देवाच्या मार्गदर्शनानुसार चालणं
या अंकाच्या पहिल्या लेखात सांगितल्याप्रमाणे बरेच लोक बायबलला एक धार्मिक ग्रंथ मानतात. त्यांनी अनुभवलं आहे की बायबल वाचल्यामुळे आणि त्यातली माहिती जीवनात लागू केल्यामुळे देवाचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे. तसंच, त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देशही समजला आहे.
बायबलमध्ये ‘आध्यात्मिक मनोवृत्ती’ याचा अर्थ जीवनाप्रती आपली मनोवृत्ती किंवा आपला दृष्टिकोन देवासारखा असणं असा होतो. (यहूदा १८, १९) ज्या लोकांना देवाच्या मार्गदर्शनानुसार चालायचं नसतं ते स्वतःच्या विचारांवर अवलंबून राहतात, पण ज्यांना देवाचं मार्गदर्शन हवं असतं ते त्याच्या स्तरांबद्दल कदर बाळगतात.—इफिसकर ५:१.
आशा
बायबल तत्त्व: “संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ती अल्प होय.”—नीतिसूत्रे २४:१०.
याचा काय अर्थ होतो: आपण जर निराश झालो तर जीवनाच्या समस्यांचा सामना करण्यासाठी लागणारी शक्ती आपल्याकडे नसेल. पण दुसरीकडे पाहता आशा आपल्याला समस्यांचा धैर्याने सामना करण्यासाठी मदत करते. आपल्याकडे आशा असते तेव्हा आपल्याला समजतं की आपल्या समस्या या कायमच्या नाहीत तर फक्त काही काळासाठी आहेत. खरंतर त्यांतून चांगल्या गोष्टी निष्पन्न होऊ शकतात.
तुम्ही काय करू शकता: भविष्याबद्दल सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा. भविष्यात काय घडू शकतं याबद्दल चिंता करू नका किंवा सर्व परिस्थिती पूर्णपणे चांगली होईल अशी अपेक्षा करू नका. तर त्याऐवजी तुम्ही ठरवलेल्या ध्येयांनुसार पाऊल उचलत राहा. हे खरं आहे की अनपेक्षित घटना घडू शकतात. (उपदेशक ९:११) पण खरं पाहिलं तर अनेकदा आपल्या अपेक्षांपेक्षा चांगल्या गोष्टी घडतात. हे समजण्यासाठी बायबलमध्ये शेतीसंबंधी एक उदाहरण दिलं आहे. त्यात म्हटलं आहे, की “सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीही आपला हात आवरू नको; कारण त्यांतून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील, हे तुला ठाऊक नसते.”—उपदेशक ११:६.
जीवनातल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं
बायबल तत्त्व: “मला बुद्धि दे . . . तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे.” —स्तोत्र ११९:१४४, १६०.
याचा काय अर्थ होतो: अनेक लोकांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं बायबलमध्ये दिली आहेत. उदाहरणार्थ:
आपण अस्तित्वात कसे आलो?
आपल्याला दुःख का सहन करावं लागतं?
मृत्यूनंतर एका व्यक्तीचं काय होतं?
भविष्यात काय होणार आहे?
जगातल्या लाखो लोकांनी बायबलमधून अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेतल्यामुळे त्यांच्या जीवनात बरेच चांगले बदल झाले आहेत.
तुम्ही काय करू शकता: बायबल नेमकं काय शिकवतं हे तुम्ही स्वतः जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकता. बायबलमधली माहिती समजून घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्यासोबत चर्चा करायला विचारू शकता. तुम्ही jw.org/mr ही वेबसाईट पाहू शकता किंवा आमच्या सभांना उपस्थित राहू शकता. या सभा सर्वांसाठी आहेत आणि तिथे वर्गणी घेतली जात नाही.
इतर बायबल तत्त्वं:
बायबलचा अभ्यास का करावा? हा व्हिडिओ jw.org/mr या वेबसाईटवर पाहा. हा व्हिडिओ ८८० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे
तुम्ही देवाला जाणून घेणं आणि त्याच्या मार्गदर्शनाचं पालन करणं गरजेचं आहे.
“जे आपली आध्यात्मिक गरज ओळखतात ते सुखी आहेत.”—मत्तय ५:३.
देवाबद्दल आणखी शिकून घ्या.
“देवाचा शोध घ्यावा आणि . . . त्याला प्राप्त करून घ्यावं. मुळात, तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.”—प्रेषितांची कार्ये १७:२७.
बायबल वाचा आणि त्यातल्या माहितीवर विचार करा.
तो “परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो . . . आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.”—स्तोत्र १:२, ३.