उपस्थित असलेल्यांसाठी माहिती
अटेंडंट या बांधवांना तुम्हाला मदत करायला नेमण्यात आलं आहे. त्यामुळे पार्किंग, गर्दीवर नियंत्रण ठेवणं, जागा राखणं आणि इतर गोष्टींबाबत ते जेव्हा तुम्हाला सूचना देतात, तेव्हा कृपया त्यांना सहकार्य करा.
दान सर्वांनाच अधिवेशनाच्या कार्यक्रमाचा पूर्ण आनंद घेता यावा आणि यहोवासोबतचं नातं आणखी मजबूत करता यावं, म्हणून बराच खर्च केला जातो. या खर्चाने पुरेशी बसण्याची जागा, व्हिडिओ आणि साऊंड सिस्टम, तसंच दुसऱ्या बऱ्याच सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. तुम्ही स्वतःच्या इच्छेने देत असलेल्या दानातून हा खर्च भागवला जातो. याशिवाय, जगभरात होणाऱ्या कामांसाठीसुद्धा या दानाचा उपयोग केला जातो. दान टाकायला सभागृहात ठिकठिकाणी स्पष्ट शब्दांत, ‘दानपेटी’ असं लिहिलेल्या पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. तुम्ही donate.jw.org या वेबसाईटचा वापर करून ऑनलाईनही दान देऊ शकता. तुम्ही देत असलेल्या दानाची आम्ही मनापासून कदर करतो. देवाच्या राज्याशी संबंधित कार्याला हातभार लावण्यासाठी तुम्ही उदार मनाने जे काही देता त्याबद्दल नियमन मंडळ तुमचे आभार मानतं.
प्रथमोपचार कृपया लक्षात घ्या, की ही वैद्यकीय सेवा फक्त तातडीच्या प्रसंगांसाठीच आहे.
लॉस्ट ॲण्ड फाऊंड अधिवेशनाच्या आवारात सापडलेल्या सर्व वस्तू ‘लॉस्ट ॲण्ड फाऊंड’ या विभागात आणून द्याव्यात. तुमची एखादी वस्तू हरवली असेल, तर या विभागात जाऊन त्या वस्तूची ओळख पटवून ती घ्या. पालकांपासून चुकामूक झालेल्या मुलांनासुद्धा या विभागात न्यावं. पण हा विभाग मुलांची काळजी घेणारा विभाग आहे असं समजू नये. कृपया आपल्या मुलांवर लक्ष ठेवा आणि त्यांना नेहमी तुमच्यासोबत ठेवा.
बसण्याची व्यवस्था जागा राखताना कृपया इतरांचाही विचार करा. लक्षात असू द्या, की फक्त तुमच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास करणाऱ्यांसाठी, तुमच्यासोबत एकाच घरात राहणाऱ्यांसाठी किंवा तुमच्यासोबत बायबलचा अभ्यास करत असलेल्यांसाठीच तुम्ही जागा राखून ठेवू शकता. तुम्ही ज्या सीटवर बसणार आहात, त्याच्या आजूबाजूच्या सीटवर वस्तू ठेवू नका.
स्वयंसेवा अधिवेशनातल्या कामाला हातभार लावायची तुमची इच्छा असेल, तर ‘माहिती आणि स्वयंसेवा विभागाशी’ संपर्क साधा.
यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळातर्फे आयोजित
© 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania