वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ५/८ पृ. ३१
  • त्यांच्याबद्दल काळजी व्यक्‍त करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्यांच्याबद्दल काळजी व्यक्‍त करा
  • सावध राहा!—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • आत्महत्या—तरुणांवर शाप
    सावध राहा!—१९९८
  • आत्महत्या—साथीचा अदृश्‍य रोग
    सावध राहा!—२०००
  • ख्रिस्ती कुटुंब वयस्करांना मदत देते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • वेगळे राहात असले तरी त्यांना विसरलो नाही
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ५/८ पृ. ३१

त्यांच्याबद्दल काळजी व्यक्‍त करा

कॅनडामधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

अलीकडील काळात कॅनडातील बरेचसे वयस्कर लोक अनामिक मनोवेदनेपायी आत्महत्या करत असून हे प्रमाण खरोखर झोप उडवणारे आहे. व्हँकूव्हर सन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार कॅनडामध्ये, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्‍या २०० तरुणांपैकी केवळ एकाचाच मृत्यू होतो; पण वयाची पासष्टी ओलांडलेल्या आणि आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्‍या दर ४ वृद्धांपैकी एकाचा मृत्यू होतो. याशिवाय, “वयस्कर लोकांमधील आत्महत्येची आणखीन बरीचशी प्रकरणे उघडकीस येत नाहीत; कारण गंभीर रोगांनी ग्रासलेल्या या वयस्करांचा मृत्यू नैसर्गिक होता की त्यांनी खरोखर आत्महत्या केली हे जाणणे इतके सहजसोपे नसते.”

पण, आज अनेक वयस्कर लोक जगण्याची ऊर्मी का गमावत आहेत? ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील मनोविकार तज्ज्ञ आणि वयस्कर लोकांमधील आत्महत्या या विषयावरील तज्ज्ञ ओल्यूवाफेमी आगवेयावा यांच्या मते नैराश्‍य, सामाजिक एकलकोंडेपणा आणि एकाकीपणा ही आत्महत्येची प्रमुख कारणे आहेत. कॅलगारी, अल्बेर्टा येथील आत्महत्या माहिती आणि शिक्षण केंद्राचे संचालक गेरी हॅरिंगटन म्हणतात की, “वयानुसार लोक आपला दबदबा, चार लोकांत असलेले आपले वजन आणि अधिकार गमावून बसतात . . . अचानक त्यांच्या जीवनात अशी एक वेळ येते जेव्हा त्यांच्या शब्दाला किंमत राहात नाही. परिणामस्वरूप, अनेक वयस्कर लोक वृद्धाश्रमात येऊन पडतात; तिथेही पत्ते खेळणे, टीव्ही पाहणे यांशिवाय दुसरा कोणताच उद्योग ते करत नसतात.” त्यांच्या या मनोदशेत भर पाडणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे, हल्लीचा समाज तरुण पिढीला आणि नेमके वयानुसार ऱ्‍हास पावणाऱ्‍या लक्षणांनाच अर्थात स्वातंत्र्य, उत्पादनक्षमता आणि वेग यांस नको तितके महत्त्व देतो.

पण, यहोवा परमेश्‍वराला मात्र हे वयस्कर लोक प्राणप्रिय आहेत. तो संवेदनशील असून त्याला त्यांच्या भावनिक गरजा समजतात; ही गोष्ट त्याने प्राचीन इस्राएल राष्ट्राला दिलेल्या आज्ञेतून स्पष्ट होते: “पिकल्या केसासमोर उठून उभा राहा; वृद्धाला मान दे; आपल्या देवाचे भय बाळग.”—लेवीय १९:३२.

तर मग, आपण वयस्कर लोकांना ‘मान कसा देऊ’ शकतो? कदाचित त्यांच्या मुखातून नेहमीच सुविचार निघणार नाहीत किंवा वय होते तसे ते अधिकच चुकतील. पण, त्याचा अर्थ त्यांचा आदरसन्मान केला जाऊ नये असा होत नाही. उलट, त्यांच्याबद्दल तुम्हाला आत्मीयता वाटते हे दाखवा. त्यांच्या समजबुद्धीचा उपयोग करून त्यांचा आदरसन्मान करा; आणि जर त्यांनी देवाच्या पवित्र आत्म्यानुसार तसेच त्याच्या वचनानुसार आपले जीवन व्यतीत केलेले असेल तर विशेषकरून असे करा.

वृद्धांची काळजी वाहणे आणि त्यांचा आदरसन्मान करणे याबद्दल देवाचे वचन एवढेच शिकवत नाही. सदर विषयावर अधिक माहिती हवी असल्यास कृपया या नियतकालिकाच्या प्रकाशकांना पत्र लिहून कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे पुस्तक मागवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा