तुम्हाला बाप्तिस्मा घेण्यास काय अडचण आहे?
“पाहा हे पाणी; मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?”—प्रे. कृत्ये ८:३६.
१. यरुशलेम व गज्जा यामधील रस्त्यावर काय होत होते?
यहोवाचा दिव्यदूत बोलला आणि यरुशलेम व गज्जा यामधील वाळंवटाच्या रस्त्यावर काहीतरी घडत गेले. धावत्या रथावर एक कुशी शास्त्रवचने वाचत होता. लवकरच एक माणूस त्या रथाच्या बरोबरीने धावू लागला. “आपण जे वाचीत आहा ते आपल्याला समजते काय?” असे धावणाऱ्या माणसाने विचारले. “कोणी मार्ग दाखविल्याशिवाय मला कसे समजणार?” असे तो कुशी उत्तरला. तेव्हा ते मार्गदर्शन, दिव्यदूताकरवी पाठविण्यात आलेल्या फिलिप्प या सुवार्तिकाद्वारे देण्यात आले. रथात कुशी माणसाशेजारी बसल्यावर फिलिप्पाने यशयाकरवी लिखित असणाऱ्या भविष्यवादापासून सुरवात करुन “येशूविषयीची सुवार्ता” त्याला कळविली.
२, ३. (अ) कुशी माणसाने सुवार्तेला कोणता प्रतिसाद दाखविला? (ब) या घटनेमुळे कोणते प्रश्न उद्भवतात?
२ रस्त्यातून जाताना एके ठिकाणी कुशी आवेशाने उद्गारलाः “पाहा हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?” तेव्हा त्याने रथ थांबविण्यास सांगितले. दोघेहीजण पाण्यात शिरले आणि फिलिप्पाने त्याला बाप्तिस्मा दिला. यानंतर यहोवाच्या आत्म्याने फिलिप्पाला दुसऱ्या ठिकाणी निरविले आणि तो कुशी आपल्या मार्गाने हर्ष करीत गेला.—प्रे. कृत्ये ८:२६-३९.
३ तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांसोबत सहवास ठेवून असाल पण तुमचा बाप्तिस्मा झालेला नसेल तर वरील घटनांमुळे तुम्ही कदाचित हे प्रश्न विचारालः त्या कुशीचा इतक्या लवकर का बाप्तिस्मा झाला? बाप्तिस्म्याचा विधि कसा केला जाण्यास हवा? तो कशाचे चिन्ह आहे? मला बाप्तिस्मा घेण्यास कोणती अडचण आहे?
घाईने बाप्तिस्मा झाला नाही
४. हा कुशी कोण होता?
४ तो कुशी “यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता” याचा हा अर्थ होतो की तो सुंता झालेला यहुदी परिवर्तित होता. तो “षंढ” होता पण शारीरिकरित्या नव्हे, कारण कोणा भग्नांड किंवा लिंगछेदन झालेल्या व्यक्तीला इस्राएली मंडळीतून उच्छेद करण्यात येत असे. (अनुवाद २३:१) तेव्हा “षंढ” या शब्दाचा अर्थ येथे अधिकारी असा होतो कारण तो “कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते.”—प्रे. कृत्ये ८:२७.
५. कुशी षंढाचा इतक्या त्वरेने का बाप्तिस्मा होऊ शकला?
५ तो कुशी परराष्ट्रीयातील मनुष्य होता. तथापि, त्याचे यहुदी धर्मात परिवर्तन झाले होते त्यामुळे त्याचा, इ. स. ३६ मध्ये कर्नेल्य या बेसुंती विदेश्याकडे राज्याचा संदेश पोहंचण्याआधी, बाप्तिस्मा होऊ शकला. यहुदी परिवर्तित या नात्याने या कुशीला देव व त्याचे वचन याविषयीची माहिती होती, पण याला आध्यात्मिक मदतीची गरज होती. याकरताच या माणसाला प्रचार करण्यासाठी फिलिप्पला निरविले गेले आणि सुवार्ता विदेश्यांकडे जाण्याआधी त्याचा बाप्तिस्मा होऊ शकला.
आरंभीचा ख्रिस्ती बाप्तिस्मा
६. त्या कुशीचा कसा बाप्तिस्मा झाला, आणि तुम्ही तसे का म्हणता?
६ या कुशीचा कसा बाप्तिस्मा झाला? “बाप्तिस्मा” हा शब्द बा.प्ती’झो या ग्रीक शब्दाकडून आला आहे व याचा अर्थ “बुडणे, बुडविणे” असा होतो. या शब्दाचा एक प्रयोग २ राजे ५:१४ च्या ग्रीक सेप्ट्युजंट भाषांतरात आहे. हा कुशी व फिलिप्प “पाणवठ्याजवळ” आले तेव्हा त्याने बाप्तिस्मा द्यावा अशी फिलिप्पाला विनंति केली हे लक्षवेधक आहे. बाप्तिस्मा घेण्यासाठी ते “दोघे पाण्यात उतरले” आणि नंतर ते “पाण्यातून वर आले.” (प्रे. कृत्ये ८:३६-३९) अशाप्रकारे कुशी षंढाचा पाण्यात बुडून बाप्तिस्मा झाला.
७. बाप्तिस्मा पाण्याने केला जावा यासाठी कोणत्या नमुनेदार घटना आधी घडल्या?
७ येशूचा देखील पाण्यात बुडून बाप्तिस्मा झाला. यार्देन नदीत त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर असे म्हटले आहे की, तो “पाण्यातून वर आला.” (मत्तय ३:१३, १७) बाप्तिस्मा योग्य प्रकाराने व्हावा यासाठीच बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने शालिमाजवळ यार्देनेच्या खोऱ्यातील एक स्थळ निवडून घेतले होते. ते का बरे? कारण “तेथे मुबलक पाणी होते.” (योहान ३:२३) अशाप्रकारे, शास्त्रवचने सुचवितात की, मुबलक पाणी असेल तेथे बाप्तिस्मा होण्यास हवा.
८. परुशी तसेच इतर यहुद्यांच्या प्रथेकरवी आपल्याला बाप्तिस्म्याविषयीचा कोणता निर्वाळा घेता येतो?
८ आम्ही जेव्हा परुशी आणि इतर यहुदी यांच्या प्रथांचा विचार करतो तेव्हा बाप्तिस्म्याविषयीचा योग्य निर्वाळा घेण्याकरता आम्हाला काही आधार मिळतो. शुभवर्तमानकार मार्क लिहितोः “परुशी व इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरुन हात नीट धुतल्यावाचून जेवीत नाहीत; बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय [ग्रीकः रॅन.टी’झो] ते जेवीत नाहीत; आणि प्याले, घागरी, पितळेची भांडी धुणे [बॅ.प्टि.स्मौस’] व असल्या बऱ्याच दुसऱ्या रुढी ते पाळतात.” (मार्क ७:३, ४) हे लोक बाजारातून परत आल्यावर जेवण्याआधी दांभिकपणे स्वतःवर पाणी शिंपडून घेत. पण तेच जेवणाकरता जी भांडी ते वापरीत ते मात्र ती धुत वा पाण्यात बुडवीत असत.
९. बाप्तिस्म्याविषयी टर्टुलिनने काय म्हटले?
९ धर्मत्यागाने आपला प्रवेश मिळविल्यानंतर देखील चर्च फादर टर्टुलियन (इ. स. सुमारे १६०-२३०) बाप्तिस्म्याविषयी असे म्हणालेः “ईश्वरी कार्याचा साधेपणा जो कृतीमध्ये दिसून येतो आणि याच्या परिणामात जी भव्यता मिळण्याचे अभिवचन दिले जाते ते पाहता माणसाचे मन दुराग्रही होऊ शकेल असे त्यात काही नाही. इतक्या साधेपणाने, कसलाही दिखावा न करता, कोणतीही बरीच अशी अपूर्व तयारी न करता आणि शेवटचे म्हणायचे तर कोणताही खर्च न घेता माणसाला पाण्यात बुडविण्यात येते, आणि काही वचने उद्गारित त्याला शिंपडविले जाते व मग पुन्हा वर काढण्यात येते. यावेळी शुद्ध होणाऱ्या माणसास परिणाम म्हणून चिरकालाची वाटणारी प्राप्तता इतकी मोठी, विलक्षण वाटत नाही.” टर्टुलियनने काय म्हटले ते लक्षात आणाः “माणसाला पाण्यात बुडविण्यात येते, . . . मग पुन्हा वर काढण्यात येते.”
१०. ख्रिस्ती बाप्तिस्म्याची आरंभीची पद्धत काय होती असे प्रामाण्य म्हणतात?
१० प्रामाण्य देखील दाखवितात की ख्रिस्तीजनांनी आरंभाला लोकांचा पाण्यात पूर्णपणे बुडवून बाप्तिस्मा केला. एक प्रख्यात फ्रेंच संदर्भग्रंथ म्हणतोः “पहिल्या ख्रिस्तीजनांना बाप्तिस्मा हा जेथे पाणी आढळत असे तेथे दिला जाई.” तसेच द कॅथोलिक एनसायक्लोपिडिआ म्हणतोः “जो विधि प्राचीन काळापासून आचरण्यात येई तो पाण्यात बुडवून केला जाणारा बाप्तिस्मा हा होय.”—खंड २, पृष्ठ २६१ (१९०७ ची आवृत्ती).
शिकविणे व बाप्तिस्मा करणे
११. येशूने आपल्या शिष्यांना कोणती आज्ञा दिली?
११ कोणा माणसाचा बाप्तिस्मा होण्याआधी त्याने अचूक ज्ञानाची प्राप्ती करुन त्यानुसारची हालचाल केली पाहिजे. हे, ख्रिस्ताने त्याच्या अनुयायांना जेव्हा असे म्हटले तेव्हा स्पष्ट करण्यात आलेः “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले आहे ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”—मत्तय २८:१९, २०.
१२. ‘पित्याच्या नावाने’ बाप्तिस्मा घेणे याचा काय अर्थ होतो?
१२ ‘पित्याच्या नावाने’ बाप्तिस्मा घेणे याचा हा अर्थ होतो की बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवाराने देवाचे पद व त्याचा अधिकार ओळखला पाहिजे. यहोवा हा “सर्व पृथ्वीवर परात्पर,” निर्माता आणि विश्वाचा सार्वभौम आहे अशी त्याच्याविषयीची ओळख बाळगली जाते. (स्तोत्रसंहिता ३६:९; ८३:१८; २ राजे १९:१५) ती व्यक्ती यहोवाला आपला न्यायाधीश, नियम-दाता आणि राजा मानते.—यशया ३३:२२; स्तोत्रसंहिता ११९:१०२; प्रकटीकरण १५:३, ४.
१३. ‘पुत्राच्या नावाने’ बाप्तिस्मा घेणे याचा काय अर्थ होतो?
१३ ‘पुत्राच्या नावाने’ बाप्तिस्मा घेणे म्हणजे ख्रिस्ताचे पद व अधिकार ओळखून, देवाने त्याला “एक जुळणारी खंडणी” याप्रकारे तरतूद म्हणून पुरविले हेही ओळखणे. (१ तीमथ्य २:५, ६) येशूने सचोटी रक्षक या अर्थाने मरण पत्करल्यावर “देवाने त्याला अत्युच्च केले”, त्यामुळेच जे बाप्तिस्मा घेऊ इच्छितात त्यांनी ख्रिस्ताचा “देवपित्याच्या गौरवासाठी . . . प्रभु” असा स्वीकार केलाच पाहिजे. (फिलिप्पैकर २:९-११) याशिवाय, येशू हा यहोवाचा “विश्वासू साक्षी” आणि “राजांचा राजा” आहे असाही पत्कर केला पाहिजे.—प्रकटीकरण १:५; १९:१६.
१४. ‘पवित्र आत्म्याच्या नावाने’ बाप्तिस्मा घेण्यात काय समाविष्ट आहे?
१४ त्या विशिष्ठाचा ‘पवित्र आत्म्याच्या नावाने’ देखील बाप्तिस्मा होण्यास हवा. त्याने हे ओळखले पाहिजे की, पवित्र आत्मा ही काही व्यक्ती नव्हे तर देवाची क्रियाशील शक्ती आहे, जिचा वापर निर्मितीकार्यात, पवित्र शास्त्र लेखकांना प्रेरणा देण्यात आणि इत्यादि गोष्टींसाठी झाला. (उत्पत्ती १:२; २ शमुवेल २३:१, २; २ पेत्र १:२१) “देवाच्या गहन गोष्टीची” समज होण्यासाठी तसेच “प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रियदमन” या ईश्वरी फलप्राप्तीचे प्रदर्शन करावयाचे आहे तर यहोवाच्या आत्म्याची ओळख बाळगली पाहिजे. (१ करिंथकर २:१०; गलतीकर ५:२२, २३) याशिवाय, राज्याच्या प्रचाराचे काम करण्यासाठीही देवाच्या आत्म्याची गरज आहे हे ओळखले पाहिजे.—योएल २:२८, २९.
बाप्तिस्मा कशाची सूचकता देतो
१५. ख्रिस्ती बाप्तिस्मा पापे का धुवून काढू शकत नाही?
१५ बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने पवित्र आत्म्याच्या पाठबळाने लोकांचा बाप्तिस्मा केला. (प्रे. कृत्ये १३:२४) त्याने त्यांचा, पापे धुवून टाकण्यासाठी नव्हे तर पश्चातापासाठी बाप्तिस्मा केला. (प्रे. कृत्ये १९:४) योहानाने येशूचा, “ज्याला पाप ठाऊक नव्हते” त्याचा, बाप्तिस्मा केला. (१ पेत्र २:२२) याशिवाय हनन्याने तार्ससच्या शौलाला ही विनवणी केलीः “उठ, [येशूच्या] नावाचा धावा करुन बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकाचे क्षालन कर.” (प्रे. कृत्ये २२:१२-१६) तद्वत, ख्रिस्ती बाप्तिस्मा पाप धुवून टाकत नाही. बाप्तिस्मा नव्हे तर, येशूचे ओतण्यात आलेले रक्त आणि ‘त्याच्या नावाचा धावा करणे’ हे क्षमा घडवून आणते.—इब्रीयांस ९:२२; १ योहान १:७.
१६. (अ) बाप्तिस्मा हा पापे धुवून टाकत नसल्यामुळे तो कशाचे चिन्ह ठरतो? (ब) एखादा बाप्तिस्मा घेतो त्यावेळी लाक्षणिकपणे काय घडत असते?
१६ ख्रिस्ती बाप्तिस्मा जरी पापे धुवून टाकत नसला तरी तो, पाण्यात बुडणाऱ्या त्या विशिष्ठ व्यक्तीने यहोवा देवाला येशू ख्रिस्तामार्फत स्वतःचे बिनशर्तपणे समर्पण केले आहे असे सुचवितो. (पडताळा मत्तय १६:२४.) समर्पण करणे म्हणजे “घोषणा करणे, पुष्टी देणे, अर्पण करणे” होय. देवास केलेले समर्पण, त्या विशिष्ठ व्यक्तीविषयी हे दाखविते की, त्याने देवाची इच्छा ख्रिस्ताद्वारे करण्यासाठी स्वतःला बिनशर्तपणे वेगळे केले आहे व तशी कबूली त्याने दिली आहे. तेव्हा, या बाप्तिस्म्याच्या उमेदवाराला लाक्षणिकरित्या जेव्हा तात्पुरते पाण्यात “पुरले” जाते व मग वर काढले जाते तेव्हा तो त्याच्या पूर्वीच्या मार्गाक्रमणास मरतो आणि यहोवाची इच्छा बिनशर्तपणे करण्याकरता एका नव्या जीवनासाठी उठत असतो.—पडताळा रोमकर ६:४-६.
१७. बालकांचा बाप्तिस्मा का अयोग्य आहे?
१७ यास्तव बाप्तिस्मा हे मोठे गंभीर पाऊल आहे. बालकांचा बाप्तिस्मा करणे हे चुकीचे आहे कारण या बालकास काही समजत नसते, त्याला निर्णय घेता येत नाही व ते शिष्य बनू शकत नाही. (मत्तय २८:१९, २०) फिलिप्पाच्या उपाध्यपणात ज्यांचा बाप्तिस्मा केला गेला ती सर्व बालके नव्हे तर “पुरुष व स्त्रिया” होत्या. (प्रे. कृत्ये ८:४-८, १२) जे शिकू, विश्वास ठेवू शकतात आणि विश्वास राखू शकतात अशांसाठी बाप्तिस्मा आहे. (योहान १७:३; प्रे. कृत्ये ५:१४; १८:८; इब्रीयांस ११:६) याविषयी ऑगस्टस निएंडर या इतिहासकारांनी लिहिलेः “विश्वास व बाप्तिस्मा यांचा नेहमीच एकमेकांशी संबंध राहिला आहे; आणि कदाचित याच कारणामुळे . . . तान्ह्या बाळांच्या बाप्तिस्म्याची प्रथा [पहिल्या शतकात] ज्ञात नव्हती. . . . ही प्रथा तिसऱ्या शतकात प्रेषितांचा सांप्रदाय या अर्थी ओळखण्यात आली हे मूळ प्रेषितीय आरंभाच्या कारणामुळे नव्हे तर त्याच्या विरुद्ध मतामुळे मान्य करण्यात आली याकरवी स्पष्ट दिसते.—हिस्ट्री ऑफ द प्लान्टींग ॲण्ड ट्रनिंग ऑफ द ख्रिश्चन चर्च बाय द अपॉस्टल्स (न्यूयॉर्क, १८६४) पृष्ठ १६२.
१८. (अ) यहोवाच्या साक्षीदारांपैकी बनण्यासाठी शास्त्रवचनीयदृष्ट्या कशाची गरज आहे? (ब) विश्वासाविषयीचा कोणता पुरावा, त्या विशिष्ट व्यक्तीचा बाप्तिस्मा होण्यास हवा की नाही हे सूचित करील? (क) खंडणीवरील विश्वासाविषयी बाप्तिस्म्याच्या उमेदवारांना कसे जोरदारपणे सांगितले जाते?
१८ शास्त्रवचने वेळोवेळी विश्वासूंच्या बाप्तिस्म्याविषयीचे भाष्य करतात. (प्रे. कृत्ये ४:४; ५:१४; ८:१३; १६:२७-३४; १८:८; १९:१-७) तेव्हा, यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक बनायचे आहे तर त्या व्यक्तीने विश्वास ग्रहण केला पाहिजे—विश्वास पत्करुन मग त्याचा बाप्तिस्मा झाला पाहिजे. असा हा विश्वास बाप्तिस्म्याअगोदर देखील ईश्वरी वागणूक, यहोवावरील भाव, राज्य-प्रचाराच्या कामात सहभागी होणे आणि येशूच्या खंडणी यज्ञार्पणाचा स्वीकार करणे या गोष्टीत प्रकट होत असतो. खंडणीवरील विश्वास हा बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांकरता जोर देऊन सांगण्यात येतो, कारण बाप्तिस्म्याच्या भाषणाच्या वेळी वक्ता त्यांना जे दोन प्रश्न विचारत असतो त्यापैकीचा एक असा आहेः “येशू ख्रिस्ताच्या यज्ञार्पणाच्या आधारावर तुम्ही आपल्या पापाविषयीचा पश्चाताप व्यक्त करुन, यहोवाला, त्याच्या इच्छेप्रमाणे करीत राहण्यासाठी स्वतःचे समर्पण केले आहे का?” उमेदवाराने या प्रश्नाचे होय, असे उत्तर दिले, आणि आपले समर्पण व बाप्तिस्मा या गोष्टी त्याला, देवाने आपल्या आत्म्याद्वारे मार्गदर्शित केलेल्या संस्थेमध्ये यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक असल्याची ओळख देत असतात हे जाणले तरच त्याला पाण्यात बुडवून बाप्तिस्मा दिला जातो.
प्रार्थनेकरवी समर्पण
१९. यहोवाला प्रार्थनेकरवी समर्पण का करावे?
१९ बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांनी देव व ख्रिस्त यांच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. पण, देवास केले जाणारे समर्पण हे प्रार्थनेद्वारे केले जाण्यास हवे असे यहोवाचे साक्षीदार का म्हणतात? कारण आपण यहोवाची भक्ती सर्वस्वीपणे करणार आहोत हे त्याला प्रार्थनेकरवी सांगणे अगदी उचित आहे. (अनुवाद ५:८, ९; १ इतिहास २९:१०-१३) येशूने देखील प्रार्थनेकरवी, आपल्या स्वर्गीय पित्याला त्याची पवित्र सेवा सर्वस्वीपणे करण्याची इच्छा व्यक्त केली. (इब्रीयांस १०:७-९) बाप्तिस्मा घेत असताना सुद्धा येशू “प्रार्थना करीत होता.” (लूक ३:२१, २२) अशाप्रकारे, देवास प्रार्थनेकरवी समर्पण केले पाहिजे हे स्पष्ट आहे.
२०. आरंभीच्या ख्रिस्तीजनांनी नव्या शिष्यांना, देवाला प्रार्थनेकरवी समर्पण करण्याचे आर्जविले असावे असे का म्हणता येईल?
२० आरंभीच्या ख्रिश्चनांनी देखील नव्या शिष्यांना प्रार्थनेद्वारे देवाला स्वतःचे समर्पण करावयास सांगितले होते असे दिसते. कारण नंतर टर्टुलिनने म्हटलेः “ज्यांचा बाप्तिस्मा व्हावयाचा आहे अशांनी निरंतर प्रार्थना, उपास आणि गुडघे टेकणे केले पाहिजे.” याआधी जस्टीन मार्टर (सुमारे इ. स. १००-१६५) यांनी लिहिलेः “ख्रिस्तामध्ये आम्हाला नवेपण मिळते तेव्हा आम्ही आमचे देवाला कोणत्या पद्धतीने समर्पण करत असतो तेही तुम्हाला स्पष्ट करुन सांगतो . . . आम्ही जे सांगतो ते सत्य आहे याचा जे विश्वास धरतात व त्यानुरुप जगण्याचा निश्चय करतात अशांना, देवाला प्रार्थना व उपासासोबत याचना करुन त्यांच्या गत पापांची क्षमा प्रदान व्हावी यासाठी उत्तेजन दिले जाते, आणि आम्हीही त्यांच्यासाठी प्रार्थना व उपास करतो.”
२१. तुमचा काही वर्षांआधी बाप्तिस्मा झाला त्यावेळी प्रार्थनेकरवी समर्पण करावयास हवे असे तुम्हाला सांगितले गेले नसले तरी कसली शक्यता आहे?
२१ तुमचा बाप्तिस्मा होऊन आता खूप वर्षे झाली आहेत व त्यावेळी प्रार्थनेकरवी समर्पण करावे असे तुम्हाला सांगण्यात आले नसेल तर तुमचा बाप्तिस्मा अपात्र ठरतो असे नाही. त्याकाळी, म्हणजे सुमारे ४० वर्षांआधी लहान असताना आपण सुद्धा देवाला गुडघे टेकून कळकळीच्या प्रार्थनेद्वारे यहोवाला आपले समर्पण केले आहे हे काहीजण आठवून सांगतात. तथापि, जरी कोणी आधी प्रार्थनेकरवी समर्पण करण्याचा प्रघात अनुसरला नव्हता तरीही बाप्तिस्म्याच्या दिवशी भाषण दिल्यावर वक्त्याने प्रार्थना म्हटली आणि यात सभागृहातील लोक सहभागी झाले तेव्हा त्यात इतर उमेदवारांसोबत सहभागी होताना त्याने आपल्या बाप्तिस्म्याच्या विषयास प्रार्थनापूर्वकपणे सादर केले असावे यात काही शंका नाही.
काहीजण का मागे राहतात?
२२. काहीजण बाप्तिस्मा घेण्यापासून स्वतःला का मागे ठेवतात?
२२ यहोवाचा समर्पित साक्षीदार असणे ही एक आशीर्वादित स्थिती आहे तर मग हे पाऊल उचलण्यास काहीजण का मागे राहतात? देवाच्या वचनाचे आज्ञापालन न करणे, येशूच्या नेतृत्वास अनुसरुन बाप्तिस्मा न घेणे यामागील एक कारण म्हणजे खऱ्या प्रेमाची उणीव होय. (१ योहान ५:३) अर्थात, बाप्तिस्मा न झालेला कोणी, मी येशूचे उदाहरण अनुसरणार नाही किंवा देवाच्या आज्ञांचे पालन करणार नाही असे बहुधा कधी म्हणणार नाही. पण, ते जगातील घडामोडीत स्वतःला इतके गुंतवून ठेवतात की, आध्यात्मिक ध्येयाची पूर्ति करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. हीच जर तुमची समस्या आहे तर, आपल्या इच्छा, आस्था आणि आकांक्षा यात सूज्ञपणे बदल करु नये का? जे खरोखरी देवावर प्रेम करुन आहेत ते जगावर प्रेम करणार नाहीत. (१ योहान २:१५-१७) तसेच ‘द्रव्याच्या मोह’ आपणास सुरक्षितता देऊ शकेल अशा गुंगीत स्वतःला ठेवू नका. (मत्तय १३:२२) खरी सुरक्षितता ही केवळ यहोवा देवासोबतच्या समर्पित नातेसंबंधातून मिळत असते.—स्तोत्रसंहिता ४:८.
२३. इतर काहीजण यहोवास समर्पण करण्यापासून व त्याची लाक्षणिक सूचकता पाण्याच्या बाप्तिस्म्याकरवी प्रदर्शित करण्यापासून स्वतःला का मागे ठेवतात?
२३ काहीजण म्हणतात की आमचे देवावर प्रेम आहे पण त्याला समर्पण करण्यापासून ते मागे राहतात याचे कारण हे की, यामुळे जबाबदारी टळते आणि आपण जबाबदार राहात नाही असे त्यांना वाटते. यांना नंदनवनात राहण्याचे नक्की आवडेल पण त्याविषयी ते फारच कमी वा यर्त्किचितही हालचाल दाखवीत नाहीत. (नीतीसूत्रे १३:४) तथापि, असे लोक जबाबदारीतून सुटू शकत नाहीत, कारण जेव्हा त्यांनी यहोवाचे वचन ऐकले तेव्हाच त्यांच्यावर जबाबदारी आलेली असते. (यहेज्केल ३३:७-९) आपल्या समर्पणाकरवीच ते देवाला, आपणाठायी त्याच्या इच्छेची जाण असून ती पुरी करण्याची उत्कंठा आहे असे व्यक्त करु शकतात. अशाप्रकारच्या आज्ञाधारकपणामुळे त्यांच्यावर भारी ओझे पडण्याऐवजी यहोवाचे आशीर्वाद येतात व त्यामुळे त्यांना आनंद मिळतो कारण आपली देवावर प्रीती आहे या त्यांच्या दाव्यानुरुप जगण्याचा तो सबळ पुरावा असतो.
२४. आणखी कोणत्या कारणामुळे काहीजण बाप्तिस्मा घेत नाहीत?
२४ आणखी एक कारण असे की, आम्हाला शास्त्रवचनांचे पुरेसे स्पष्टीकरण करता येत नाही असे काहीजण म्हणतात आणि ते बाप्तिस्मा घेण्याचे टाळतात. पण कुशी षंढ तर, त्याने फिलिप्पासोबत रथात चर्चा केल्यानंतर लगेच देवाला केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेण्यास तयार झाला. हे खरे की, यानंतर या कुशीने ज्यांच्यापाशी सत्याविषयीची बोलणी केली असतील त्यांच्या सर्व प्रश्नांची त्याला आली उत्तरे देता नसतील. तरीपण ऐकलेल्या गोष्टींमुळे त्याचे अंतःकरण कृतज्ञतेने इतके भारावून गेले होते की, त्याने पुढेच पाऊल उचलण्यात माघार घेतली नाही. “प्रीतीच्या ठायी भीती नसते; इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवनू देते.” (१ योहान ४:१८) ज्ञानाने भरलेले मस्तक नव्हे तर प्रीतीने ओतप्रोत भरलेल्या अंतःकरणामुळे त्या व्यक्तीला देवाला समर्पण करण्याची व बाप्तिस्मा घेण्याची चालना मिळते.—लूक १०:२५-२८.
२५. यहोवा, आपणावर प्रीती करीत आहोत असे म्हणणाऱ्यांच्या बाबतीत कसली अपेक्षा धरुन आहे?
२५ तुमचा अद्याप बाप्तिस्मा झाला नसेल तर स्वतःला विचाराः देवावर प्रीती आहे असे म्हणणाऱ्यांच्या बाबतीत देव कोणती अपेक्षा धरुन आहे? तो सर्वस्वाच्या भक्तीची अपेक्षा धरतो आणि जे त्याची “आत्म्याने व खरेपणाने” भक्ती करु इच्छितात अशांच्या तो शोधात आहे. (योहान ४:२३, २४; निर्गम २०:४, ५; लूक ४:८) कुशी षंढाने अशाप्रकारची भक्ती सादर केली, जेव्हा संधी प्रस्तुत झाली तेव्हा बाप्तिस्मा घेण्यास माघार दर्शविली नाही. तर मग, तुम्हीही यहोवाला समर्पण करण्याचा आत्ताच प्रार्थनापूर्वक विचार करुन हे का विचारु नये की, “बाप्तिस्मा घेण्यास मला काय अडचण आहे?”
उजळणीसाठी प्रश्न
◻ कुशी षंढाचा इतक्या लवकर का बाप्तिस्मा होऊ शकला?
◻ आरंभीच्या ख्रिस्तीजनांत बाप्तिस्मा कोणत्या पद्धतीने होत होता?
◻ ‘पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामात’ बाप्तिस्मा घेणे याचा काय अर्थ होतो?
◻ ख्रिस्ती बाप्तिस्मा कशाला सूचक आहे?
◻ यहोवाला प्रार्थनेमध्ये का समर्पण करावे?
◻ काहीजण कोणत्या कारणामुळे समर्पण करण्यास व बाप्तिस्मा घेण्यास मागे पडतात?