वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ९/१ पृ. ३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • मिळती जुळती माहिती
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • आपल्यासाठी महत्त्वाचं असणारं एक “लाक्षणिक” नाटक!
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • नव्या कराराकरवी मोठे आशीर्वाद
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • तुम्ही “याजकराज्य” व्हाल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ९/१ पृ. ३१

वाचकांचे प्रश्‍न

◼ प्रेषित पौलाने गलतीकरांस पत्र ४:२५ मध्ये लिहिल्याप्रमाणे यरूशलेम कशी “गुलामगिरीत” होती?

पौलाच्या काळातील यरूशलेम व त्याचे लोक हे मुलभूतपणे मोशेच्या नियमशास्त्राच्या गुलामगिरीत होते.

गलतीकरांस लिहिलेल्या पत्रातील ४थ्या अध्यायात प्रेषिताने दाखविले की ख्रिश्‍चनांना ख्रिस्ताकरवी विकत घेण्यात आले असल्यामुळे ते आता नवीन करारात आहेत व त्यामुळे स्वतंत्र आहेत. यांच्या स्थितीची वैधर्म्यता नियमशास्त्र कराराखाली राहणाऱ्‍या यहुद्यांच्या स्थितीसोबत स्पष्ट करण्यात आली. याचे विदारण पौलाने अब्राहामाची बायको [सारा] व त्याची उपपत्नी [हागार] यांच्याकरवी करून म्हटले: “त्या स्त्रिया म्हणजे दोन करार होत. एक तर सिनाय पर्वतावरून केलेला; तो गुलामगिरीसाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार आहे. हागार ही अरबस्तानातील सिनाय पर्वत [जेथे यहोवाने इस्राएलांना मोशेकरवी नियमशास्त्र दिले] होय, आणि ती हल्लीच्या यरूशलेमेच्या जोडीची आहे. ती आपल्या मुलाबाळांसह गुलामगिरीत आहे. परंतु, वर असलेले यरूशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे.”—गलतीकर ४:२४–२६.

“दोन स्त्रिया म्हणजे दोन करार” असे पौलाने म्हटले त्यावेळी तो रूपक भाषेत बोलत होता. यहोवा हा काही अव्यक्‍तिक कराराशी विवाहबद्ध नाही तर तो करारात संघटीत असणाऱ्‍या लोकांशी बद्ध आहे. नियमशास्त्र कराराखाली असणाऱ्‍या इस्त्राएलांना त्याने अगोदर बायकोप्रमाणे समजले होते. (पडताळा यशया ५४:१, ६) तथापि, मुक्‍त स्त्री [सारा] वरील यरूशलेम, यहोवाची सार्वत्रिक संस्था हिला सूचित करीत होती, जी त्याला बायकोप्रमाणे आहे.

पण, नियमशास्त्र तर पूर्ण होते व ते देवाने स्वत: दिले होते तर यहुदी नियमशास्त्राच्या गुलामगिरीत होते असे कसे म्हटले जाऊ शकत होते?

हे खरे की, ‘नियमशास्त्र पवित्र आणि आज्ञा पवित्र, यथान्याय आणि उत्तम’ होती. (रोमकर ७:१२) तरीपण अपूर्ण इस्राएलांना त्यांनी यथाशक्‍ति प्रयत्न केला तरी नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन करणे जमले नाही. (रोमकर ७:१४–१६) या वास्तविकतेस, प्रेषित पेत्राने ख्रिश्‍चनांच्या नियमन मंडळास प्रश्‍न केला त्यावेळी सामोरे आणले होते की, “जे जोखड आपले पूर्वज व आपणही वाहावयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता?” (प्रे. कृत्ये १५:१०) याच अनुषंगाने, पौलाने गलतीकरांस पत्र ४:४, ५ मध्ये म्हटले की, “जे नियमशास्त्राधीन होते त्यांस . . . खंडणी भरून सोडवावे” याकरता ख्रिस्त आला. तद्वत, जे कोणी ख्रिश्‍चनांना नियमशास्त्रानुसारचे वार, महिने, सणाचे काळ व वर्षे . . . पाळण्याकरता’ सक्‍तीची गळ घालीत ते पुनः त्यांना गुलामगिरीप्रत निरवीत होते.—गलतीकर ४:९, १०.

द वॉचटावर मासिकाच्या मार्च १५, १९८५ अंकातील पृष्ठ १३ वर सूचित असल्याप्रमाणे पहिल्या शतकातील यहुदी अनेक मार्गी गुलामगिरीत होते. ते राजकीयदृष्टया रोमी लोकाच्या बंधनात होते. (योहान ८:३४) शिवाय ते चुकीच्या धार्मिक दृष्टिकोनाच्या दास्यात होते. पण पौलाने गलतीकर ४:२५ मध्ये जिचा उल्लेख केला ती प्रमुख गुलामगिरी, यहुद्यांची, सिनाय पर्वतावर देण्यात आलेले व अब्राहामाची दासी उपपत्नी हागार इजकरवी सूचित असणारे मोशाचे नियमशास्त्र याला असणारी गुलामगिरी होती.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा