कोडेक्स बझाय एक अप्रतिम हस्तलिखाण
थिओडोर डिबेझ हे ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे एक प्रख्यात फ्रेंच प्रामाण्य प्रॉटेस्टंट सुधारक जॉन केल्विन यांचे जवळचे स्नेही तसेच वारसदार होते. त्यांना बझा असे सर्वसाधारणपणे ओळखले जात असे. त्यांनी १५६२ मध्ये एक असामान्य प्राचीन हस्तलिखित उजेडात आणले. त्यांनी हे लिखाण फ्रान्समधील लयोन्स शहरातील “सेंट” इरेनियुस मठात मिळाल्याचा दावा केला. ते शहर हुगुनॉटस् लोकांनी उद्ध्वस्त केले होते. या हस्तलिखाणाचे मूळ अजूनही ज्ञात नाही, पण ते बहुधा उत्तर आफ्रिका किंवा मिसरातील असावे असा अंदाज केला जातो.
हा कोडेक्स १०×८ इंच इतक्या आकाराचा असून तो इ. स. च्या पाचव्या शतकातील, म्हणजे सिनियाटिक, व्हॅटिकन आणि अलेक्झांड्रियन हस्तलिखाणाच्या काही काळानंतरचा असावा असे मानले जाते. यात ४०६ पाने असून त्यामध्ये केवळ चार शुभवर्तमाने आणि प्रेषितांची कृत्ये यांचे लिखाण व काही ठिकाणी अंतर सोडलेले आढळते. तथापि, कोडेक्स बझाय यात आरंभाला इतर पत्रांचे लिखाण असावे असे वाटते, कारण त्यामध्ये योहानाने लिहिलेल्या तिसऱ्या पत्राचे चर्मपत्र आढळते. मत्तय व योहान ही शुभवर्तमाने लूक व मार्क शुभवर्तमानाआधी दिसतात.
हे हस्तलिखाण द्विभाषी मजकूराचे आरंभीचे उदाहरण होय. यात डाव्या बाजूला ग्रीक तर उजवीकडे लॅटीन भाषा आढळते. ते आधीच्या लव्हाळी लिखाणाची नक्कल असावी असे वाटते व हे तिसऱ्या किंवा चवथ्या शतकाच्या P29, P38, आणि P48 असे ओळखल्या जाणाऱ्या इतर लिखाणाच्या सदृश्य आहे.
कोडेक्स बझायचे लिखाण ठळक व मोठ्या अक्षरात केलेले असून ते पूर्ण ओळीत नाही. त्याच्या ओळी लहान-मोठ्या असून प्रत्येक ओळीच्या शेवटी वाचताना पूर्णविराम आढळतो. लॅटिनचे लिखाण हे ग्रीक लिखाण पद्धतीप्रमाणे करण्यात आले असून ते कित्येक प्रकरणात ग्रीक वाचनास अनुलक्षून केलेले आहे. पण ग्रीक लिखाणाविषयी बघता ते खूपच वेगळे व पुष्कळांनी त्यातील चुका सुधारलेल्या आहेत असे दिसते. यात मूळ शास्त्र्यांकरवीच्याही सुधारणा आहेत.
कोडेक्स बझायचा शासकीय क्रमांक “D” असा आहे. तो इतर सर्व प्रमुख लिखाणांपासून वेगळाच व स्वतंत्र आहे. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्किपचर्समधील तळटीपा सूचित करतात त्यानुसार हा कोडेक्स कधीकधी सिनायटीक (א), व्हॅटिकन (B), आणि अलेक्झांड्रियन (A) या कोडेक्सबरोबर सहमत दर्शवितो तर कधी दर्शवीत नाही. या कोडेक्सचे महत्त्व हे त्यातील विशिष्ट भर किंवा गाळलेल्या भागापेक्षा तो इतर महत्त्वपूर्ण लिखाणांना जी पुष्टी देतो त्यात आहे.—न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स—वीथ रेफरन्स, मध्ये मत्तय २३:१४; २४:३६; २७:४९; मार्क ७:१६; ९:४४, ४६; ११:२६; लूक १५:२१; योहान ५:४ येथील तळटीपा पहा.
असामान्य वाचन व विविधपणा सोडला तर कोडेक्स बझाय, पवित्र शास्त्र आमच्या काळापर्यंत कसे बचावून राहिले ते दाखविणारा आणखी एक सुंदर पुरावा ठरतो.