वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ११/८ पृ. ३०
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हिंसक प्रवासी
  • अपस्माऱ्‍यांसाठी श्‍वान साह्‍य
  • वैद्यकीय पद्धतीचा “तारुण्याचा झरा” नाही
  • पाककला—लुप्त होत चाललेली कला?
  • पूर्ण वाढ झालेल्या सस्तन प्राण्याचे पहिले क्लोन (प्रतिरूप)
  • बालपणातील दम्याचा संबंध झुरळांशी
  • मोटार अपघात तुम्ही सुरक्षित आहात का?
    सावध राहा!—२००२
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा! माहितीपत्रक १३-४ (gbr13-4)
सावध राहा!—१९९७
g97 ११/८ पृ. ३०

जगावरील दृष्टिक्षेप

हिंसक प्रवासी

व्यापारी एअर लाईन्स, क्रोधिष्ट प्रवाशांच्या हिंसक वागणुकीत झपाट्याने वाढ झाल्याचा अहवाल देतात. द न्यू यॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, विलंबित उड्डाणांमुळे व सामानसुमान गहाळ झाल्यामुळे अस्वस्थ झालेले प्रवासी “उड्डाण परिचरांवर थुंकतात, जेवणाचे ट्रे भिरकावतात तर कधी कर्मचाऱ्‍यांवर हातही उचलतात. वेळप्रसंगी, ते वैमानिकांवर देखील हल्ला करतात.” चालू विमानांमध्ये घडणाऱ्‍या अशा हल्ल्यांमुळे विमान दुर्घटना होऊ शकतात, त्यामुळे अधिकारी विशेषतः चिंतातूर झाले आहेत. एक एअर लाईन प्रत्येक महिन्याला, शाब्दिक अथवा शारीरिक हल्ल्यांच्या जवळजवळ १०० प्रकरणांचा अहवाल देते. द टाईम्स म्हणते की, “हे विघातक प्रवासी, पुरुष आणि स्त्रिया अशा दोन्ही गटांतील, विभिन्‍न जातींतील, विविध वयोगटांतील, तसेच आर्थिक, व्यावसायिक किंवा चक्क उच्च वर्गातील असून, ते एकसारखेच उपद्रवी असतात. प्रत्येक तीन जणांपैकी एक जण दारू पिऊन तर्र झालेला असतो.”

अपस्माऱ्‍यांसाठी श्‍वान साह्‍य

इंग्लंडमध्ये, अपस्मार पीडितांना संभवनीय अपस्मार झटक्याची पूर्वसूचना देण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षित केले जात आहे. लंडनच्या द टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, यामुळे झटका येण्याआधी तयार राहण्यास रुग्णाला पुरेसा वेळ मिळू शकेल. अपंगांना मदत करण्यास कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यात तज्ज्ञ असणाऱ्‍या एका धर्मार्थ संस्थेच्या व्यवस्थापिका असा खुलासा करतात: “अपस्माराच्या झटक्याच्यावेळी भुंकण्यासाठी कुत्र्याला बक्षीस दिल्याचा परिणाम, झटका येण्याच्या काही वेळेपूर्वीच पीडित व्यक्‍ती प्रकट करत असलेले संकेत व लक्षणे कुत्रा ग्रहण करू लागला आहे. अशा प्रतिसादामुळे प्रतिफळ दिले जाईल याची जाणीव असल्यामुळे, ह्‍या संकेतांसंबंधी कुत्रा अधिकच संवेदनाक्षम बनतो.”

वैद्यकीय पद्धतीचा “तारुण्याचा झरा” नाही

वार्धक्याचे शास्त्रज्ञ, ऑन्ड्रेया प्रॉटेस यांच्या मतानुसार, तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या संप्रेरकांसारखी फॅड औषधे घेतल्याने “थोडाफार फायदा होण्याची शक्यता असली तरी त्यांमुळे तुमच्या आरोग्याला मोठी हानी पोहंचण्याची शक्यता आहे.” वार्धक्याविरुद्धच्या संघर्षात, “नवीन औषधांपेक्षा, नवीन सवयीच अधिक प्रभावकारी असतात,” असा डॉ. प्रॉटेस यांचा सल्ला आहे. ब्राझीलचे सुपरइन्टरेस्सेन्टी नियतकालिक अशी नोंद करते, की दीर्घायुषी बनविणाऱ्‍या उत्तम सवयींमध्ये, पुरेशी झोप घेणे, मन शांत ठेवणे, हातपाय ताणणे तसेच माफक प्रमाणात व्यायाम करणे, मानसिकरित्या स्वतःस उद्युक्‍त ठेवणे व स्निग्ध पदार्थ कटाक्षाने टाळणे, या गोष्टीही समाविष्ट आहेत. फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये असलेली जीवनसत्त्वे व खनिज पदार्थ सेवन करणेही महत्त्वपूर्ण आहे. वार्धक्यामध्ये सर्व पेशी अंतर्भूत असल्याकारणाने केवळ एकाच पदार्थामुळे, एकाच वेळी शरीराच्या विभिन्‍न अवयवांना फायदा होऊ शकत नाही.

पाककला—लुप्त होत चाललेली कला?

ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्यात, खाण्याच्या सवयींवर केलेल्या वर्षभराच्या अभ्यासानुसार, पाककला एक लुप्त कला होण्याची संभावना आहे. द कोरियर मेलने दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षे वयोमानाखालील अधिकतर लोकांपाशी, आपले स्वतःचे अन्‍न शिजवण्याइतकी देखील आवश्‍यक कला नसते. सार्वजनिक आरोग्य व्याख्यात्या व अभ्यासाच्या लेखिका मार्गारेट विनेट म्हणाल्या, की पूर्वी तरुण लोक—खासकरून मुली—घरच्या घरीच आपल्या मातांकडून अथवा शाळेमध्ये, स्वयंपाक शिकत असत. परंतु, सध्या असे दिसून येते, की अनेक तरुणांना व मुलींना देखील स्वयंपाक येत नाही व तो शिकून घेण्यातही त्यांना काही रस असल्याचे दिसत नाही. अनेक लोक, पॅक केलेले भोजन अथवा फास्ट फुड्‌सं अधिक पसंत करतात. काहींना असे वाटते की, अशा आहार सवयींमुळे हायपरटेन्शन, मधुमेह व हृदयरोग यांत कदाचित वाढ होऊ शकेल.

पूर्ण वाढ झालेल्या सस्तन प्राण्याचे पहिले क्लोन (प्रतिरूप)

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस, स्कॉटलँडमधील संशोधकांनी, पूर्ण वाढ झालेल्या मेंढीच्या डीएनएपासून एक प्रतिरूप मेंढी निर्माण केल्याची घोषणा करून साऱ्‍या जगाला हादरवून टाकले. कित्येक वर्षांपासून गर्भपेशीचे क्लोन करण्यात आले असले तरी, पूर्ण वाढ झालेल्या सस्तन प्राण्यापासून आनुवंशिक जुळे तयार करणे अशक्य कोटीतील बाब असल्याचे आतापर्यंत तरी अनेक शास्त्रज्ञांना वाटत होते. संशोधकांनी म्हटले, की तत्त्वज्ञानात हेच तंत्र मानवासंबंधी देखील लागू केले जाऊ शकते—म्हणजे तरुण, पण आनुवंशिकरित्या साधर्म्य जुळे निर्माण करण्यासाठी एखाद्या प्रौढ व्यक्‍तीच्या पेशीतील डीएनएचा उपयोग केला जाऊ शकतो. तथापि, इन्टरनॅशनल हेरल्ड ट्रिब्यूनच्या मते, हा प्रकल्प राबवणारे शास्त्रज्ञ इयान विल्मट, यांना मात्र ही कल्पना नैतिकदृष्ट्या स्वीकृत वाटत नाही. द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन यात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार जागतिक आरोग्य संघटना, मानवाच्या क्लोनिंगचा, ‘एक अतिरेकी स्वरूपाच्या प्रयोग’ म्हणून विरोध करून आपले एकमत दर्शवते.

बालपणातील दम्याचा संबंध झुरळांशी

न्यू यॉर्क डेली न्यूजच्या अहवालानुसार, शहरातील केंद्रस्थानी राहणाऱ्‍या मुलांमध्ये दम्याचा वाढता प्रादुर्भाव झुरळांमुळे होत असल्याचे यु.एस. नॅशनल इंस्टिट्यूट्‌स ऑफ हेल्थसाठी केलेल्या पाच वर्षांच्या अभ्यासात आढळून आले. सात देशांत अभ्यासिलेल्या १,५२८ दमाग्रस्त मुलांपैकी ३७ टक्क्यांना झुरळांची तीव्र ॲलर्जी होती. ज्यांना ही ॲलर्जी होती व त्यांच्या बेडरूममध्ये देखील भरमसाट झुरळे होती अशांना, इतर दमाग्रस्त मुलांच्या तुलनेत रुग्णालयात दाखल करण्याची गरज तीनपट असल्याची संभावना होती. अभ्यासाचे मुख्य, डॉ. डेवीड रोसेन्सट्राईक यांनी, झुरळ पिंजरा, जंतुनाशके व बोरिक ॲसिड वापरून तसेच स्वच्छता राखून झुरळांचा नाश करण्याचा आर्जव केला. त्यांनी असेही म्हटले की, संपूर्ण घरात व्हॅक्यूम क्लिनरचा वापर केल्यामुळे धुळीत असलेली झुरळांची विष्टा नाहीशी करण्यास मदत होते. डॉ. रोसेन्सट्राईक यांनी पुढे म्हटले की, “झुरळांना आकृष्ट करतील असे अन्‍न पदार्थ अथवा पाणी त्यांच्यापासून दूर ठेवावे, विशेषतः पाण्याची गळती किंवा स्रवणे. याचे कारण पाण्यावरच झुरळांचा निभाव होत असतो.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा