वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • my कथा ४६
  • यरीहोचा तट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यरीहोचा तट
  • बायबल कथांचं माझं पुस्तक
  • मिळती जुळती माहिती
  • राहाब गुप्तहेरांना लपवते
    बायबलमधून शिकू या!
  • यहोवाचे नाम किती थोर आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • राहाब हेरांना लपवते
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • राहाबनं यहोवावर विश्‍वास ठेवला
    आपल्या चिमुकल्यांना शिकवा
अधिक माहिती पाहा
बायबल कथांचं माझं पुस्तक
my कथा ४६
यहोशवा इस्राएली लोकांचं नेतृत्व करतो. ते आरोळी ठोकतात, शिंग वाजवतात आणि यरीहोचा तट पडतो

कथा ४६

यरीहोचा तट

यरीहोचा हा तट कशामुळे कोसळत आहे? त्याच्यावर जणू बॉम्ब पडल्यासारखं दिसत आहे. पण त्या काळी बॉम्ब नव्हते, आणि बंदुकाही नव्हत्या. तो यहोवाचा आणखी एक चमत्कार होता! तो कसा झाला पाहू या.

ऐका, यहोवा यहोशवाला काय सांगतो: ‘तू आणि तुझी लढाऊ माणसं शहराभोवती प्रदक्षिणा घाला. सहा दिवस त्याच्या भोवती रोज एक प्रदक्षिणा घाला. कराराचा कोश तुमच्या बरोबर न्या. सात याजकांनी त्याच्यापुढे चालत शिंगं फुंकावी.

‘सातव्या दिवशी तुम्ही शहराभोवती सात प्रदक्षिणा घालाव्या. मग शिंगं बराच वेळ वाजवा नि सर्वांचा मोठा रणघोष करवा. म्हणजे तट भुईसपाट होईल!’

यरीहोचा तट पडला, पण तटाला लागून असलेलं रहाबचं घर मात्र पडलं नाही

यहोशवा आणि सर्व लोक यहोवानं सांगितल्याप्रमाणे करतात. प्रदक्षिणा घालत असताना सर्व जण अगदी गप्प असतात. कोणी चकार शब्द बोलत नाही. फक्‍त शिंगांचा आणि चालणाऱ्‍या पायांचा आवाज ऐकू येतो. यरीहोतल्या, देवाच्या लोकांच्या शत्रूंची घबराट उडाली असेल. एका खिडकीतून लटकणारी लाल दोरी तुम्हाला दिसते का? ती कोणाची खिडकी आहे बरं? होय, त्या दोन हेरांनी सांगितलेली गोष्ट राहाबेनं केली आहे. तिचं सर्व कुटुंब आत आहे आणि तिच्याबरोबर, घडणाऱ्‍या गोष्टी पाहात आहे.

शेवटी, सातव्या दिवशी, शहराभोवती सात वेळा प्रदक्षिणा घातल्यावर शिंगं वाजतात, लोक आरोळी ठोकतात; आणि तट कोसळतो. मग यहोशवा म्हणतो: ‘शहरातल्या प्रत्येकाला ठार करा आणि शहर जाळून टाका. सर्व काही जाळून टाका. फक्‍त सोनं, रुपं तांबं आणि लोखंड जपा नि यहोवाच्या मंडपाच्या भांडारात जमा करा.’

त्या दोन हेरांना यहोशवा म्हणतो: ‘राहाबेच्या घरात जाऊन, तिला आणि तिच्या सर्व कुटुंबाला बाहेर आणा.’ हेरांनी वचन दिल्याप्रमाणे राहाब आणि तिचं कुटुंब वाचतं.

यहोशवा ६:१-२५.

अभ्यासासाठी प्रश्‍न

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा