वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ११/१ पृ. २७-३१
  • तुम्ही कोणा जीवनसाथीच्या शोधात आहात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही कोणा जीवनसाथीच्या शोधात आहात का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘केवळ प्रभूमध्ये विवाह करा’
  • इतरत्र तरी का पाहावे?
  • आमचे कपटी हृदय
  • ‘तुम्ही जे पेराल त्याचीच कापणी कराल’
  • यहोवावर थांबून असा
  • विवाह—प्रेमळ देवाकडून मिळालेली देणगी
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • विवाह जोडीदार निवडण्यासंबंधी देवाचा सल्ला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • तुमच्या विवाहाकरता उत्तम पाया घालणे
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • यशस्वी विवाहाकरता तयारी करणे
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ११/१ पृ. २७-३१

तुम्ही कोणा जीवनसाथीच्या शोधात आहात का?

“उत्तम विवाहापेक्षा इतर कोणताही सख्यसंबंध वा सोबत अधिक प्रिय, मित्रत्वाची आणि मोहक नाही” असे बोलले जाते. याकरताच लाखो सड्या लोकांना जीवनात साथीदार असण्याची इच्छा वाटते यात काही आश्‍चर्य नाही.

काहीजण योग्य निवडीकरता संगणक यंत्राकडे तर काही ग्रहमानाकडे पाहतात. परंतु, आमच्या निर्मात्याकडे, विवाहाच्या उत्पादकाकडे पाहणे किती अधिक चांगले असेल! (उत्पत्ती २:१८–२४) देवाची प्रेमळ आस्था व सूज्ञान त्याचा उपदेश व तत्वे यावर विश्‍वास ठेवण्यास बळकट आधार पुरविते. हीच तत्वे विवाह सोबत्यात कोणत्या गोष्टींचे परीक्षण करावे याकरता मदत देतात. (स्तोत्रसंहिता १९:७) त्याचे वचन आम्हास पुढीलप्रमाणे आज्ञा करते:

‘केवळ प्रभूमध्ये विवाह करा’

पण का? हे यासाठी की यहोवा देव आमच्या सार्वकालिक कल्याणाबाबत आस्था बाळगून आहे. प्रेषित पौलाने “केवळ प्रभूमध्ये विवाह कर”ण्याचा दिलेला सल्ला यहोवाच्या आरंभीच्या सेवकांच्या सरावाशी एकमत आहे जे त्यांच्या प्रमाणेच खरी भक्‍ति आचरणारे असत, असा विवाह सोबती ते निवडीत. (१ करिंथकर ७:३९; अनुवाद ७:३, ४) अशा प्रकारच्या कृतीद्वारेचे फायदे अगणित आहेत हे आम्ही लक्षात ठेवले पाहिजे.

उदाहरणार्थ, इश्‍वरीय विवाह सोबती आमच्या प्रेमळ स्वर्गीय पित्यास विश्‍वासूपणा राखण्यात अनुदान देतो. (पडताळा उपदेशक ४:९–१२.) ख्रिस्ती सोबती एकमेकांना उत्तेजन देऊ शकतात व विविध समस्यांना उभयता यशस्वी तोंड देऊ शकतात. विवाह बंधन कमजोर करण्याच्या दबावास ते एकतेत विरोध करू शकतात. दोघेही यहोवाकडे पाहत असल्यामुळे व त्याच्या अद्‌र्भित सल्ल्याचे अवलंबन करीत असल्यामुळे ते मोठ्या सहजतेने तडकाफडकीवर मात करू शकतात व स्पर्धक होण्याऐवजी एकमताने कार्य करू शकतात. यहोवाची सेवा करण्याच्या व त्याच्या इच्छेप्रमाणे जीवनास वळण देण्याच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे ते यशस्वी विवाहास हातभार लावतात की ज्यामुळे निर्माणकर्त्याचा सन्मानच होतो.

काही वर्षापूर्वी ग्लोरिया नावाच्या स्त्रीचा एका तरूण माणसाशी अगदी जवळचा सहवास होता जो ख्रिस्ती सभांना उपस्थित राही व टेहळणी बुरुज अभ्यासात उत्तरे देई. या बाप्तिस्मा न पावलेल्या व्यक्‍तिसोबत जवळचा सहवास चालू ठेवू नये असा सल्ला तिला देण्यात आला होता. परंतु ती त्याच्या ‘इतक्या प्रेमात’ पडली होती की तो सल्ला तिने लागू केला नाही. तरीसुद्धा हा सल्ला उत्तम आहे हे तिला ठाऊक होते. त्यामुळे तिने याबाबतीत सहाय्यासाठी यहोवाकडे प्रामणिकपणे धाव घेतली व त्याला विनवणी केली. त्यानंतर थोडक्याच अवधीत हे दृष्टोत्पत्तीस आले की तो अनैतिक माणूस होता. तेव्हा ग्लोरियाने ताबडतोब त्याच्या बरोबरची मैत्री तोडून टाकली. तिने नंतर एका उत्तम ख्रिस्ती तरूणाशी विवाह संपादिला. आज तो एक नियुक्‍त वडील आहे व त्याची दोन्ही मुले सत्यात सक्रीय आहेत. जेव्हा ती गत आयुष्याकडे पाहते तेव्हा म्हणते: “मी यहोवाचे आभार मानते की मी अनेक समस्या टाळू शकले. त्याच्या मार्गदर्शनामुळे मला अति उत्तम सल्ला मिळाला ज्यामुळे प्रेमळ पतीसोबत आनंदी जीवन जगण्यास शक्य झाले.”

इतरत्र तरी का पाहावे?

विवाह सोबत्यासाठी, यहोवास समर्पित असणाऱ्‍या व्यक्‍तिने इतरत्र का बरे पहावे? आमच्यासाठी अति उत्तम काय आहे याची जाणीव व इच्छा यहोवाठायी आहे याची खात्री त्या ख्रिस्ती व्यक्‍तीस झालेली नसते का? (नीतीसूत्रे ३:१–७; स्तोत्रसंहिता १४५:१६) तुमच्या बाबत काय? यहोवा हा “सत्याचा देव” आहे यावर तुम्ही विश्‍वास ठेवता का? (स्तोत्रसंहिता ३१:५) तसे असेल तर तो यथायोग्य व आमच्या फायद्यासाठी असणारा विश्‍वसनीय सल्ला सर्वदा पुरवितो हे तुम्ही पक्के जाणाल. (यशया ४८:१७, १८) खरोखर, आमचा स्वर्गीय पिता सार्वकालिक कल्याणाच्या दृष्टीकोणातूनच सल्ला देत असतो. परंतु आम्ही आमच्या लघु दृष्टीमुळे तत्कालीक भविष्याकरता आमच्या योजना कदाचित सीमित करू. तरी जीवन साथीच्या शोधात आहोत तर आम्ही चिरकालिक भविष्याकडे पाहू नये का?—स्तोत्रसंहिता ३७:११, २९.

देवाचे राज्य अगदी हाताशी आहे व ते पृथ्वीला शुद्ध करण्यास लवकरच हालचाल करील यावर तुमचा खरोखर विश्‍वास आहे का? पूर्वभाकित नंदनवनात तुम्ही स्वतःला पाहता का? किंवा या सद्य व्यवस्थिकरणात पूर्ण आनंद लुटण्याची तुमची इच्छा आहे? उत्तम जीवन पद्धत पुरविण्याची क्षमता असणाऱ्‍या जीवनसाथीस तुम्ही शोधता का? किंवा जो जीवनात खऱ्‍या भक्‍तीस प्रथम स्थानी ठेवतो अशाला शोधता? (मत्तय ६:३३) खरोखर, तुमच्या जीवनात काय प्रमुख स्थानी आहे? आमचे विचार व हेतु यांचे परीक्षण करणे आम्हास सूज्ञपणाचे आहे. तर मग आवश्‍यकता असेल तर यहोवास असंतुष्ट करणारा जीवनक्रम टाळण्यात जरूर ती सुधारणा करू शकतो.—पडताळा स्तोत्रसंहिता ७८:४०, ४१.

आमचे कपटी हृदय

यिर्मया १७:९ ही सूचना पुरविते की, “सर्व गोष्टीपेक्षा हृदय फार कपटी आहे.” याकरता त्यावर नियंत्रण आवश्‍यक आहे. ही गोष्ट देखील लक्षात ठेवणे चांगले आहे की जे कोणी प्रेरित शास्त्राचा सल्ला व मंडळीतील वडीलांनी दिलेली प्रेमळ सूचना याकडे दुर्लक्ष करतात असे बहुदा अश्रु गाळतात व त्यांच्या हृदयास वेदना होतात.

परंतु कोणी विचारील: “तुम्ही ते कसे म्हणू शकता? कारण मला एक बंधु ठाऊक आहे की ज्याने सह उपासक असणाऱ्‍याशी विवाह केला नाही. पण आता ते दोघेही यहोवाची सेवा करतात.” होय, काही घटनेत ही बाब अगदी यानुरूप घडली, आणि आम्हास आनंद वाटतो की आता दोघे सोबती “सत्यात चालतात.” (३ योहान ४) तरी ज्या बंधुने बाप्तिस्मा न पावलेल्या सोबत्याशी विवाह केला तो आज्ञाभंजक होता. त्यामुळे तोच स्वैराचाराचा आत्मा पुन्हा एकदा त्याचे स्वरूप धारण करणार तर नाही ना? त्याला कदाचित असा विचार करण्यास भुलविले जाईल का की, देवापेक्षा तो अधिक चांगले जाणतो व त्यामुळेच पवित्र शास्त्रीय सत्यास अनादर प्रदर्शित करून आणखी काही परिस्थितीत स्वतःच्या ज्ञानावर विसंबून राहील? आम्हास हे उत्तेजन दिले जाते की, “पूर्ण हृदयाने यहोवावर विसंबून रहा.” (नीतीसूत्रे ३:५) त्याचा अर्थ हा होतो की सर्व बाबतीत इश्‍वरी इच्छेस मान्यता देऊन तिच्या अधीन होणे. यास्तव अगदी छोट्या बाबतीत सुद्धा आज्ञाधारकतेच्या परीक्षेस तोंड देणारे आज्ञाधारक हृदय बनविणे आम्हास आवश्‍यक आहे. (लूक १६:१०) देवाच्या आज्ञेचा भंग करतो त्यावेळी आम्ही कोणता नमुना विकसीत करीत असतो? ज्या बंधुने ‘प्रभुमध्ये विवाह केला’ नाही त्याला कदाचित आपल्या मर्जीनुरूप वागण्याची चूक लक्षात आली असेल व त्याने यहोवास क्षमेची याचनाही केली असेल. परंतु तुमचा विवाह अशा प्रकारे अनुसरला जावा असे तुम्हास वाटते का?

“परंतु माझ्या मित्राने तर पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु केला आहे व तो सभांनासुद्धा उपस्थित राहतो” असे आणखी कोणी म्हणेल. होय, पण तो अभ्यास का करीत आहे? विवाह सोबत्यास आपलेसे करण्यास की यहोवा देवाविषयी शिकून त्याची सेवा करण्यास? सबंध भेटीगाठीत अभ्यास करण्याविषयीचा त्याचा उद्देश बहुधा कळून येणार नाही. पण विवाहाच्या दिवसानंतर तुम्हाला काय आढळेल? अर्थात, तुमचा मित्र वा मैत्रीण बाप्तिम्सा घेईपर्यंत तुम्ही कदाचित थांबून रहाल व त्यानंतर लवकरच विवाहाची तारीख नक्की कराल. हे बहुधा, तुम्ही “प्रभूमध्ये विवाह करीत आहोत” हे दाखविण्यासाठी कराल. पण तुम्ही त्या सल्ल्याच्या आत्म्याच्या एकमतात हालचाल करीत असता का?

सेवेच्या एखाद्या खास संधीसाठी कोणा बंधुची शिफारस केव्हा केली जाते ते तुम्ही अवलोकिले आहे का? त्यासाठी बाप्तिस्मा झालेला असणे एवढेच पुरेसे आहे का? नाही. त्या बंधुच्या ‘योग्यतेची परिक्षा प्रथम घेतली जाते.’ (१ तिमथ्यी ३:१०) ह्‍यावरून आम्ही काही धडा शिकू शकतो का? होय. थांबा, पहा व ऐका. विवाहाच्या गांभिर्याविषयी थांबून विचार करा. त्या व्यक्‍तिकडे उन्मादाच्या ढगाळ दृष्टीकोणातून नव्हे तर उद्दिष्टपूर्वक पाहा. शिवाय ऐका सुद्धा. तो किंवा ती अंतःकरणापासून प्रेमळ शब्दाने देवाची स्तुती वदवितो का? त्याने उचित काळापर्यंत आपल्या ख्रिस्ती वाढीचा पुरावा सादर केला आहे का? त्याचा विश्‍वासूपणा व आध्यात्मिक गुणवत्ता प्रकट झाल्यार तो किंवा ती संभवनीय जीवनसाथी या विषयी लवकरात लवकर विचार करण्यास सुरुवात केली जाऊ शकते. एका विनोदी कवीचे अवतरण असे आहे:

“कुमारिके! माझी ही कहाणी

त्यात आहे बोधवाणी—

न केवळ शोधिसी साजेसा सखा सोबती

परि साजेशी विवाह वेळ असावी मति.”

जेव्हा आमचे हृदय चांगला सल्ला व उद्दीष्टपूर्ण विचार या गोष्टी दूर सारण्यास प्रवृत्त होते तेव्हा काय होऊ शकते? त्याचे परिणाम नाशकारक होऊ शकतात. लक्षात ठेवा की पवित्र शास्त्र आम्हास सल्ला देते की:

‘तुम्ही जे पेराल त्याचीच कापणी कराल’

जॅक्लिनला काय झाले याचा विचार करा. ख्रिस्ती मंडळीच्या बाहेर असलेल्या एका तरूणाबरोबर ती जी मैत्री संपादित होती त्याविषयी वडीलांनी तिला सल्ला दिला. परंतु तिला वाटले की हे बंधू कडकपणाची अतिशयोक्‍ति करीत होते व म्हणून पवित्र शास्त्र आधारीत शिफारसींकडे तिने आपले कान बंद केले. स्वतःच्या मनोवृत्तीवर तिने काही कालानंतर प्रतिक्षेप टाकला तेव्हा तिने कबूल केले की, “एखाद्याला जे हवे आहे तेच तो पाहतो, परंतु यहोवा काय पाहतो व बोलतो ते नाही.” त्या तरूणाने पवित्र शास्त्र अभ्यास करण्यास सुरुवात केली व शेवटी बाप्तिस्मा घेतला. तीन महिन्यांच्या आत ते विवाहबद्ध झाले.

समस्यांनी लवकरच आपले डोके वर काढले, प्रत्यक्षात मधुचंद्राच्या काळात त्यांना अंकुर फुटला. नको असणारे गुण जे जॅक्लिनला दिसले नाहीत किंवा सोईस्कररित्या तिने त्याकडे कानाडोळा केला होता, ते आता स्पष्ट होऊ लागले होते. तिने सर्वसाधारण बघतात त्याप्रमाणेच आनंदी व ऐक्यतेच्या विवाहाचे स्वप्न पाहिले होते. परंतु, दुःखद गोष्ट ही होती की याच्या अगदी उलट घडले. तिच्या पतीला बहिष्कृत केले गेले व त्याने तिला व त्यांच्या दोन लहान मुलांना सोडून दिले. आता तिला या बिघडत चाललेल्या व्यवस्थेच्या आर्थिक दबावासच केवळ नाही तर त्या दोन लहान मुलांची शारीरिक व भावनात्मक गरजांची काळजी घेण्याच्या आव्हानासही तोंड द्यावे लागते आहे. ह्‍या कडव्या अनुभवावरून जॅक्लिन काय शिकली? ती म्हणते: “आज्ञाधारकपणा हा जरी एखादा सल्ला फारच कठोर वाटतो किंवा तो तुमच्यासाठी चांगला नाही असे जरी दिसत असले तरी तो यहोवाकडून येत आहेत असा विचार करून त्याचे पूर्ण पालन करा.”—गलतीकर ६:७; स्तोत्रसंहिता ८६:११.

दुसरा एक अनुभव लक्षात घ्या. मारीझा हिला तिचा भावी पती कामावर भेटला. त्याने तिला अशा जगीक गोष्टी दाखविल्या ज्याची तिला ओळख नव्हती व त्या तिला इतक्या वाईट अशा दिसल्या नाहीत. तो चांगला सुशिक्षित होता. चांगल्या चालीरिती त्याच्याठायी होत्या व अनेक विषयावर विद्वतेने बोलत असे. जरी तिला अनेक शास्त्रवचनीय सूचना दिल्या गेल्या पण त्या तिच्यात शिरल्या नाहीत. ती त्याच्या फारच प्रेमात पडली होती.

लवकरच मारीझाला सभांचा कंटाळा येऊ लागला. तिचे मनोरंजन करणाऱ्‍या सोबत्याच्या सहवासात सायंकाळ उत्तेजित करणारी जी चमक होती ती सभेत वाटत नव्हती. त्यांच्या विवाहापूर्वी त्याने अभिवचन दिले होते की तिच्या ख्रिस्ती सभांच्या बाबतीत तो व्यत्यय आणणार नाही, आणि ते तसेच होते. परंतु हळूहळू इतर बाबतीत ती इतकी व्यस्त झाली की तिच्या आध्यात्मिक हालचाली खालच्या पातळीवर, दुय्यम स्थानी आल्या व ती अक्रियाक बनली.

त्या मनोरंजक संभाषणाविषयी काय? हळू हळू तेही थांबले. अंतास तिच्या पतीने ४ ते ९ वर्षाच्या चार मुलांसहित सोडून घटस्फोट घेतला. या झटक्याने मारीझा सुन्‍न झाली. केवळ तीन वर्षानंतरच तिला शांत वाटले की जेणेकरून तिच्या जीवनात काय घडले व तिच्या जीवनाचे काय करावे याचे विश्‍लेषण ती करू शकली. ती स्वतःला सांगत राहिली की, “जीवन जगायचे तर दुःख भोगायचे.” परंतु त्यामुळे तिचे समाधान झाले नाही. कारण अद्याप तिला त्या वर्षाची आठवण येत असे जेव्हा ती आनंदी होती. क्षेत्रकार्यात बाहेर असताना तिला चाटून जाणारी थंड हवेची झुळुक, याचा ती आनंद लुटत होती. इतरांसोबत राज्याच्या सुवार्तेचा सहभाग देत असे.

मारीझाने उद्वेगाने म्हटले: “अहा! मी ऐकले असते तर मला किती दुःख व किती पीडा टाळता आल्या असत्या.” तिच्या मुलांच्या शालेय सोबत्यामुळे ती पुन्हा एकदा यहोवाच्या साक्षीदारांच्या संपर्कात आली. सत्याविषयीची तिची आस्था व यहोवाबद्दलचे तिचे प्रेम परत उज्वलित झाले. आता ती व तिची मुले सेवेमध्ये क्रियाशील आहेत. आता मारीझा पूर्ण हृदयाने शिफारस करते की, “यहोवा जे मार्गदर्शन देत आहे त्यास अधीन होण्यास शिका व ज्यास तुम्ही कमी लेखता अशा व्यक्‍तिचा, यहोवा त्याची इच्छा जाहीर करण्यास उपयोग करतो हे जाणा.” येशू ख्रिस्ताने म्हटले हाते: “तुम्ही कसे ऐकता याकडे लक्ष द्या.” (लूक ८:१८) होय, थांबा, पहा व ऐका.

पुढील सभेच्या वेळी तुम्ही राज्य सभागृहात जाल तेव्हा सभोवार नजर टाका. तुम्ही निःसंशये हे पाहाल की अनेक आनंदी ख्रिस्ती विवाहीत दांपत्ये त्यांचा वेळ व अनुभव एकमेकात सहभागी करण्यात आनंदात असल्याचे दिसून येईल. पण दुसऱ्‍या बाजूस हे पाहाल की काहीजण अगदी एकटे आहेत, कारण त्यांचा वैवाहिक सोबती खऱ्‍या विश्‍वासधारकातील नाही. अहा, आपली पत्नी किंवा आपला पती आपल्यासोबत असता तर ते किती बरे होते असे त्यांना वाटू लागते. बहुधा सभा संपताक्षणीच उभारणीकारक संभाषण व विश्‍वासू बंधुजनांचा सहवास टाळून त्वरेने घरी जावे लागत असेल. ‘प्रभूमध्ये विवाह करा’ या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही सुद्धा ह्‍या अनावश्‍यक अशा परिस्थितीत गुरफटण्याचा धोका स्वतःवर पत्करण्याची इच्छा करता का? त्यापेक्षा यहोवाच्या सूचनांचे पालन करून अशी दुःखद परिस्थिती टाळण्यात किती सूज्ञता आहे!—स्तोत्रसंहिता ११९:९; नीतीसूत्रे २८:२६.

यहोवावर थांबून असा

‘परंतु,’ तुम्ही म्हणाल, ‘मला मंडळीत तर कोणीही दिसत नाही. माझ्या वयाचे फारच कमी लोक आहेत.’ होय, ते खरे असेल. परंतु तुम्ही आनंदी असावे अशी यहोवाची इच्छा आहे ही तुमची खात्री झाली आहे का? “तो तुमची काळजी बाळगतो.” (१ पेत्र ५:६, ७) तुम्हाला ते नीतीसूत्र आठवते ना, जे म्हणते: “सूज्ञ पत्नी यहोवाचे दान आहे”? (नीतीसूत्रे १९:१४) तर मग विवाहाचा विषय प्रार्थनेद्वारा विचारात का घेऊ नये?—फिलिप्पैकर ४:६, ७.

हन्‍ना व तिची मूल व्हावे अशी इच्छा तुमच्या आठवणीत आहे का? तिने काय केले? यहोवास विनवणी करण्यास तिने तिचे हृदय ओतून दिले व पूर्णतः त्यावर विश्‍वास ठेवला. त्यानंतर तिने ते प्रकरण यहोवाच्या हाती सोपविले. तिला योग्य वेळी तिच्या प्रार्थनेचे आश्‍चर्यकारक उत्तर मिळाले—एका मुलाचा जन्म.—१ शमुवेल १:९–११, १८–२०; स्तोत्रसंहिता ६२:८.

तुमच्या मंडळीत तुमच्या वयाची कमी माणसे असतील परंतु विभागीय संमेलने व प्रांतिय अधिवेशन याबद्दल काय? अशा प्रकारच्या संमेलनास आध्यात्मिक कारणांसाठी आपण उपस्थित राहतो. परंतु अशावेळी जे स्वयं स्फूर्तीने सेवा सादर करतात अशांना इतरांची सेवा करण्यात व जे पूर्ण जिवाने यहोवाची सेवा करतात अशा बंधु–भगिनीची भेट घेण्यास समाधान मिळते, आणि अशाच प्रसंगी भविष्यातील जीवनसाथी भेटण्याची काही शक्यता असते.

परंतु, जरी तुम्हाला सोयीस्कर असा ख्रिस्ती सोबती सापडला नाही तरीही सडी व्यक्‍ति या नात्याने शुद्ध जीवनाचा पाठलाग करण्यात यहोवाच्या मदतीवर प्रार्थनापूर्वकपणे विसंबून रहा. जोवर अविवाहीत आहात तोवर चांगला पती व पिता किंवा चांगली पत्नी व माता बनू शकाल असे गुण व क्षमता स्वतःमध्ये उत्पादित करा. (गलतीकर ५:२२, २३) पायनियर या नाते पूर्ण वेळेची सेवा स्विकारून अनेकांना असे करण्यास सहाय्य मिळाले. तुमचा वेळ व शक्‍ती खर्च करण्यात हा केवढा उत्तम मार्ग आहे!

तुम्ही जीवनसाथी शोधण्याच्या विचारात आहात तर कोठून सुरुवात कराल? जे जीवनातील तुमच्या उद्देशात सहभागी होतात व यहोवाची सेवा करण्याची ज्यांची उत्साही इच्छा आहे अशा यहोवाची भक्‍ति करणाऱ्‍या क्रियाशील सोबत्यात व्हावी. (२ तिमथ्यी २:२२) यहोवाने देवभिरू जीवन साथीसह तुम्हाला आशीर्वादित केले तर तुमचा विवाह आमच्या प्रेमळ देवास सन्मानित करणारा व्हावा अशीच आमची इच्छा आहे.

[३० पानांवरील संक्षिप्त आशय]

“अहा, मी ऐकले असते तर मला किती दुःख व किती पीडा टाळता आल्या असत्या!”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा