वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 ८/१ पृ. १४-१९
  • तुमच्या उपयुक्‍त सवया कोणालाही बिघडवू देऊ नका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या उपयुक्‍त सवया कोणालाही बिघडवू देऊ नका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • त्यांच्यासाठी व आमच्यासाठी सल्ला
  • फसण्याचे टाळा
  • तरुणपणाच्या सवयासुद्धा
  • आमच्या सवयांचे रक्षण करण्यासाठी सकारात्मक पावले
  • या शेवटल्या काळात तुम्ही कोणाची सोबत निवडाल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • सूज्ञ निर्णय घेण्यासाठी मदत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • “सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • “बोलत राहा, शांत राहू नकोस!”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 ८/१ पृ. १४-१९

तुमच्या उपयुक्‍त सवया कोणालाही बिघडवू देऊ नका

“फसू नका, कुसंगतीने नीती [“उपयुक्‍त सवया”, न्यू.व.] बिघडते.” —१ करिंथकर १५:३३.

१, २. (अ) करिंथमधील ख्रिश्‍चनांच्याबाबतीत प्रेषित पौलाला काय वाटले आणि का? (ब) विशेषपणे कोणत्या सल्ल्याचा विचार केला जाईल?

पालकीय प्रीती किती प्रबळ भावना आहे! ही भावना पालकांना त्यांच्या मुलांसाठी बलिदान करण्यास, शिकवण्यास, व सल्ला देण्याला प्रवृत्त करते. प्रेषित पौल एक स्वाभाविक पिता नसावा परंतु त्याने करिंथमधील ख्रिश्‍चनांना लिहिले: “कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ बाप नाहीत; मी तर तुम्हास ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे.”—१ करिंथकर ४:१५.

२ पौलाने आधी करिंथचा प्रवास केला होता, तेथे त्याने यहुदी व हेल्लेणी (ग्रीक) लोकांना प्रचार केला होता. करिंथमध्ये मंडळी स्थापन करण्यास त्याने मदत केली. तसेच दुसऱ्‍या एका पत्रात पौलाने स्वतःची तुलना लालनपालन करणाऱ्‍या दाईबरोबर केली, परंतु करिंथकरांना तो पित्याप्रमाणे होता. (१ थेस्सलनीकाकर २:७) स्वाभाविक पित्याप्रमाणे पौलाने त्याच्या आध्यात्मिक मुलांना सल्ला दिला. करिंथमधील ख्रिश्‍चनांना त्याने पित्याप्रमाणे दिलेल्या सल्ल्याचा फायदा तुम्हालाही होऊ शकतो: “फसू नका, कुसंगतीने नीती [उपयुक्‍त सवया, न्यू.व.] बिघडते.” (१ करिंथकर १५:३३) पौलाने करिंथकरांना हे का लिहिले? आम्ही या सल्ल्याचे अवलंबन कसे करु शकतो?

त्यांच्यासाठी व आमच्यासाठी सल्ला

३, ४. पहिल्या शतकातील करिंथविषयी आणि त्याच्या लोकसंख्येविषयी आम्हाला काय माहीत आहे?

३ पहिल्या शतकात एका ग्रीक भूगोलतज्ज्ञ स्ट्रॅबो यांनी लिहिले: “त्याच्या व्यापारामुळे करिंथला ‘संपन्‍न’ समजले जात होते, ते त्याच्या इस्तमसवर वसलेल्या आणि एक थेट आशियाकडे नेणाऱ्‍या व दुसरा मार्ग इटलीकडे नेणाऱ्‍या दोन बंदरांवर त्याचे वर्चस्व असल्यामुळे, दोन्ही राष्ट्रांना विक्रीच्या मालाची अदलाबदल सहज होत असे.” दर दोन वर्षांनी इस्तमियन खेळाच्या नवचैतन्यामुळे करिंथमध्ये लोकांच्या झुंडी येत असत.

४ हे शहर सरकारी अधिकारी व ॲफ्रोडाइटीच्या विषयासक्‍त उपासनेचे केंद्र होते तर तेथे राहणारे लोक कशाप्रकारचे असावेत? प्राध्यापक टी. एस. व्हॅन्स स्पष्ट करतात: “उच्च वर्गीयाच्या समाजाची लोकसंख्या कदाचित ४,००,००० होती, परंतु त्यांची नैतिकता अतिशय खालच्या दर्जाची होती, . . . आखियातील रहिवाशांचे, बौद्धिक अस्वस्थपणा आणि विलक्षणपणानंतर आतुरतेने एक क्षुब्ध इच्छेचे विशेष लक्षण होते. . . . त्यांचा स्वार्थीपणा सहजपणे सांप्रदायिकवादाला चिथावणी देत होता.”

५. करिंथमधील बांधवांना कोणत्या संकटाला तोंड द्यावे लागले होते?

५ त्या वेळेत प्रौढ तर्काकडे अजूनही काहींचा ओढा असल्यामुळे मंडळी विभाजित झाली. (१ करिंथकर १:१०-३१; ३:२-९) काही लोक म्हणत होते की “मेलेल्यांचे पुनरूत्थान नाही” ही मोठी समस्या होती. (१ करिंथकर १५:१२; २ तीमथ्य २:१६-१८) त्यांचा विश्‍वास (किंवा अविश्‍वास) कोणताही असो, ख्रिस्त “मेलेल्यातून उठविला गेला आहेच” या स्पष्ट पुराव्याने पौलाला त्यांना सुधारायचे होते. अशाप्रकारे, देव “आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आपणाला जय” देईल असा भरवसा ख्रिश्‍चन ठेऊ शकत होते. (१ करिंथकर १५:२०, ५१-५७) तुम्ही तेथे असता तर बहुधा फुट पाडणाऱ्‍या आत्म्याचा तुमच्यावर परिणाम झाला असता का?

६. पहिले करिंथकर १५:३३ मधील पौलाचा सल्ला विशेषपणे कोणाला लागू होत होता?

६ मृतांचे पुनरूत्थान केले जाईल याविषयी दृढ पुरावा सादर करताना, पौलाने त्यांना म्हटले: “फसू नका कुसंगतीने नीती [उपयुक्‍त सवया, न्यू.व.] बिघडते.” या सल्ल्याचा मुद्दा पुनरूत्थानाच्या सिद्धांताविषयी सहमत न दाखविणाऱ्‍या व ख्रिस्ती मंडळीसोबत सहवास ठेवणाऱ्‍यांसाठी होता. त्यांना समजला नाही असा तो विशिष्ट मुद्दा होता का? (पडताळा लूक २४:३८.) नाही. पौलाने लिहिले की ‘तुम्हापैकी काही माणसे पुनरूत्थान नाही असे म्हणतात,’ तर जे यात सामील होते ते मतभेद, व धर्मत्यागाकडे त्यांचा ओढा दाखवित होते. ते इतरांच्या उपयुक्‍त सवया आणि विचारसरणी बिघडवू शकतील याविषयी पौलाला चांगले माहीत होते.—प्रे. कृत्ये २०:३०; २ पेत्र २:१.

७. कोणत्या एका परिस्थितीत १ करिंथकर १५:३३ मधील पौलाच्या सल्ल्याचे अवलंबन आम्ही करु शकतो?

७ आमच्या संगतीविषयी पौलाच्या इशाऱ्‍याचे अवलंबन आम्ही कसे करु शकतो? मंडळीमध्ये एखाद्याला पवित्र शास्त्राचे वचन किंवा शिक्षण समजणे अवघड वाटत असेल तर मदत देण्याचे नाकारणे हा त्याचा अर्थ होत नव्हता. खरोखर, यहूदा २२, २३ आम्हाला, अशी शंका असलेल्या प्रामाणिक लोकांना दयाशील मदत देण्याचे आर्जवते. (याकोब ५:१९, २०) तथापि आम्हाला माहीत असलेल्या पवित्र शास्त्रीय सत्याविषयी कोणी हरकत घेतली किंवा संशयखोर व नकारात्मक टीका करीत राहीले तर पौलाने पित्याप्रमाणे दिलेला सल्ला येथे लागू झाला पाहिजे. आम्ही त्या प्रकारच्या लोकांच्या संगतीपासून सावध राहिले पाहिजे. अर्थातच, कोणी हमखास धर्मत्यागी झाला, तर आध्यात्मिक मेंढपाळांनी कळपाचे रक्षण करण्यासाठी कार्य करण्यास हवे.—२ तीमथ्य २:१६-१८; तीत ३:१०, ११.

८. पवित्र शास्त्राच्या शिक्षणाशी कोणाची सहमती नसते तेव्हा आम्ही समजदारीने कसे वागतो?

८ पहिले करिंथकर १५:३३ मधील पौलाचे पित्याप्रमाणे असलेले शब्द, खोट्या शिक्षणाला वाढविणाऱ्‍या मंडळीच्या बाहेरील लोकांना सुद्धा लागू होतात. त्यांच्याबरोबरच्या सहवासात आम्ही कसे ओढले जाऊ शकतो? सत्य शिकण्यासाठी ज्यांना मदत केली जाऊ शकते असे आणि खोटे शिक्षण वाढविण्यास जे वादविवाद करतात त्यांच्यामधील फरक आम्ही ओळखू शकलो नाही तर हे घडू शकते. उदाहरणार्थ, आमच्या साक्षीकार्यात आम्ही अशा व्यक्‍तीला भेटतो जो काही मुद्यांना त्याची सहमती नसल्याचे दर्शवतो परंतु आणखी चर्चा करण्याची त्याची इच्छा आहे. (प्रे. कृत्ये १७:३२-३४) यामुळे काही समस्या येत नाही, तर जे खरेपणाने माहिती घेऊ इच्छितात अशांना आम्ही आनंदाने पवित्र शास्त्राचे सत्य सांगतो, व याचा खात्री पटविणारा पुरावा सादर करण्यासाठी पुन्हा भेट देखील देतो. (१ पेत्र ३:१५) तथापि, पवित्र शास्त्राचे सत्य शोधण्याच्या बाबतीत काहीजण खरोखर आस्थेवाईक नसतील.

९. आमच्या विश्‍वासासंबंधीच्या आव्हानांना आम्ही कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे?

९ पुष्कळ लोक अनेक आठवडे, तासन्‌तास चर्चा करतील परंतु ते सत्याचा शोध करण्यासाठी नव्हे. तर ते इतरांचा विश्‍वास क्षीण करुन, त्यांचे इब्री, ग्रीकमधील दावा केलेले शिक्षण किंवा उत्क्रांतीवादाच्या विज्ञानाला दिमाखाने मिरवण्याचे इच्छितात. त्याचा सामना करते वेळी काही साक्षीदारांना आव्हानात्मक वाटले आहे आणि खोट्या धर्माचा विश्‍वास व तत्त्वज्ञान किंवा वैज्ञानिक त्रुटी यावर केंद्रित असण्यावर याचा परिणाम झाला आहे. इब्री आणि ग्रीक शिकलेल्या धार्मिक नेत्यांबरोबर केलेल्या वादविवादात येशू जिंकू शकला असता, परंतु त्याने असे होऊ दिले नाही हे खरोखर उल्लेखनीय आहे. आव्हान केले तेव्हा येशूने संक्षिप्तपणे प्रत्युत्तर दिले, व नंतर लगेच त्याने त्याचे लक्ष नम्र जनांकडे, खऱ्‍या मेंढरांकडे नेले.—मत्तय २२:४१-४६; १ करिंथकर १:२३–२:२.

१०. संगणके व संगणक रचनेत साठविलेली माहिती उपलब्ध असणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना सावधानगिरी बाळगणे का उचित आहे?

१० आधुनिक संगणकाने कुसंगतीची काही क्षेत्रे उघडली आहेत. काही व्यापारी कंपन्या वर्गणीदारांना, संगणक रचनेत साठवलेला संदेश, संगणक व दूरध्वनी मार्फत अनेक लोकांना संदेश पाठविण्यास मदत करतात. अशाप्रकारे एखादी व्यक्‍ती संगणकातील रचनेत साठवलेला तिचा संदेश सर्व वर्गणीदारांना उपलब्ध करु शकते. धार्मिक गोष्टीवरील विद्युत वादविवाद म्हटलेल्या गोष्टीकडे याने निरवले आहे. अशा वादविवादाकडे एखादा ख्रिस्ती वळला जाऊ शकतो व धर्मत्यागी विचार करणारा, ज्याला मंडळीतून बहिकृत केले आहे त्याच्याबरोबर अधिक तास तो खर्च करू शकतो. कुसंगती टाळण्याविषयी २ योहान ९-११ मधील पौलाचा पित्याप्रमाणे असलेला सल्ला यावर जोर देतो.a

फसण्याचे टाळा

११. करिंथमधील व्यापारी परिस्थितीने कोणती सुसंधी प्रस्तुत केली?

११ आधी दर्शवल्याप्रमाणे, करिंथ हे पुष्कळ दुकाने आणि उद्योगधंदे असलेले एक व्यापाराचे केंद्र होते. (१ करिंथकर १०:२५) इस्तमिनियन खेळासाठी आलेले अनेकजण तंबूत राहत आणि त्या प्रसंगी व्यापारी लोक सहजपणे हालविता येणाऱ्‍या टपऱ्‍यांमधून किंवा आच्छादन असलेल्या दुकानातून विक्री करीत असत. (पडताळा प्रे. कृत्ये १८:१-३.) यामुळे पौलाला तेथे तंबू बनविण्याचे काम मिळणे शक्य झाले व तो कामाच्या जागेचा वापर सुवार्तेत वाढ करण्यासाठी करु शकत होता. प्राध्यापक जे. मरफी-ओʹकॉनर लिहितात: “गर्दी असलेल्या रस्त्यासमोरील . . . वर्दळ असणाऱ्‍या बाजारपेठेच्या दुकानातील सहकर्मचारी व गिऱ्‍हाईकांसोबतच केवळ नव्हे तर बाहेरील लोकसमुदायाबरोबर देखील त्याला संधी होती. व्यापार कमी होत असलेल्या वेळेत तो दरवाज्यात उभे राहून व जे ऐकतील असे त्याला वाटले त्यांच्याबरोबर संभाषण करीत असे . . . त्याचे जोरदार व्यक्‍तिमत्त्व व पूर्ण खात्री यामुळे त्याचे व्यक्‍तिमत्त्व शेजारी राहणाऱ्‍या लोकांमध्ये उल्लेखनीय ठरले नाही याची कल्पना करणे कठीण वाटते. आणि यामुळे समजून घेण्याची इच्छा असणाऱ्‍यांना, केवळ आळशी लोकांनाच नव्हे तर खरेपणाने शोध करणाऱ्‍यांना आकर्षित केले . . . आपल्या सेवकांबरोबर आलेल्या विवाहित स्त्रिया, ज्यांनी पौलाचे ऐकले होते त्या खरेदी करण्यासाठी आल्या आहेत असा बहाणा सांगून त्याची भेट घेऊ शकल्या. त्रासाच्या प्रसंगी, छळ किंवा जेरीस आणण्याचे भय वाटत असताना विश्‍वासू जण ग्राहक आहोत असे दाखवून त्याच्यापुढे येते. त्याच्या कामाच्या ठिकाणाने त्याचा संपर्क नगरपालिकेच्या अधिकाऱ्‍यांबरोबर आणला.”

१२, १३. कामाच्या ठिकाणी १ करिंथकर १५:३३ कसे उचितपणे लागू होऊ शकते?

१२ पौलाने, कामाच्या जागेतील “कुसंगतीची” शक्यता ओळखली असेल. आम्ही सुद्धा ओळखली पाहिजे. काहींच्या मध्ये अशाप्रकारची प्रवृत्ती दिसून येते यामुळे यथायोग्यपणे पौलाने उद्धृत केले: “चला आपण खाऊ पिऊ, कारण उद्या मरावयाचे आहे.” (१ करिंथकर १५:३२) यानंतर लगेच त्याने त्याच्या पित्याप्रमाणे असलेला सल्ला दिला: “फसू नका, कुसंगतीने नीती [उपयुक्‍त सवया, न्यू.व.] बिघडते.” कामाचे ठिकाण आणि सुखविलास मिळवण्याचा शोध घेणे या गोष्टी व संभवनीय धोका यांचा मेळ कसा घातला जाऊ शकतो?

१३ ख्रिश्‍चनांनी सहकर्मचाऱ्‍यांसोबत स्नेहभाव ठेवला पाहिजे, ही गोष्ट साक्ष देण्यास मार्ग उघडला जाऊ शकतो व ते किती प्रभावशाली ठरु शकते याविषयी अनेक अनुभव प्रचिती देतात. तथापि, सहकर्मचारी, सहवास ठेवण्याच्या निमंत्रणाच्या मित्रत्त्वाचा एकत्र चांगला वेळ घालविण्यासाठी विपर्यास करु शकतो. तो किंवा ती जेवणासाठी, कामानंतर मादक पेयाकरता अंमळ थांबण्यासाठी, किंवा सप्ताह अंती काही मनोरंजनासाठी निमंत्रण देऊ शकते. ही व्यक्‍ती कदाचित दयाळू आणि योग्य दिसत असेल आणि निमंत्रण कदाचित निष्कपट वाटत असेल. तरीदेखील, पौल आम्हाला सल्ला देतो: “फसू नका.”

१४. संगतीमुळे काही ख्रिश्‍चन कसे फसले गेले आहेत?

१४ काही ख्रिश्‍चन फसले आहेत. सहकर्मचाऱ्‍याच्या संगतीच्या बाबतीत त्यांनी हळुहळू लवचिक प्रवृत्ती धारण केली. ती कदाचित क्रिडा किंवा एखाद्या छंदामुळे समाईक आस्थेत वाढ झालेली असेल. किंवा अपवाद म्हणून कामावरील ख्रिस्ती नसणारी एखादी व्यक्‍ती दयाळू आणि विचारी असेल, यामुळे अधिक वेळ त्याच्याबरोबर घालवणे एवढेच नव्हे तर मंडळीतील काहीजणांऐवजी त्याच्याबरोबर संगती करण्याची निवड करण्याकडे निरवले गेले. यामुळे मग केवळ एक सभा चुकविण्यासाठी प्रवृत्त केले जाऊ शकते. याचा अर्थ संध्याकाळी घरी उशीरा येणे आणि सकाळी क्षेत्र कार्यात भाग घेण्याची सवय मोडणे असा होऊ शकतो. एखादा ख्रिस्ती सामान्यपणे विरोध करीत असलेला सिनेमा, किंवा व्हिडीओ पाहण्यात याचा परिणाम होऊ शकतो. कदाचित आम्ही असा विचार करु की, ‘ते माझ्याबाबतीत होऊ शकणार नाही.’ परंतु फसलेल्या अनेकांनी प्रथम अशीच प्रतिक्रिया दाखवली होती. आम्ही स्वतःला हे विचारण्याची गरज आहे की, ‘पौलाच्या सल्ल्याचे अवलंबन करण्यामध्ये मी किती निश्‍चयी आहे?’

१५. शेजाऱ्‍यांच्या बाबतीत आमची कोणती समतोल मनोवृत्ती असली पाहिजे?

१५ कामाच्या ठिकाणाबद्दल जे काही आम्ही आता पाहिले ते शेजाऱ्‍यांच्या बरोबरील संगतीला देखील लागू होते. प्राचीन करिंथमधील ख्रिश्‍चनांच्या जवळपास शेजारी नक्कीच होते. काही समाजात शेजाऱ्‍यांबरोबर मैत्रीपूर्ण आणि त्यांना सहकार्य देणे सर्वसाधारण गोष्ट आहे. ग्रामीण भागात एकाकीपणा असल्यामुळे शेजारी एकदुसऱ्‍यांवर विसंबून राहू शकतात. कौटुंबिक नातेसंबंध विशेषपणे काही संस्कृतीत बळकट असतात, यामुळे ते जेवणासाठी अधिक निमंत्रणे देत असतात. साहजिकच येशूने दाखविल्याप्रमाणे समतोल दृष्टिकोन राखणे महत्त्वाचा आहे. (लूक ८:२०, २१; योहान २:१२) शेजारी आणि नातेवाईकांसोबत आमची वर्तणूक ख्रिस्ती होण्यापूर्वी जशी होती त्याप्रमाणेच अजूनही आहे काय? उलटपक्षी, आम्ही अशा वर्तणूकीचा पुनर्विचार करुन व कोणत्या मर्यादा उचित आहेत त्यांचा जाणीवपूर्वक निश्‍चय करु नये का?

१६. मत्तय १३:३, ४ मधील येशूच्या शब्दांना आम्ही कसे समजण्यास हवे?

१६ येशूने राज्याच्या वचनाची तुलना एकदा बियांबरोबर केली जे “वाटेवर पडले व पाखरांनी येऊन खाऊन टाकले.” (मत्तय १३:३, ४, १९) त्यावेळी, वाटेवरील माती लोकांच्या जाण्या-येण्यामुळे कठीण झाली होती. अशाचप्रकारे हे अनेक लोकांच्याबाबतीत घडते. त्यांचे जीवन शेजारी, नातेवाईक आणि इतर जाणा-येणाऱ्‍या लोकांमुळे व्यग्र झालेले असते. हे त्यांच्या हृदयावरील माती तुडवल्यासारखे आहे, यामुळे सत्याच्या बीजाला मूळ धरण्यास कठीण बनविले जाते. जो आधीच ख्रिस्ती आहे त्याच्याबाबतीत देखील अशा प्रकारचा अप्रतिसाद वाढू शकतो.

१७. शेजारी आणि इतरांबरोबरील संगतीचा आमच्यावर कसा परिणाम होऊ शकतो?

१७ काही जगीक शेजारी आणि नातेवाईक यांनी आध्यात्मिक गोष्टीसाठी आस्था किंवा धार्मिकतेसाठी सातत्याने प्रीती दाखवली नसेल तरी देखील ते स्नेहभावाचे आणि मदत देणारे असतील. (मार्क १०:२१, २२; २ करिंथकर ६:१४) आम्ही ख्रिस्ती होण्याचा अर्थ मैत्रीहीन आणि शेजारहीन होणे असा होत नाही. इतरांसाठी अस्सल आस्था दाखविण्यासाठी येशूने आम्हाला सल्ला दिला. (लूक १०:२९-३७) परंतु पौलाचा सल्ला यासारखाच प्रेरित आणि आमच्या संगतीविषयी काळजी घेण्यासंबंधी आवश्‍यक असलेला आहे. आम्ही आधीच्या सल्ल्याचे अवलंबन करु तसे, आम्ही नंतरचा विसरता कामा नये. आम्ही दोन्ही तत्त्वांना लक्षात ठेवले नाही तर, आमच्या सवयांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. प्रामाणिकपणा आणि कैसराचे नियम पाळण्याच्याबाबतीत तुमच्या सवयांची तुलना तुम्ही तुमचा शेजार आणि नातेवाईकांसोबत कशी करु शकता? उदाहरणार्थ, त्यांना वाटेल की कर भरताना उत्पन्‍नाचा कमी अहवाल देणे किंवा धंद्यात झालेल्या नफ्याच्याबाबतीत हातमिळवणी केली जाऊ शकते व जगण्यासाठी असे करणे आवश्‍यक आहे. कदाचित ते त्यांचे विचार तुम्हाला कॉफी घेण्यासाठी एकत्र आल्यावर किंवा संक्षिप्त भेटी दरम्यान पटवून सांगताना तुमचे मन वळवतील. याचा परिणाम तुमच्या विचारसरणीवर आणि प्रामाणिक सवयांवर कसा होऊ शकतो? (मार्क १२:१७; रोमकर १२:२) “फसू नका कुसंगतीने नीती [उपयुक्‍त सवया, न्यू.व.] बिघडते.”

तरुणपणाच्या सवयासुद्धा

१८. पहिले करिंथकर १५:३३ युवकांना देखील का लागू होते?

१८ तरुणांवर खासपणे जे काही ते पाहतात किंवा ऐकतात त्याचा प्रभाव पडतो. मुलांचे हावभाव किंवा लकबी त्यांच्या पालकांसारख्याच किंवा कोणा नातेवाईकांप्रमाणेच असतात हे तुम्ही पाहिले नाही का? तरमग मुलांवर त्यांच्या सवंगड्यांचा किंवा शाळासोबत्याचा मोठा प्रभाव पडू शकतो यात आम्हाला आश्‍चर्य वाटू नये? पडताळा मत्तय ११:१६, १७.) जर तुमच्या मुला, किंवा मुलीभोवती त्यांच्या पालकांना अनादराने बोलणारे तरुण आहेत तर याचा काही परिणाम होणार नाही अशी कल्पना का करावी? इतर तरुण अनेकदा अश्‍लील भाषा वापरताना ते ऐकत असतील तर काय? त्यांचे शाळेतील किंवा शेजारी असलेले सोबती नव्या शैलीचे बुट किंवा नव्या पद्धतीच्या दागदागिण्यांबद्दल उतावळे होत असतील तर काय? तरुण ख्रिश्‍चनांवर अशा प्रभावांचा परिणाम होऊ शकत नाही असा आम्ही विचार केला पाहिजे का? पौलाने १ करिंथकर १५:३३ मध्ये असे सांगितले का की ठराविक वय गाठलेल्यांवरच केवळ याचा परिणाम होईल?

१९. पालकांनी त्यांच्या मुलांवर कोणता दृष्टिकोन बिंबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे?

१९ तुम्ही पालक असल्यास, तर्क करताना व तुमच्या मुलासाठी निर्णय घेतांना त्या सल्ल्याबरोबर तुम्ही सतर्क आहात का? याचा अर्थ तुमच्या मुलाच्या भोवती असलेले शेजारी किंवा शाळेतील मुले चांगले नाहीत असा होत नाही, हे मान्य करायला कदाचित तुम्हाला मदत मिळेल. त्यातील काही तुमच्या शेजाऱ्‍यांसारखे, नातेवाईकांसारखे आणि सहकर्मचारी लोकांसारखे आनंददायक आणि सभ्य असतील. तुमच्या अपत्याला हे पाहण्यास आणि पौलाने करिंथकरांना दिलेल्या सुज्ञतेच्या पालकीय सल्ल्याचे संतुलित अनुसरण करण्याचे आकलन होण्याची मदत करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ज्याप्रमाणे गोष्टींचे संतुलन करता, त्याप्रमाणे तुमचे अनुकरण करण्यात त्यांना मदत होईल.—लूक ६:४०; २ तीमथ्य २:२२.

२०. युवकांनो, तुम्ही कोणत्या आव्हानांना सामोरे जात आहात?

२० तुम्ही जे अजूनही तरुण आहेत, पौलाच्या सल्ल्याचे महत्त्व तरुण आणि वयस्कर असलेल्या सर्व ख्रिश्‍चनांसाठी आहे हे जाणून त्याचा अवलंब कसा करावा हे ओळखण्याचा प्रयत्न करा. असे करण्यासाठी जोराचा परिश्रम व निश्‍चय करण्याची आवश्‍यकता आहे, परंतु आव्हानात्मकरित्या या समस्यांवर मात करण्यासाठी इच्छूक का असू नये? बालपणापासून काही युवकांना तुम्ही ओळखत असाल परंतु याचा अर्थ ते तुमच्या सवयांवर परिणाम करु शकत नाहीत, किंवा ख्रिस्ती युवक या नात्याने असलेली तुमची सवय ते बिघडवणार नाही असा होत नाही.—नीतीसूत्रे २:१,१०-१५.

आमच्या सवयांचे रक्षण करण्यासाठी सकारात्मक पावले

२१. (अ) संगतीच्या बाबतीत कोणती गरज आम्हाला आहे? (ब) काही संगती धोकेदायक असू शकते याची खात्री आम्ही का बाळगू शकतो?

२१ आम्हा सर्वांना संगतीची आवश्‍यकता असते. असे असताना देखील चांगल्या आणि वाईटासाठी आमच्या सोबत्यांचा आम्हांवर परिणाम होऊ शकतो म्हणून आम्ही दक्ष असले पाहिजे. ही गोष्ट आदाम व तेव्हापासून अनेक शतकांपर्यंत प्रत्येकांच्याबाबतीत खरेपणाने सिद्ध झाली आहे. उदाहरणार्थ, यहुदाचा चांगला राजा यहोशाफाट याने, यहोवाची कृपापसंती आणि आशीर्वादांचा आनंद उपभोगला. परंतु इस्राएलमधील अहाबाच्या मुलीचा त्याच्या मुलाबरोबर विवाह होण्यास त्याने परवानगी दिली तेव्हा, यहोशाफाटाने अहाबासोबत संगती ठेवण्यास सुरवात केली. या वाईट संगतीमुळे यहोशाफाटाला जवळजवळ स्वतःच्या जीवनाची किंमत द्यावी लागली. (२ राजे ८:१६-१८; २ इतिहास १८:१-३, २९-३१) आमच्या संगतीविषयी आम्ही चुकीची निवड केल्यास, ते यासारखेच धोकेदायक ठरू शकते.

२२. आम्ही हृदयाप्रत काय घेतले पाहिजे आणि का?

२२ तरमग, १ करिंथकर १५:३३ मधील पौलाने दिलेला प्रेमळ सल्ला आमच्या हृदयाप्रत आपण घेऊ या. ते असे शब्द नाहीत की जे आपण अनेकदा ऐकलेले आहेत यामुळे ते आपण आपल्या स्मरणशक्‍तीतून पुन्हा सांगू शकतो. पौलाला, त्याच्या आध्यात्मिक बंधू आणि भगिणीसाठी व तसेच आमच्यासाठी असलेल्या पालकीय आपुलकीला प्रवर्तित करतात. निसंशयाने आमच्या प्रयत्नांना यश मिळावे अशी आमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा असल्यामुळे त्याने पुरविलेल्या सल्ल्याचा त्यात समावेश आहे.—१ करिंथकर १५:५८.

[तळटीपा]

a संगणक रचनेत साठविलेल्या माहितीचा आणखी एक धोका म्हणजे, स्वतःच्या संगणकावरील कार्यक्रमात त्याची नक्कल करणे किंवा मूळ मालकाची किंवा लेखकाची परवानगी न घेता त्याची नक्कल करणे हे आंतरराष्ट्रीय हक्क नियमाच्या विरूद्ध आहे.—रोमकर १३:१.

तुम्हाला आठवते का?

▫ पौलाने विशेषकरुन कोणत्या कारणासाठी १ करिंथकर १५:३३ लिहिले?

▫ आम्ही पौलाच्या सल्ल्याचा वापर कामाच्या ठिकाणी कसा करु शकतो?

▫ आमचा, शेजाऱ्‍यांच्या बाबतीत कोणता समतोल दृष्टिकोन असला पाहिजे?

▫ पहिले करिंथकर १५:३३ मधील सल्ला विशेषपणे युवकांसाठी का उचित आहे?

[१६ पानांवरील चित्रं]

सुवार्तेत वाढ करण्यासाठी पौलाने कामाच्या जागेचा वापर केला

[१७ पानांवरील चित्रं]

इतर युवक तुमच्या ख्रिस्ती सवया बिघडू शकतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा