वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ४/१ पृ. २२-२३
  • जीवनी मार्ग

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवनी मार्ग
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • मिळती जुळती माहिती
  • सर्वाधिक प्रसिद्ध असलेले प्रवचन
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • इतरांचे बरे करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • मत्तय अध्याय ५-७
    आजपर्यंतचा सर्वोत्तम सल्ला!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ४/१ पृ. २२-२३

येशूचे जीवन व उपाध्यपण

जीवनी मार्ग

येशूच्या शिक्षणानुरुप जगणे हा जीवनी मार्ग आहे. पण ते तितकेसे सोपे नाही. कारण परुशी हे साधारणपणे लोकांचा कठोरपणे दोष काढीत व याचे अनुकरण बहुत लोक करीत. तेव्हा येशू डोंगरावरील आपल्या प्रवचनात पुढे हा सल्ला देतोः “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील.”

अत्यंत टिकेखोर असणाऱ्‍या परुश्‍यांचे अनुकरण करणे हे धोक्याचे होते. या धोक्याची स्पष्टता करताना येशू उदाहरण देऊन म्हणतोः “आंधळाच आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेहि खाचेत पडतील की नाही?”

दुसऱ्‍यांविषयी अति टिकेखोर बनणे, त्यांच्या चुका मोठ्या करुन दाखविणे व त्यांची थट्टा करणे हा फारच गंभीर गुन्हा आहे. यास्तव येशू विचारतोः “‘तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे’ असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे! अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल.”

याचा अर्थ, येशूच्या शिष्यांनी इतर लोकांविषयी तारतम्य बाळगायचे नाही असा नव्हता, कारण तो म्हणतोः “जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोत्ये डुकरांपुढे टाकू नका.” देवाच्या वचनातील सत्ये पवित्र आहेत. ते लाक्षणिकपणे मोती आहेत. पण तेच कोणी, एखाद्या कुत्र्याप्रमाणे वा डुकराप्रमाणे या मौल्यवान सत्यासंबंधी गुणग्राहकता दाखवीत नसेल तर येशूच्या शिष्यांनी त्याला सोडून देऊन जे अधिक ऐकून घेऊ शकतील अशा लोकांचा शोध घ्यावयाचा होता.

आपल्या प्रवचनात येशूने आधी प्रार्थनेविषयीची चर्चा केली होती तरी त्याचा पाठपुरावा करीत राहण्याच्या गरजेविषयी त्याने येथे अधिक भर दिला. “मागत राहा,” असे त्याने आर्जविले, “म्हणजे तुम्हास दिले जाईल.” प्रार्थनेला उत्तर देण्याची तत्परता देवाठायी किती आहे त्याचे उदाहरण सांगताना येशू विचारतोः “आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल . . . असा तुमच्यात कोण माणूस आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाला चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरुन चांगल्या देणग्या देईल?”

यानंतर येशू वागणूकीचा प्रसिद्ध नियम देतो जो सुवर्णनियम या नावाने ओळखला जातो. तो म्हणतोः “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” या नियमानुरुप जगणे म्हणजे इतरांविषयी चांगले ते करणे, आपल्याला जसे वागवले जावे असे वाटते तसेच त्यांनाही वागवणे ह्‍या सरळ मनोवृत्ती समाविष्ट आहेत.

जीवनी मार्ग हा सोपा नाही हे येशूच्या आणखी एका दाखल्याद्वारे स्पष्ट होते. तो म्हणतोः “अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.”

फसण्याचा धोका भारी असल्यामुळे येशू इशारा देतोः “खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत.” जसे चांगले झाड व वाईट झाड हे त्याच्या फळावरुन ओळखण्यात येते हे दाखवून येशू म्हणतो की, खोट्या संदेष्ट्यांना त्यांची वागणूक आणि शिक्षण याकरवी ओळखता येते.

पुढे जाऊन येशू याची स्पष्टता करतो की, कोणा व्यक्‍तीने नुसते म्हटले तर तो येशूचा शिष्य बनत नाही तर आपल्या कृतीमुळे होतो. काही लोक म्हणतात की येशू हा त्यांचा प्रभु आहे पण ते जर त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागत नाहीत तर येशू म्हणतो की, “मी त्यांना स्पष्ट सांगेन की, ‘मला तुमची कधीच ओळख नव्हती, अहो, अनाचार करणाऱ्‍यांनो, माझ्यापुढून निघून जा!’”

शेवटी, येशू आपल्या प्रवचनाला लक्षात राहण्याजोगा समारोप देतो. तो म्हणतोः “जो प्रत्येक जण माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सूज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरीही ते पडले नाही. कारण त्याचा पाया खडकावर घातला होता.”

उलटपक्षी, येशू म्हणतोः “जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराहि सुटला व त्या घरास लागला. तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले.”

येशू आपले प्रवचन संपवितो तेव्हा लोकसमुदाय त्याच्या शिक्षणामुळे थक्क होतो कारण तो त्यांच्या धार्मिक पुढाऱ्‍यांप्रमाणे नव्हे तर अधिकार असलेल्या माणसाप्रमाणे शिक्षण देत होता. मत्तय ७:१-२९; लूक ६:२७-४९.

◆ इतरांचे दोष काढण्याविषयी येशू काय म्हणतो, तरीपण आपल्या शिष्यांनी लोकांविषयी तारतम्य राखण्यास हवे हे तो कसे दाखवून देतो?

◆ प्रार्थनेविषयी येशू आणखी काय सांगतो आणि वागणूकीविषयीचा कोणता नियम तो देतो?

◆ जीवनी मार्ग सोपा नाही हे येशू कसे दाखवितो आणि फसविले जाण्याचा धोका आहे हे तो कसे सांगतो?

◆ येशू आपले प्रवचन कसे संपवितो, आणि याचा कोणता परिणाम होतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा