आपल्या थोर निर्माणकर्त्याठायी आनंद करणे
“इस्त्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो, सीयोनाची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावोत.”—स्तोत्रसंहिता १४९:२.
१. “सरतेशेवटी स्वातंत्र्य” ही या घोषणा दिली गेली असली तरी मानवजातीची खरी अवस्था काय आहे?
आजचे जग “वेदनांनी” पीडित आहे. येशूने या संज्ञेचा वापर, १९१४ मध्ये पहिल्या महायुध्दाने जे संकटाचे युग चालू झाले, त्या “युग समाप्तीच्या” भविष्यवाणी संबंधाने केला. (मत्तय २४:३-८) पुष्कळ राजकारणी मुत्सद्दी भवितव्यात उद्विग्नतेशिवाय काहीच पाहत नाहीत. पूर्व युरोप मध्ये “सरतेशेवटी स्वातंत्र्य” याची घोषणा झाली तरी, परिस्थितीला अनुलक्षून त्या क्षेत्रावर एकेकाळी असणाऱ्या पंतप्रधानाने असे म्हटले: “वाढती लोकसंख्या, पृथ्वीच्या तापमानात प्रमाणापेक्षा जास्त होणाऱ्या वाढीचा परिणाम, ओझोनच्या थराला पडलेली छिद्रे व एड्स, अण्वुवस्त्राची दहशत व उत्तरेकडील श्रीमंत रा आणि दक्षिणेतील गरीब रा यांच्यातील नाटकीय वाढता दरार, अन्नटंचाईचा धोका, पृथ्वीग्रहातील खनिज पदार्थांची व जीव सृष्टिची घट, दूरदर्शनवरील कार्यक्रमानुसार समाजाच्या कल्पना व त्यांचा दृष्टिकोण यात घडला गेलेला बदल आणि प्रादेशिक लढायांचे भय—या सर्व व इतर हजारो कारणांनी मानवजातीला भयभीत केले आहे.” ह्या शेवटल्या अनर्थाच्या धमकीला कोणतीच मानवी शक्ति घालवून देऊ शकत नाही.—यिर्मया १०:२३.
२. मनुष्याच्या समस्यांबद्दल कायम स्वरूपाचा तोडगा कोणाकडे आहे व यासंबंधाने त्याने कोणते पाऊल आधीच उचलले आहे?
२ तथापि, आपल्या थोर निर्माणकर्त्याजवळ कायमस्वरूपाचा तोडगा आहे याचा आपल्याला आनंद वाटायला हवा. येशूच्या भविष्यवाणीतील “युगाची समाप्ती” त्याच्या अदृष्य “उपस्थितीशी” संबंधित आहे. (मत्तय २४:३, ३७-३९) “नवे आकाश” निर्माण करण्याकरिता यहोवाने येशूला त्याच्या सिंहासनावर मशीही राजा म्हणून विराजमान केले, व भविष्यवादीत पुरावा दाखवतो की ही ऐतिहासिक घटना १९१४ या वर्षी स्वर्गात घडली.a (२ पेत्र ३:१३) सार्वभौम प्रभू यहोवासोबत सहराजा यानात्याने, येशूला राष्ट्रांचा न्याय करावयाचा आहे व मेंढरासमान पृथ्वीवरील नम्र जनांना शेरडासारख्या हट्टी लोकांमधून वेगळे करण्याचे काम दिले आहे. अभक्त “शेरडे” यांना “सार्वकालिक दंडासाठी” राखून ठेवले आहे आणि “मेंढरे” यांना पृथ्वीच्या राज्यात सार्वकालिक जीवन आहे.—मत्तय २५:३१-३४, ४६.
३. खऱ्या ख्रिश्चनांना आनंद करण्याचे कोणते कारण आहे?
३ सनातन राजा यहोवा त्याच्या पुत्राच्या राज्याकरवी त्याचे सर्व थोर उद्देश कळसास नेत असताना पृथ्वीवरील आध्यात्मिक इस्त्राएलातील शेष, यांच्यासोबत मोठ्या समुदायातील आज्ञाकारी मेंढरे यांना याच्यामध्ये आनंद करण्याचे प्रत्येक कारण आहे. ते म्हणू शकतात: “मी परमेश्वराच्या [यहोवा. न्यू. व] ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्लासतो; कारण त्याने मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत; कारण भूमी जशी आपला अंकुर उगविते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवेसे करितो, तसा परमेश्वर [यहोवा न्यू. व.] सर्व राष्ट्रांदेखत धार्मिकता व कीर्ति अंकुरित करील.” (यशाया ६१:१०, ११) हा “अंकुरित” होण्याचा पुरावा प्रत्येक राष्ट्रातून लाखो लोक यहोवाची स्तुती गाण्यास एकत्रित होत असल्यामध्ये दिसतो.
‘त्वरित घडवून आणणे’
४, ५. (अ) देवाच्या लोकांच्या एकत्रीकरणबद्दल कसे भाकीत केले होते? (ब) १९९२च्या कार्यवर्षात कोणती वाढ स्पष्ट दिसून आली?
४ सैतानाच्या व्यवस्थेचा अंत नजीक येतो तसेच एकत्रित होण्याचे कामही वाढत आहे. आपला थोर निर्माणकर्ता घोषित करतो: “तुझे सर्व लोक धार्मिक होतील, माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लाविलेले रोप होतील, ते माझ्या हातची कारागिरी होतील. जो सर्वात लहान त्याचे सहस्त्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल; मी परमेश्वर [यहोवा न्यू. व.] हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन.” (यशाया ६०:२१, २२) या मासिकात पृष्ठ १२ ते १५ वर दिलेला यहोवाच्या साक्षीदारांचा १९९२ सेवा वर्षाचा कार्य अहवाल दाखवतो की, किती आश्चर्यकारक रितीने ही वाढ त्वरित घडून आली.
५ ह्या अहवालात चित्तवेधक गोष्ट म्हणजे राज्य घोषकांचा नवा उच्चांक व तो आहे ४४,७२,७८७ मागच्या वर्षापेक्षा अधिक १,९३,९६७—४.५ टक्के वाढ. १९९२ मध्ये ३,०१,००२ उच्चांकांनी बाप्तिस्मा घेतलेल्या लोकांद्वारे पवित्र शास्त्राचे सत्य पुष्कळ जन स्वीकारत आहेत ही वस्तुस्थिती प्रकट होते. ह्या “अंधाराच्या व औदासीनाच्या दिवसात”, टोळाच्या झुंडी सारखे असणारे “एक महान व बलवान राष्ट्र” “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” राज्याची साक्ष घोषित करत आहेत हे पाहून आम्हाला केवढा आनंद वाटतो! (योएल २:२, २५; प्रे. कृत्ये १:८) वॉचटावर सोसायटीच्या विमानाने ५०पेक्षा अधिक भेटी दिल्या त्या बर्फाच्छादित अलास्कापासून ते माली व बुरकीना फासो या अत्यंत उष्ण वाळवंटात आणि मायक्रोनेसियाच्या विखुरलेल्या बेटांपर्यंत, “देवाकडून होणारे तारण दिगंतापर्यंत न्यावे” म्हणून यहोवाचे सेवक “राष्ट्रांचा प्रकाश” असे चकाकत आहेत.—यशया ४९:६.
६, ७ अलिकडच्या काळात कोणत्या अनपेक्षित घटना घडल्या, व त्याबद्दल यहोवाच्या सेवकांनी कशी प्रतिक्रिया दर्शवली?
६ यहोवा त्याच्या लोकांना सुरक्षा व सांभाळण्यामध्ये बळकट दुर्ग व आश्रयस्थान बनला आहे. पृथ्वीच्या काही भागांमध्ये, यहोवाच्या साक्षीदारांना वर्षानुवर्षे निष्ठुर छळाचा व उपद्रवाचा सामना करावा लागला. (स्तोत्रसंहिता ३७:३९, ४०; ६१:३, ४) पण अलिकडेच, जणू काय चमत्कारच की काही २१ राष्ट्रांतील प्रतिबंध व निर्बंध हटविण्यात आले, व यामुळे देवाचे लोक आता मुक्तपणे आमच्या थोर निर्माणकर्त्याने येशू ख्रिस्ताला संपूर्ण पृथ्वीवर राजा म्हणून अधिष्टित केले आहे असे घोषित करु शकतात.—स्तोत्रसंहिता २:६-१२.
७ यहोवाचे लोक त्यांना नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याचा चांगला उपयोग करीत आहेत का? बल्गेरिया, रोमानिया, पूर्व युरोपमध्ये आधी असलेले सोव्हियत राष्ट्र, अंगोला, बेनिन, आफ्रिकातील मोझांबिक यांच्यामध्ये झालेल्या वाढीसाठी सोबतच्या त्तक्त्याकडे लक्ष देऊन पहा. झायर या देशात देखील अभूतपूर्व वाढ आहे. आनंदी हृदयाने आपले मुक्त बांधव आव्हानाला हे उत्तर देतात: “परमेश्वराचे [यहोवा न्यू. व] उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे, जो एकटाच मोठी अद्भूत कृत्ये करितो, त्याचे कारण त्याची दया सनातन आहे.” (स्तोत्रसंहिता १३६:१, ४) राज्याच्या बाजूला इतर मेंढरासमान लोकांना आवेशाने एकत्रित करण्याच्या कामाद्वारे हे आभार प्रदर्शविले जातात.
८. पूर्व युरोप व आफ्रिकेत यहोवाचे नवे स्तुती करणारे कसे “मेघाप्रमाणे धावत” आले?
८ युरोपात गेल्या उन्हाळ्यात, पूर्वी कम्युनिस्ट म्हणून असलेल्या प्रदेशात यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनांना आश्चर्यचकीत करणारी उपस्थिती होती. सोबत असलेला त्तक्ता दाखवतो त्यानुसार बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या ही आणखी आश्चर्यकारक गोष्ट आहे. याचप्रकारे, टागो, आफ्रिका या देशांवर असलेली भक्तिची बंदी डिसेंबर १०, १९९१ रोजी उठविण्यात आली. यानंतर लागलेच पुढच्या महिन्यातच तेथे अधिवेशन भरले. प्रत्येक महिन्याच्या क्षेत्रकार्यातील ६,४४३ प्रचारकांसोबत तुलना करता, उपस्थितांची संख्या २५,४६७ पर्यंत वाढली ज्यामध्ये ५५६ लोकांनी बाप्तिस्मा घेतला—ती प्रचारकांच्या संख्येत ८.६ टक्के वाढ झाली. जसे यशया ६०:८ मध्ये यहोवाची स्तुती नव्यानेच गाणाऱ्यांबद्दल म्हटले आहे की: “मेघाप्रमाणे धावतात, व कबुतरे आपल्या घरकुंडाकडे उडून जातात.” अशापध्दतीने यहोवाच्या लोकांच्या मंडळ्यांमध्ये ते येत आहेत.
९. अलिकडेच भक्तिसाठी स्वातंत्र्य मिळालेल्या देशातल्या ख्रिश्चनांना “अन्न खाऊन तृप्त” होण्यासाठी कोणत्या योजना केल्या गेल्या?
९ पूर्व युरोप व आफ्रिकेतील आध्यात्मिक अन्नाची भूक शमविली जात आहे. जर्मनी, इटली व दक्षिण आफ्रिकेतील वॉचटावर संस्थेच्या छापखान्यांनी आध्यात्मिकतेने भुकेलेल्या राष्ट्रांना मोटारगाड्या भरभरुन विविध भाषांमध्ये, प्रकाशने पाठविली. यापूर्वी, प्रत्येक साक्षीदारांकडे त्यांचे वैयक्तिक मासिक नसल्याने जुनी झालेली मर्यादितच मासिके एकदुसऱ्याला पुढे पाठवीत होते, पण आता त्यांना आध्यात्मिक अन्न विपुलतेने मिळत आहे. त्यांना भविष्यवाणीच्या पूर्तीत सहभागी होण्याचा आनंद होत आहे, जेथे म्हटले आहे: “तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल व ज्याने तुम्हांसाठी आश्चर्याची कृत्ये केली तो तुमचा देव [यहोवा न्यू. व.] परमेश्वर याच्या नामाची स्तुती कराल.”—योएल २:२६.
पुढील वाढीसाठी काळजी वाहणे
१०. स्मारकदिनाच्या उच्च उपस्थितीला ध्यानात ठेवून, नवोदितांना कोणते आमंत्रण दिले जात आहे?
१० येशूच्या मृत्युच्या स्मारक दिनाची जगभरातील उपस्थिती १,१४,३१,१७१ आश्चर्याची आहे, मागच्या वर्षापेक्षा ७,८१,०१३ किंवा ७.३ टक्क्यांनी वाढ होती. तुम्हा सर्व नवोदितांचे स्वागत असो! या सर्व नव्या आस्थेवाईक व्यर्क्तिनी यहोवाच्या साक्षीदारांसोबत घरगुती पवित्र शास्त्राभ्यासाचा लाभ मिळवला तर हे किती विस्मयकारक असेल बरे! (यशया ४८:१७ पहा.) सेवा वर्ष अहवाल दाखवतो की प्रत्येक महिन्याला ४२,७८,१२७ शास्त्राभ्यास चालविले जातात, ही ८.४-टक्क्यांची एक उत्तम वाढ आहे. तथापि ह्या सेवेचा फायदा आणखीन पुष्कळ जण करून घेऊ शकतात. यहोवाचे साक्षीदार आस्थेवाईकांसोबत नियमित मोफत घरगुती पवित्र शास्त्र अभ्यासाद्वारे सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर स्थिर उभे राहण्याकरिता मदत करण्यास आनंदी आहेत. (योहान ३:१६, ३६) अशा अभ्यासाची विनंती का करु नये? शिवाय राज्य सभागृहात तुमच्या आगमनाचे उबदारपणे स्वागत केले जाईल हे लक्षात असू द्या!—स्तोत्रसंहिता १२२:१; रोमकरांस १५:७.
११, १२. (अ) काही देशांमध्ये कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे? (ब) श्रीमंत व गरीब राष्ट्रांमध्ये कोणत्या रितीने “समानता” घडून येत आहे?
११ ज्या मंडळ्यांना उत्तम सभागृह आहे त्या समृध्दपणे आशीर्वादित आहेत. काही देशातील परिस्थिती फार वेगळी आहे जिथे विश्वासू साक्षीदारांनी अनेक वर्ष बंदीवास सहन केला, व लहान लहान गटाने सभा चालविल्या. अशाच काही देशात, ते आता स्वतंत्र आहेत, पण सभागृह अल्प आहेत. उदाहरणार्थ, एका आफ्रिकन देशात ९३ मंडळ्या केवळ तीन राज्य सभागृह वापरतात. यास्तव विशेषकरुन सभा मोठ्या रिकाम्या मैदानावर भरविल्या जातात. १५० प्रचारक असलेल्या मंडळीमध्ये ४५० पर्यंत नियमित उपस्थिती असते.
१२ पूर्व युरोपात राज्य सभागृह बांधणे किंवा त्यासाठी जागा विकत घेणे सहज कठीन आहे, तरी देखील काही प्रगती प्राप्त झाली. पोलंड मध्ये नोव्हेंबर २८, १९९२ रोजी एका नव्या शाखेच्या समर्पणाची योजना केली होती. यहोवाच्या साक्षीदारांच्या जगव्याप्त कामाला दिलेल्या नि:स्वार्थ देणग्यांचा, सभागृह बांधण्यास व इतर सोयींसाठी उपयोग केला जात आहे. अशाप्रकारे गैरसोय असणाऱ्या देशातल्या मंडळ्यांच्या आध्यात्मिक गरजा भागवण्यासाठी “समानतेने” नि:स्वार्थ बांधव त्यांच्या “भरपुरीतून” हातभार लावत आहेत.—२ करिंथ ८:१३, १४.
एक अब्ज तास!
१३. १९९२ ह्या वर्षात प्रचार व शिकवण्याच्या कामात किती तास खर्च झाले व या आकड्यात कोणाच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब दिसते?
१३ एक अब्ज तासांचे तुम्ही काय करणार? सार्वकालिक जीवन प्राप्त करणारे तेवढे किंवा ह्याहीपेक्षा अधिक तास फलदायी, व तृप्तीने यहोवाच्या सेवेत खर्च करु शकतील. एका वर्षात ह्या सर्व तासांना भरण्याची कल्पना करा! यहोवाच्या लोकांनी हेच ते १९९२ या वर्षात सिद्धीस नेले. राज्य प्रचारकांच्या व्यक्तिगत अहवालांना एकत्रित मोजल्यावर १,०२,४९,१०,४३४ तासांचा नवा उच्चांक मिळतो की जे तास उत्तम मार्गाने— “लोकात व घरोघरी शिकविण्यास”, व आमच्या थोर निर्माणकर्त्याचे गौरव करण्यात खर्च केले गेले. (प्रे. कृत्ये २०:२०) सरासरीने, ४२,८९,७३७ साक्षीदार प्रत्येक महिन्याला अहवाल देत होते. ते सर्व विविध जीवन शैलीतून आलेले आहेत. काहींकडे राज्याच्या कामाला हातभार लावण्यासाठी मर्यादित वेळ आहे. ह्यात आपल्या घरच्या गरजा पूर्ण करणारे कुटुंब प्रमुख, वृद्ध व्यक्ति, पुष्कळ शारिरीक समस्या असलेले, यासोबत शाळेत जाणाऱ्या मुलांचा देखील समावेश आहे. तरीपण, प्रत्येकाचा अहवाल यहोवावरील प्रेमाचे बहुमोल प्रतिबिंब व्यक्त करतो.—लुक २१:२-४.
१४. युवक ‘आपल्या निर्माणकर्त्याचे स्मरण’ कसे करीत आहेत?
१४ यहोवाच्या सेवेत एक युवक पिढी वाढ करत आहे; ते “आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर” या उपदेशक १२:१ मधील शलमोनाच्या शब्दांचे अनुपालन करीत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. शाळेचा अभ्यास चांगला करण्यासोबत ते आपल्या निष्ठावान पालकांकडून आध्यात्मिक गोर्ष्टिची तालिम घेत आहेत. अलिकडच्या अधिवेशनात किशोरवयीन युवकांनी बाप्तिस्मा घेण्यासाठी स्वत:ला उभे केलेले पाहून फारच आनंद वाटला. तसेच बहुत युवक त्यांचे शालेय जीवन संपविल्यावर पायनियरिंग करण्यासाठी काही कला वा उद्योग शिकत आहेत ही देखील आनंदाची गोष्ट आहे. अशा तऱ्हेने, पौल ज्याप्रमाणे उदारनिर्वाहासाठी वेळोवेळी तंबू बनविण्याचे काम करीत होता त्याच प्रकारे त्यांनाही असे करणे साहाय्यक ठरेल.—प्रे. कृत्ये १८:१-४.
१५, १६. राज्याच्या कामात प्रगती व्हावी म्हणून कित्येक पायनियर व पूर्णवेळचे सेवक यांनी मोठ्या प्रमाणावर कशी मदत पुरविली आहे, व यातील काहींनी कोणत्या आशीर्वादांचा आनंद मिळवला?
१५ राज्याच्या कामात प्रगती व्हावी म्हणून कित्येक पायनियर व पूर्णवेळचे सेवक केवढ्या मोठ्या प्रमाणावर मदत पुरवीत आहेत! मागील वर्षाहून पायनियरांची संख्या ९,३१,५२१ च्या उच्चांकाने वाढली आहे. घरोघरच्या कार्याद्वारे व लोकांच्या घरी जाऊन पवित्र शास्त्र अभ्यास चालविल्यामुळे, शास्त्रवचनावर भाष्य करण्यात ते प्रभावी बनले आहेत. एवढेच नव्हे तर दोन आठवड्यांची पायनियर सेवा शाळा याला उपस्थित राहिल्याने देवाची सेवा आनंदाने व मोठ्या प्रमाणावर कशी विकसित करता येईल त्याचे प्रशिक्षण पुष्कळांनी घेतले.
१६ प्रत्येक विश्वासू पायनियर यशया ५०:४ मधील शब्दांशी सहमत असेल: “शिणलेल्यांस बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभु [यहोवा न्यू. व.] परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे.” आज अनेक असे लोक आहेत जे, त्यांच्याभोवतालच्या भ्रष्ट जगाने पीडिलेले आहेत पण आपल्या विश्वासू पायनियरांच्या शब्दांनी तजेला पावतात.—नीतीसूत्रे १५:२३; यहेज्केल ९:४.
एक भव्य बांधणी प्रकल्प
१७. आध्यात्मिक बांधकामासोबत, अलिकडेच कोणत्या वास्तविक बांधकामाचे निरिक्षण करण्यास मिळाले?
१७ यहोवाच्या साक्षीदारांच्या जगव्याप्त आध्यात्मिक उत्कर्षासोबत भौतिक वाढीचीही गरज आहे. यामुळे संमेलनगृह, राज्य सभागृह बांधण्यासाठी, बेथेल गृह व छापण्याच्या तरतुदींमध्ये विस्तार करण्याची गरज भासते. यासाठी, यहोवाच्या साक्षीदारांना अक्षरार्थ रितीने बांधणारे होण्यास हवे. असेच बांधकाम शलमोन राजाच्या दिवसात झाले होते. शलमोनाने यहोवाची भक्ति करण्यासाठी “जे नमुने दैवी आत्म्याच्या प्रेरणेने त्यास मिळाले होते” त्याप्रमाणे त्याने मंदिर बांधिले; हे नमुने त्याच्या पित्याला, दाविदाला यहोवाने पुरविले होते. (१ इतिहास २८:११, १२) अशाप्रकारे, शलमोनाने नुसते त्याच्या ऐकणाऱ्यांना अमुल्य सूज्ञ गोष्टींनीच दृढ केले असे नाही तर प्रापंचिक जग कधीच बांधू न शकणाऱ्या अशा एका श्रेष्ठ इमारतीच्या बांधकामाचे निर्देशन केले.—१ राजे ६:१; ९:१५, १७-१९.
१८, १९. (अ) यहोवाच्या संस्थेद्वारे कोणत्या जलद बांधकामाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत? (ब) आध्यात्मिक व भौतिक बांधकामात यहोवाचा आत्मा कसा दिसत आहे?
१८ आज जरी यहोवाचे साक्षीदार दैवी प्रेरणेने नमूने बांधित नसले तरी त्यांच्यासोबत देवाचा आत्मा जरुर असतो. इस्त्राएलांच्या दिवसात होते तसे, जगाच्या लोकांना अचंबित करण्यालायक इमारत ते बांधत आहेत. (जखऱ्या ४:६) वेळ आता फार कमी आहे. विलंब न लावता राज्य सभागृह व इतर काही इमारतींना बांधण्याची फारच गरज आहे. काही राष्ट्रांमध्ये जलदीने बांधलेले राज्य सभागृह आता सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. उदाहरणार्थ, गेल्या १० वर्षात कॅनडाने ३०६ राज्य सभागृह व तेही प्रत्येकी कमीतकमी दोन दिवसांच्या आत बांधल्याचा अहवाल दिला. यहोवाच्या ह्या जगव्याप्त कामाच्या जलद वाढीमुळे, एकूण ४३ नव्या शाखा इमारती किंवा शाखेच्या विस्ताराची योजना आहे किंवा बांधल्या जाणार आहेत. याशिवाय, ज्यामध्ये एक हजार बेथेल स्वयंसेवक राहू शकतील असे ३० मजली वसतिगृह, ब्रुकलिन येथे बांधण्यात येत आहे. पॅटरसन न्यूयॉर्क येथे पवित्र शास्त्र शिक्षण केंद्राचे बांधकाम आराखड्याच्या अगदी पुढे पोंहचले आहे व ही योजना वॉचटावर सोसायटीचा सर्वात मोठा प्रकल्प आहे.
१९ हे प्रकल्प एवढ्या कार्यक्षमतेने प्रगतीपथावर उच्च व सुधारित प्रकाराने बांधले जात आहेत की, बांधकामाची माहिती असलेले व्यावसायिक लोक ते पाहून थक्क होतात. का बरे? यहोवाच्या समर्पित साक्षीदारांनी केलेल्या विलक्षण देणगीमुळे हे साध्य झाले. त्याचा आत्मा त्यांना आर्थिक मदतच नव्हे तर संपूर्ण हृदयाने वेळ व शक्ति खर्च करण्याची चालना देतो. बांधकामाचे ठिकाण निष्ठावान व सुशिक्षित कामकऱ्यांनी गच्च भरुन जाते. तेथे कोणत्याही कामगारांचा संप नाही वा कोणीही कामावर कामचुकारपणा करून वेळ घालवीत नाही. यहोवाचा आत्मा त्यांना ही चालना देतो जशी त्याने मोशेच्या काळी निवासमंडपाच्या आणि शलमोनाच्या दिवसात मंदिर बांधणाऱ्यांना दिली होती. या कामकऱ्यांना आध्यात्मिकता ह्या गुणाची उल्लेखनीय आवश्यकता असते.—निगर्म ३५:३०-३५; ३६:१-३; ३९:४२, ४३; १ राजे ६:११-१४ पडताळा.
२०. (अ) राज्याची सुवार्ता अद्याप कोठवर गाजवण्यात येईल? (ब) यहोवाच्या लोकांसाठी कोणते आशीर्वाद राखून ठेवले आहेत?
२० मंदिर पूर्ण झाल्यावरही शलमोनाने बांधकामाचे कार्यक्रम चालु ठेवले. (२ इतिहास ८:१-६) आधुनिक साक्षीदारांना—त्यांच्या वाढीसोबत आणखीन किती राज्य सभागृहे व इतर सुविधा बांधाव्या लागतील हे आम्हास ठाऊक नाही. तथापि, आम्हाला ही माहिती आहे की राज्याची ही सुवार्ता यहोवाची इच्छा आहे तेवढ्या प्रमाणात गाजविली जाईल तेव्हा शेवट “मोठे संकट” येईल. (मत्तय २४:१४, २१) आता लोभिष्ट माणसांद्वारे पृथ्वीची नासाडी होत नसता, “नवे आकाश” व “नवी पृथ्वी” या यहोवाच्या व्यवस्थेद्वारे अगणित आशीर्वाद मानवजातीवर मिळत राहतील. यास्तव आम्ही “जे काही देव उत्पन्न करितो त्यात सदा आनंदी व उल्लास” करीत आमच्या थोर निर्माणकर्त्याची स्तुती करु या!—यशया ६५:१७-१९, २१, २५.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने छापलेल्या “तुझे राज्य येवो,” या पुस्तकातील पृष्ठ १०५-१६, १८६-९ पहा.
तुम्ही विवेचीत करु शकाल?
▫ आमच्या थोर निर्माणकर्त्यामध्ये आनंद करण्याची कोणती कारणे आम्हाकडे आहेत?
▫ १९९२ सेवा वर्षात कोणत्या वाढीचा अहवाल दिला आहे?
▫ पूर्वी ज्या देशांवर बंदी होती, त्या देशातून आता कोणत्या भरपूर आशीर्वादांचा अहवाल दिला गेला?
▫ यहोवाच्या संस्थेतील वाढीला युवकांनी व पायनियरांनी कसा हातभार लावला?
▫ आध्यात्मिक व भौतिक बांधकामात यहोवाचे लोक कसे मग्न राहिले?
[६-९ पानांवरील तक्ता]
(For fully formatted text, see publication)
यहोवाच्या साक्षीदारांच्या १९९२चा जगव्याप्त सेवावर्ष अहवाल
[४ पानांवरील चित्रं]
मागच्या वर्षाच्या बाप्तिस्मा घेतलेल्या लाखो उमेदवारांवरुन असे दिसून येते की यहोवाचे आशीर्वाद प्रचारकार्य व शिकवण्याच्या कामावर आहे
[१० पानांवरील चित्रं]
असंख्य युवक ‘त्यांच्या निर्माणकर्त्याचे स्मरण’ करीत आहेत.
[११ पानांवरील संक्षिप्त आशय]
प्रचारकार्यात व शिकवण्याच्या कामात मागच्या वर्षी एक अब्जापेक्षा अधिक तास खर्च केले गेले