वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ७/१ पृ. ८-९
  • एका शोमरोनी स्त्रीस शिक्षण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एका शोमरोनी स्त्रीस शिक्षण
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मिळती जुळती माहिती
  • एका शोमरोनी स्त्रीला शिकवणे
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • विहिरीवर आलेली स्त्री
    बायबलमधून शिकू या!
  • स्त्री सोबत विहिरीपाशी
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • पुष्कळ शोमरोनी विश्‍वास धरतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ७/१ पृ. ८-९

येशूचे जीवन व उपाध्यपण

एका शोमरोनी स्त्रीस शिक्षण

येशू व त्याचे शिष्य यहुदीयापासून गालीलकडे प्रवास करीत असता शोमरोन या मार्गाने जातात. प्रवासाने थकून गेल्यामुळे ते सुखार नावाच्या नगरात दुपारच्या वेळी विश्रांतीसाठी एका विहीरीजवळ थांबतात. कित्येक शतकापूर्वी ही विहीर याकोबाने खोदली होती. आणि आजतागायत ती सध्याच्या नाबलुस या शहरात आहे.

येशू येथे विश्रांती घेत असता. त्याचे शिष्य अन्‍न विकत घेण्यास नगरात जातात. एक शोमरोनी स्त्री तेथे पाणी काढावयास येते तेव्हा तो तिला विनंती करतोः “मला प्यावयास पाणी दे.”

त्यावेळेस सर्वसाधारणपणे यहुदी लोक व शोमरोनी यांच्यामध्ये एकमेकांविरूद्ध रूढ असणारा अहंभाव होता त्यामुळे ते आपसात कोणताही संबंध ठेवीत नसत. त्यामुळेच आश्‍चर्यचकित होऊन ती स्त्री विचारतेः “आपण यहुदी असता माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यावयास पाणी मागता हे कसे?”

येशू तिला उत्तर देताना म्हणतो, जर तो कोण आहे हे तिने जाणले असते तर त्याच्याजवळ तिने “जिवंत पाणी” मागितले असते. तो म्हणतो हे पाणी “सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल.”

ती स्त्री म्हणते, “महाराज, ते पाणी मला द्या.”

आता येशू म्हणतोः “तू जाऊन आपल्या नवऱ्‍याला बोलावून आण.”

“मला नवरा नाही,” ती स्त्री उत्तरात म्हणते.

येशू तिचे म्हणणे स्पष्ट करतांना म्हणतोः “‘मला नवरा नाही’ हे तू ठीक बोललीस, कारण तुला पाच नवरे होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो तुझा नवरा नाही.”

“महाराज, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले” ती स्त्री चकित होऊन म्हणते. आपली आध्यात्मिक आस्था दाखवून ती एक मुद्दा सामोरा आणते व म्हणते की शोमरोनी तर गेरिझिम डोंगरावर उपासना करतात, पण यहुदी यरूशलेमेस उपासनेचे स्थान मानतात.

तरीपण, उपासनेचे ठिकाण हे महत्वाचे नाही हे येशू स्पष्ट करतो, “देव आत्मा आहे,” तो म्हणतो, “आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.”

त्या स्त्रीवर याचा खोल परिणाम होतो. “मसिहा, ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे.” ती म्हणते,“तो आल्यावर आम्हास सर्व गोष्टी सांगेल.”

“जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे.” येशू तिला सांगतो. याचा विचार करा! ही स्त्री जी, तिच्या जीवनाच्या वाईट मार्गामुळे शहरातील इतर स्त्रियांनी तिरस्कारलेली किंवा धिक्कारलेली अशी असता दुपारच्या वेळेस त्यांचा संपर्क येऊ नये याकरता पाणी काढावयास आली होती तिला येशूने किती चांगल्या रीतिने आपली पसंती दर्शविली! तिने जो अपराध कोणापुढेही स्पष्ट केला नव्हता तो त्याने तिला उघडपणे सांगितला. याचा कोणता परिणाम घडला? आमच्या पुढच्या अंकातील लेख याची स्पष्टता देईल. योहान ४:३–२६.

◆ येशू शोमरोनी स्त्रीबरोबर बोलल्यामुळे ती आश्‍चर्यचकित का झाली?

◆ येशू तिला जिवंत पाणी व कोठे उपासना करावयाची या संबंधी काय शिकवतो?

◆ येशू तो कोण आहे हे तिला कसे दाखवितो, आणि ही उघडकीस आणलेली गोष्ट आश्‍चर्यकारक का होती?

[९ पानांवरील चित्र]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा