तुम्ही वेळ निघून गेल्यावर विचार करता का?
त्याच्या मृत्युपूर्वी तीन दिवस अगोदर, यरुशलेमात येशू अत्यंत कार्यमग्न होता. तो दिवस आज हयातीत असणाऱ्या ख्रिश्चनांकरिता अत्यंत महत्त्वाचा असा ठरला. त्याने मंदिरात शिक्षण दिले, त्याला पाशात पकडण्यासाठी, यहूदी धर्मपुढाऱ्यांनी जे कावेबाज प्रश्न विचारले, त्यांना परतवून लावले. शेवटी, शास्त्री व परुशांना अत्यंत कडक शब्दात दोष लावला की, ज्यामुळे ते सार्वकालिक नाशाकरिता ढोंगी व सापाची पिल्ले असल्याचे सूचित झाले.—मत्तय अध्याय २२, २३.
मंदिराच्या परिसरातून निघत असताना त्याच्या एका शिष्याने त्यास म्हटलेः “गुरुजी, पाहा कसे हे धोंडे, व कशा ह्या इमारती!” अप्रभावित झालेल्या येशूने त्यास म्हटलेः “ह्या मोठ्या इमारती तू पाहतोस ना? जो पाडला जाणार नाही, असा येथे दगडावर दगड राहणार नाही.” (मार्क १३:१, २) त्यानंतर अगदी अंतिम वेळेकरिता येशू त्या मंदिरातून निघाला, किद्रोनाची दरी पार करून जैतून डोंगराच्या उतरणीवर आला.
जेव्हा तो तेथे बसला, तेव्हा मध्यानानंतरच्या सूर्यप्रकाशात तो न्हावून निघाला. दरीच्या पलिकडे मोराया डोंगरावरील मंदिर दृष्टीपथात होते, तेव्हा पेत्र, योहान व आंद्रिया खाजगीरित्या त्याच्याकडे आले. मंदिराच्या नाशाविषयी जे शब्द त्याने उच्चारले होते ते समजण्यास कठीण असे अद्यापही त्यांच्या मनावर ठसलेले होते. त्यांनी विचारलेः “ह्या गोष्टी केव्हा घडतील, व तुझ्या उपस्थितीची व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय ते आम्हास सांग.” (मत्तय २४:३; मार्क १३:३, ४) जैतुन डोंगरावर त्या सायंकाळी त्यांच्या प्रश्नाला त्याने जे उत्तर दिले, ते आम्हाकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहे. या सद्य व्यवस्थीकरणाच्या समाप्तीविषयी, विचार करण्याचे, अति विलंब होईपर्यंत वाट बघण्याचे टाळण्यास मदत करील.
त्यांचा प्रश्न दुहेरी होता. त्यातील एक भाग, मंदिराचा व यहूदी व्यवस्थेचा नाश व दुसरा भाग, येशूची भविष्यातील राजा यानाते उपस्थिती, व ह्या सद्य व्यवस्थीकरणाचा अंत, याच्याशी संबंधीत होता. म़तय २४ व २५, मार्क १३ व लूक २१ मध्ये येशूने दिलेल्या उत्तरात या दोन्हा प्रश्नांचा निकाल लागला. (प्रकटीकरण ६:१-८ सुद्धा पाहा.) या सद्य जगाच्या किंवा व्यवस्थीकरणाच्या अंतासंबंधाने येशूने अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचे वर्णन केले व या सर्वांना एकत्र केले तर शेवटल्या दिवसांची ओळख देऊ शकणारी ती सामूहिक चिन्ह अशी ठरतात. ते सामूहिक चिन्ह परिपूर्ण होत आहे का? ज्या विषयी बायबल सांगते त्या शेवटल्या दिवसात ते आम्हास निरविते का? त्याची परिपूर्णता आम्हास याची सूचना देते का की, वेळ सरुन गेल्यावर मग विचार करणारे ठरु?
येशूने दिलेल्या सामूहिक चिन्हाचा एक लक्षवेधक भाग म्हणजे, “राष्ट्र राष्ट्रावर व राज्य राज्यावर उठेल.” (मत्तय २४:७) १९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरु झाले. त्या दशकातील यहोवाचे साक्षीदार तत्क्षणी दक्ष राहिले. आणि का बरे? साधारण ३५ वर्षे अगोदर, डिसेंबर १८७९ मध्ये, बायबल आधारीत कालगणनेनुसार वॉच टावर मासिकाने असे म्हटले होते की, मानवी इतिहासात १९१४ हे वर्ष एक कलाटणी देणारे असेल. खरोखरी एका जागतिक स्तरावर ज्यामध्ये प्रत्यक्षात २८ रा गोवली होती, व १४ दशलक्ष लोक मारले गेले होते, असे हे पहिले महायुद्ध, अंतसमयाविषयी येशूच्या सामूहिक चिन्हातील घटनांची सुरवात ठरू शकले असते का? त्या चिन्हाच्या इतर लक्षवेधक गोष्टी त्यानंतर घडून येणार होत्या का?
येशूने दिलेल्या प्रकटीकरणात हाच रक्तरंजितपणा पूर्वभाकित केला आहे. येथे एक अग्निवर्ण घोडा व त्यावरील स्वार पृथ्वीवरील शांती हरण करीत आहे. (प्रकटीकरण १:१; ६:४) १९१४ ते १९१८ या दरम्यान ते निश्चितपणे घडले. आणि पहिले जागतिक युद्ध केवळ सुरवात होते. १९३९ मध्ये दुसरे जागतिक युद्ध पेटेले. त्या झगड्यात ५९ रा खेचली गेली, आणि साधारण ५० दसलक्ष लोक मारले गेले. दुसऱ्या जागतिक युद्धानंतर ४५ वर्षात १२५ पेक्षा अधिक युद्धे लढली गेली, व २० दसलक्षापेक्षा अधिक लोक मारले गेले.
त्या चिन्हाचा आणखी एक लक्षवेधक भाग म्हणजेः “अन्न टंचाई.” (मत्तय २४:७) पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान व नंतर सर्वत्र दुष्काळ पसरलेला होता. एक अहवाल दाखवून देतो की, १९१४ पासून ६० पेक्षा अधिक दुष्काळ झाले, व अनेक लक्षावधि जिविताची हानी झाली. याशिवाय आजही अपुऱ्या आहारामुळे व टाळल्या जाऊ शकणाऱ्या आजारामुळे दर दिवशी ४०,००० बालके मृत्युमुखी पडतात.
“जागोजागी भूमिकंप होतील.” (लूक २१:११) पहिल्या महायुद्धाची सुरवात झाल्यानंतर त्यांनी पृथ्वीला कंपायमान केले. १९१५ मध्ये इटलीत ३२,६१० जीव घेतले; १९२० मध्ये आणखी एकाने चीनमध्ये २,००,०००; १९२३ मध्ये जपानमध्ये ९९,३०० मेले; १९३५ मध्ये सध्याच्या पाकिस्तानात २५,०००नी आपले जीवन गमावले; १९३९ मध्ये तुर्कीत ३२,७०० नाश पावले; १९७० मध्ये पेरुत ६६,८०० मारले गेले; १९७६ मध्ये चीनमध्ये २,४०,००० (काही म्हणतात, ८,००,०००) मेले; १९८८ मध्ये अर्मेनियात २५,००० ना जीव गमावावा लागला. खचितच, १९१४ पासून मोठमोठे धरणीकंप होत आलेले आहेत!
“जागोजागी मऱ्या होतील.” (लूक २१:११) १९१८ व १९१९ च्या दरम्यान जवळजवळ १,००,००,००,००० लोक स्पॅनिश एन्फ्लुएंजा यामुळे आजारी होते, व २,००,००,००० पेक्षा अधिक लोक मेले. परंतु ती केवळ सुरवात होती. प्रगतशील जगात मलेरिया, स्नेल फिव्हर, रिव्हर ब्लाइंडनेस्, अक्युट डायरिया व इतर प्रकारचे त्रास आजही लक्षावधी लोकांना लुळे करीत आहेत व अंत करीत आहेत. यात आणखी भर म्हणजे हृदयरोग, कर्करोग आणखी लक्षावधी लोकांचे जीव घेतात. लैंगिकतेद्वारे संक्रमित होणारे आजार मानवजातीत जोराने वाढत आहेत. आज हृदयात भयाची धडकी निर्माण करणारा नाशकारक शाप म्हणजे एडस्. असा अंदाजे केला जातो की, प्रत्येक नऊ मिनिटाला एक नवीन बळीस तो जडतो, व त्यास कोणताही उपचार दृष्टीपथात नाही.
“अधर्मात वाढ.” (मत्तय २४:१२) १९१४ पासून अधर्म अत्यंत जोरदारपणे वाढत आहे, आणि आज तो स्फोटक असा झाला आहे. खून, बलात्कार, चोऱ्या, टोळीयुद्ध ह्या गोष्टी वर्तमानपत्रांचे मथळे व रेडिओ व दूरदर्शनवरील बातम्या बनत आहेत. हिंसाचार अमर्यादपणे वाढत आहेत. अमेरिकेत एक बंदुकधारी, जलद गोळीबार करून हल्ला करणाऱ्या रायफलने शालेय मुलांच्या घोळक्यात १०० गोळ्यांचा वर्षाव करतो, त्यामुळे ५ मृत्युमुखी व २९ घायाळ झाले. इंग्लंडमध्ये एक वेडा एके-४७ या हल्ला करणाच्या रायफलने १६ लोकांची हत्या करतो. कॅनडामध्ये स्त्रियांचा द्वेष करणारा एक माणूस माँट्रीयल विश्वविद्यालयात जातो व तेथील १४ची हत्या करतो. असे लोक लांडगे, सिंह, जंगली श्वापदे, असमंजस जनावरे यासारखी त्यांना पकडून नष्ट केले जावे याकरिताच जन्म घेतात.—पडताळा यहेज्केल २२:२७; सफन्या ३:३; २ पेत्र २:१२.
“भयाने व जगावर कोसळणाऱ्या संकटाने माणसे मरणोन्मुख होतील.” (लूक २१:२६) पहिल्या अणुबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर थोडक्याच अवधीत अणुशास्त्रज्ञ हेराल्ड सी. युरे यांनी भविष्याबद्दल असे म्हटलेः “आम्ही भय सेवन करू; भयात झोपू; भयात जगू व भयातच मरू.” आण्विक युद्धाच्या भयात गुन्हेगारी, दुष्काळ, आर्थिक अस्थिरता, नैतिक अधःपात, कौटुंबिक नाश, पृथ्वीचे प्रदूषण यांची भर पडलेली आहे. वस्तुतः वर्तमानपत्रे व दूरदर्शनवरील बातम्यांद्वारे वाईट दिवस आमच्या दृष्टीपुढे नियमित आणले जातात व यामुळे भय सर्वत्र फैलावले जाते.
या सद्य व्यवस्थीकरणाच्या अंतिम दिवसात जी परिस्थिती असेल तिच्याविषयी प्रेषित पौलाने देखील लिखाण केले आहे. त्याची वचने, दिवसाच्या बातम्या वाचल्यासारखी वाटतात. “हे जाण की, शेवटल्या काळी कठीण दिवस येतील, कारण मनुष्ये स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, कृतघ्न, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाड, असंयमी, क्रूर, चांगल्यावर प्रेम न करणारी, विश्वासघातकी, हूड, मदांध, देवावर प्रेम न करता विषयावर प्रेम करणारी, सुभक्तीचे केवळ स्वरुप दाखवून स्वतःवर तिचा संस्कार नाही अशी ती होतील. त्यांजपासूनही दूर राहा.”—२ तीमथ्य ३:१-५.
“उत्पत्तीच्या प्रारंभापासून जसे चालू आहे” तसेच सर्वकाही राहिले आहे?
शेवटल्या दिवसासंबंधी प्रेषित पेत्राने आणखी एक लक्षवेधक गोष्ट पूर्वभाकित केली आहेः “शेवटल्या दिवसात आपल्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक थट्टा करीत येऊन म्हणतीलः ‘त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून, उत्पत्तीच्या प्रारंभापासून जसे चालू आहे तसेच सर्वकाही राहिले आहे.”—२ पेत्र ३:३, ४.
आज जेव्हा केव्हा शेवटल्या दिवसासंबंधी विषय उपस्थित होतो तेव्हा पुष्कळ लोक थट्टेद्वारे पेत्राच्या भविष्यवादीत शब्दांची पूर्णता करतात व म्हणतातः ‘ओह, ह्या सर्व गोष्टी अगोदर होऊन गेल्या आहेत. इतिहासाची केवळ पुनरावृत्ती होत आहे. म्हणूनच ते त्या सूचनेला बाजूला सारतात व आपल्याच वासनात चालू लागतात. अंतिम दिवसाची ओळख देणाऱ्या त्या भविष्यवादांची पूर्णता ते बुद्धीपुरस्सर विसरतात.—२ पेत्र ३:५.
तथापि, सामूहिक चिन्हांच्या ज्या वेगवेगळ्या लक्षवेधक गोष्टी येशूने पूर्वभाकित केलेल्या आहेत, त्या सर्वांची परिपूर्णता इतक्या थोडक्या काळात, इतक्या प्रखरतेने व इतक्या दूरवर त्यांचे परिणाम पोहंचतील, अशा प्रकारे पूर्वी कधीही झालेली नाही. (उदाहरणार्थ, मत्तय २४:३-१२; मार्क १३:३-८; लूक २१:१०, ११, २५, २६ यांची उजळणी करा.) तसेच प्रकटीकरणात वर्णित केलेल्या अंतिम दिवसाविषयी लक्षवेधक असणाऱ्या अद्याप इतर काही गोष्टींकडे आपले लक्ष वेधण्यास खासपणे आम्हास आवडेल.
प्रकटीकरण ११:१८कडे आपण आपले लक्ष वळवू. ते असे म्हणते की, ख्रिस्ताचे राज्य जेव्हा राजवट सुरु करते, आणि रा क्रोधाविष्ट झालेली आहेत व न्याय करण्याची वेळ येत आहे, तेव्हा यहोवा जे पृथ्वीची नासाडी करतात अशांचा नाश करील.” प्रदूषण आज पृथ्वीची नासाडी करीत नाही का? हे खरे आहे की, लोकांनी स्वतःला समृद्ध करण्यासाठी, पृथ्वीतील साधनांचा गैरवापर केला. परंतु असे करीत असताना निवासी ग्रह या नाते तिचा नाश करण्याच्या स्थितीत पूर्वी कधीही नव्हते. परंतु आता १९१४ पासून शास्त्रीय तंत्रज्ञानात वाढ झाल्यामुळे, मानवाठायी आता ते सामर्थ्य आहे, आणि संपत्तीची अधाशीपणे पकडे घेत राहिल्याने ते पृथ्वीची नासाडी खचितच करीत आहेत, वातावरण प्रदूषित करीत आहेत, आणि जीवन टिकवून ठेवण्याची पृथ्वीची क्षमता धोक्यात आणीत आहेत.
द्रव्यलोभी, भौतिकवादी अशी वसाहत ह्या गोष्टी धोकादायक मर्यादेप्रत करीत आहेत. त्या दुष्कृत्यांचे काही परिणाम याप्रकारे उद्भवत आहेत, जसे कीः आम्लाचा वर्षाव, गोलार्ध तापणे, ओझोनच्या थारा छेद पडणे, निरुपयोगी गोष्टींची फाजील साठा, विषारी गोष्टींचा कचरा, धोकादायक किटकनाशके, आण्विक कचरा, पाण्यावरील तेलाचे तवंग, मैला तसाच टाकणे, प्राण्यांच्या वर्गाला धोका, मृत तलाव, प्रदूषित पाणी, जंगलतोड प्रदूषित जमीन, जमिनीच्या पृष्ठ भागाची धूप, आणि झाडे, पिके तसेच मानवी आरोग्यास इजा पोहंचविणारा धूर.
प्राध्यापक बॅरी कॉमनेर म्हणतातः “माझा असा विश्वास आहे की, पृथ्वीवर सतत होणारे प्रदूषण जर थांबविले नाही, तर मानवी जीवनाकरता असलेली पृथ्वीची योग्यता सरतेशेवटी नष्ट केली जाईल. . . . शास्त्रोक्त अडाणीपणा ही समस्या नाही, तर जाणूनबुजून दाखविलेला आधाशीपणा ही अडचण आहे.” स्टेट ऑफ द वर्ल्ड १९८७ हे पुस्तक पृष्ठ ५ वर असे म्हणतेः “मानवी हालचालीच्या तराजूने, स्वतः पृथ्वीवरील वसाहतीबाबतच भय दाखविण्यास सुरवात केली आहे.” १९९० मध्ये अमेरिकेत सार्वजनिक दूरचित्रवाणीत जी एक प्रमुख मालिका निनादविली गेली तिचे शीर्षक होते, “ग्रहाला वाचविण्यास चाललेली धाव.”
प्रदूषित करणे, मानव केव्हाही थांबविणार नाही. परंतु देव थांबवील जेव्हा की, जे पृथ्वीचा नाश करतात, अशांचा नाश करण्याद्वारे. देव व त्याचा सरसेनापती ख्रिस्त येशू हर्मगिदोन या अंतिम युद्धात भौतिकवादी राष्ट्रांवर न्यायदंड बजावण्याद्वारे ते साध्य करील.—प्रकटीकरण १६:१४-१६; १९:११-२१.
शेवटी, अंतिम दिवसाविषयी येशूने केलेल्या भविष्यवादातील पुढील लक्ष वेधविणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्याः “राज्याची ही सुवार्ता साक्षीकरिता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) ही सुवार्ता सांगते की, देवाच्या राज्याने आता स्वर्गात राजवट सुरु केली आहे, आणि लवकरच या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करण्यास व पृथ्वीवर नंदनवन पुनर्स्थापित करण्यास हालचाल करील.
सरकारी बंदी, सामूहिक हिंसाचार, बंदिवास, छळ व अनेक मृत्यु अशा प्रकारचा छळ येशूने पूर्वभाकित केलेला छळ असताना देखील १९१४ पासून यहोवाच्या साक्षीदारांनी ते केलेले आहे.
१९१९ मध्ये या सुवार्तेची घोषणा ४,००० यहोवाचे साक्षीदार करीत होते. त्यांची संख्या वाढतच गेली, म्हणूनच गतवर्षी ४०,००,००० पेक्षा अधिक जण २१२ राष्ट्रात, साधारण २०० भाषेत प्रचार करीत होते. शेकडो लक्षावधी बायबलचे, पुस्तकांचे व मासिकांचे वितरण करीत होते, लोकांच्या घरोघर लक्षावधी बायबल अभ्यास घेत होते व जगाच्या सर्व भागात मोठमोठ्या खेळांच्या मैदानात अधिवेशने आयोजित करीत होते. शुभवर्तमानाचा अवाढव्य प्रमाणातील प्रचार १९१४ पूर्वी केव्हाही होऊ शकला नसता. त्याची साध्यता ज्या प्रमाणात प्राप्त केली गेली त्याकरिता आधुनिक जलद छपाई यंत्रे, प्रवासाच्या सुविधा, गणकयंत्रे, फॅक्स यंत्रे, वांड्.मय पाठविण्याचे व दळणवळण राखण्याच्या सुविधा यांची गरज होती व त्या आमच्या काळात एकमेवतेत उपलब्ध आहेत.
यिर्मयाच्या दिवसातील यरुशलेमास, त्याच्या येणाऱ्या नाशाची सूचना दिली होती, त्याच्या रहिवाशांनी केवळ उपहास केला. पण त्यांनी विचार केला तेव्हा खूपच उशीर झाला होता. आज हर्मगिदोनातील नाशाची सूचना बऱ्याच मोठ्या प्रमाणात घोषित केली जात आहे व यास बराच मोठा पाठिंबा उघड आहे. (प्रकटीकरण १४:६, ७, १७-२०) लक्षावधी लोक ऐकत नाहीत. पण वेळ सरत आहे. ते विचार करतील तेव्हा वेळ निघून गेलेली असणार. तुम्हीही वेळ निघून गेल्यावर विचार करणार का?
[७ पानांवरील चित्रं]
यिर्मयाच्या काळातील लोकांनी वेळ निघून गेल्यावर विचार केला