“सार्वकालिक जीवनाचा एकमेव मार्ग”—या विनामूल्य जाहीर व्याख्यानास तुमचे स्वागत आहे
जवळजवळ २० वर्षांपूर्वी डॉ. ऑल्विन सिल्व्हरस्टाइन यांनी मृत्यूवर विजय (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात लिहिले: “आम्ही जीवनाचे परमसत्य शोधून काढू. माणूस वयोवृद्ध कसा होतो . . . हे आम्ही जाणून घेऊ.” त्यांनी असेही भाकीत केले की, “मृत्यूवर विजय मिळवून देणारे ज्ञान, चिरतारुण्यही बहाल करणार असल्यामुळे कोणीही ‘वृद्ध’ असणार नाहीत.”
अगदी अलीकडे, सप्टेंबर २८, १९९७ च्या द न्यूयॉर्क टाईम्स मॅग्झीनमधील एका लेखाने, आधुनिक तंत्रज्ञानाच्या संभाव्य शक्तीविषयी विशेष रस असलेल्या व आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्या अनेकांच्या “जीवन विस्तार” आशावादावर एक अहवाल सादर केला. यात विशेष रस असलेल्या एका व्यक्तीने म्हटले: “आपली पिढी, सर्वकाळ जगणारी पहिलीच पिढी असेल असा माझा खरोखरच विश्वास आहे.” तर दुसऱ्या एकाचा, “वृद्धापकाळाला खिळ बसवून, आणि कदाचित तो उलटवून देखील [या पिढीला] वाचवण्याचे जननशास्त्र विस्तार तंत्र लवकरात लवकर उपलब्ध होईल असा सुखकारक विश्वास असल्याचे” सांगण्यात आले. असा आशावाद तुम्हास चकित करतो का?
मानव आपल्या तंत्राद्वारे मृत्यूवर विजय मिळविल असा तुमचा विश्वास आहे का? की अनंतकाल जगण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे? जगभरातील लक्षावधी लोकांची खात्री झाली आहे, की सार्वकालिक जीवन खरोखरच सत्यात उतरेल. पण ते कसे, हे जाणून घेण्यासाठी, “ईश्वरी जीवनाचा मार्ग” या प्रांतीय अधिवेशनात दिल्या जाणाऱ्या, “सार्वकालिक जीवनाचा एकमेव मार्ग” या स्फूर्तिदायक व्याख्यानाचे आमंत्रण स्वीकारा. या महिन्याच्या सुरवातीपासून जगभरात शेकडो ठिकाणी होणार असलेल्या या अधिवेशनांत दिले जाणारे हे व्याख्यान, तुम्हाला जवळ पडेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऐकू शकता.
तुम्हाला सगळ्यात जवळ असेल अशा अधिवेशन स्थानाची माहिती मिळविण्यासाठी स्थानिक यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा अथवा या नियतकालिकाच्या प्रकाशकांना पत्र लिहा.