‘देव तुमचे प्रशिक्षण पूर्ण करील’
महत्वपूर्ण घटनेसाठी तयारी करणाऱ्या धावपटूस कठोर कसरत करावी लागते. त्या महान दिवशी शक्य तेवढा चांगला खेळ दाखवावा यासाठी आपले शरीर बांधेसूद करण्याची तो इच्छा करतो. ख्रिश्चनांनीही कठोर कसरत करायची आहे परंतु वेगळ्या ध्येयाने. प्रेषित पौलाने म्हटलेः “सुभक्ती हे ध्येय ठेवून त्याविषयीची कसरत कर.”—१ तीमथ्य ४:७, न्यू. व.
अशाप्रकारे, ख्रिश्चनाने स्वतःस आध्यात्मिकतेत बांधेसूदपणा आणला पाहिजे. धावपटू त्याचे शरीर सुधारतो त्याप्रमाणे ख्रिश्चन त्याची आध्यात्मिक शक्ती व सहनशक्ती सुधारतो. हे तो देवाचे वचन पवित्र शास्त्राचा अभ्यास, प्रार्थना, नियमितपणे समविश्वासूंच्या सोबत एकत्र येण्याने व त्याच्या विश्वासाचे जाहीर वक्तव्य करून करतो.
धावपटूस बहुदा प्रशिक्षण देणारा कोणी असतोच व ख्रिश्चनासही प्रशिक्षण देणारा कोणी आहे. कोण तो? स्वतः यहोवा देव याशिवाय दुसरा कोणी नाही. ख्रिस्ती प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल यहोवाला वाटणाऱ्या चिंतेकडे पेत्राने निर्देश केला. तो लिहितोः “कृपेचा देव . . . स्वतः तुमचे प्रशिक्षण पूर्ण करील, तो तुम्हास दृढ करील, तो तुम्हास सबळ करील.” (१ पेत्र ५:१०) यहोवा आम्हास कोणते प्रशिक्षण देतो? पुष्कळ प्रकारचे, व आम्ही ख्रिश्चन बांधेसूदपणात राहू इच्छितो तर ते सर्व महत्वपूर्ण आहे.
सरळ शिस्त
पेत्राने स्वतः यहोवापासून प्रशिक्षण प्राप्त केले होते. आम्ही त्याच्या अनुभवातून पुष्कळसे शिकू शकतो. पेत्राला दिलेले प्रशिक्षण काही वेळेस वेदनायुक्त होते. त्याने देवाच्या उद्देशातून जाण्यापासून येशूस निराश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा येशूने उत्तर दिलेः “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टींकडे नव्हे तर मानवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष आहे.” असे म्हणताना पेत्राला कसे वाटले असावे याची कल्पना करा. (मत्तय १६:२३) पुष्कळ वर्षांनंतर मनुष्याच्या भयाने त्याला मूर्खपणाने वागायला लावले त्यावेळेस देखील त्याला कसे वाटले असावे याचा विचार करा. त्याप्रसंगी प्रेषित पौलाने त्याला यहोवाची शिस्त लावलीः “केफा [पेत्र] अंत्युखियास आला तेव्हा तो दोषी असल्यामुळे मी त्याला तोंडावर अडविले.”—गलतीकर २:११-१४.
तरीसुद्धा, या दोन प्रसंगी यहोवा पेत्रास प्रशिक्षण देत होता. तो हे शिकला की, “कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही तर खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतीमत्व हे शांतीकारक फळ देते.” (इब्रीकर १२:११) यहोवाकडील शिक्षण म्हणून ते कडक दोषारोप स्विकारण्याने पेत्राला विशिष्ठ प्रकरणाविषयी योग्य दृष्टीकोन लाभण्यात मदत मिळाली व त्याला नम्रता व लिनता या महत्वपूर्ण ख्रिस्ती गुणात प्रशिक्षित केले गेले.—नीतीसूत्रे ३:३४; १५:३३.
परिस्थिती हाताळणे
यहोवा आम्हास हाताळण्यास कठीण अशी परिस्थिती निर्माण होण्यास परवानगी देऊन आम्हाला तालीम देतो. ही परिस्थिती काही वेळेस ख्रिस्ती मंडळीतही उद्भवते. आम्ही मार्गदर्शनार्थ प्रार्थना करतो, शिकलेली पवित्र शास्त्र तत्वे लागू करतो व ती तत्वे लागू करणे हा नेहमी चांगला मार्ग कसा आहे हे पाहतो तेव्हा ख्रिस्ती यानाते वाढतो.
येशूच्या प्रेषितांमध्ये जेव्हा व्यक्तीगत मतभेद निर्माण झाले तेव्हा पेत्रही त्यात समाविष्ठ होता. आम्ही त्याविषयींचा अहवाल वाचतो तेव्हा, अपूर्णत्व व अनुभवाची कमतरता यामुळे उद्भवलेल्या या मतभेदांचा येशूने आपल्या अनुयायांना आवश्यक ख्रिस्ती गुण प्रीती, लीनपणा व क्षमाशीलता यांची तालीम देण्यासाठी कसा उपयोग केला हे पाहणे चित्तवेधक आहे.—मत्तय १८:१५-१७, २१, २२; लूक २२:२४-२७.
पौलानेही व्यक्तीमत्वातील भांडणाचा अनुभव घेतला. (प्रे. कृत्ये १५:३६-४०; फिलिप्पैकर ४:२) अशाप्रकारच्या समस्या ख्रिश्चनाला तालीम प्राप्त करण्याची संधी कशी देते हे त्याने याप्रकारे बोलून स्पष्ट केलेः “एकमेकांचे सहन करा व कोणाविरूद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. यहोवाने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्या सर्वांवर परिधान करा.”—कलस्सैकर ३:१३, १४.
पहिल्या शतकात ख्रिश्चनांमध्ये एक अति अनिष्टकारक धोका सामोरा आला. पेत्राने याबाबत कडक इशारा दिलाः “तर आपल्या लोकातही खोटे संदेष्टे होते तसे तुम्हातही खोटे शिक्षक होतील. ते विध्वंसक, पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील; ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील व आपणावर आकस्मिक नाश ओढवून घेतील. त्यांच्या कामातुर आचरणाचे पुष्कळ लोक अनुकरण करतील, त्यांच्यामुळे सत्यमार्गाची निंदा होईल.” (२ पेत्र २:१, २) या अनुभवाचा परिणाम पश्चातापी नाहीत अशा “खोट्या शिक्षकांच्या” नाशात होईल. (२ पेत्र २:३) परंतु, जे विश्वासू राहतील त्यांचे काय?
हा अनुभव त्यांना ‘त्यांच्यामध्ये स्पष्ट विचारसरणी उभारण्यास जागृत’तेची तालीम देणार होता. (२ पेत्र ३:१) खोट्या शिक्षणाच्या आकस्मिकतेविरूद्ध दक्ष राहण्याची त्यांची जागृतता त्यांना त्यांच्या विश्वासाच्या कारणमीमांसेची उजळणी करण्यास हाक देणार होती. “खोट्या शिक्षका”चे दुष्परिणाम ते पाहतील तसे त्यांचा ख्रिस्ती विश्वासावरील आत्मविश्वास अधिकच दृढ होणार होता.—२ पेत्र ३:३-७.
उदाहरणार्थ, एक मंडळीत वृद्ध प्रेषित योहानाला दियत्रफेस नावाच्या महत्वाकांक्षी माणसाने विरोध केला. त्याला योहानाच्या अधिकाराबद्दल आदर असा मुळी वाटतच नव्हता. शिवाय, त्याने, योहानाने पाठविलेल्या निरोप्यांना केवळ धिक्कारले नाही तर ज्यांनी अशांचे स्वागत केले त्यांना बहिष्कृतही करण्याचा प्रयत्न केला. दियत्रफेस ज्या मंडळीत होता त्यातील सर्व प्रांजळ ख्रिश्चनांना यामुळे नक्कीच त्रासदायक वाटले असावे. परंतु यामुळे त्यांना ते ‘वाईटाचे अनुयायी नव्हते’ हे दाखविण्याची संधि दिली गेली व अशाप्रकारे यहोवा देव व प्रेषितीय अधिकार यांच्याबद्दलची निष्ठा यांची तालीम अगोदरच प्राप्त करू शकले.—३ योहान ९-१२.
ख्रिश्चनेत्तरांसोबत व्यवहार राखताना
येशूने म्हटले की त्याचे अनुयायी या जगाचा भाग नव्हते. (योहान १७:१६) ख्रिश्चनाची पहिली निष्ठा यहोवा देव व त्याचे राज्य यासाठी आहे. तो देवाचे नैतिक दर्जे राखण्याचा प्रयत्न करतो यास्तव त्याची प्रमुख आस्था व चिंता जगातील लोकांपेक्षा भिन्न असते. तथापि, ख्रिश्चनास या जगात राहणे भाग आहे व यामुळे तणाव येणार ही अटळ गोष्ट आहे.
ख्रिश्चनांना या जगाच्या मागण्यांशी तोल साधून आपल्या विवेकाच्या संवेदनाशीलतेने केवढे कठीण निर्णय घ्यावे लागतात हे पेत्राला त्याच्या बऱ्याच वर्षांच्या उपाध्यपणाच्या काळादरम्यान अनेकदा पहावयास मिळाले असेल. यामुळे पेत्राच्या पहिल्याच पत्रात त्याने हे कसे साध्य करावे की ज्यामुळे ख्रिश्चन “शुद्ध विवेकभाव राखू” शकेल यावर चांगली व व्यवहारी सूचना दिली.—१ पेत्र २:१३-२०; ३:१-६, १६.
अर्थात, ख्रिस्ती या नात्याने आम्ही अशा समयाकडे नजर रोखून आहोत जेव्हा आम्हास या व्यवस्थीकरणाच्या मागण्यावर विचार करण्याची जरूरी नसणार. परंतु मध्यंतरात आम्हास सहनशक्तीची तालीम दिली जात आहे व मोहपाशाच्या व अनितीमान प्रभावापुढे आमची निष्ठा दाखविण्यास परवानगी दिली जात आहे. आम्हास पवित्र शास्त्र तत्वे भिन्न परिस्थितीत लागू करण्याचा अनुभव मिळतो व यहोवा आम्हाकडून कोणत्या मार्गी वागण्याचे अपेक्षितो तसे धैर्याने वागतो तेव्हा आम्हास व्यवहारी सूज्ञान व धैर्यशाली तालीमही दिली जाते. या व्यवस्थीकरणात राहिल्यामुळे व पुष्कळ कठीण समस्या यशस्वीपणे हाताळण्यामुळे आम्हाला किती अधिक तालीम मिळालेली असणार याचा जरा विचार करा.
छळात
पेत्र देवाकडून मिळणाऱ्या प्रशिक्षणाबाबत बोलला तेव्हा तो खासकरुन छळास संदर्भित करीत होता. त्याने दाखविले की, ख्रिश्चनाने छळाची अपेक्षा धरावीः “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधीत फिरतो.”—१ पेत्र ५:८; तसेच २ तीमथ्य ३:१२ पहा.
पेत्र हे अधिकारयुक्तपणे सांगू शकत होता कारण त्याने वैयक्तिकपणे छळाचा अनुभव घेतला होता. ख्रिस्ती मंडळीच्या सुरुवातीच्या दिवसात, त्याला व इतर प्रेषितांना छडीमार करून प्रचार कार्य थांबविण्याचा हुकूम केला होता. याविषयी त्यांची प्रतिक्रिया कोणती दिसली? ते “त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले.”—प्रे. कृत्ये ५:४१.
याकारणास्तव, पेत्र अनुभवातून व त्याचप्रमाणे प्रेरणेद्वारे असे म्हणालाः “ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहा त्या अर्थी आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्लास व आनंद कराल. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहा; कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे.”—१ पेत्र ४:१३, १४.
होय, छळ एक प्रकारचे प्रशिक्षण म्हणून कार्य करू शकतो. त्यामध्ये ख्रिश्चन देवाच्या आत्म्यावर अधिक विसंबून राहण्यास शिकतो. त्याचा विश्वास “पारखलेला गुण” म्हणून वाढतो. (१ पेत्र १:७) यहोवाच्या सामर्थ्यावर आधारित धैर्यावर त्याला तालीम दिली जाते. (२ तीमथ्य १:७) तो धीर व सहनशीलता वाढवितो आणि येशूप्रमाणे ‘दुःख सोसून आज्ञाधारकपणा शिकतो.’—इब्रीकर ५:८; १ पेत्र २:२३, २४.
यहोवा आमचे प्रशिक्षण पूर्ण करतो
अर्थात, ख्रिश्चनास सामोऱ्या येणाऱ्या कठीण समस्या आणि सहन करावा लागणारा छळ या गोष्टी देवापासून येत नाहीत. याकोबाने सूचना केलीः “कोणाची परिक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडीत नाही.” (याकोब १:१३) समस्या अनेक कारणास्तव येतात, यात लोक चुका करतात किंवा स्वेच्छेने वाईट कर्मे आचरतात हे समाविष्ठ असते. तरीपण अशा गोष्टी घडतात तेव्हा यहोवा यांचा त्याच्या सेवकांना मोलवान ख्रिस्ती गुणांची तालीम देण्यासाठी उपयोग करुन घेतो.
इयोब, यिर्मया, पेत्र, पौल व पवित्र शास्त्र काळी देवाच्या सर्व सेवकांना या मार्गी तालीम देण्यात आली. आम्ही सुद्धा विविध कठीण परिस्थितीस तोंड देतो तेव्हा त्याकडे यहोवाने तालीम देण्याचा स्त्रोत म्हणून परवानगी दिली या दृष्टीने पहावे. आम्ही यांचा यहोवाच्या शक्तीकरवी सामना केल्यामुळे आम्हाला आज्ञाधारकता, सूज्ञता, लिनता, धैर्य, प्रीती, सहनशीलता आणि इतर पुष्कळ गुणांची तालीम दिली जाते.—याकोब १:२-४ पडताळा.
आमचे हे प्रशिक्षण एके दिवशी संपुष्टात येईल हे जाणल्यामुळे आम्हाला आणखी प्रोत्साहन मिळते. या कारणास्तव पेत्राने सोबतीच्या ख्रिश्चनांना असे म्हणून सांत्वन दिलेः “आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हास पूर्ण, दृढ व सबळ करील.” (१ पेत्र ५:१०) हे शब्द, पृथ्वीवरील नंदनवनातील सार्वकालिक जीवनाकडे दृष्टी रोखून असलेल्या “मोठा लोकसमुदाय” वर्गाला सुद्धा तितक्याच प्रखरतेने लागू होतात.
हा विचार स्वतःच आम्हास शांतपणे या प्रशिक्षण अनुभवात कोणतीही हातमिळवणी न करण्याच्या निश्चयाने साहाय्यक ठरला पाहिजे. अशाप्रकारे आम्हास पौलाच्या त्या विश्वसनीय प्रोत्साहनदायक शब्दांचा अनुभव येईलः “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.”—गलतीकर ६:९.