वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • fg पाठ १३ प्रश्‍ने १-४
  • धर्मांबद्दल कोणती आनंदाची बातमी आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धर्मांबद्दल कोणती आनंदाची बातमी आहे?
  • देवाकडून आनंदाची बातमी!
  • मिळती जुळती माहिती
  • धर्म लोकांना देवापासून दूर कसे नेतात?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • खोट्या उपासनेपासून अलिप्त राहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?
    धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?
  • देवाला मान्य असलेली उपासना
    बायबल नेमके काय शिकवते?
अधिक माहिती पाहा
देवाकडून आनंदाची बातमी!
fg पाठ १३ प्रश्‍ने १-४

पाठ १३

धर्मांबद्दल कोणती आनंदाची बातमी आहे?

१. सगळेच धर्म चांगले आहेत का?

एक माणूस बायबल वाचत आहे

सगळ्याच धर्मांमध्ये प्रामाणिक मनाचे लोक आहेत. देव या लोकांकडे लक्ष देतो आणि त्याला त्यांची काळजी आहे. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, धर्माच्या नावाखाली बऱ्‍याच वाईट गोष्टी केल्या जातात. (२ करिंथकर ४:३, ४; ११:१३-१५) जगभरातल्या बातम्यांवरून कळतं, की काही धर्म तर खूप वाईट गोष्टींमध्ये सामील आहेत. जसं की दहशतवाद, जातिसंहार, युद्धं आणि लहान मुलांचं लैंगिक शोषण. देवाला मानणाऱ्‍या प्रामाणिक मनाच्या लोकांना हे पाहून खूप दुःख होतं.—मत्तय २४:३-५, ११, १२ वाचा.

खरा धर्म देवाचा गौरव करतो. पण दुसरीकडे पाहिलं, तर खोट्या धर्मात देवाला न आवडणाऱ्‍या गोष्टी शिकवल्या जातात. त्यात अशा गोष्टी शिकवल्या जतात ज्या बायबलमध्ये सांगितलेल्या नाहीत. जसं की, देवाबद्दल आणि मेलेल्या लोकांबद्दल शिकवल्या जाणाऱ्‍या खोट्या गोष्टी. पण यहोवाची इच्छा आहे, की लोकांना त्याच्याबद्दलचं सत्य कळावं.—उपदेशक ९:५, १०; १ तीमथ्य २:३-५ वाचा.

२. बायबलमध्ये धर्मांबद्दल कोणती आनंदाची बातमी सांगितली आहे?

काही धर्म म्हणतात की त्यांचं देवावर प्रेम आहे. पण खरं पाहिलं तर त्यांचं सैतानाच्या जगावर प्रेम आहे. असे धर्म देवाला फसवू शकत नाहीत. (याकोब ४:४) देवाच्या वचनात सगळ्या खोट्या धर्मांना “मोठी बाबेल” असं म्हटलं आहे. बाबेल हे प्राचीन काळातलं एक शहर होतं. नोहाच्या जलप्रलयानंतर या शहरातूनच खोट्या धर्माची सुरुवात झाली. आज या खोट्या धर्मांमुळे लोकांची फसवणूक होते आणि त्यांच्यावर अत्याचार होतो. पण लवकरच देव या सगळ्या धर्मांचा अचानक नाश करेल.—प्रकटीकरण १७:१, २, ५, १६, १७; १८:८ वाचा.

यासोबतच आणखी एक आनंदाची गोष्ट आहे. आजही जगभरात खोट्या धर्मांमध्ये जे प्रामाणिक मनाचे लोक आहेत, त्यांना यहोवा विसरलेला नाही. तो त्यांना सत्य शिकवून एकत्र आणत आहे.—मीखा ४:२, ५ वाचा.

३. प्रामाणिक मनाच्या लोकांनी काय केलं पाहिजे?

ख्रिस्ती सभेनंतर भाऊबहिणी एकमेकांशी बोलत आहेत

खरा धर्म लोकांना एकत्र आणत आहे

जे लोक खऱ्‍या आणि चांगल्या गोष्टींवर प्रेम करतात, त्यांच्यावर यहोवासुद्धा प्रेम करतो. म्हणूनच, त्यांनी खोट्या धर्मातून निघावं असं तो त्यांना कळकळीने सांगत आहे. ज्या लोकांचं देवावर प्रेम आहे, ते त्याला खूश करण्यासाठी आपल्या जीवनात बदल करायला तयार असतात.—प्रकटीकरण १८:४ वाचा.

येशूच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याच्या प्रेषितांनी लोकांना राज्याचा संदेश सांगितला, तेव्हा प्रामाणिक मनाच्या लोकांनी त्याला आनंदाने प्रतिसाद दिला. यहोवाने त्यांना जीवन जगण्याचा एक नवीन मार्ग दाखवला. यहोवाचं हे मार्गदर्शन स्वीकारल्यामुळे त्यांचं जीवन जास्त आनंदी झालं. तसंच, त्यांना जीवनात एक उद्देश आणि आशा मिळाली. त्यांनी यहोवाला आपल्या जीवनात पहिलं स्थान देऊन आनंदाच्या संदेशाला चांगला प्रतिसाद दिला. आणि असं करून त्यांनी आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण ठेवलं.—१ थेस्सलनीकाकर १:८, ९; २:१३ वाचा.

जे खोटा धर्म सोडून देतात, त्यांचं यहोवा आपल्या उपासकांच्या कुटुंबात स्वागत करतो. जर तुम्ही यहोवाचं हे प्रेमळ आमंत्रण स्वीकारलं, तर तुम्हाला बरेच आशीर्वाद मिळतील. तुम्हाला त्याच्याशी मैत्री करता येईल आणि त्याची उपासना करणाऱ्‍या प्रेमळ भाऊबहिणींच्या कुटुंबाचा भाग बनता येईल. तसंच, तुम्हाला सर्वकाळाचं जीवनही मिळवता येईल.—मार्क १०:२९, ३०; २ करिंथकर ६:१७, १८ वाचा.

४. देव सबंध जगात आनंदाची परिस्थिती कशी आणेल?

लवकरच खोट्या धर्मांचा न्याय केला जाईल, ही खरंच एक आनंदाची बातमी आहे. कारण यामुळे धर्माच्या नावाखाली होत असलेल्या वाईट गोष्टींपासून सबंध जगातल्या लोकांची सुटका होईल. यानंतर कधीही खोटे धर्म लोकांची फसवणूक करू शकणार नाहीत किंवा त्यांच्यात फूट पाडू शकणार नाहीत. त्या वेळी जगातल्या सगळ्या लोकांमध्ये एकता असेल. कारण ते सगळे एकाच खऱ्‍या देवाची उपासना करतील.—प्रकटीकरण १८:२०, २१; २१:३, ४ वाचा.

जास्त माहितीसाठी, बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?  या पुस्तकातले अध्याय १५ आणि १६ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा