वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • fg पाठ १४ प्रश्‍ने १-४
  • देवाचे लोक संघटित का आहेत?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाचे लोक संघटित का आहेत?
  • देवाकडून आनंदाची बातमी!
  • मिळती जुळती माहिती
  • देवाची दृश्‍य संघटना
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • देवाची संघटना आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • यहोवाचे साक्षीदार कशा प्रकारे संघटित आहेत
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
  • यहोवा सुव्यवस्थेचा देव आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
देवाकडून आनंदाची बातमी!
fg पाठ १४ प्रश्‍ने १-४

पाठ १४

देवाचे लोक संघटित का आहेत?

१. प्राचीन काळात देवाने इस्राएली राष्ट्राला का संघटित केलं?

१. प्राचीन इस्राएलमध्ये देवाचे लोक; २. पहिल्या शतकातले ख्रिस्ती घरोघरचं प्रचार कार्य करत आहेत

प्राचीन काळात अब्राहाम नावाचा एक कुलप्रमुख होता. देवाने त्याच्या वंशजांना संघटित करून त्यांचं एक राष्ट्र तयार केलं आणि त्यांना नियमशास्त्र दिलं. देवाने त्या राष्ट्राला ‘इस्राएल’ असं नाव दिलं. त्या काळात खरी उपासना करणारं हे एकच राष्ट्र होतं. देवाने आपल्या वचनाचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. (स्तोत्र १४७:१९, २०) इस्राएल राष्ट्रामुळे बाकीच्या सर्व राष्ट्रांतल्या लोकांना आशीर्वाद मिळणार होते.—उत्पत्ती २२:१८ वाचा.

देवाने इस्राएली लोकांना आपले साक्षीदार म्हणून निवडलं होतं. या राष्ट्राच्या इतिहासावरून दिसून येतं, की जेव्हा लोक देवाचे नियम पाळतात तेव्हा त्यांना फायदा होतो. (अनुवाद ४:६) इस्राएल राष्ट्रामुळे इतर लोकांनाही खऱ्‍या देवाला जाणून घ्यायची संधी मिळाली.—यशया ४३:१०, १२ वाचा.

२. खरे ख्रिस्ती संघटित का आहेत?

इस्राएल राष्ट्राने पुन्हा पुन्हा देवाचे नियम मोडल्यामुळे, काही काळानंतर ते देवाचे निवडलेले लोक राहिले नाहीत. पुढे यहोवाने इस्राएल राष्ट्राऐवजी, येशूच्या शिष्यांनी बनलेल्या ख्रिस्ती मंडळीला निवडलं. (मत्तय २१:४३; २३:३७, ३८) त्यामुळे आज इस्राएल राष्ट्राऐवजी खरे ख्रिस्ती यहोवाचे साक्षीदार म्हणून त्याची सेवा करत आहेत.—प्रेषितांची कार्यं १५:१४, १७ वाचा.

सगळ्या राष्ट्रांच्या लोकांना आनंदाचा संदेश सांगण्याचं आणि शिष्य बनवण्याचं काम करण्यासाठी येशूने आपल्या अनुयायांना संघटित केलं. (मत्तय १०:७, ११; २४:१४; २८:१९, २०) आज आपण या जगाच्या समाप्तीच्या काळात राहत आहोत आणि येशूने आपल्या शिष्यांवर सोपवलेलं हे काम जवळजवळ पूर्ण होत आलं आहे. इतिहासात पहिल्यांदाच यहोवाने सगळ्या राष्ट्रांतल्या लोकांना खरी उपासना करण्यासाठी एकत्र केलं आहे. (प्रकटीकरण ७:९, १०) येशूच्या खऱ्‍या अनुयायांना आज एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी संघटित करण्यात आलं आहे. सबंध जगात त्यांच्या सभांमध्ये त्यांना बायबलमधून एकाच प्रकारचं शिक्षण दिलं जातं.—इब्री लोकांना १०:२४, २५ वाचा.

३. आधुनिक काळात यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटनेची सुरुवात कशी झाली?

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आणि आजच्या काळात यहोवाचे साक्षीदार प्रचार करत आहेत; बऱ्‍याच भाषांमध्ये असलेलं बायबल-आधारित छापील साहित्य.

१८७० च्या दशकात, बायबल विद्यार्थ्यांच्या एका लहानशा गटाने बायबलमधून बरीच सत्यं शोधून काढली. येशूने ख्रिस्ती मंडळीला प्रचार करण्यासाठी संघटित केलं होतं, हे त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी जगभरात राज्याच्या संदेशाचा प्रचार करायचं काम सुरू केलं. १९३१ मध्ये त्यांनी ‘यहोवाचे साक्षीदार’ हे नाव स्वीकारलं.—प्रेषितांची कार्यं १:८; २:१, ४, ११; ५:४२ वाचा.

४. यहोवाच्या साक्षीदारांची संघटना कशा प्रकारे काम करते?

पहिल्या शतकात, बऱ्‍याच देशांमध्ये असलेल्या ख्रिस्ती मंडळ्या यरुशलेममधल्या नियमन मंडळाच्या मार्गदर्शनाखाली काम करायच्या. नियमन मंडळात सेवा करणारे बांधव येशूला ख्रिस्ती मंडळीचा प्रमुख मानायचे. (प्रेषितांची कार्यं १६:४, ५) आजही सबंध जगातले यहोवाचे साक्षीदार अनुभवी वडिलांनी बनलेल्या नियमन मंडळाच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. हे नियमन मंडळ यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयांवर देखरेख करतं. ही शाखा कार्यालयं ८०० पेक्षा जास्त भाषांमध्ये बायबलवर आधारित साहित्याचं भाषांतर, छपाई आणि वितरण करतात. यामुळे सबंध जगातल्या १,२०,००० पेक्षा जास्त मंडळ्यांना बायबलमधून प्रोत्साहन आणि मार्गदर्शन पुरवणं नियमन मंडळाला शक्य होतं. प्रत्येक मंडळीत बायबलमध्ये दिलेल्या पात्रता पूर्ण करणारे बांधव, वडील किंवा देखरेख करणारे म्हणून सेवा करतात. हे बांधव देवाच्या कळपाची प्रेमळपणे काळजी घेतात.—१ पेत्र ५:२, ३ वाचा.

लोकांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी आणि शिष्य बनवण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांना संघटित करण्यात आलं आहे. पहिल्या शतकातल्या प्रेषितांसारखंच आज आम्हीही घरोघरी जाऊन आनंदाचा संदेश सांगतो. (प्रेषितांची कार्यं २०:२०) तसंच, ज्यांना सत्य जाणून घ्यायची मनापासून इच्छा आहे अशा लोकांसोबत आम्ही बायबल अभ्याससुद्धा करतो. पण यहोवाचे साक्षीदार ही फक्‍त एक संघटना नाही. तर यहोवा आमचा प्रेमळ पिता असल्यामुळे आम्ही एक कुटुंब आहोत. आम्ही एकमेकांना भाऊबहीण समजतो आणि एकमेकांची काळजी घेतो. (२ थेस्सलनीकाकर १:३) यहोवाच्या या संघटनेत सगळ्यांनाच देवाला खूश करायची आणि एकमेकांना मदत करायची इच्छा आहे. म्हणूनच, हे जगातलं सगळ्यात आनंदी कुटुंब आहे.—स्तोत्र ३३:१२; प्रेषितांची कार्यं २०:३५ वाचा.

जास्त माहितीसाठी, बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?  या पुस्तकाचा अध्याय १९ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा