वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 २/८ पृ. ३०
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आनंदी राहा—आणि निरोगी व्हा!
  • मुलांची आवड-नावड
  • निवड तुमची
  • “चीनमधील वृद्धांची लोकसंख्या”
  • बालमजूर —वाढती समस्या
  • दांडगाई करण्यात गैर काय?
    सावध राहा!—१९९७
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९९
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९८
  • मी त्रास देणाऱ्‍यांचा सामना कसा करू शकतो?
    तरुणांच्या मनात येणाऱ्‍या १० प्रश्‍नांची उत्तरं
सावध राहा!—१९९७
g97 २/८ पृ. ३०

जगावरील दृष्टिक्षेप

आनंदी राहा—आणि निरोगी व्हा!

“विनोदी राहून लोक जास्त सहनशील बनतात, निराश्‍याचा योग्यप्रकारे सामना करू शकतात आणि शारीरिक तसेच मानसिक आरोग्यही राखू शकतात,” असे साउं पाऊलु विद्यापीठाच्या प्राध्यापिका सुली डॉमरज्यॉन म्हणतात. ओ एस्टॉडो द साउं पाउलु या ब्राझील वृत्तपत्राच्या एका अहवालानुसार, उत्तम विनोदबुद्धी लिहिण्यावाचण्याप्रमाणे शिकता येऊ शकते. स्पष्टतः, याचा अर्थ चिडचिड्या व्यक्‍तीला निश्‍चितच आपल्या विचारसरणीत बदल करावा लागेल. मानसशास्त्राच्या प्राध्यापिका रॉकल रॉड्रीगस केरबाऊई म्हणतात: “जग नीतिमान बनल्यावरच आपल्याला आनंदी राहता येईल असा कोणाचा विचार असल्यास, ती व्यक्‍ती नेहमीसाठी चिडखोरच राहील. अन्याय कुठं नाही?” नेहमी व्यग्र असूनही, हसत्याखेळत्या स्वभावाच्या लोकांना इतरांमध्ये मिळूनमिसळून राहायला आवडते, असे तो अहवाल म्हणतो. त्यांना “थोड्या गप्पा, एखादे चॉकलेट किंवा पाच मिनिटांचे सुरेल संगीत” अशा किरकोळ गोष्टींचे सुद्धा महत्त्व वाटते.” परंतु, डॉमरज्यॉन असा इशारा देतात: “विनोदबुद्धी म्हणजे थिल्लरपणा किंवा अश्‍लीलता नव्हे बरं का?”

मुलांची आवड-नावड

मुलांना अगदीच आवडत नाहीत अशा कोणत्या गोष्टी आहेत? मिलान विद्यापीठ, इटली येथील प्राध्यापक गुस्तावो पियत्रोपोली शॉरमेट यांच्या ६ ते ११ वयोगटातील मुलांच्या अभ्यासात, बहुतांश मुले म्हणाली: “घरी बसून टीव्ही पाहणे,” किंवा “आईबरोबर बसून गृहपाठ करणे.” ला रिपब्लिका या वृत्तपत्रानुसार, “ठिकठिकाणी जाणे,” म्हणजेच, डान्सिंग क्लास, इंग्रजीचा क्लास, पियानो वगैरे क्लासेससाठी धावपळ करणे ही सर्वात नावडती गोष्ट आहे. तसेच “एकटे राहणे” देखील सहसा त्यांना आवडत नसते. दुसऱ्‍या बाजूला पाहता, ४९ टक्के मुलांना, आईवडिलांनी त्यांना “घराबाहेर खेळू द्यावे” तर मुलींना, आपल्या आईवडिलांनी “आपल्यासोबत खेळावे” असे वाटते. या मुली म्हणतात: ‘आई माझ्याबरोबर खेळते तेव्हा तिला खेळायचं सोंग करावं लागतं. मग तिला खरंच मजा येतेय की नाही हे लगेच कळतं आणि मग मला सुद्धा खेळायला मजा येत नाही.’

निवड तुमची

“तुमच्या वर्षाची वाईट सुरवात झाली आहे का?” असा प्रश्‍न नवीन वैज्ञानिक (इंग्रजी) या नियतकालिकातील एका लेखाने विचारला. “चिंता करू नका, जगभरात किमान १४ इतर नवीन वर्षे आहेत, पाहिजे ते निवडा.” खरे म्हणजे, ज्या राष्ट्रांनी ग्रेगरियन कॅलेंडर स्वीकारले आहे केवळ त्यांच्यासाठीच जानेवारी १ हा वर्षाचा पहिला दिवस असतो. सा. यु. पू. ४६ मध्ये ज्युलियस सिझरने, कॅलेंडर वर्षांची सुरवात जानेवारी १ रोजी होईल असे ठरवले होते आणि पोप ग्रेगरी यांनी १५८२ मध्ये ही दिनदर्शिका सुधारली तेव्हा तीच पद्धत ठेवण्यात आली. वेगवेगळ्या परंपरांनी आपापल्या कॅलेंडरच्या पद्धती काढल्या तशा किमान २६ नवीन वर्षांचे दिवस निघाले. त्यांपैकी आज हयात असलेली सर्वात जुनी पद्धत म्हणजे चिनी पद्धत. त्यांच्यानुसार, या वर्षी फेब्रुवारी ७ तारखेला त्यांचे नवीन वर्ष सुरू होते. ज्युईश न्यू इयर ऑक्टोबर २ तारखेला असेल. त्याचप्रमाणे, संपूर्णतः मुस्लिम चांद्र दिनदर्शिकेतही वेगळीच तारीख असेल.—मे ८.

“चीनमधील वृद्धांची लोकसंख्या”

“चीनमधील वृद्धांची लोकसंख्या एकसारखी वाढत आहे,” असे वृत्त चायना टुडे हे नियतकालिक देते. “सन १९९४ च्या समाप्तीपर्यंत चीनमध्ये, ६० पेक्षा अधिक वयाचे ११,६९,७०,००० वयस्कर लोक होते, ही १९९० मधील संख्येपेक्षा १४.१६ टक्के वाढ आहे.” ६० पेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या आता देशातील लोकसंख्येच्या १० टक्के आहे आणि या वयस्करांची संख्या एकूण लोकसंख्येपेक्षा जवळजवळ तीन पटीने वाढत आहे. त्यांची काळजी कशी घेतली जाते? पगार, पेन्शन, सामाजिक विमा आणि मदत कार्यांद्वारे बहुतांश लोकांची काळजी घेतली जाते, तर चीनच्या ५७ टक्के वयस्करांचा सांभाळ त्यांचीच मुले किंवा नातेवाईक करतात. “चीनमध्ये कौटुंबिक नातेसंबंध तुलनात्मकरित्या स्थिर असल्यामुळे आणि चीनमध्ये वयस्करांचा आदर करण्याची व त्यांचा चांगला सांभाळ करण्याची उत्तम प्रथा असल्यामुळे बहुतांश वयस्कर लोक आपल्या नातेवाईकांसोबत राहतात आणि त्यांची चांगली देखभाल केली जाते,” असे चायना टुडे म्हणते. “चीनमधले फक्‍त ७ टक्के वृद्ध लोक एकटेच राहतात.”

बालमजूर —वाढती समस्या

आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या अलीकडील अहवालानुसार, जगामध्ये १० ते १४ वयोगटातील १३ टक्के मुलांना, म्हणजेच ७.३ करोड मुलांना काम करणे भाग पडते. हे वृत्त पुढे असे म्हणाले, की जर दहा वर्षांखालील मुलांची आणि पूर्ण समय घरकाम करणाऱ्‍या मुलींची आकडेवारी असती, तर जगातल्या बालमजुरांची संख्या कदाचित कोट्यवधीत जमा झाली असती. जिनेव्हा येथील संघटना, गेल्या ८० वर्षांपासून बालमजुरीविरुद्ध प्रतिरोध करण्याचा प्रयत्न करत असली, तरी ही समस्या अधिकाधिक वाढत आहे, विशेषतः आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या देशांमध्ये. गुलामी आणि घातक कामाच्या परिस्थिती या कोट्यवधी मुलांच्या वाट्याला तर येतातच, पण वेश्‍याव्यवसाय ही एक विशिष्ट समस्या असल्याचे सांगण्यात आले होते. काही देशांमध्ये “[एचआयव्ही]ची लागण होऊ नये म्हणून प्रौढांना लैंगिक उपभोगांसाठी लहान मुले सुरक्षित वाटतात,” असे या अहवालाने सांगितले. पॅरिसच्या इंटरनॅशनल हेरल्ड ट्रिब्यूनने म्हटले, की त्या संघटनेने “सरकारी अधिकाऱ्‍यांच्या हलगर्जीपणामुळे . . . त्यांच्यावरच आरोप लावला.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा