वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 ६/१ पृ. ८-९
  • अश्रु परमानंदात पालटतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अश्रु परमानंदात पालटतात
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • अश्रुंचे परमानंदात रुपांतर
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • येशू मेलेल्यांना उठवतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • येशू अनेक चमत्कार करतो
    बायबलमधून शिकू या!
  • तिने त्याच्या वस्त्राला स्पर्श केला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 ६/१ पृ. ८-९

येशूचे जीवन व उपाध्यपण

अश्रु परमानंदात पालटतात

रक्‍तस्रावी स्त्री बरी झाल्याचे याईर बघतो तेव्हा येशूच्या अलौकिक शक्‍तीमध्ये त्याचा भरवसा आणखीनच वाढतो. त्या दिवशी याईरने येशूला विनवणी करून म्हटले होते की त्याची १२ वर्षे वयाची मुलगी मरणाच्या लागास आली आहे, तिला त्याने येऊन बरे करावे. येशू आपल्या सोबत्यांसह कफर्णहूमाच्या जवळपास असलेल्या याईरच्या घरी येत असता मध्यंतरात ही स्त्री येशूच्या झग्याला शिवते व बरी होते.

आता याईरला ज्याची मोठी भीती वाटते तेच घडते. येशू अध्याप त्या स्त्रीसोबत बोलतच आहे तेव्हाच काही लोक येतात व याईरला गुपचूप सांगतात की, “तुमची कन्या मरण पावली आहे! गुरुजीला आणखी श्रम कशाला देता?”

ही बातमी किती धक्कादायक आहे! जरा विचार कार. याईर हा माणूस, ज्याला समाजामध्ये मोठा आदर आहे, त्याला आपल्या मुलीच्या मरणाची बातमी कळते तेव्हा तो किती हतबल होतो. परंतु, येशू त्यांच्यामधील संभाषण दुरूनच ऐकतो. तो याईरकडे वळतो व त्याला धीर देत म्हणतो: “भिऊ नको, विश्‍वास धर.”

येशू त्या दुःखी माणसाबरोबर त्याच्या घराकडे निघतो. ते तेथे पोहोंचतात तेव्हा त्यांना रडणाऱ्‍यांचा व आकांत करणाऱ्‍यांचा गलबला ऐकू येतो. लोकांचा मोठा समुदाय जमलेला आहे व ते स्वतःला दुःखाने मारून रडत आहेत. येशू आत येतो तेव्हा तो विचारतो: “तुम्ही कशाला गलबला करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे.”

हे ऐकून लोक येशूचा उपहास करतात, कारण त्यांना माहीत आहे की, मुलगी खरोखर मेली आहे. पण येशू म्हणतो की, ती फक्‍त झोपली आहे, ही गोष्ट दाखवून देण्यासाठी की, लोक जसे गाढ झोपलेल्या माणसाला जागे करतात तसेच तो, देवाने त्याला दिलेल्या शक्‍तीद्वारे लोकांचे मारणातून पुनरुत्थान करू शकतो.

येशू आता सर्वांना बाहेर घालवतो. तो आपल्यासोबत पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबडील यांना घेतो व मुलीला जेथे ठेवले आहे तेथे येतो. येशू मुलीचा हात धरून म्हणतो: “तलीथा कुम्‌.” याचा अर्थ, मुली, मी तुला सांगतो, ‘उठ.’” ती मुलगी लगेच उठते व चालू लागते! हे दृश्‍य बघून तिच्या पालकांना मोठा आनंद होतो, ते खूपच विस्मित होतात.

मुलीला काही खावयास द्या असे सांगितल्यावर येशू याईर व त्याच्या बायकोला निक्षून सांगतो की, जे काही घडले ते त्यांनी कोणासही सांगू नये. पण इतके सांगून सुद्धा या गोष्टीची कीर्ती अवघ्या देशात पसरते. हे येशूने केलेले दुसरे पुनरुत्थान होय. मत्तय ९:१८-२६; मार्क ५:३५-४३; लूक ८:४१-५६.

◆ याईरला कोणती बातमी कळते, आणि येशू त्याला कशाप्रकारे धीर देतो?

◆ ते याईरला घरी पोहोचल्यावर तेथे कशी परिस्थिती असते?

◆ मुलगी मेली नाही, फक्‍त झोपली आहे असे येशू का म्हणतो?

◆ कोण पाच जण येशूसोबत राहून पुनरुत्थान घडल्याचे पाहतात?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा