“एकमेकांसाठी प्रार्थना करा”
यहोवा “प्रार्थना ऐकणारा” आहे. (स्तोत्रसंहिता ६५:२) खऱ्या अंतःकरणाने त्याच्याजवळ केलेल्या प्रार्थना तो ऐकतो व जेव्हा ते एकमेकांसाठी प्रार्थना करतात तेव्हा तो ऐकतो अशी आमची खात्री असली पाहिजे.
पण ही एकमेकांसाठी प्रार्थना का करायची? कोणता संदर्भ घेऊन या प्रार्थना करायला हव्या? आणि एकमेकांसाठी प्रार्थना करताना कोणते ईश्वरी गुण वाढीस लावले पाहिजे?
एकमेकांसाठी का प्रार्थना करावी?
पवित्र शास्त्रवचने यहोवाच्या लोकांना एकमेकांसाठी प्रार्थना करावयास प्रोत्साहीत करतात. प्रेषित पौल देवाकडे ज्या मागण्या करीत असे त्यात दुसऱ्यांसाठी केल्या जाणाऱ्या प्रार्थनांचाही समावेश होता. (कलस्सैकर १:३; २ थेस्सलनीकाकर १:११) शिवाय शिष्य याकोबानेही असे लिहिलेः “एकमेकांसाठी प्रार्थना करा.”—याकोब ५:१६.
देवाच्या इतर सेवकांसाठी केलेल्या प्रार्थना परिणामकारक असतात. याकोबाचे पत्र ५:१३-१८ मध्ये हे दाखविले आहे की, जो आध्यात्मिकरित्या आजारी आहे त्याने मंडळीच्या वडीलांना बोलवावे आणि “त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी.” त्यांच्या प्रार्थना ऐकून त्या दुःखी व्यक्तीलाही शक्ती मिळेल व त्याच्याही प्रार्थना देव ऐकेल अशी त्याची खात्री पटेल. (स्तोत्रसंहिता २३:५; ३४:१८) त्या वैयक्तीकासोबत केल्या जाणाऱ्या प्रार्थनेखेरीज वडील त्याला वचनांमधील सद्बोध दाखवून त्याचे आध्यात्मिक आरोग्य परत मिळवण्याचा प्रयत्न करतात. हा सद्बोध सांत्वनपर तेलाप्रमाणे आहे.
याकोब पुढे म्हणतोः “विश्वासाची प्रार्थना दुखणाईतांस वाचवील आणि यहोवा त्याला उठवील.” होय, आध्यात्मिकतेत आजारी असलेली व्यक्ती वडीलांकडून “विश्वासाने केलेल्या प्रार्थने”द्वारे बरी होऊ शकते, व वचनांद्वारे मदत मिळवण्याची त्या व्यक्तीची इच्छा असेल तर देवही त्याला आध्यात्मिक निरोगीपणात “उठवील.” पण हा आध्यात्मिक आजार गंभीर पातकांपासून उद्भवला असल्यास काय? तर या व्यक्तीने पश्चाताप व्यक्त केल्यास यहोवा त्याला क्षमा करील.
“यास्तव,” याकोब म्हणतो, “तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतीमानांची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. एलिया . . . त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली; आणि साडेतीन वर्षे पृथ्वीवर पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा आकाशातून पाऊस पडला आणि भूमीने आपले फळ उपजविले.” (१ राजे १७:१-७; १८:१, ४२-४५) देवाच्या इच्छेच्या सहमतात केल्या जाणाऱ्या नीतीमानाच्या प्रार्थनेत सामर्थ्य असते.—१ योहान ५:१४, १५.
प्रार्थना कशासाठी केली जावी?
कोणतीही गोष्ट आमच्या समविश्वासूंसाठी केल्या जाणाऱ्या प्रार्थनेचा विषय बनू शकते. उदाहरणार्थ, पौलाने इतरांना त्याची सुवार्तेबद्दल बोलण्याची पात्रता असावी याबद्दल प्रार्थना करण्यास सांगितले. (इफिसकर ६:१७-२०) कोणाला मोहात पाडले जात आहे हे आपल्याला माहीत आहे तर काय? त्याने ‘काहीही अयोग्य करू नये’ व देवाने त्याला मोहपाशात सोडू नये आणि त्याने त्याला दुष्ट सैतान याच्या तावडीतून सोडवावे अशी आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करू शकतो. (२ करिंथकर १३:७; मत्तय ६:१३) जर कोणी शारीरिक व्याधिग्रस्त असले तर त्याला त्याच्या आजारात हवे असणारे मनोधैर्य मिळावे अशी आपण यहोवा देवाकडे याचना करू शकतो.—स्तोत्रसंहिता ४१:१-३.
छळ होत असलेल्या यहोवा देवाच्या उपासकांसाठी प्रार्थना करणे योग्य आहे. पौल व त्याच्या सहकाऱ्यांना असीम छळाला तोंड द्यावे लागले व त्याने करिंथमधील ख्रिश्चनांना सांगितलेः “तुम्हीही आम्हासाठी प्रार्थना करून आम्हाला साहाय्य करावे; असे की जे कृपादान पुष्कळ जणांच्या योगे आम्हाला मिळाले त्याबद्दल पुष्कळ जणांनी आमच्या वतीने उपकारस्तुती करावी.” (२ करिंथकर १:८-११; ११:२३-२७) आम्ही तरुंगवासात जरी असलो तरी छळ होणाऱ्यांसाठी प्रार्थना करावी व यहोवा ‘नीतीमानांच्या प्रार्थना ऐकतो’ याची खात्री ठेवावी.—नीतीसूत्रे १५:२९.
यहोवाच्या संस्थेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांना वाहत असलेल्या बांधवासाठी खासपणे आपण प्रार्थना केली पाहिजे. या बांधवांमध्ये संस्थेला मार्गदर्शन देणाऱ्या व “विश्वासू व बुद्धिमान दास”वर्गा द्वारे दिले जाणारे आध्यात्मिक अन्न तयार करणाऱ्यांचा समावेश आहे. (मत्तय २४:४५-४७) उदाहरणार्थ, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाच्या सदस्यांसाठीही आम्ही प्रार्थना केल्या पाहिजे. यामध्ये देवाने त्यांना “सूज्ञानाचा आत्मा” द्यावा असाही उल्लेख करावा.—इफिसकर १:१६, १७.
ख्रिस्ती गुणवत्ता वाढीस लागते
समविश्वासूंसाठी प्रार्थना करण्याद्वारे आम्ही त्यांची काळजी वाटणारे, निःस्वार्थी व दयाळू असल्याचे दाखवतो. आपल्या आध्यात्मिक बंधू-भगिनींसाठी दर्शवलेली निःस्वार्थी व दयाळू वृत्ती ही पौलाच्या मुद्याच्या एकवाक्यतेत आहे, जेथे तो म्हणतोः “प्रीती स्वार्थ पाहत नाही.” (१ करिंथकर १३:४, ५) दुसऱ्यांसाठी प्रार्थना करण्याद्वारे आम्ही “आपलेच हित पाहत नाही तर दुसऱ्यांचेही पाहतो.” (फिलिप्पैकर २:४) प्रार्थनेमध्ये दुसऱ्यांच्या आध्यात्मिक कल्याणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा येशूचे शिष्य असल्याचे चिन्ह असणाऱ्या बंधूप्रीतीत आम्ही त्यांच्या अधिक निकट जातो.—योहान १३:३४, ३५.
ज्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो त्यांच्याबद्दलची सहकारत्वाची भावना प्रगत होते. (१ पेत्र ३:८) त्यांच्या हितामध्ये तसेच दुःखामध्ये सहभागी होऊन आम्ही आमची सहानुभूति दाखवतो. मानवी शरीरात एक हात जर दुखावला गेला तर दुसरा त्याची काळजी करतो आणि जखमेने होणारे दुःख शमविण्याचा प्रयत्न करतो. (पडताळा १ करिंथकर १२:१२, २६.) त्याचप्रमाणे दुःख सहन करणाऱ्या आमच्या बंधूभगिनींसाठी केल्या गेलेल्या प्रार्थनेमुळे त्यांच्याबद्दलची आमची सहानुभूति अधिकच वाढीस लागते व त्यांना आपल्या आठवणीत ठेवण्यात मदत मिळते. यहोवा देव व येशू ख्रिस्त विश्वासू सह ख्रिश्चनांचा त्याग करीत नाही, त्यामुळे आम्ही अशांकडे प्रार्थनेत दुर्लक्ष करणे हे आमच्याच तोट्याचे आहे.—१ पेत्र ५:६, ७.
आम्ही इतरांसाठी प्रार्थना करीत राहतो तेव्हा विविध ईश्वरी गुणांची वाढ होण्यात मदत मिळते. त्यांच्याविषयी आम्ही अधिक समजूतदार व सहनशील बनतो. अवघे कडूपण मुळासकट उपटवले जाते व आम्हाला दयाळू व आनंदी बनविणाऱ्या प्रोत्साहनदायक विचारांना वाव मिळतो. इतरांसाठी प्रार्थना केल्यामुळे यहोवाच्या लोकांमधील शांती व ऐक्य वाढीस लागते.—२ करिंथकर ९:१३, १४.
एकमेकांसाठी प्रार्थना करीत राहा
पौलाप्रमाणे आम्हीही इतरांना आम्हासाठी प्रार्थना करावयास सांगू शकतो. आम्हाबरोबर प्रार्थना करण्यासोबत आमचे बांधव खाजगीपणे आम्हासाठी प्रार्थना करू शकतात, त्यामध्ये आमचे नाव घेऊ शकतात व आमच्या समस्यांचा उल्लेख करू शकतात आणि देवाने आम्हाला मदत करावी अशीही विनवणी करू शकतात. ती मदत नक्की मिळू शकते, कारण “भक्तीमान लोकांना परिक्षेतून कसे सोडवावे हे यहोवाला चांगले कळते.”—२ पेत्र २:९.
आपल्या प्रार्थनेत आमची आठवण करणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांना कदाचित परिक्षा प्रसंगांना तोंड द्यावे लागत असेल व त्यांच्यावरील संकट आम्हापेक्षाही बिकट असू शकेल. असे असताना सुद्धा ते सनातन राजापुढे अश्रू ढाळीत आम्हासाठी प्रार्थना करीत असतात. (पडताळा २ करिंथकर २:४; २ तीमथ्य १:३, ४.) तर मग, आम्ही यासाठी केवढे कृतज्ञ असावयास हवे! यास्तव, आत्ताच चर्चिलेल्या मुद्यांसाठी तसेच गुणग्राहकता दाखविण्यासाठी आपण एकमेकांसाठी प्रार्थना करू या.