नाही तर द्वेष निर्माण होऊ शकतो. अशाही काही घटना घडलेल्या आहेत की, अमुक मंडळीच्या पुस्तक अभ्यासाला नेमून देऊ नये अशी मागणी साक्षीदाराने केली कारण तेथे उपस्थित असलेला एखादा ख्रिस्ती किंवा एखादे कुटुंब त्याला “आवडत नाही.” हे किती दुःखाचे आहे! पवित्र शास्त्र सांगते की एकदुसऱ्यांना जगीक न्यायालयात नेणे ख्रिश्चनांचा पराभव आहे, परंतु जर आम्ही आमच्या किंवा आमच्या नातेवाईकांच्या बाबतीत मागील असभ्य कृत्य किंवा काही टीकेमुळे कोणा बांधवास टाळले तर तो पूर्ण होणार नाही का? आम्ही आमच्या बंधू आणि बहिणीसोबतच्या शांतीसंबंधापुढे रक्ताच्या नातेसंबंधाला ठेवतो हे आमच्या भावना प्रकट करतात का? आमच्या बहिणीसाठी आम्ही मरावयास देखील तयार आहोत असे आम्ही म्हणतो, पण सध्या आमच्या भावना तिच्यासाठी क्वचितच बोलण्यास आम्हाला प्रवृत्त करतात का? (पडताळा योहान १५:१३) देव आम्हाला स्पष्टपणे सांगतो: “वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करु नका. . . . शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या.”—रोमकर १२:१७-१९, १ करिंथकर ६:७.
१६. भावनेने वागताना अब्राहामने कोणते चांगले उदाहरण मांडले?
१६ शत्रुत्त्व तसेच चालत राहू देण्याऐवजी, आमच्या भावनांवर पुनःनियंत्रण ठेवून दोष देण्याचे काही कारण सोडवून शांती बनवावी. अब्राहामाच्या मोठ्या कळपांना लोटच्या कळपाबरोबर तो प्रदेश अपुरा पडत असल्यामुळे, त्यांच्या गुराख्यांमध्ये भांडणे होऊ लागली. अब्राहामाच्या भावनांनी त्यावर मात केली का? किंवा त्याने संयम दाखवला? प्रशंसापूर्वक, त्याने व्यापारी मतभेदावर शांतीपूर्ण उपाय, म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्र प्रदेश असावा असे सुचविले. व त्याने निवड करण्याची प्रथम संधी लोटला दिली. अब्राहामला लोटाविरुद्ध कोणतीही कटुता आणि द्वेष नव्हता, हे त्याने नंतर लोटाच्या वतीने लढाई करण्याद्वारे शाबीत केले.—उत्पत्ती १३:५-१२; १४:१३-१६.
१७. एके प्रसंगी पौल आणि बर्णबा कसे अपयशी झाले, परंतु त्यानंतर काय घडले?
१७ पौल आणि बर्णबा यांच्याबाबतीत जे घडले त्याद्वारे आम्ही संयमाविषयी देखील शिकू शकतो. अनेक वर्षे दोघे सोबती असतानाही, मार्कला दौऱ्यावर घ्यावे की नाही याबद्दल दोहोंचे असहमत झाले. “त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा मार्काला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला.” (प्रे. कृत्ये १५:३९) त्या प्रसंगी ही प्रौढ मनुष्ये त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरली हा आमच्यासाठी इशारा आहे. असे जर त्यांच्याबाबतीत होऊ शकले तर आमच्याबाबतीत देखील होऊ शकते. त्यांनी तुटलेले संबंध किंवा वैर वाढण्यास अनुमती दिली नाही. अहवाल प्रकट करतो की पौल आणि बर्णबा यांनी त्यांच्या भावनांवर नियंत्रण मिळवले आणि नंतर शांतीने सोबत कार्य केले.—कलस्सैकर ४:१०; २ तीमथ्य ४:११.
१८. भावना दुखावल्या गेल्यास, प्रौढ ख्रिस्ती काय करु शकतो?
१८ देवाच्या लोकामध्ये देखील दुःखी भावना किंवा द्वेष असू शकतात याची आम्ही अपेक्षा करु शकतो. हे इब्री काळात होते व प्रेषितांच्या दिवसात देखील होते. आमच्या काळातील यहोवाच्या सेवकांमध्येही घडले आहे, कारण आम्ही सर्व अपरिपूर्ण आहोत. (याकोब ३:२) येशूने त्याच्या अनुयायांना, बांधवामधील अशा समस्या त्वरीत सोडविण्याचे आर्जवले. (मत्तय ५:२३-२५) परंतु आमच्या संयमात वाढ करुन आम्ही पहिल्याच जागेत त्या टाळल्या पाहिजेत. तुमच्या बंधू किंवा बहिणीने तुम्हाला क्षुल्लक गोष्टीबाबत काही बोलण्याद्वारे किंवा काही करण्याद्वारे कमी लेखल्याचे वाटले असेल किंवा तुमचे मन दुखावले असेल तर तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवून ते विसरत का नाही? ती व्यक्ती चूक कबूल करीपर्यंत जणू तुमचे समाधान होणारच नाही म्हणून दुसऱ्या व्यक्तीला सामोरे आणणे जरुरीचे आहे का? तर मग तुम्ही तुमच्या भावनांच्या किती नियंत्रणाधीन आहात?
हे शक्य आहे!
१९. आमची चर्चा, आमच्या भावनांवर नियंत्रण राखण्यावर केंद्रित आहे हे का उचित आहे?
१९ आम्ही आमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याच्या, संयमाच्या एका दृष्टिकोनाविषयी पाहिले आहे. ते एक प्रमुख क्षेत्र आहे, कारण आमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्यास, त्यामुळे आमच्या भावना आम्हाला जिभेवरील ताबा, आमचा लैंगिक हुरूप, आमच्या खाण्याच्या सवया गमावण्याकडे, तसेच संयम दाखविला पाहिजे अशा जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये ताबा गमावण्याकडे आम्हाला निरवू शकते. (१ करिंथकर ७:८, ९; याकोब ३:५-१०) यास्तव धीर धरा, संयम राखण्याद्वारे तुम्ही प्रगती करु शकता.
२०. प्रगती करणे शक्य आहे याची आम्ही खात्री का बाळगू शकतो?
२० यहोवा आम्हाला मदत करण्यास इच्छुक आहे. आम्ही याची खात्री कशी बाळगू शकतो? त्याच्या आत्म्याचे एक फळ इंद्रियदमन [संयम] हे आहे. (गलतीकर ५:२२, २३) अशाप्रकारे, आम्ही याच्या योग्यतेचे होण्यासाठी तसे कार्य करु, व यहोवाकडून त्याचा पवित्र आत्मा प्राप्त करुन त्याचे फळ जीवनात प्रकट करण्याप्रत आम्ही अधिक संयमी असण्याची अपेक्षा बाळगू शकतो. येशूने दिलेली हमी विसरू नका: “स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल.”—लूक ११:१३; १ योहान ५:१४, १५.
२१. भविष्यात संयम आणि आमच्या भावनासंबंधी काय करण्याचा तुमचा निर्धार आहे?
२१ ते सोपे असेल अशी कल्पना करू नका. काहींना असे करणे कठीण वाटेल कारण त्यांची वाढ अशा लोकांमध्ये झालेली असेल की ज्यांनी त्यांच्या भावनांना अनियंत्रित कार्यांना परवानगी दिली असेल, काहींचा चटकन भावनाविवश होणारा तापट स्वभाव असेल, किंवा काहींनी कधीही संयम दाखविण्याचा प्रयत्न केला नसेल. अशा ख्रिश्चनासाठी, संयम राहू देणे आणि तो भरुन वाहू देणे एक खरे आव्हान असू शकते. तथापि हे शक्य आहे. (१ करिंथकर ९:२४-२७) आम्ही सद्य व्यवस्थिकरणाच्या अंताच्या जसजसे जवळ जात आहोत, तसतसे तणाव व दबाव वाढतील. आम्ही संयम कमी करण्याऐवजी त्यात अधिकाधिक वाढ केली पाहिजे! तुमच्या संयमाविषयी तुम्ही स्वतःचे परीक्षण करा. काही क्षेत्रात तुम्हाला प्रगती करण्याची जरुरी आढळून आल्यास, त्यावर कार्य करा. (स्तोत्रसंहिता १३९:२३, २४) देवाला त्याच्या आत्म्याची अधिक मागणी करा. तो तुमचे ऐकेल जेणेकडून तुमचा संयम टिकून राहील व तो भरून वाहू लागेल.—२ पेत्र १:५-८.
मनन करण्याचे मुद्दे
▫ तुमच्या भावनांवर नियंत्रण राखणे इतके महत्त्वाचे का आहे?
▫ हामान आणि युवदिया व सुंतुखेच्या उदाहरणापासून तुम्ही काय शिकला आहात?
▫ मन दुखावण्याचे कारण घडले तर तुम्ही प्रामाणिकपणे काय करण्याचा प्रयत्न कराल?
▫ कोणताही द्वेष राखण्याचे टाळण्यासाठी संयम तुम्हाला कशी मदत करील?
[२६ पानांवरील चित्रं]
फेलिक्स आणि द्रुसिल्लासमोर असताना, पौल धार्मिकता आणि संयम याविषयी बोलला