वाचकांचे प्रश्न
◼ पृथ्वीवरील प्रभूचे अभिषिक्त शेष, यहोवाची स्वर्गातील पत्नी संस्था “वरील यरूशलेम” याचे भाग आहेत का?
पृथ्वीवरील अभिषिक्त शेषांना, ते देवाचे संघटन, त्याचा बौद्धिक प्राण्यांचा विश्वव्यापी परिवार याचे दृश्य भाग आहेत असे म्हटले जाऊ शकते.
“नव्याने जन्म”लेले या नात्याने ते यहोवाचे आध्यात्मिक पुत्र बनतात. (योहान ३:३, ५; रोमकर ८:१५–१७) यहोवा त्यांचा पिता आहे. त्यांना “माता” सुद्धा आहे कारण प्रेषित पौलाने लिहिले की, “वरील यरूशलेम . . . आपली माता आहे.” हा , निष्ठावंत दुतांच्या स्वर्गीय संघटनेस अनुलक्षून असणारा संदर्भ असावा, ज्याला यहोवा लाक्षणिक “पत्नी” समजतो. (गलतीकर ४:२६) अभिषिक्त ख्रिश्चनांचे स्वर्गीय पुनरूत्थान होते त्या वेळी ते त्या स्वर्गीय संघटनेत आपली जागा मिळवितात.—प्रकटीकरण ४:४; १४:१–५.
पृथ्वीवरील अभिषिक्त शेष अद्याप “वरील यरूशलेम” याचे प्रत्यक्ष भाग नाहीत. तरी पण आध्यात्मिक पुत्र यानात्याने त्यांचे अद्वितीय स्थान, त्यांची स्वर्गीय जीवनाची आशा व ते देवाची स्वर्गीय “स्त्री” हिचे करीत असलेले प्रतिनिधित्व यामुळे यहोवा यांना, तो आपल्या स्वर्गातील पत्नीसमान संघटनेला उद्देशून बोलणारे सांत्वनदायक बोल, तसेच अनुज्ञा, भविष्यवाद व अभिवचने विदीत करताना सामावून घेतो.
याचे विदारण आम्हाला प्राचीन इस्राएलांच्या संदर्भाने करता येईल. यहोवाने यशयाद्वारे बंधनात जखडलेल्या, धुळीत बसलेल्या आणि जागे होऊन आपला उजेड सभोवार पाडण्याची गरज असणाऱ्या स्त्रीचे वर्णन दिले. (यशया ५१:९, १४; ५२:१, २; ६०:१) अशी स्थिती स्वर्गीय “स्त्री” म्हणजे यहोवाचे निष्ठावंत आत्मिक पुत्र यात कधीही उद्भवली नव्हती. तरीपण ती इस्राएल राष्ट्रात अस्तित्वात होती. इस्राएलांची इ.स.पू. ५३७ मध्ये बाबेलच्या दास्यातून सुटका झाली तेव्हा ते जागे झाले, धुळीतून उठून उभे राहिले आणि यहोवाचा उजेड प्रवर्तित करीत राहिले. पुनर्बांधणी करण्यात आलेले यरूशलेम (जे राष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत होते) ते आधी धिक्कारलेल्या पण नंतर स्विकृत बनलेल्या आणि [पुनरुज्जीवित राष्ट्रातील यहुद्यांच्या रुपात] संतानांस जन्म देणाऱ्या स्त्री समान होते. (यशया ५४:१–८; ६०:१–२२; ६६:७–१४) याकरता “स्त्री”च्या स्थितीबाबत (जिचा उद्धारकर्ता पती यहोवा आहे) यशयामध्ये आढळणारे उद्गार तिचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पृथ्वीवरील राष्ट्राच्या रूपात साकार झाले.
आता आपण आपले लक्ष, देव (आणि त्याची स्वर्गीय “स्त्री” यांनी) दैहिक इस्राएलांचा वापर करण्याचे थांबवून आध्यात्मिक राष्ट्राचा स्विकार केला त्याकडे वळवू. (गलतीकर ६:१६) कित्येक शतके वांझ राहिल्यानंतर “वरील यरूशलेम” हिने आध्यात्मिक पुत्रांना निपजविण्यास सुरुवात केली. ज्याची निर्मिती पहिली झाली तो इ.स. २९ मध्ये येशू पहिला होता, यानंतर प्रेषितांपासून ते आमच्या काळापर्यंत १,४४,०००ची निर्मिती झाली. (गलतीकर ४:२१–३१) या शतकाच्या आरंभाला आध्यात्मिक इस्राएलाच्या शेषांना थोडा दबाव सहन करावा लागला व ते जणू बंधनात अडकले. त्यानंतर १९१९ मध्ये त्यांना बाबेलोनी दास्यत्वातून मुक्तता लाभून त्यांचे आध्यात्मिक प्रदेशी एक नवे राष्ट्र जन्मले. अशाप्रकारे आम्हाला दिसते की प्राचीन यरुशलेमाविषयीच्या यशयाच्या भविष्यवादित शब्दांची समांतर पूर्णता आज पृथ्वीवर आध्यात्मिक इस्राएलात होते.
याचप्रकारे प्रकटीकरण १२:१–१७ चा विचार करा. १९१४ मध्ये विदेश्यांच्या काळाची समाप्ती झाली त्यावेळी देवाच्या स्वर्गीय “स्त्री”ने राज्य सरकारला “पुसंतान” या नात्याने जन्म दिला. अधोगति प्राप्त झालेला सैतान “स्त्रीवर रागावला.” पण तो आता स्वर्गातील देवाच्या स्त्री संस्थेवर हल्ला करूच शकत नव्हता कारण आता त्याला या विभागात जाण्याची मनाई करण्यात आली होती. त्यामुळेच या पृथ्वीवर “तिचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तिच्या संतानापैकीचे बाकीचे लोक” यांच्याशी त्याने युद्ध केले.
तद्वत, गतकाळात दैहिक इस्राएलाबाबत जसे होते तसेच आध्यात्मिक इस्राएलाच्या बाबतीत सुद्धा आहे. “वरील यरूशलेम” हिजविषयीची परिस्थिती पृथ्वीवरील तिच्या मुलांमध्ये परावर्तित होते. याकारणामुळे देवाच्या स्वर्गीय स्त्री संस्थेला देण्यात येणाऱ्या अनुज्ञा, सुधारणा, सांत्वन व अभिवचने मुलभूतपणे पृथ्वीवर तिचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ज्यांना देवाच्या स्वर्गीय संघटनेत सहभागी होण्याचे भवितव्य आहे अशांकरता लागू होतात.
◼ “मोठा लोकसमुदाय” याचे भागीदार असणारे लोक यहोवाच्या सार्वत्रिक संघटनेचे भाग बनतात का?
सध्या, “मोठे संकट” येण्याआधी सर्वच यहोवाचे साक्षीदार देवाची सेवा ऐक्याने व आनंदाने करीत आहेत. (मत्तय २४:२१) यापैकीची छोटी संख्या आत्म्याने अभिषिक्त आहे व ती स्वर्गात जाण्याची वाट पाहून आहे आणि बाकीच्या बहुसंख्यांकाना पृथ्वीवरील नंदनवनात चिरकालिक जीवनाची आशा आहे ही गोष्ट त्यांच्यामध्ये भेदभाव दाखवीत नाही. येशूने दाखविल्याप्रमाणे ही “मेंढरे” आणि “दुसरी मेंढरे” यांचा मिळून “एक कळप” तयार होतो. (योहान १०:११, १६) अशाप्रकारे यहोवाच्या सेवकांची सध्याची संस्था दोन्ही गटांची, दोन वेगवेगळी भवितव्ये असणाऱ्यांनी मिळून बनली आहे.
अशा या समृद्धीचा आनंद आपल्या स्त्रीला पहायला मिळेल हे यहोवाने आधीच अवलोकिले होते. त्याने सूचित केले की आध्यात्मिक इस्राएल गटात नसणारे सर्व राष्ट्रातील लोक मोठ्या संख्येने एकत्रित केले जातील. (यशया ६०:१–२२; ६१:५–९) प्रकटीकरणाचे पुस्तक एका ‘मोठ्या लोकसमुदाया’चे वर्णन देते जो, “सर्व राष्ट्रे वंश, भाषा व लोक यांजमधून सामोरा, आलेला” व तो “राजासनासमोर व कोकऱ्यासामोर उभा” आहे. हे पृथ्वीवरील आशा असणारे लोक आहेत. ते, जे खासपणे आज यहोवाच्या सार्वत्रिक संघटनेचे प्रतिनिधित्व करीत आहेत त्या अभिषिक्तांच्या आध्यात्मिक राष्ट्राचे नाहीत. तरीपण “मोठा लोकसमुदाय” देवाच्या राजासनासमोर व कोकऱ्यासमोर, कोकऱ्याच्या रक्तात आपली वस्त्रे धुवून शुभ्र केल्यामुळे उभा आहे. आत्ताच त्यांना केवढे सुंदर स्थान लाभले आहे!—प्रकटीकरण ७:९–१७.
“मोठा लोकसमुदाय” गटाच्या लोकांची सचोटीसंबंधाने परिक्षा घेतली जाते. त्यांनी आता, हजार वर्षीय राज्यकीर्दीत आणि शेवटल्या परिक्षेत राखलेला विश्वासूपणा याचा परिणाम यहोवा त्यांना येशूची “दुसरी मेंढरे” वर्गाचा भाग बनणाऱ्या पुनरुत्थितांसहित परिपूर्ण मानव या नात्याने नीतीमान असे घोषित करील. अशी ही “नश्वरतेच्या दास्यातून” मुक्तता लाभल्यामुळे यांना “देवाच्या लेकरांची गौरवयुक्त स्वतंत्रता” मिळेल. (रोमकर ८:२१) ते मग आदाम हव्वेप्रमाणे यहोवाच्या सार्वत्रिक संघटनेचे दृश्य भाग बनतील. ते यहोवा व त्याच्या स्वर्गातील स्री संघटनेची परिपूर्ण व बुद्धीमान मुले बनतील.