“नमस्ते! तुम्हाला देवाचे नाव माहीत आहे का?”
यहोवाच्या साक्षीदारांच्या ब्राझिल मधील शाखा दप्तरात फोरटालेझा शहरातून, १२ वर्षाच्या जुळ्या बहिणींकडून खालील पत्र आले:
“आम्ही १९९० मध्ये आम्ही पाचवीत होतो, तेव्हा आमच्या शाळेने विज्ञान, कला, व विकास या विषयांवर प्रदर्शन भरविले होते. आमची सादरता इतर विद्यार्थ्यांपासून वेगळी हवी, असे आम्ही आमच्या शिक्षकेला सांगितले. यहोवाबद्दल व पवित्र शास्त्राविषयीचे आम्ही बोलत असताना तिने ऐकले होते व तिने सुचविले: ‘यामुळे मग तुम्ही तुमच्या देवाबद्दल काही लिहू शकता!’
“आम्ही ही संधी साक्ष देण्यासाठी फार उत्तम आहे असे पाहिले व यहोवाच्या नामावर दृष्टी टाकणाऱ्या पवित्र शास्त्र प्रकाशनांचे प्रदर्शन लावण्याचे ठरवले. आम्ही स्तोत्रसंहिता ८३:१८ हे वचन मोठ्या अक्षरात लिहिले व ते पवित्र शास्त्रावर उघडून ठेवले आहे असे एक चित्र चिटकवले. शिवाय, आम्ही एका टेबलवर विविध पवित्र शास्त्र भाषांतरे ठेवली ज्यामध्ये यहोवाचे नाव आहे. त्याच टेबलवर पवित्र शास्त्र प्रकाशनांच्या निरनिराळ्या प्रती ठेवल्या. टेबलाच्या कडेला, आम्ही एक वी.सी.आर व दूरदर्शन संच पाहुण्यांना यहोवाचे नाव प्रचलित चित्रपटात कोठे वापरले होते याचे उदाहरण द्यावे म्हणून ठेवला.
“प्रदर्शना दरम्यान, कोणी आमच्या टेबला जवळ येई, तेव्हा आम्ही म्हणत असू: ‘नमस्ते! तुम्हाला देवाचे नाव माहीत आहे का?’ त्या पाहुण्याला प्रतिसाद देण्याची संधी देऊन, व जोए फेरियेरा डे अलमेडा, द जरुसलेम बायबल, व न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन यासारख्या विविध पवित्र शास्त्रांमधील नाव दाखवून आम्ही पुढे म्हणू: ‘इथे पहा! अनेक पवित्र शास्त्र अवतरणे दाखवतात की देवाचे नाव यहोवा आहे.’ यानंतर मग आम्ही चित्रपटातील मुख्य कलाकाराची भूमिका दाखवायचो जेथे देवाचे नाव यहोवा आहे असे म्हटले होते. जेव्हा लोक आस्था दाखवित आम्ही त्यांना अधिक माहितीकरीता मासिक अगर हस्तपत्रिका देत असू.
“एक तरुण आमच्या टेबलाजवळ आला व त्याने वश्चन्स यंग पीपल आस्क—आर्सस दॅट वर्क हे पुस्कत मागितले. आमच्या शिक्षीकेने तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे हे पुस्तक पाहिले व म्हटले: ‘हे पुस्तक किती चित्तवेधक आहे!’ प्रदर्शनाच्या अंतापर्यंत आम्ही ७ पुस्तके, १८ हस्तपत्रिका, आणि ६७ मासिके सादर केली होती. प्रदर्शनात आम्हाला तीसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. परंतु ह्याहूनही अधिक म्हणजे ईश्वरीय नाम यहोवा हे प्रकट करुन देण्याचा सुहक्क मिळाला याबद्दल अधिक आनंद होतो.”