वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 १०/१ पृ. १०-१५
  • देवाने केलेल्या गोष्टींची तुम्हाला रसिकता वाटते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाने केलेल्या गोष्टींची तुम्हाला रसिकता वाटते का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विश्‍वास व कार्ये
  • जीवनावर परिणाम घडतो
  • बाप्तिस्म्याकरता वाटणारे अडथळे दूर सारणे
  • भौतिक गोष्टी
  • देवाच्या मदतीने ईश्‍वरी सेवा
  • तारले जाण्यासाठी आपण काय करावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • विश्‍वास आणि कार्यांमुळे तुम्ही नीतिमान ठरू शकता!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • तुम्हाला सुवार्तेवर खरोखर विश्‍वास आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 १०/१ पृ. १०-१५

देवाने केलेल्या गोष्टींची तुम्हाला रसिकता वाटते का?

“कोणी माझ्यामागे येऊ पाहतो, तर त्याने आत्मनिग्रह करावा व प्रतिदिवशी आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला नित्याने अनुसरावे.”—लूक ९:२३.

१. देवाने दिलेल्या काही अद्‌भुत देणग्या कोणत्या आहेत?

आमचे जीवन देवाच्या मालकीचे आहे. त्याने मानवाची निर्मितीच केली नसती तर आमचा जन्म कधीच झाला नसता. तथापि, देवाने जीवनाची निर्मिती करण्यासोबत अधिक काही केले. त्याने आमची अशी निर्मिती केली की, आम्ही पुष्कळ गोष्टींचा स्वाद घ्यावा, जसे की, अन्‍नाची चव, सूर्यप्रकाशाचा उबदारपणा, संगीताचा लयबद्ध सूर, वसंत ऋतुतील उत्साहवर्धक दिवस आणि प्रेमाचा कोमल स्पर्श. यासोबतच देवाने आम्हाला मन व त्याच्याविषयी शिकून घेण्याची इच्छा प्रदान केली आहे. त्याने पवित्र शास्त्र लिहिण्याची प्रेरणा दिली; ते आम्हाला आनंदी जीवन कसे जगावे हे शिकवते, आणि देवाच्या नव्या धार्मिक जगात सदासर्वदा जगण्याची आशा देते. याचप्रमाणे देव आम्हाला पवित्र आत्मा, स्थानिक मंडळीचा आधार आणि मंडळीतील प्रेमळ वृद्ध पुरुष व स्त्रिया यांचा सहवास देतो, जे आम्हाला त्याच्या सेवेत बळकट राहण्यासाठी मदत देऊ शकतात.—उत्पत्ती १:१, २६-२८; २ तीमथ्य ३:१५-१७; इब्रीयांस १०:२४, २५; याकोब ५:१४, १५.

२. (अ) देवाने आम्हासाठी कोणती उल्लेखनीय गोष्ट केली आहे? (ब) आम्ही कोणत्याही कामांद्वारे तारणप्राप्ती मिळवू शकतो का?

२ याखेरीज, देवाने आपल्या प्रथम जन्मलेल्या पुत्राला, पिता आम्हाकडून कशाची अपेक्षा धरतो त्याविषयी अधिक माहिती देण्यास तसेच जे तिचा स्वीकार करतील अशा सर्वांसाठी “खंडणीद्वारे मुक्‍ती” देण्याकरता पाठवले. (इफिसकर १:७; रोमकर ५:१८) त्या पुत्राने, येशू ख्रिस्ताने असे म्हटलेः “देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे.” (योहान ३:१६) त्या खंडणीद्वारे साधले जाणारे तारण हे इतक्या मोठ्या मोलाचे आहे की, इतर कोणतीही कामे त्याला मिळवू शकत नाहीत. मोशेच्या नियमशास्त्र वर्चस्वाखाली केली जाणारी कोणतीही कामे ती मिळवू शकली नाहीत. यामुळेच पौलाने लिहिलेः “मनुष्य नियमशास्त्रातील कर्मांनी नीतीमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्‍वासाच्या द्वारे ठरतो.”—गलतीकर २:१६; रोमकर ३:२०-२४.

विश्‍वास व कार्ये

३. विश्‍वास व कार्ये याविषयी याकोब काय म्हणाला?

३ तारण विश्‍वासाद्वारे मिळते, पण विश्‍वास आणि देवाने आम्हासाठी जे केले आहे त्याबद्दल वाटणारी रसिकता आम्हाला कृति करण्यास चालना देते. तिने आम्हास अशी कृति करण्यास लावले पाहिजे ज्याद्वारे आपला विश्‍वास जाहीर होईल. येशूचा सावत्र भाऊ याकोब याने असे लिहिलेः “विश्‍वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जिव आहे.” त्याने पुढे म्हटलेः “क्रियावाचून तू आपला विश्‍वास मला दाखीव आणि मी आपला विश्‍वास माझ्या क्रियांनी तुला दाखवीन.” याकोबाने हेही दर्शविले की, भूतेही “विश्‍वास धरतात व कापतात,” पण हे दुरात्मे ईश्‍वरी कार्ये निश्‍चितच करीत नाहीत. पण तेच, अब्राहामापाशी विश्‍वास व क्रिया या दोन्ही गोष्टी होत्या. “विश्‍वास त्याच्या क्रियासहीत कार्य करीत होता, आणि क्रियांनी विश्‍वास पूर्ण झाला.” यासाठीच, याकोब पुन्हा सांगतोः “विश्‍वासही क्रियांवाचून निर्जीव आहे.”—याकोब २:१७-२६.

४. जे येशूचे अनुकरण करू इच्छितात अशांनी काय करावे म्हणून त्याने सांगितले?

४ बरोबरची कामे करण्यातील महत्त्व ते काय हे येशूनेही दाखवून दिले. तो म्हणालाः “तुमचा उजेड लोकांपुढे पडो, यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पहावी, आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.” “कोणी माझ्यामागे येऊ पाहतो, तर त्याने आत्मनिग्रह करावा व प्रतिदिवशी आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला नित्याने अनुसरावे.”a आपण “आत्मनिग्रह” केला तर आपल्या पुष्कळ व्यक्‍तीगत आवडीनिवडी टाकून देऊ. सर्वकाही देवाच्या मालकीचे आहे हे आपण ओळखू व म्हणून आपण आपल्याला देवाचे दास असे देऊ आणि येशूने म्हटले त्याप्रमाणे त्याची इच्छा शिकून घेऊन त्यानुसार वागू.—मत्तय ५:१६; लूक ९:२३; योहान ६:३८.

जीवनावर परिणाम घडतो

५. (अ) आमच्या सबंध जीवनाक्रमणावर कशाचा परिणाम होण्यास हवा असे पेत्राने दाखविले? (ब) त्याने कोणत्या चांगल्या कामांची शिफारस केली?

५ पेत्र असे दर्शवितो की, आम्हाकरता देण्यात आलेले ख्रिस्ताचे “मोलवान रक्‍त” हे इतके मौल्यवान आहे की, त्याविषयी आम्हाला वाटणारी रसिकता आमच्या सबंध जीवनाक्रमणातून दिसावयास हवी. आमच्या रसिकतेने आम्हाला करावयास उद्युक्‍त केले पाहिजे अशा बऱ्‍याच गोष्टी प्रेषिताने दाखविल्या. त्याने सूचना केलीः “सर्व दुष्टभाव सोडून” टाका. “वचनास अनुसरुन असणाऱ्‍या निऱ्‍या दुधाची इच्छा धरा.” “ज्याने तुम्हास अंधःकारातून आपल्या अद्‌भूत प्रकाशात पाचारण केले आहे त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.” “वाईटाचा त्याग करून बरे ते करावे.” “तुम्हामध्ये जी आशा आहे तिची विचारपूस करणाऱ्‍या प्रत्येक इसमाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा.” “आपले उरलेले दैहिक आयुष्य मनुष्यांच्या वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे.”—१ पेत्र १:१९; २:१, २, ९; ३:११, १५; ४:२.

६. (अ) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी आपला विश्‍वास कसा प्रदर्शित केला? (ब) याने आम्हासाठी कोणते उदाहरण घालून दिले पाहिजे?

६ पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी आपल्या विश्‍वासानुरुप जीवन व्यतित केले. त्याने त्यांचा दृष्टीकोण व व्यक्‍तीत्व बदलविले, आणि देवाच्या इच्छेच्या सहमतात आपले जीवन आणण्याची चालना दिली. आपल्या विश्‍वासाचा नाश करण्याऐवजी त्यांनी बंदिवास, दगडमार, मारहाण, तुरुंगवास आणि मरणही सहन केले. (प्रे. कृत्ये ७:५८-६०; ८:१; १४:१९; १६:२२; १ करिंथकर ६:९-११; इफिसकर ४:२२-२४; कलस्सैकर ४:३; फिलिमोन ९, १०) इ. स. ५६ च्या सुमाराला जन्म झालेला टॅसिटस्‌ हा रोमी इतिहासकार म्हणतो की, ख्रिश्‍चनांना “आग व भाजणे, दिवस टळल्यावर रात्री मशाल म्हणून जळण्यासाठी दंड करण्यात आला होता.” तरीपण ते डगमगले नाहीत!—द ॲनल्स, पुस्तक १५, परिच्छेद ४४.

७. आज काही लोक कोणत्या परिस्थितीत असल्याचे दिसतील?

७ काही मंडळ्यात तुम्हाला काही लोक बऱ्‍याच वर्षांपासून सभांना हजर राहात आहेत असे दिसले असेल. यांना यहोवाच्या संस्थेविषयी प्रेम वाटते, त्याचे लोक सर्वांत उत्तम लोक असल्याचे ते समजतात, सत्याबद्दल ते चांगले बोलतात आणि बाहेरील लोकांना सत्याबद्दलचे चांगले समर्थन करतात. तरीही त्यांच्या मार्गात काहीतरी उभे असते जे त्यांना मागे रेटते. अशांनी, पेंटेकॉस्टच्या वेळी ३,००० लोकांनी जे केले, विश्‍वासधारी ईथोपियाच्या गृहस्थाने ज्याविषयीची विचारणा केली होती, तसेच पूर्वीचा छळ करणाऱ्‍या शौलाला जेव्हा येशू हाच खरा मशीहा असल्याचे कळले तेव्हा हनन्याने त्याला जे करायला लावले ते चांगले पाऊल स्वतः उचलले नाही. (प्रे. कृत्ये २:४१; ८:३६; २२:१६) अशा लोकांमध्ये आज कसली उणीव आहे? पवित्र शास्त्र ज्याला “चांगल्या विवेकाच्या प्राप्तीस्तव देवाजवळ विनंती करणे” असे म्हणते ते पाऊल यांनी का उचलले नाही? (१ पेत्र ३:२१) सत्य माहीत आहे, पण त्यासाठी काही करीत नाहीत अशा परिस्थितीत तुम्ही आहात तर हा लेख खासपणे तुम्हासाठी तयार करण्यात आला आहे असे समजा.

बाप्तिस्म्याकरता वाटणारे अडथळे दूर सारणे

८. तुम्ही कधी चांगले विद्यार्थी बनला नसाल तर आता कोणता मार्ग धरणे सूज्ञतेचे ठरेल?

८ तुम्हाला काय अडखळण असू शकेल? मागील अंकातील लेखाने दाखविले की, काहींना व्यक्‍तीगत अभ्यासात समस्या असेल. देवाने आम्हाला अद्‌भूत प्रकारचे मन दिलेले आहे व याचा वापर आम्ही त्याच्या सेवेत करावा अशी त्याची इच्छा आहे. काही लोकांना वाचायला येत नव्हते, परंतु देव व त्याच्या उद्देशाबद्दल अधिक शिकून घेण्यासाठी त्यांनी वाचण्याची कला शिकून घेतली. मग, तुम्हाबद्दल काय? तुम्हाला वाचता येते तर, बिरुयाच्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी तशाच आहेत की काय हे बघण्यासाठी जसा “शास्त्रात प्रतिदिवशी काळजीपूर्वक शोध” केला तसा अभ्यास तुम्ही करता का? तुम्ही सत्याची “रुंदी, लांबी, खोली व उंची” ही शोधून काढली आहे का? तुम्ही देवाच्या वचनात पुरेसे उत्खनन केले आहे का? ते केवढे उत्तेजक आहे हे तुम्हाला आढळले आहे का? तुम्ही देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी खरी जिज्ञासा वाढवली आहे का? तुम्हाला सत्याबद्दल खरीच क्षुधा आहे का?—प्रे. कृत्ये १७:१०, ११; इफिसकर ३:१८.

९. मंडळीतील कोणाबरोबर तुमचे पटत नसले तर कोणती बरोबरची गोष्ट करणे उचित ठरेल?

९ मंडळीतील कोणा बरोबर तरी खरी वा काल्पनिक समस्या असल्यामुळे लोक कधी कधी मागे राहतात. तुम्हाला कोणी खरोखरीच गंभीररित्या दुःखी केले आहे का? तर येशूने या शब्दात दाखविलेले मार्गदर्शन अनुसराः “तू व तो एकटे असताना त्याचा अपराध त्याला दाखीव.” (मत्तय १८:१५) तुम्हाला कदाचित आढळेल की, तुम्हाला त्याच्याकडून त्रास झाला आहे याची त्याला जाणीवही झाली नाही. आणि जरी असली तरी तुम्हाला येशूने म्हटल्याप्रमाणे ‘आपला भाऊ मिळविता’ येईल. याद्वारे, इतरांना अडखळवू नये म्हणून तुम्ही त्याला मदत देऊ शकता. पण, तुम्ही खरेपणाने हा विचार केला तर तुम्हाला काय वाटते, तुम्ही कोणाची सेवा करता—त्या व्यक्‍तीची की देवाची? तुमचे देवावरचे प्रेम इतके दुबळे आहे का की, कोणा अपूर्ण मानवाच्या चुकीमुळे त्या प्रेमाला तडा बसू शकेल?

१०, ११. काही गुप्तपणे आचरण्यात येणारे पाप तुम्हाला मागे ठेवत असल्यास तुम्ही काय करावे?

१० कोणा व्यक्‍तीला गुप्तपणे आचरण्यात येणारे पाप बाप्तिस्म्यापासून मागे ठेवीत असेल. हे कदाचित मागे घडले असेल किंवा त्याच चुकीच्या आचाराची पुनरावृत्ती होत असेल. हीच तुमची समस्या आहे तर ती आता सुधारण्याची वेळ नाही का? (१ करिंथकर ७:२९-३१) यहोवाच्या कित्येक लोकांना आपल्या जीवनात बदल करावे लागले. पवित्र शास्त्र म्हणतेः “तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्‍चाताप करा व मागे वळा, अशासाठी की विश्रांती मिळण्याचे समय यहोवाकडून यावे.”—प्रे. कृत्ये ३:१९.

११ तुम्ही आपल्या गत आयुष्यात काहीही केले असेल तरी, तुम्हाला पश्‍चाताप करून बदल करता येईल आणि देवाला क्षमा मागता येईल. “पृथ्वीवरील तुमचे सर्व अवयव जिवे मारा, म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ यांस जिवे मारा. . . . तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसुद्धा काढून [टाका] आणि जो नवा मनुष्य, त्यास अस्तित्वात आणणाऱ्‍याच्या प्रतिरुपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला” धारण करा. तुम्हाला आपले जीवन देवाच्या मार्गाच्या सहमतात आणता येईल, शुद्ध विवेकाचा अनुभव घेता येईल आणि त्याच्या नीतीमान नव्या जगातील सार्वकालिक जीवनाची आशा राखता येईल. हे मिळवण्यासाठी प्रयत्न करणे योग्यतेचे ठरणार नाही का?—कलस्सैकर ३:५-१०; यशया १:१६, १८; १ करिंथकर ६:९-११; इब्रीयांस ९:१४.

१२. तुम्ही व तुमच्या शुद्ध विवेकाच्या मध्ये तंबाखू, मद्याची अतिप्राशनता, किंवा मादक द्रव्यांचे व्यसन या गोष्टी उभ्या असतील तर तुम्ही काय केले पाहिजे?

१२ तुमच्या शुद्ध विवेकाच्या आड तंबाखूचे सेवन, मद्याचे अतिप्राशन किंवा माद्रक द्रव्याचे व्यसन या गोष्टी येत आहेत का? अशा जीवघेण्या सवया देवाची अद्‌भूत देणगी, जीवन, याचा अनादर करीत नाहीत का? अशा या सवया तुमच्या मार्गात अडसर म्हणून उभ्या आहेत तर त्या दूर करण्याची हीच वेळ आहे. या सवया तुमच्या जीवनात हितकारक आहेत का? पौल म्हणतोः “देहाला व आत्म्याला अशुद्ध करणाऱ्‍या सर्वांपासून आपण स्वतःला शुद्ध करावे आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याची परिपूर्ती करावी.” हे करण्यासाठी देवाचे शुद्ध तसेच नीतीमान मार्ग पुरेसे आहेत हे तुम्हाला पटते का?b—२ करिंथकर ७:१.

भौतिक गोष्टी

१३, १४. (अ) भौतिक ध्येये बाळगण्याविषयी शास्त्रवचने काय सांगतात? (ब) स्वर्गीय गोष्टींना प्राधान्य देणे का महत्त्वाचे आहे?

१३ आज जग, इतर सर्व गोष्टींच्या आधी यशप्राप्ती आणि “संसाराची फुशारकी” यांना ठेवते. पण, येशूने “संसाराची चिंता व द्रव्याचा मोह” या गोष्टींची तुलना देवाच्या वचनाची वाढ खुंटविणाऱ्‍या ‘काट्यां’सोबत केली. त्याने असेही विचारलेः “मनुष्य सर्व जग मिळवील आणि आपला जीव गमावील तर त्याला काय लाभ होईल?”—१ योहान २:१६; मार्क ४:२-८, १८, १९; मत्तय १६:२६.

१४ येशूने दाखवले की, देव पक्ष्यांना अन्‍न मिळत आहे अशी काळजी करतो व तो फुलांनाही सुंदरपणे वाढवतो. मग, त्याने विचारलेः “पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहा की नाही? . . . देव तुम्हास पोषाख किती विशेषकरून घालील!” यासाठीच, येशूने सूज्ञपणे आम्हास म्हटले की, भौतिक गोष्टींबद्दल “काळजी करू नका.” त्याने म्हटलेः “तुम्ही [देवाच्या] राज्याच्या मागे लागा म्हणजे याबरोबर हीही तुम्हास मिळतील.” आपण स्वर्गीय गोष्टींना प्राधान्य द्यावे असे त्याने सांगितले, कारण ‘जेथे तुमचे धन तेथे तुमचे अंतःकरण’ असते असे तो म्हणाला.—लूक १२:२२-३१; मत्तय ६:२०, २१.

देवाच्या मदतीने ईश्‍वरी सेवा

१५. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांचे उदाहरण आम्हाला कोणते सुंदर प्रोत्साहन देते?

१५ इतरांना साक्ष देण्याची समस्या तुम्हाला वाटते का? लाजाळूपणा तुम्हाला मागे ठेवीत आहे का? तर, आज आपल्याला ज्या भावना वाटतात तशाच पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनाही वाटत होत्या हे लक्षात ठेवणे बरे. देवाने त्या काळी सूज्ञ तसेच सामर्थ्यशाली लोकांना निवडले नाही, तर “बलवानांस लाजवावे म्हणून [त्याने] जे दुर्बल ते निवडले.” (१ करिंथकर १:२६-२९) बलवान धार्मिक पुढाऱ्‍यांनी “साधारण” लोकांना विरोध केला व त्यांना प्रचार बंद करायला सांगितले. पण ख्रिश्‍चनांनी काय केले? त्यांनी प्रार्थना केली. त्यांनी धैर्यासाठी देवाकडे विनंती केली व ती विनंती त्याने मान्य केली. याचा परिणाम हा झाला की, त्यांनी आपल्या संदेशाने यरुशलेम व नंतर सबंध जग भरून टाकले!—प्रे. कृत्ये ४:१-४, १३, १७, २३, २४, २९-३१; ५:२८, २९; कलस्सैकर १:२३.

१६. इब्री लोकांस पत्राच्या ११ व्या अध्यायातील “साक्षीरुपी मेघा”कडून आपण काय शिकू शकतो?

१६ यास्तव, आम्हामध्ये व देवाची सेवा याजमध्ये मनुष्याची भीती येऊ देऊ नये. इब्रीयांस पत्राचा ११ वा अध्याय “साक्षीरुपी मेघा”बद्दल सांगतो, ज्याला माणसाची नव्हे तर देवाची भीती होती. आम्ही देखील असाच विश्‍वास दाखविला पाहिजे. प्रेषिताने लिहिलेः “आपण आपल्या इतक्या साक्षीरुपी मेघाने वेढलेलो आहो म्हणून आपणही सर्व दडपण व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरुन धीराने धावावे.”—इब्रीयांस १२:१.

१७. देवाने यशयामार्फत कोणते प्रोत्साहन दिले?

१७ देव आपल्या सेवकांना प्रचंड मदत देऊ शकतो. विश्‍वाच्या निर्मात्याने यशयाला म्हटलेः “यहोवाची आशा धरून राहणारे नवीन शक्‍ती संपादित करतील. ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत; चालतील तरी थकणार नाहीत.”—यशया ४०:३१.

१८. राज्य प्रचाराच्या कामात सहभागी होण्याची भीती वाटत असल्यास ती तुम्हाला कशी काढून टाकता येईल?

१८ तुम्हाला स्थानिक मंडळीत जे धैर्यवान व आनंदी लोक दिसत आहेत ते पृथ्वीभरातील चाळीस लाखांपेक्षा अधिक आवेशी सेवकांचा एक भाग आहेत. येशू ख्रिस्ताने ज्या कार्याविषयी भाकित केले होते त्यामध्ये सहभागी होण्याचा यांना आनंद वाटतो. तो म्हणाला होताः “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवितील, तेव्हा शेवट होईल.” तुम्ही राज्याची सुवार्ता घोषित करण्यास पात्र आहात, पण यात सहभागी होण्याबद्दल काही समस्या आहे तर सेवाकार्यात चांगले काम करणाऱ्‍या कोणा साक्षीदाराला आपणासोबत येण्याचे का निमंत्रण देऊ नये? देव खरेपणाने “सामर्थ्याची पराकाष्ठा” प्रदान करतो, आणि ही ईश्‍वरी सेवा किती आनंदाची आहे ते आढळल्यावर तुम्हाला नक्कीच आश्‍चर्य वाटेल.—मत्तय २४:१४; २ करिंथकर ४:७; तसेच स्तोत्रसंहिता ५६:११; मत्तय ५:११, १२; फिलिप्पैकर ४:१३ पहा.

१९. येशूने कोणते शैक्षणिक कार्य करण्याचे आपल्या शिष्यांना आज्ञापिले?

१९ राज्य संदेशाबद्दल आवड धरणाऱ्‍यांनी काही केलेच पाहिजे अशी येशू अपेक्षा धरतो. त्याने म्हटलेः “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे सर्वकाही मी तुम्हास आज्ञापिले ते पाळावयास त्यांस शिकवा.”—मत्तय २८:१९, २०.

२०. तुम्ही आध्यात्मिक गोष्टीत प्रगमन करीत आहात तर मग, लवकरच कोणता प्रश्‍न उपयुक्‍त ठरेल?

२० देवाकडील आशीर्वाद, येशूचे “मोलवान रक्‍त,” आणि सार्वकालिक जीवनाची अद्‌भूत आशा याबद्दल तुम्हाला वाटणारी आवड कार्य करण्यास उद्युक्‍त करते का? (१ पेत्र १:१९) तुम्ही आपले जीवन देवाच्या नीतीमान गरजांच्या सहमतात आणले आहे का? तुम्ही शिष्य बनविण्याच्या कामात नित्याने सहभागी होत आहात का? तुम्ही स्वतः आत्मनिग्रह किंवा त्याग केला असून देवास आपले समर्पण केले आहे का? या सर्व प्रश्‍नांना जर तुमचे होय, असे निश्‍चित उत्तर आहे तर विश्‍वास बाळगणाऱ्‍या कुशीने फिलिप्पाला जो प्रश्‍न केला होता तोच तुम्हीही, तुमच्या मंडळीतील वडीलांना केला पाहिजे की, “मला बाप्तिस्मा घेण्यास काय अडचण?”—प्रे. कृत्ये ८:३६.

[तळटीपा]

a द जरुसलेम बायबल याचे भाषांतर “स्वतःला नाकारतो,” असे देते. जे. बी. फिलिप्स यांनी केलेले भाषांतर “स्वतःचा सर्व हक्क सोडून देतो,” असे म्हणते; तर द न्यू इंग्लिश बायबल “सर्व काही सोडून देऊन” असे म्हणते.

b या सवया दूर करण्याच्या उपयुक्‍त माहितीसाठी पहा, द वॉचटावर फेब्रुवारी १, १९८१, पृष्ठे ३-१२; जून १, १९७३, पृष्ठे ३३६-४३; आणि अवेक! जुलै ८, १९८२, पृष्ठे ३-१२; मे २२, १९८१, पृष्ठे ३-११. हे अंक तुम्हाला यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक राज्यसभागृहातील ग्रंथालयात पाहण्यास मिळतील.

तुम्हाला आठवते का?

◻ देवाला कृतज्ञता व्यक्‍त करण्याची कोणती खास कारणे आम्हाला आहेत?

◻ विश्‍वास व रसिक भावना यांनी आम्हाला काय करण्याची चालना देण्यास हवी?

◻ आमच्यामध्ये व देवास आज्ञाधारकपणा दाखवण्यामध्ये कोणत्या समस्या कदाचित उभ्या राहतील, आणि याबद्दल आम्हाला काय करता येईल?

◻ ज्यांचा अद्याप बाप्तिस्मा झालेला नाही अशांनी कोणते प्रश्‍न स्वतःला विचारावेत?

[१३ पानावरील चौकट]

‘मी कसल्या प्रकारची “माती” आहे?’

येशूने पेरणी करणाऱ्‍याचा दाखला दिला. काही बी वाटेवर पडले व ते पाखरांनी खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, तेथे फारशी माती नव्हती. त्यांना अंकुर आला पण सूर्य आला तेव्हा ते त्याच्या झळांनी सुकून गेले. काही काटेरी झुडुपात पडले व काट्यांनी त्यांची वाढ खुंटविली. येशूने म्हटले की, हे तीन गट, पहिला “राज्याचे वचन ऐकतो पण समजत नाही,” अशा लोकांना; दुसरा वचन स्वीकारणाऱ्‍या पण “संकट किंवा छळ” आल्यावर मागे फिरणाऱ्‍या लोकांना; आणि तिसरा “संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवि”णाऱ्‍या लोकांना सूचित करतात.

पण येशू आणखी एका जागेबद्दल, चांगल्या मातीबद्दल बोलला जेथे ते बी पडले. तो म्हणालाः “हा असा आहे की, वचन ऐकून समजतो; तो फळ देतोच देतो.”—मत्तय १३:३-८, १८-२३.

यास्तव आम्हाबाबतीत हे विचारणे योग्य ठरेल की, ‘मी कसल्या प्रकारची “माती” आहे?’

[१४ पानावरील चौकट]

ते आपल्या विश्‍वासासाठी मेले

आपल्या विश्‍वासाचा भंग करण्यापेक्षा मरण पत्करणे बरे अशा कोणाची तुम्हास माहिती आहे का? यहोवाच्या हजारो साक्षीदारांनी हे केले आहे. द नाझी स्टेट ॲण्ड द न्यू रिलिजन्स: फाईव्ह केस स्टडीज्‌ इन नॉन-कन्फॉर्मिटी या पुस्तकात डॉ. ख्रिश्‍चिन ई. किंग यांनी लिहिलेः “दोघा जर्मन साक्षीदारांपैकी एकाला तुरुंगात टाकले गेले आणि चारापैकी एकाला आपला जीव द्यावा लागला.”

१९४५ मध्ये छावणीतील भयंकर स्थिती संपली तेव्हा “साक्षीदारांची संख्या वाढलेली दिसली व यांपैकी कोणीही हातमिळवणी केलेली नव्हती.” द नाझी पर्सिक्युशन ऑफ द चर्चेस यात जे. एस. कॉन्वे यांनी साक्षीदारांबद्दल लिहिलेः “गेस्टेपोच्या क्रुद्ध दहशतवादीपणापुढे इतका दृढ निर्धार इतर कोणाही पंथाने दाखविला नाही.”

यहोवाच्या साक्षीदारांचा राजकारण किंवा वंश या कारणामुळे छळ झाला नाही. उलटपक्षी, त्यांची देवावरील प्रीती व पवित्र शास्त्राद्वारे तालीम मिळालेल्या विवेकाचा भंग करण्याचा नकार यामुळे ते घडले.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा