वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ११/८ पृ. ३१
  • आमच्या वाचकांचे मनोगत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या वाचकांचे मनोगत
  • सावध राहा!—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९६
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९७
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९८
सावध राहा!—१९९७
g97 ११/८ पृ. ३१

आमच्या वाचकांचे मनोगत

जिवलग स्नेही स्थलांतर करतो “तरुण लोक विचारतात . . . माझ्या जिवलग स्नेह्‍याने स्थलांतर का केले?” (जानेवारी ८, १९९७) या लेखासाठी मी मनापासून कृतज्ञता व्यक्‍त करू इच्छिते. तो लेख अतिशय समयोचित होता. लवकरच, माझी एक मैत्रीण स्थलांतर करणार आहे; ती आणि तिचे पती, प्रचारकांची अधिक गरज असलेल्या एका मंडळीत सेवा करण्यास जाणार आहेत. याबद्दल मी खूष असले तरी, मला तीव्रपणे तिची उणीव भासणार हे मला ठाऊक आहे. तुमच्या उत्कृष्ट सल्ल्यासाठी आभारी आहे.

आर. ए., इटली

आमचे प्रांतीय पर्यवेक्षक, प्रवासी सेवक एका नवीन क्षेत्रात सेवा करण्यासाठी आम्हाला सोडून गेले, तेव्हा या लेखानं मला किती हेलावून सोडलं याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. माझ्या आध्यात्मिक व भावनिक गरजांसंबंधी त्यांनी माझी किती काळजी वाहिली होती. त्या लेखातील चित्रात दाखवलं आहे त्याप्रमाणेच, निरोप देणं हा खरोखरच एक दुःखद प्रसंग होता. तुम्ही दिलेल्या सूचना किती समयोचित आहेत कारण एकाकीपणाशी झुंजण्यास त्या मला मदत करत आहेत.

जे. डी., नायजेरिया

सहिष्णुता मी २२ वर्षांचा आहे आणि “सहिष्णुता—जगाने याबाबतीत कहर केला आहे का?” (फेब्रुवारी ८, १९९७) या श्रृंखलेसाठी मी तुमचे आभार मानू इच्छितो. तरुण ख्रिश्‍चनांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. या लेखांनी मला, विकोपास न जाण्याचं उत्तेजन दिलं, तसंच जगिक दबाव आले असतानाही यहोवाची सेवा करत राहण्याचा माझा निर्धार पक्का केला.

एम. बी., इटली

स्वयंपाकघरातील मजा “स्वयंपाकघर मजेचे ठिकाण असू शकते” (फेब्रुवारी ८, १९९७) या लेखासाठी आभारी आहे. स्वयंपाकघरातील संभाषणांपासून मलाही फायदा झाला आहे. कांदे, बटाटे सोलताना माझी आई मला यहोवावर प्रेम करण्याविषयी शिकवायची तसंच जिवाभावानं त्याची सेवा करण्याचं उत्तेजनही द्यायची. स्वयंपाकघरातील ही संभाषणं विशेषकरून एका खडतर काळात, म्हणजे माझ्या बाबांनी धार्मिक गोष्टीसाठी आमचा विरोध केला त्याकाळी अतिशय मोलाची ठरली. माझे बाबा यहोवाचे सेवक बनल्याचं पाहून मला आणि माझ्या आईला आता आनंद होत आहे. तसंच, अनेक चविष्ट पदार्थ बनविण्याचंही मी शिकले आहे!

ए. एम. एम., इटली

मी एका मनोरंजन इंडस्ट्रीच्या मालकाच्या घरात स्वयंपाकीण म्हणून काम करते. त्यामुळंच स्वयंपाकघरात काम करत असताना, येणाऱ्‍या पाहुण्यांना तसंच काही नामवंत कलाकारांना देखील आध्यात्मिक अन्‍न देण्याच्या अनेक संधी मला मिळाल्या. स्वयंपाकघराच्या ड्रॉवरमध्ये मी काही बायबल साहित्य ठेवत असते. एकदा एका पाहुण्याबरोबर बायबलची चर्चा रंगली. नंतर, आणखीन चर्चा करण्यासाठी तो पुन्हा स्वयंपाकघरात आला. मी चिकन तळण्यात व्यस्त असताना त्यानं, प्रकटीकरण—त्याचा भव्य कळस जवळ आहे! या माझ्या पुस्तकातून मोठ्यानं काही वाचलं. होय, तुम्ही म्हणालात ते सत्यच आहे. स्वयंपाकघर मजेचे ठिकाण असू शकते!

ए. आर., संयुक्‍त संस्थाने

पाप कबूल करणं मी एका मंडळीत वडील म्हणून कार्य करत आहे, आणि “तरुण लोक विचारतात . . . मी माझं पाप कबूल करावं का?” (फेब्रुवारी ८, १९९७) या लेखासाठी मी कृतज्ञता व्यक्‍त करू इच्छितो. काही काळापूर्वी केलेली गंभीर पातके कबूल करण्यासाठी या लेखानं अनेक युवकांना प्रवृत्त केलं. प्रेमळ मदत मिळाल्यानंतर या युवकांनी पुन्हा एकवार यहोवाबरोबर आपला नातेसंबंध प्रस्थापित केला, हे पाहणं खूप सुखकारक होतं. स्वतःस शुद्ध ठेवण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.

ओ. बी., इटली

या लेखानं मला याची जाणीव करून दिली की मूग गिळून बसणं अत्यंत घातक असू शकतं. आपले पाप कबूल केल्यानं लाज व शरम वाटेल हे खरं आहे, पण मग तुम्ही यहोवाजवळ आणि तुमच्या पालकांजवळ आपलं पाप कबूल करता तेव्हा त्यांच्यासोबतचा तुमचा नातेसंबंध अधिक बळकट व घनिष्ठ झाल्याचं तुम्ही अनुभवता.

बी. के., गियाना

मला गरज होती अगदी अशाच वेळी हा लेख आला. मी जे काही केलं होतं ते मी माझ्या आईबाबांच्या व मंडळीतील वडिलांच्या कानावर घातलंच पाहिजे हे समजण्यास त्या लेखानं माझी मदत केली. मला असं वाटलं, जणू तो लेख खास माझ्यासाठीच लिहिला गेला होता. शेवटी मी त्यांना माझ्या समस्या सांगितल्या तेव्हा मला किती हलकं हलकं वाटलं!

ए. ए., संयुक्‍त संस्थाने

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा