पवित्रशास्त्र—सबंध मानवजातीसाठी असलेले पुस्तक
“पहा! सर्व राष्ट्रे वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा मोठा लोकसमुदाय राजासनासमोर उभा आहे.”
तो कोणत्या प्रकारचा लोकसमुदाय आहे? व ते काय करीत आहेत?
“त्यांच्या हातात झावळ्या होत्या” असे अहवाल पुढे म्हणतो. “ते उच्च वाणीने म्हणत होतेः ‘राजासनावर बसलेल्या’ आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे.” हा, कसली मागणी करण्यासाठी व काही कारणास्तव निदर्शने करणारा हिंसक जमाव नाही. या ऐवजी, तो आनंदी, हर्षित जमाव आहे जो नुकताच हर्षवर्धक अनुभवातून गुदरला आहे. “हे मोठ्या संकटातून आलेले आहेत . . . ते यापुढे भूकेले अगर तान्हेले होणार नाहीत, . . . व देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील.”
सबंध मानवजातीसाठी संदेश
ह्या आंतरराष्ट्रीय “मोठ्या लोकसमुदायाचे” शद्वचित्र पवित्रशास्त्राचे शेवटचे पुस्तक प्रकटीकरण ७ अध्याय, ९ते१७ वचनात आढळते. शद्वचित्राच्या मार्गी ते आम्हास मानवजात वंश, भाषा व राष्ट्रीयवादाने विभाजित राहणार नाही तर शांतीत एकवटेल व भय आणि आकांक्षेपासूनच्या खऱ्या स्वातंत्र्याचा आनंद लुटील याचे भावी चित्र रेखाटते. सारांश, पवित्रशास्त्र मानवजातीसाठी अतुलनीय संदेश बाळगून आहे.
‘परंतू’ तुम्ही विचाराल, ‘कोणत्या मार्गी हा संदेश अतुलनीय आहे? जगभरातील लोक शांती व ऐक्याबाबत बोलणी करीत नाही काय?’ होय, ते करतात. या आंतरराष्ट्रीय तणावाच्या, राजकारण, वंशत्व, सधनता व धार्मिक द्वंद्वाने विकोपास पोहचलेल्या या जगात कोण जागतिक शांतीबाबत चिंता करणार नाही? परंतु फार पुर्वी अशाप्रकारचे आंतरराष्ट्रीय झगडे होते व मानवजातीचा बचाव हे प्रकरण होते त्याच्या फार पूर्वी पवित्रशास्त्र, सर्व मानवजात एक सरकार देवाचे राज्य याच्या वर्चस्वाखाली शांती व ऐक्याचा आनंद लुटील अशा काळाविषयी सागंते.
सुरूवातीपासूनचा जागतिक दृष्टिकोण
अगदी सुरूवातीपासूनच मानवाच्या भवितव्याचा विषय आला तेव्हा पविशास्त्राने जगव्याप्त स्वरूपाचा दृष्टिकोण प्रदर्शित केला. “फलद्रुप व्हा व बहुगुणित व्हा व पृथ्वी भरून टाका” ही पहिली आज्ञा आदाम व हव्वा यांना त्यांचा निर्माणकर्ता यहोवा देवाने दिली होती. (उत्पत्ती १:२८) आदाम व हव्वा यांना कांही विशिष्ट वंशाचे व राष्ट्राचे पूर्वज व्हावयाचे नव्हते. त्याऐवजी ते मानवजातीचे पूर्वज होणार होते. प्रेषित पौलाने पवित्रशास्त्र संदेश ग्रीस अथेन्स मध्ये आणला तेव्हा याविषयी साक्ष दिली. त्याने त्याना सांगितले देवाने “एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करुन त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले.”—प्रे. कृत्ये १७:२६.
आम्ही, सर्व मानवजात बंधू व भगिणी आहोत ही कल्पना सर्वसाधारण मानवाच्या विचारापलिकडील आहे ती स्विकारली पाहिजे. आज सुद्धा, जागतिक शांती व बंधुत्व याविषयी सर्व बोलत असले तरीही वंशभेद व राष्ट्रीयवाद हे मानवजातीस पछाडून नाहीत का? तथापि, पवित्रशास्त्र अशा इतर बंधनावर वरचढ आहे. ते सर्व राष्ट्राच्या बाबतीत एक भव्य कुटुंब व पृथ्वी सर्व मानवजातीसाठीचे भव्य घर असे म्हणते. या दृष्टिने पाहता ते खरोखरी सबंध मानवजातीसाठी पुस्तक आहे.
आदाम व हव्वा यहोवा देवास आज्ञाधारक राहिले असते तर सर्व मानवी वंशाने पृथ्वीभरातले आनंदी कुटूंबाचे भवितव्य साकार झाल्याचे पाहिले असते. परंतु ते तसे काही घडले नाही.“एका माणसाच्या (आदाम) द्वारे पाप जगात शिरले व पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे अशा प्रकारे मरण पसरले” असे पवित्रशास्त्र आम्हास सांगते.—रोमकर ५:१२.
याच्या प्रकाशात पाहता कोणताही वंश व राष्ट्र एकदुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा क्षुद्र नाही. येथे पुन्हा, पवित्रशास्त्र सर्व मानवजातीबाबत कोणतीही कृपादृष्टि किंवा अवाजवीपणा विरहीत बोलते. ते साधेपणात स्पष्टपणे दाखविते की “सर्वांनी पाप केले व ते देवाच्या गौरवास उणे पडले.” (रोमकर ३:२३) कांही विशिष्ट भागातील लोक भौतिकतेत सधन चांगले शिक्षण घेतलेले असतील, तरीपण सर्वत्र लोक त्याच मुलभूत समस्या—आजार, वार्धक्य, अपूर्णता व मृत्यूचा सामना करताना आम्ही पाहत नाही का?
सर्व मानवजातीच्या फायद्याचे अभिवचन
मानवजातीची स्थिती निराशजनक बनली होती तरी मानवास आशाहीन परिस्थितीत सोडले गेले नाही. या कठीण परिस्थितीत यहोवा देवाने अभिवचनाद्वारे आशेचे किरण दिले. अब्राहामास देव म्हणालाः “तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व रा अभिष्ट पावतील.” (उत्पत्ती २२:१८) हे अभिवचन जगातील तीन मोठ्या धर्मांनी—यहुदी, ख्रिश्चन व मुस्लीम—यांनी त्यांच्या विश्वासाचा भाग म्हणून स्विकारले आहे ही मनोवेधक गोष्ट आहे. पवित्रशास्त्रच केवळ या अभिवचनाची पूर्ति अब्राहाम व त्याचे वंशज, पूर्वीचे इस्त्राएल राष्ट्रयासोबत यहोवा देवाचे व्यवहार लिखित करून उघड करते.
परंतु येथे पुष्कळजण आक्षेप घेतील. त्यांना वाटते की हे तर कृपादृष्टी व अवाजवी राष्ट्रीयवादाचे नमुनेदार प्रकरण आहे. या आधारावर ते पवित्रशास्त्रास धिक्कारतात किंवा कमीत कमी इब्री शास्त्रवचनाचा पुष्कळ भाग केवळ वंशिक आहे असे म्हणतात. तथापि ही वाजवी विचारधारा आहे का? यहोवा देवाने अब्राहामावर असा आत्मविश्वास का दाखविला व त्याजसोबत अभिवचन का केले?
पवित्रशास्त्र स्पष्ट करते: ‘“अब्राहामाने यहोवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व गणण्यात आले,’ व त्याला ‘देवाचा मित्र’ म्हणण्यात आले.” (याकोब २:२३) चित्तवेधकपणे, मुस्लिमाचा पवित्र ग्रंथ कुराण सुद्धा देवाने अब्राहामास त्याच्या विश्वासामुळे मित्र म्हणून स्विकारले याकडे निर्देश करतो. “जो स्वतःस पुर्णपणे अल्लाहला देतो त्यापेक्षा चांगला धर्म तो कोणता? व जो सदाचारी (इतरांबाबत) इब्राहीमचा [अब्राहाम] जो सात्विक व ज्या इब्राहीमला देवाने मित्र म्हणून स्विकारले त्याचा विश्वास अनुसरतो.—सुरा ४:१२५ पवित्र कुराण, भाषांतर एम. एच. शाकीर.
इस्त्राएलांच्या बाबत काय? अब्राहामासोबत करार केल्यानंतर ४०० वर्षांनी मोशेने त्यांना सांगितले: “यहोवाने तुम्हावर प्रेम करुन तुम्हास निवडीले याचे कारण तुम्ही बहुसंख्य आहात म्हणून नव्हे उलट तुम्ही सर्व राष्ट्रात अल्प होता, यहोवाने तुम्हास समर्थ हाताने दास्यगृहातून, मिसराचा राजा फारो याच्या हातातून सोडवून बाहेर आणले याचे कारण हेच की त्याचे तुमच्यावर प्रेम आहे आणि तुमच्या पूर्वजांशी जी आणभाक त्याने केली ती पूरी करण्याची त्याची इच्छा आहे.”—अनुवाद ७:७,८.
यास्तव अब्राहाम किंवा इस्त्राएल उच्च कुळातील किंवा राष्ट्राचे अगर इतरापेक्षा कोणत्यातरी मार्गी इतर लोकांपेक्षा चांगले होते म्हणून नव्हे. या ऐवजी देवाचे प्रेम व विपुल दया, त्यांचा विश्वास व सत्कृत्यामुळे दाखविण्यात आली. प्रेषित पेत्राने हा मुद्दा घेतला तेव्हा त्याने म्हटले “देव पक्षपाती नाही, तर प्रत्येक राष्ट्रापैकी जो कोणी त्याचे भय बाळगतो व ज्याची कृत्ये नीतिमत्वतेची आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रे. कृत्ये १०:३४,३५.
अशाप्रकारे, यहोवा देव कांही काळासाठी फक्त इस्त्राएल राष्ट्राबरोबर संधान बांधून होता तरी तो सर्व मानवजातीच्या भल्याचा दृष्टिकोण राखून होता. त्याचा इस्त्राएलासोबतचा व्यवहार होता तो पवित्रशास्त्रात राष्ट्रीयवाद वाढविण्यास किंवा एका राष्ट्रास दुसऱ्यापेक्षा उच्च करण्यास लिखित केला नाही. त्यापेक्षा “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणासाठी लिहिले.” (रोमकर १५:४) होय, या घटना देवाचे प्रेम व सर्व मानवजात पुन्हा एकवार ऐैक्य व शांती आणण्याच्या आशापूर्ति करण्यातील धीरावर जोर देतात. ही आशा कशी पूर्ण होऊ शकते?
एक शांतीचे व्यवस्थापन
“पूर्वी केलेल्या योजने प्रमाणे त्याने [देवाने] स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळविले; ती योजना अशी की कालखंडाच्या पुर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे.” पौल स्पष्टीकरण करतो. (इफिसकर १:९,१०) ही “व्यवस्था” काय आहे?
ही संज्ञा ज्या ओय–को–नो–मिआ ह्या ग्रीक शब्दापासून भाषांतरीत झाली त्याचा मूळ अर्थ “घराचे व्यवस्थापन” आहे. अशाप्रकारे मानवजात राजकीयतेत, वंश, आर्थिक व धर्म यात विभाजित असली तरी देवाने या सर्व वादात्मक गोष्टी काढून सर्व आज्ञाधारक मानवजातीस पुन्हा एकवार पृथ्वीभरातील आनंदी कुटुंब म्हणून एकत्र आणण्याचे उद्देशिले आहे. हे तो कसे करील? तो हे त्याचे मसिही राज्य त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या हाती आहे त्याद्वारे करील.—पहा दानिएल २:४४; यशया ९:६,७.
सध्या गोलार्धिक तणाव व समस्यात जगभरातील लाखो लोकांनी शांती व ऐक्याच्या पवित्रशास्त्रीय संदेशास प्रतिसाद दिला आहे. ते अगणित “मोठा लोकसमुदाय” म्हणून सामोरे आल्याचे प्रकटीकरण पुस्तक वर्णिते. लाक्षणिकपणे, ते देवाच्या राजासनासमोर झावळ्या उंचावून त्यांची स्तुती व आज्ञाधारकता “जो राजासनारूढ आहे,” त्या यहोवा देवास “व कोकरा” येशू ख्रिस्तास अर्पण करीत आहेत.—प्रकटीकरण ७:९,१०.
तुम्हास हा संदेश आर्जवितो काय? तुमचा वंश, राष्ट्रीयत्व किंवा भाषा यांच्या ऐवजात आत्ताच पवित्रशास्त्रीय संदेश परीक्षिणे व स्विकारणे यामुळे तुम्ही त्या आंतरराष्ट्रीय “मोठ्या लोकसमुदाया”ला येऊन मिळू शकता. त्यांच्या सोबत तुम्ही आत्मविश्वासाने म्हणू शकताः “ज्यामध्ये नीतिमत्व वास करिते असे ‘नवे आकाश’ व ‘नवी पृथ्वी’ ह्याची त्याच्या [देवाच्या] वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.”—२पेत्र ३:१३.
खरंच, पवित्रशास्त्र तुम्हासाठी असणारे पुस्तक होऊ शकते!
[५ पानांवरील चित्रं]
आदाम व हव्वा मानवी वंशाचे जनक होते.
[७ पानांवरील चित्रं]
अब्राहाम ज्याने जन्मभूमी सोडली; विश्वास व सत्कृत्यांनी देवाची कृपापसंती मिळविली.