वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • bm भाग १७ पृ. २०
  • येशू लोकांना देवाच्या राज्याबद्दल शिकवतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशू लोकांना देवाच्या राज्याबद्दल शिकवतो
  • बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • मिळती जुळती माहिती
  • येशूने देवाच्या राज्याविषयी काय शिकवले?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • येशू पुन्हा जिवंत होतो!
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • देवाच्या सरकाराबद्दल अचूक माहिती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
  • येशू ख्रिस्ताबद्दलचं सत्य
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
अधिक माहिती पाहा
बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
bm भाग १७ पृ. २०
येशू एका जमावाला शिकवतो

भाग १७

येशू लोकांना देवाच्या राज्याबद्दल शिकवतो

येशू त्याच्या शिष्यांना अनेक गोष्टी शिकवतो, तरी देवाचे राज्य या मुख्य विषयाकडे खासकरून तो त्यांचे लक्ष वेधतो

येशूला पृथ्वीवर कशासाठी पाठवण्यात आले होते? त्याने स्वतःच म्हटले: “[मला] देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.” (लूक ४:४३) देवाचे राज्य या आपल्या प्रचाराच्या मुख्य विषयासंबंधी येशूने शिकवलेल्या चार खास गोष्टींकडे लक्ष देऊ या.

१. येशू या राज्याचा नेमलेला राजा होता. ज्याच्याविषयी भाकीत करण्यात आले होते तो मशीहा आपणच असल्याचे येशूने स्पष्टपणे सांगितले. (योहान ४:२५, २६) तसेच, दानीएल संदेष्ट्याने दृष्टान्तात पाहिलेला राजाही आपणच असल्याचे त्याने सांगितले. येशूने त्याच्या प्रेषितांना सांगितले की एक दिवस तो “गौरवाच्या राजासनावर” बसेल आणि तेसुद्धा राजासनांवर बसतील. (मत्तय १९:२८) त्याच्यासोबत राज्य करणाऱ्‍या या राजांना त्याने आपला ‘लहान कळप’ म्हणून संबोधले. शिवाय, या गटात सामील नसलेली आपली ‘दुसरी मेंढरेही’ असल्याचा त्याने उल्लेख केला.—लूक १२:३२; योहान १०:१६.

२. देवाचे राज्य न्यायाने शासन करेल. एदेन बागेत आदाम व हव्वेने देवाची आज्ञा मोडली, तेव्हापासून सैतानाने कितीतरी प्रकारे यहोवाच्या नावावर काळिमा फासला आहे. पण देवाचे राज्य यहोवाच्या नावावर लावण्यात आलेला कलंक पूर्णपणे मिटवून त्याचे नाव पवित्र करेल आणि अशा रीतीने आजपर्यंत घडलेला सर्वात मोठा अन्याय निकालात काढेल असे येशूने सांगितले. (मत्तय ६:९, १०) येशू स्वतः सर्वांशी न्यायाने वागला. त्याने कोणताही भेदभाव न करता स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत अशा सर्व लोकांना शिकवले. त्याला मुळात इस्राएली लोकांना शिकवण्याकरता पाठवण्यात आले होते. तरीसुद्धा, त्याने यहुदी नसलेल्या शोमरोनी व विदेशी लोकांनाही साहाय्य केले. त्याच्या काळातील धर्मपुढाऱ्‍यांपेक्षा तो अगदीच वेगळा होता. लोकांमध्ये उच्च-नीच असा भेदभाव करण्याची प्रवृत्ती त्याच्यात नावालाही नव्हती.

३. देवाच्या राज्याचा या जगातील सरकारांशी संबंध नाही. येशू पृथ्वीवर आला तो अतिशय उलथापालथीचा काळ होता. त्याच्या मायदेशावर दुसऱ्‍या देशाची सत्ता होती. पण, लोकांनी येशूला त्या काळातील राजकीय घडामोडींमध्ये गोवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने याला साफ नकार दिला. (योहान ६:१४, १५) एका राजकारण्याला त्याने असे सांगितले: “माझे राज्य ह्‍या जगाचे नाही.” (योहान १८:३६) आपल्या अनुयायांनाही त्याने सांगितले, की “तुम्ही जगाचे नाही.” (योहान १५:१९) त्याचे संरक्षण करण्यासाठीही त्याने कधी आपल्या शिष्यांना शस्त्रे वापरण्याची परवानगी दिली नाही.—मत्तय २६:५१, ५२.

“तो उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता.”—लूक ८:१

४. ख्रिस्त प्रेमळपणे राज्य करेल. येशूने लोकांना विसावा देण्याचे, त्यांची ओझी हलकी करण्याचे आश्‍वासन दिले होते. (मत्तय ११:२८-३०) आणि तो आपल्या शब्दाला जागला. त्याने प्रेमळपणे लोकांना रोजच्या जीवनात उपयोगी पडतील अशा गोष्टी शिकवल्या. जीवनातील चिंताना कसे तोंड द्यावे, आपसांतील नातेसंबंध कसे सुधारावेत, लोभी प्रवृत्तीवर कशी मात करावी व खरा आनंद कसा मिळवावा याविषयी त्याने लोकांना शिकवले. (मत्तय, अध्याय ५ ते ७) तो लोकांशी प्रेमळपणे वागत असे. त्यामुळे लोकांना त्याच्याजवळ येण्यास कधीही संकोच किंवा भीती वाटत नसे. सर्व थरांतील लोक, समाजातील अगदी तळागाळातील लोकसुद्धा मोठ्या संख्येने त्याच्याकडे यायचे. तो आपल्याशी प्रेमाने, आदराने वागेल याची त्यांना खातरी वाटे. खरोखर, भविष्यात येशू किती चांगला राजा ठरेल!

येशूने देवाच्या राज्याबद्दल आणखी एका अतिशय प्रभावशाली मार्गाने शिकवले, अर्थात चमत्कार करण्याद्वारे. पण, त्याने हे चमत्कार का केले? पाहू या.

—मत्तय, मार्क, लूक आणि योहान या पुस्तकांवर आधारित.

  • देवाच्या राज्याचा राजा आपणच असल्याचे येशूने कशा प्रकारे शिकवले?

  • येशू न्यायीपणे राज्य करेल हे त्याने कोणकोणत्या मार्गांनी दाखवले?

  • आपले राज्य या जगाचे नसेल हे येशूने कशा प्रकारे स्पष्ट केले?

  • येशू प्रेमळपणे राज्य करेल हे त्याने कसे दाखवले?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा