इतिहासातलं सर्वात उपयोगी पुस्तक
आजपर्यंत सर्वात जास्त भाषांतरीत आणि वितरित झालेलं पुस्तक म्हणजे बायबल. ते वाचल्यामुळे आणि त्यामध्ये दिलेल्या सुज्ञ सल्ल्यांचं पालन केल्यामुळे बऱ्याच लोकांना फायदा झाला आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात इतर कोणत्याही पुस्तकामुळे लोकांना फायदा झालेला नाही. आता आपण काही आकडेवारी पाहू या.
बायबलचं भाषांतर आणि वितरण
९६.५% जगातली लोकसंख्या बायबल वाचू शकते
३,३५० भाषांमध्ये बायबल उपलब्ध आहे (पूर्ण किंवा काही भाग)
जवळपास ५०० कोटी बायबलच्या प्रती छापण्यात आल्या आहेत; आजतोवर इतर कुठल्याही पुस्तकाच्या इतक्या प्रती छापण्यात आल्या नाहीत
अधिक माहिती मिळवा
jw.org/mr या आमच्या वेबसाईटला भेट द्या. तिथे:
ऑनलाईन बायबल वाचा (अनेक भाषांमध्ये उपलब्ध)
बायबलची प्रत डाउनलोड करा
बायबलसंबंधित प्रश्नांची उत्तरं मिळवा
बायबलमुळे अनेकांचं जीवन कसं सुधारलं आहे याबद्दलचे लेख वाचा
ऑनलाईन बायबल अभ्यासाचा कोर्स कराa
यहोवाच्या साक्षीदारांनी तुमच्यासोबत बायबल अभ्यास करण्यासाठी विनंती करा
यहोवाचे साक्षीदार आणि बायबल
यहोवाचे साक्षीदार बायबलचं भाषांतर आणि वितरण कार्यात सक्रियपणे सहभाग घेतात.
गेल्या अनेक वर्षांत त्यांनी न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन या भाषांतरासोबत इतर अनेक बायबलच्या भाषांतरांचंही वितरण केलं आहे.
न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन
१८० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध (पूर्ण किंवा काही भाग)
२२,७०,००,००० १९५० सालापासून छापलेल्या न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन या भाषांतराच्या प्रती
a सध्या इंग्रजी आणि पोर्तुगीझ भाषेत उपलब्ध. भविष्यात आणखी भाषांमध्ये उपलब्ध होतील.