वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 २/१ पृ. १०-१५
  • करार देवाचा चिरकालिक उद्देश असणारे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • करार देवाचा चिरकालिक उद्देश असणारे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अब्राहामाचा करार—चिरकालिक आशीर्वादांचा आधार
  • अब्राहामाचे आध्यात्मिक संतान
  • नियमशास्त्र करार तात्कालिकपणे जोडण्यात आला
  • दावीदाच्या राज्याचा करार
  • देवाच्या करारांपासून तुम्ही लाभ प्राप्त करणार का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • नव्या कराराकरवी मोठे आशीर्वाद
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • यहोवा करारांचा देव आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • देवाच्या राज्यावर तुमचा पक्का विश्‍वास आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 २/१ पृ. १०-१५

करार देवाचा चिरकालिक उद्देश असणारे

“यहोवा . . . आपला करार, . . . हजारो पिढ्यांसाठी आज्ञापिलेले आपले वचन सर्वकाळ आठवतो.”—स्तोत्रसंहिता १०५:७, ८.

१, २. आम्हापैकी बहुतेकांवर कराराचा परिणाम झाला आहे असे आपण का म्हणू शकतो?

कोणातरी एका कराराने तुम्हाला गतकाळात किंवा सध्याच्या काळात तुम्हावर प्रभाव पाडला असेल किंवा पाडीत असेल; तसेच तो भविष्यातही तुम्हावर प्रभाव पाडील. ‘हा कोणता करार?’ असे तुम्ही म्हणाल. हा लग्नाचा करार आहे कारण आम्हापैकी बहुतेक सर्वच जण विवाहामुळेच जन्मलो आहोत व तसे पाहिल्यास आम्हापैकी देखील काही विवाहबद्ध झालेले आहेत. ज्यांचा अद्याप विवाह झाला नाही ते, आनंदी विवाहामुळे भावी काळात लाभणाऱ्‍या आशीर्वादाविषयी विचार राखू शकतील.

२ काही शतकांआधी मलाखी या इब्री संदेष्ट्याने ‘तुझी तारुण्यातील स्त्री,’ तसेच “तुझी सहकारिणी व तुझ्या कराराची पत्नी” याविषयी लिहिले. (मलाखी २:१४-१६) तो विवाहाला करार असे संबोधित होता, कारण दोघा जणांनी काहीतरी एकत्रपणे करण्याचा तो जाहीरनामा, औपचारिक सहमत आणि एक व्यवस्था असते. वैवाहिक प्रतिज्ञा दोन बाजूमधील करार असतो जेथे दोन्ही बाजूकडे असणारे पत्नी-पत्नी बनण्याची संमती देतात, एकमेकांसंबंधाने असणाऱ्‍या जबाबदाऱ्‍या पत्करतात व पुढील भावी चिरकाल लाभांकडे आपली दृष्टी लावतात.

३. विवाहापेक्षा इतर करारांचा कदाचित आम्हावर अधिक का परिणाम होऊ शकतो?

३ विवाह एक करार असून त्याचा आम्हावर सर्वात मोठा व्यक्‍तिगत परिणाम असतो असे आपल्याला वाटेल, पण पवित्र शास्त्र, अधिक विस्तारित मूल्य असणाऱ्‍या करारांची चर्चा करते. पवित्र शास्त्रीय करार आणि पवित्र शास्त्राच्या बाहेर असलेल्या धर्मांविषयीची चर्चा करताना एक संदर्भग्रंथ अशी माहिती देतो की, केवळ पवित्र शास्त्रात “देव व त्याचे लोक यांच्यामधील नातेसंबंधाचे हे आज्ञापिणे इतके बहुव्यापक दिसते की, ते सार्वत्रिकपणे ध्वनित आहे.” होय, या करारांमध्ये आमच्या प्रेमळ निर्मात्याच्या चिरकालिक उद्देशाचा समावेश आहे. तुम्हाला नंतर हे दिसेलच की, याच करारावर तुम्हाला अगणित आशीर्वाद मिळण्याचे अवलंबून आहे. ‘पण हे कसे काय?’ असे तुम्हाला विचारावेसे वाटेल.

४. आरंभीचा कोणता करार देवाच्या चिरकालिक उद्देशाकडे अंगूली दाखवितो?

४ देवाचे अधिकारपद झुगारुन दिल्यामुळे आदाम व हव्वेला जे भयंकर परिणाम मिळाले त्याविषयी तुम्हाला चांगली कल्पना आहे. आम्हाला त्यांच्याकडून अपूर्णता वारशाने मिळाली आणि यामुळेच आपण आजारामुळे इतके क्षीण बनत जातो व शेवटी मृत्युत विलीन होत असतो. (उत्पत्ती ३:१-६, १४-१९) तरीपण, त्यांच्या पापामुळे देवाचा उद्देश रद्द होऊ शकला नाही याविषयी आपल्याला धन्यता वाटली पाहिजे. तो उद्देश ही अखिल पृथ्वी खऱ्‍या उपासकांनी भरावी व त्यांनी चिरकाल आरोग्य व आनंदात जीवनाचा उपभोग घ्यावा हा होता. यासंबंधाने यहोवाने असा एक करार केला जो उत्पत्ती ३:१५ मध्ये लिखित आहेः “तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील.” तथापि, या संक्षिप्त व लाक्षणिक भाषेमुळे कित्येक प्रश्‍नांची उत्तरे अर्धवट राहिली. तर मग, यहोवा आपल्या कराराचे वचन कसे पूर्ण करणार होता?

५, ६. (अ) आपल्या उद्देशाची परिपूर्ति करण्यामध्ये देवाने कोणत्या माध्यमाचा वापर करण्याचे ठरविले? (ब) देवाच्या या माध्यम पद्धतीबद्दल आपण का आस्था राखावी?

५ यानंतर देवाने आणखी काही ईश्‍वरी करारांची योजना आखली आणि एदेनातील करारासोबत मिळून यांची एकंदरीत संख्या सात होते. चिरकालिक आशीर्वादांचा अनुभव अपेक्षिणाऱ्‍या आम्ही सर्वांनीच या करारांची माहिती मिळविलीच पाहिजे. हे करार कोठे व कसे करण्यात आले, त्यात कोणाचा समावेश होता, त्यातील मसुदे काय होते आणि देवाचा आज्ञाधारक मानवजातीला सार्वकालिक जीवन देण्याचा जो विचार आहे त्याच्याशी या करारांचा काय संबंध येतो हे पाहिले पाहिजे. या करारांची उजळणी करण्याची ही योग्य वेळ आहे कारण या करारांचा ज्याच्याशी थेट संबंध आहे त्या प्रभूच्या सांजभोजनाचे स्मरण ख्रिस्तीजनांच्या मंडळ्यातून एप्रिल १०, १९९० रोजी होणार आहे.

६ अर्थातच, काही लोकांना या करारांची कल्पना निःसत्त्व, कायदेबद्ध व फारच अल्प आस्थेची वाटेल. पण, थिऑलॉजिकल डिक्शनरी ऑफ द ओल्ड टेस्टमेंट काय म्हणतो त्याचा जरा विचार करा. तो म्हणतोः “‘करार’ या संज्ञेचा प्राचीन मध्यपूर्वेत तसेच ग्रीक व रोमी जगतात दोन वेगळ्या प्रकारांना म्हणजेच, एका बाजूस शपथ व त्याची पूर्ति आणि दुसऱ्‍या बाजूला प्रेम व मित्रत्व यांना अनुलक्षून वापर होत होता.” आता आम्हाला दिसेल की, ते दोन्हीही प्रकार—प्रेम व मित्रत्व—यहोवाच्या कराराची कमान कशी आहे.

अब्राहामाचा करार—चिरकालिक आशीर्वादांचा आधार

७, ८. यहोवाने अब्राहामासोबत कोणत्या प्रकाराचा करार केला? (१ इतिहास १६:१५, १६)

७ कुलपिता अब्राहाम, ‘विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांचा बाप,’ “यहोवाचा मित्र” होता. (रोमकर ४:११; याकोब २:२१-२३) देवाने त्याला आपली शपथ दिली आणि एक करार केला जो आम्हाला चिरकालिक आशीर्वाद मिळण्याचा आधार आहे.—इब्रीयांस ६:१३-१८.

८ अब्राहाम उर देशात राहात असताना यहोवाने त्याला दुसऱ्‍या प्रदेशात जायला सांगितले, जो कनान होता. त्यावेळी यहोवाने अब्राहामाला हे अभिवचन दिलेः “मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; . . . तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”a (उत्पत्ती १२:१-३) यानंतर देवाने, ज्याला आपण योग्यपणे अब्राहामाचा करार असे संबोधू शकतो त्यामधील विस्तारित माहिती हळूवारपणे प्रकट केली. ती माहिती अशीः अब्राहामाचे संतान किंवा वारस वचनयुक्‍त देशाचा ताबा घेईल; त्याच्या संतानाला अगणित संतती होईल; अब्राहाम व सारा हे राजांचे जनक होतील.—उत्पत्ती १३:१४-१७; १५:४-६; १७:१-८, १६; स्तोत्रसंहिता १०५:८-१०.

९. आमचा अब्राहामाच्या करारात समावेश असू शकतो हे आपल्याला कसे कळते?

९ देवाने याला “तुझ्या [अब्राहाम]-माझ्यामध्ये मी आपला करार” असे संबोधिले. (उत्पत्ती १७:२) पण आम्हीही यात समाविष्ट आहोत असे आपल्याला वाटले पाहिजे कारण देवाने या करारास नंतर विस्तारीत करून असे म्हटलेः “मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्‍यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळूइतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. . . . पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील.” (उत्पत्ती २२:१७, १८) आम्ही त्या राष्ट्रांचे भाग आहोत, त्यामुळे आम्हापुढे संभाव्य आशीर्वाद वाट पाहून आहेत.

१०. अब्राहामासोबत केलेल्या करारामुळे आपल्याला कोणती अंतर्दृष्टी मिळते?

१० आता आपण थोडा वेळ थांबून अब्राहामाच्या करारापासून काय शिकू शकतो ते पाहू या. हा करार देखील याच्या आधीच्या कराराप्रमाणे एका भावी “संतती” विषयीचा निर्दश करतो, आणि याकरवी हे सूचित होते की, हे संतान मानवी वंशातून असणार. (उत्पत्ती ३:१५) ती मालिका शेम, अब्राहाम व मग त्याचा पुत्र इसहाक याकरवी पुढे जाणार होती. या वंशमालिकेत राजपदाचाही समावेश असेल आणि या राजपदामुळे केवळ एकाच कुटुंबाला नव्हे तर सर्व देशातील मानवांना आशीर्वाद मिळणार. तर मग, या कराराची कशी पूर्णता झाली?

११. अब्राहामासोबत केलेल्या कराराची अक्षरार्थ कशी पूर्णता झाली?

११ अब्राहामाचे संतान याकोब किंवा इस्राएल याकरवी बहुगुणित होऊन त्याचे एक मोठे राष्ट्र झाले. अब्राहामाचे ते अगणित संतान, अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या देवाच्या शुद्ध उपासनेला समर्पित होते. (उत्पत्ती २८:१३; निर्गम ३:६, १५; ६:३; प्रे. कृत्ये ३:१३) इस्राएली लोक या शुद्ध भक्‍तीपासून वेळोवेळी दूर झाले, पण “यहोवाची त्यांजवर . . . अब्राहाम, इसहाक व याकोब यांजशी केलेल्या करारामुळे इस्राएलावर कृपा होती; . . . म्हणून त्याने त्यांचा अद्यापि नाश केला नाही.” (२ राजे १३:२३; निर्गम २:२४; लेवीय २६:४२-४५) नंतर देवाने ख्रिस्ती मंडळीचा त्याचे लोक असा स्वीकार केला तरीही त्याने अब्राहामाची खरी संतान असणाऱ्‍या इस्राएलांवर काही काळासाठी एक वर्ग या नात्याने आपली खास कृपा व्यक्‍त केली.—दानीएल ९:२७.

अब्राहामाचे आध्यात्मिक संतान

१२, १३. अब्राहामाच्या कराराच्या आध्यात्मिक पूर्णतेमध्ये येशू हा प्रधान संतान असल्याचे कसे सिद्ध झाले?

१२ अब्राहामाच्या कराराची आणखी एक पूर्णता, आध्यात्मिक पूर्णता होती. ही भव्य पूर्णता येशूच्या काळाआधी दृश्‍यमान होणार नव्हती, आणि ही आज आपल्याला स्पष्ट दिसत आहे म्हणून आनंद वाटतो. याविषयीचे स्पष्टीकरण आपल्याला देवाच्या वचनामध्ये आहे. पौल लिहितोः “अब्राहामाला व त्याच्या संतानाला ती अभिवचने सांगितली होती. संतानांना असे पुष्कळ जणांसबंधाने तो म्हणत नाही; तर ‘तुझ्या संतानाला’ असे एकाविषयी तो म्हणत आहे, आणि तो एक ख्रिस्त आहे.”—गलतीकर ३:१६.

१३ होय, ते संतान एकाच मालिकेतून किंवा घराण्यातून येणार होते व हे येशूच्या बाबतीत खरे घडले. तो स्वाभाविक यहुदी असा अब्राहामाचा खरा वंशज म्हणून जन्मला. (मत्तय १:१-१६; लूक ३:२३-३४) याखेरीज तो थोर अब्राहाम याच्या स्वर्गीय कुटुंबाचाही सभासद होता. कुलपित्या अब्राहामाठायी सखोल विश्‍वास होता व यामुळेच त्याने देवाची इच्छा आहे तर आपल्या मुलाचे यज्ञार्पण करण्याची इच्छा दर्शविली. (उत्पत्ती २२:१-१८; इब्रीयांस ११:१७-१९) याचप्रमाणे यहोवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला विश्‍वास राखणाऱ्‍या मानवजातीसाठी खंडणीचे यज्ञार्पण होण्यासाठी या पृथ्वीवर पाठविले. (रोमकर ५:८; ८:३२) यामुळेच पौलाने, अब्राहामाच्या कराराला अनुलक्षून येशू ख्रिस्ताची ओळख त्याचे प्रधान संतान अशी का दिली ते आता समजण्याजोगे आहे.

१४. अब्राहामाच्या संतानाचा दुय्यम भाग कोणता आहे, व हे पुढे कोणत्या चर्चेप्रत निरविते?

१४ देव ‘अब्राहामाचे संतान’ आध्यात्मिक दृष्ट्या वाढविणार असे पौलाने निदर्शनास आणले. त्याने लिहिलेः “तुम्ही जर ख्रिस्ताचे आहा तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारे वारीस आहा.” (उत्पत्ती २२:१७; गलतीकर ३:२९) हे आत्म्याने अभिषिक्‍त असणारे १,४४,००० ख्रिस्ती आहेत जे मिळून अब्राहामाचे दुय्यम संतान बनते. ते प्रधान संतानाच्या विरुद्ध पक्षाचे नाहीत तर ते ‘ख्रिस्ताचे आहेत.’ (१ करिंथकर १:२; १५:२३) यांच्यापैकी बहुतेकांना अब्राहामाच्या मालिकेसोबत कसा संबंध आहे ते सापडणार नाही, कारण ते यहुद्देत्तर राष्ट्रातून आहेत. आध्यात्मिक पूर्णतेनुरुप पाहू जाता ते थोर अब्राहाम यहोवा याच्या कुटुंबातून तर नाहीच नाही; तर ते पापी आदाम याच्या अपूर्ण कुटुंबातील आहेत. या कारणास्तव आता जर यांना “अब्राहामाचे संतान” यापैकीचा भाग बनायचे आहे तर नंतरच्या करारांचा येथे कसा संबंध आहे ते आपल्याला पाहिले पाहिजे.

नियमशास्त्र करार तात्कालिकपणे जोडण्यात आला

१५-१७. (अ) अब्राहामाच्या कराराला नियमशास्त्र करार का जोडण्यात आला? (ब) नियमशास्त्राने ती उद्दिष्टे कशी पूर्ण केली?

१५ आपल्या उद्देशाची परिपूर्ति साधण्यासाठी देवाने अब्राहामासोबतच्या कराराचा मूलभूत पाया स्थापिल्यावर संतानाची मालिका ते विशिष्ठ संतान येइपर्यंत नाश तसेच भ्रष्ट होण्यापासून कशी राखली जाणार होती? ते संतान आल्यावर खऱ्‍या उपासकांना त्याची कशी ओळख मिळेल? देवाने आपल्या सूज्ञतेने नियमशास्त्र कराराची जी तात्कालिक जोड पुरविली त्याकडे निर्दश करून पौल या प्रश्‍नांची उत्तरे देतो. तो प्रेषित लिहितोः

१६ “तर मग, नियमशास्त्र कशासाठी? ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघनामुळे लावून देण्यात आले. ते मध्यस्थाच्या हस्ते देवदूतांच्या द्वारे नेमून देण्यात आले. . . . आपण विश्‍वासाद्वारे नीतीमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहंचविणारे बालरक्षक होते.”—गलतीकर ३:१९, २४.

१७ सीनाय डोंगराजवळ यहोवाने त्याच्यामध्ये व इस्राएलांमध्ये एक अद्वितीय राष्ट्रीय करार, नियमशास्त्र करार, मोशे या मध्यस्ताद्वारे केला.b (गलतीकर ४:२४, २५) लोकांनी या करारात सहभागी असण्याची मंजूरी दिली आणि गोऱ्‍हे व शेरडांच्या यज्ञबलिच्या रक्‍ताद्वारे याची प्रस्थापना झाली. (निर्गम २४:३-८; इब्रीयांस ९:१९, २०) या कराराने इस्राएलांना ईश्‍वरशासित नियम आणि नीतीमान सरकारासाठी आराखडा दिला. या कराराने विदेशी लोकांसोबत विवाह संपादण्यात तसेच अनैतिक व खोट्या धर्मप्रथांमध्ये सहभागी न होण्याची बंदी घातली. यामुळे इस्राएलांचे रक्षण झाले आणि संतानाची मालिका भ्रष्ट होण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी शक्‍तीदायक ठरले. (निर्गम २०:४-६; ३४:१२-१६) पण अपूर्ण अशा कोणाही इस्राएलाला नियमशास्त्र पूर्णपणे आचरता न आल्यामुळे त्याने पाप प्रकटविले. (गलतीकर ३:१९) याकरवी एका परिपूर्ण तसेच कायम याजकाची आणि ज्याची दरवर्षी पुनरावृत्ती होणार नाही अशा यज्ञार्पणाची गरज सामोरी आली. याप्रकारे नियमशास्त्र एका बालरक्षकाकडे नेणारे ठरले जो मशीहा वा ख्रिस्त असणार होता. (इब्रीयांस ७:२६-२८; ९:९, १६-२२; १०:१-४, ११) आपला उद्देश साध्य केल्यावर मग हा नियमशास्त्र करार संपणार होता.—गलतीकर ३:२४, २५; रोमकर ७:६; पहा “वाचकांचे प्रश्‍न,” पृष्ठ ३२.

१८. नियमशास्त्र करारात आणखी कोणते भवितव्य समाविष्ट होते, पण ते समजण्यास कठीण का होते?

१८ हा तात्कालिक स्वरुपाचा करार करताना देवाने या थरारक हेतूचा देखील उल्लेख केला व म्हटलेः “तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधि व्हाल . . . तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल.” (निर्गम १९:५, ६) केवढे हे सुंदर भवितव्य! राजा-याजकाचे राष्ट्र. पण हे कसे होऊ शकणार होते? जसे नियमशास्त्राने नंतर स्पष्ट केले त्याप्रमाणे राज्य करणारा वंश (यहुदा) व याजकवंश (लेवी) यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या नेमून देण्यात आल्या. (उत्पत्ती ४९:१०; निर्गम २८:४३; गणना ३:५-१३) एकाच माणसाला मुलकी शास्ता तसेच याजक होता येणार नव्हते. तरीपण, देवाने निर्गम १९:५, ६ मध्ये उद्‌गारलेल्या शब्दात हे मानण्याचे कारण दिले की, जे निमयशास्त्र करारात होते त्यांना “याजकराज्य व पवित्र राष्ट्र” यासाठी सदस्य पुरविण्याची संधि बहाल केलेली आहे.

दावीदाच्या राज्याचा करार

१९. करारांमध्ये राज्यपदाचा कसा निर्दश करण्यात आला?

१९ काही काळातच देवाने आणखी एका कराराची जोड दिली, ज्यामुळे तो आमच्या चिरकालिक आशीर्वादासाठी त्याचा उद्देश कसा पूर्ण करणार याची स्पष्टता मिळाली. आम्ही हे पाहिले आहेच की, अब्राहामासोबतच्या कराराने अब्राहामाच्या नैसर्गिक संतानामध्ये राज्यपद येणार असा निर्दश केला होता. (उत्पत्ती १७:६) नियमशास्त्र कराराने सुद्धा देवाच्या लोकात राजे असणार अशी अपेक्षा पुरविली, कारण मोशाने इस्राएलांना म्हटलेच होतेः “[वचनयुक्‍त देशात] जाऊन तो वतन करून तेथे राहिल्यावर तुला असे वाटेल की, ‘आसपासच्या राष्ट्रांप्रमाणे आपणही आपल्यावर राजा नेमावा’; तर तुझा देव यहोवा ज्याला निवडील त्यालाच तू आपल्यावर राजा नेमावे. . . . कोणाही परदेशीयाला आपल्यावर नेमू नये.” (अनुवाद १७:१४, १५) आता हे राज्यपद देव कसे आणणार होता व त्याचा अब्राहामासोबत केलेल्या कराराशी कसा संबंध असणार होता?

२०. दावीद व त्याची वंशमालिका कशी दृश्‍यात आली?

२० इस्राएलांचा पहिला राजा शौल हा बन्यामीन वंशातून होता तरी त्याच्यानंतर यहुदा वंशातील धैर्यवान व निष्ठावंत असा दावीद राजा बनला. (१ शमुवेल ८:५; ९:१, २; १०:१; १६:१, १३) दावीद राज्य करीत असताना देवाने दावीदासोबत करार केला. प्रथमतः त्याने म्हटलेः “तुझे दिवस पुरे झाले आणि तू जाऊन आपल्या पितरांबरोबर निजलास म्हणजे तुझ्या पोटच्या वंशजास तुझ्यामागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करीन. तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन.” (२ शमुवेल ७:१२, १३) तेथे सूचित केल्याप्रमाणे दावीदाचा मुलगा शलमोन हा पुढचा राजा झाला व याचा देवाने यरुशलेमात त्याच्यासाठी घर किंवा मंदिर उभारण्यासाठी वापर केला. पण, आणखी काही होणार होते.

२१. दावीदासोबतच्या राज्य-कराराने कशाची तरतुद पुरविली?

२१ यहोवाने पुढे दावीदाशी हा करार केलाः “तुझे घराणे व तुझे राज्य ही तुजपुढे अढळ राहतील; तुझी गादी कायमची स्थापित होईल.” (२ शमुवेल ७:१६) याद्वारे, हे स्पष्ट आहे की देव इस्राएलांसाठी दावीदाच्या घराण्यातून राजमालिका स्थापन करीत होता. पण हा एकामागून एक असा दावीद राजांचा वारसा चालू राहणार नव्हता; तर दावीदाच्या घराण्यातूनच असा एकजण उदयास येणार होता जो “अक्षय” राज्य करणार आणि “त्याचे राजासन [देवा]समोर सूर्याप्रमाणे कायम” राहणार होते.—स्तोत्रसंहिता ८९:२०, २९, ३४-३६; यशया ५५:३, ४.

२२. दावीदासोबतचा करार संतानाच्या मालिकेसोबतचा संबंध कसा दर्शवितो, व त्याचा काय परिणाम दाखवितो?

२२ याप्रकारे दावीदाच्या कराराने संतानाची मालिका पुढे चालू ठेवली. पहिल्या शतकातील यहुद्यांनीही हे ओळखले होते की, मशीहा येणार तो दावीदाच्या वंशातूनच असणार. (योहान ७:४१, ४२) या दावीदाच्या राज्याच्या चिरकालिक वारस, तसेच अब्राहामासोबत करण्यात आलेल्या करारातील प्रधान संतान येशू ख्रिस्त बनला; ज्याविषयीची साक्ष दिव्यदूताने दिली. (लूक १:३१-३३) याप्रकारे, येशूला, दावीदाने राज्य केले त्या भूप्रदेशावर, वचनयुक्‍त देशावर राज्य करण्याचा हक्क मिळाला. यामुळे येशूवरील आमचा विश्‍वास अधिक वाढला पाहिजे, कारण त्याने बेकायदेशीरपणे वा बंडाळीने नव्हे, तर कायदेशीर व्यवस्थेने, ईश्‍वरी कराराद्वारे आपला राज्याधिकार मिळविला आहे.

२३. आता कोणते प्रश्‍न व विषय अद्याप पूर्ण व्हावयाचे आहेत?

२३ आम्ही आतापर्यंत केवळ चार ईश्‍वरी करारांविषयीची माहिती पाहिली आणि याकरवी देवाने, मानवजातीला चिरकालिक आशीर्वाद देण्याच्या आपल्या उद्देशासंबंधाने कशी व्यवस्था आखली ते समजले. तरीपण, तुम्हाला अद्याप एकंदरीत चित्र अपुरेच आहे असे दिसेल. काही प्रश्‍न अजूनही आहेतः मानव अपूर्णच आहेत, तेव्हा कोणती याजकीय सेवा तसेच यज्ञार्पण यामध्ये कायमचा बदल घडवून आणील? अब्राहामाच्या संतानाचे भाग बनण्यासाठी मानवाला कसे पात्र होता येईल? राज्याधिकाराचा जो हक्क आहे त्यामध्ये भूप्रदेशाचाच नव्हे तर आणखी काही क्षेत्राचा समावेश राहील असे मानण्यास काही कारण आहे का? अब्राहामाचे संतान, मग ते प्रधान असो की दुय्यम, ते “पृथ्वीवरील राष्ट्रे” व आम्हालाही कसा आशीर्वाद देणार? आपण पाहू या.

[तळटीपा]

a  हा एकपक्षीय करार आहे, कारण येथे केवळ एकाच पक्षाला (देवाला) कराराच्या शर्ती पूर्ण करायच्या होत्या.

b  “करारविषयक कल्पना ही इस्राएल धर्माचे खास अंग होते व ती सर्वस्वी निष्ठावंतपणाची मागणी करीत होते; यामुळे दोन किंवा अधिक गोष्टींना निष्ठावंतपणा दाखविण्याची जी मुभा इतर धर्मात दिसते तिला येथे काट दिली जाई.”—थिऑलॉजिकल डिक्शनरी ऑफ द ओल्ड टेस्टमेंट, खंड २, पृष्ठ २७८.

तुमचे काय उत्तर असेल?

◻ अब्राहामाच्या कराराने आम्हाला चिरकालिक आशीर्वाद मिळण्याचा पाया कसा घातला?

◻ अब्राहामाचे खरे, दैहिक संतान कोण होते? आणि लाक्षणिक संतान?

◻ अब्राहामाच्या करारासोबत नियमशास्त्राचा करार का जोडण्यात आला?

◻ दावीदाच्या राज्याच्या कराराने देवाच्या उद्देशाला कसे पुढे नेले?

[Diagram on page 13]

[For fully formatted text, see publication]

एदेनमधील करार उत्पत्ती ३:१५

अब्राहामाचा करार

प्रधान संतान

दुय्यम संतान

चिरकालिक आशीर्वाद

[Diagram on page 14]

[For fully formatted text, see publication]

एदेनमधील करार उत्पत्ती ३:१५

अब्राहामाचा करार

नियमशास्त्र करार

दावीदाचा राज्याचा करार

प्रधान संतान

दुय्यम संतान

चिरकालिक आशीर्वाद

[१० पानांवरील चित्रं]

मानवजातीस आशीर्वादित करण्याचा आपला हेतू कार्यवाहित करावा यासाठी देवाने विश्‍वासू अब्राहामासोबत करार केला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा