वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • bm भाग ८ पृ. ११
  • इस्राएल लोक कनान देशात प्रवेश करतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इस्राएल लोक कनान देशात प्रवेश करतात
  • बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • मिळती जुळती माहिती
  • यहोशवाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • यहोवाचे नाम किती थोर आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • राहाब हेरांना लपवते
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • त्याने तर्काला न पटणाऱ्‍या सूचना पाळल्या
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
अधिक माहिती पाहा
बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
bm भाग ८ पृ. ११
यहोशवा युद्धाची घोषणा करतो आणि याजक रणशिंगे फुंकत आहेत

भाग ८

इस्राएल लोक कनान देशात प्रवेश करतात

यहोशवाच्या नेतृत्वाखाली इस्राएल लोक कनान देशाचा ताबा घेतात. यहोवा आपल्या लोकांना जुलमापासून सोडवण्यासाठी न्यायाधीश उभे करतो

इस्राएल लोकांनी कनान देशात प्रवेश करण्याच्या कित्येक शतकांआधी, अब्राहामाच्या वंशाला हा देश देण्यात येईल असे अभिवचन देवाने दिले होते. आता यहोशवाच्या नेतृत्वाखाली इस्राएल लोक प्रतिज्ञात देशाचा ताबा घेण्याच्या बेतात होते.

देवाने कनानी लोकांचा नाश करण्याचे ठरवले होते. या लोकांनी अतिशय घृणित प्रकारच्या लैंगिक कृत्यांनी व निर्दयी रक्‍तपाताने सबंध देश भरून टाकला होता. त्यामुळे इस्राएल लोकांनी कनानी नगरे हस्तगत करून ती पूर्णपणे नष्ट करायची होती.

पण, त्या देशात प्रवेश करण्याआधी यहोशवाने दोन जासुदांना पाठवले. ते यरीहो नगरात राहाब नावाच्या एका स्त्रीच्या घरी उतरले. ही दोन माणसे इस्राएली आहेत हे माहीत असताना देखील तिने त्यांचे स्वागत केले व आपल्या घरात त्यांना आश्रय दिला. यहोवाने आपल्या लोकांची सुटका करण्यासाठी कोणकोणती महान कृत्ये केली होती याविषयी तिने ऐकले होते. त्यामुळे इस्राएल लोकांच्या देवावर तिचा विश्‍वास होता. यरीहो नगराच्या नाशातून तिचा व तिच्या घरच्यांचा बचाव केला जाईल असे वचन तिने त्या दोन जासुदांकडून घेतले.

नंतर इस्राएल लोकांनी कनान देशात प्रवेश करून यरीहोवर चढाई केली तेव्हा यहोवाने चमत्कारिकपणे यरीहोच्या भिंती जमीनदोस्त केल्या. मग, यहोशवाच्या सैन्याने नगरात शिरून त्याचा नाश केला. पण राहाब व तिच्या घरच्यांना त्यांनी कोणतीही इजा केली नाही. पुढील सहा वर्षांत यहोशवाच्या सैन्याने एकापाठोपाठ एक, प्रतिज्ञात देशाचे मोठमोठे भाग हस्तगत केले. नंतर हे प्रदेश इस्राएलच्या वंशांना वाटून देण्यात आले.

कनान देशाचा नकाशा[११ पानांवरील नकाशा]

आपल्या दीर्घ कारकिर्दीच्या शेवटी यहोशवाने सर्व इस्राएल लोकांना एकत्रित केले. यहोवाने त्यांच्या पूर्वजांशी कसा व्यवहार केला होता याची त्याने त्यांना आठवण करून दिली व यहोवाची सेवा करत राहण्याचा त्यांना आर्जव केला. पण, यहोशवाचा व त्याच्यासोबतीने कार्य करणाऱ्‍या वडीलजनांचा मृत्यू झाल्यानंतर इस्राएल लोक यहोवाला सोडून खोट्या दैवतांची उपासना करू लागले. सुमारे ३०० वर्षांच्या काळात यहोवाच्या नियमांचे पालन करण्यापासून ते वारंवार भरकटले. त्या काळादरम्यान यहोवाने पलिष्ट्यांकडून व इस्राएलच्या इतर शत्रूंकडून त्यांच्यावर अत्याचार होऊ दिले. पण, इस्राएल लोकांनी मदतीसाठी यहोवाचा धावा केला तेव्हा तेव्हा त्यांचा बचाव करण्यासाठी त्याने न्यायाधीश उभे केले. असे एकूण १२ न्यायाधीश इस्राएलात होऊन गेले.

शास्ते पुस्तकाच्या वृत्तान्तातील पहिला न्यायाधीश अथनिएल हा होता, तर इतिहासातला सर्वात शक्‍तीशाली पुरुष शमशोन हा शेवटचा न्यायाधीश होता. या पुस्तकातील रोमांचक अहवालातून एक मूलभूत सत्य वारंवार समोर येते: यहोवाच्या आज्ञांचे पालन केल्याने अनंत आशीर्वाद लाभतात, तर त्याच्या आज्ञांचे उल्लंघन केल्यास संकटे ओढवतात.

—यहोशवा; शास्ते; लेवीय १८:२४, २५ वर आधारित.

  • यहोवाने राहाब व तिच्या कुटुंबाचे रक्षण का केले?

  • यहोशवाच्या मृत्यूनंतर इस्राएल लोकांनी काय केले?

  • बायबलमधील शास्ते पुस्तकातून कोणते मूलभूत सत्य समोर येते?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा