वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 २/८ पृ. १८-१९
  • पृथ्वी अग्नीने भस्म होईल काय?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पृथ्वी अग्नीने भस्म होईल काय?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देव काळजी वाहतो का?
  • “पहिली पृथ्वी”
  • “नवी पृथ्वी”
  • पृथ्वीचा कधी नाश होईल का?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • पृथ्वी
    सावध राहा!—२०१५
  • “जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
सावध राहा!—१९९७
g97 २/८ पृ. १८-१९

बायबलचा दृष्टिकोन

पृथ्वी अग्नीने भस्म होईल काय?

आण्विक स्फोटात जळून राख होईल, सूर्य विस्तारल्यामुळे ती भस्म होईल किंवा क्रोधित देव तिला होरपळून टाकील—नाशाचा प्रकार वेगळा असला तरीपण अनेक लोकांचा असा ठाम विश्‍वास आहे की, मानवजातीचे घर म्हणजेच पृथ्वी ग्रह आकस्मिक संकटाने ग्रासला जाऊन बेचिराख होईल.

काहीजण तर, ईश्‍वर-निर्देशित अग्नीचे वर्णन देत असलेली बायबल वचने दाखवून मानवजातीने पृथ्वीविरुद्ध केलेल्या नासधूसीबद्दल तो दंड आहे असे सांगतात. ऑस्ट्रेलिया येथील ॲडीलेड विद्यापीठाचे प्राध्यापक, पॉल डेवीस यांनी, पृथ्वीने स्वतःवर अनिवार्य अग्निमय नाश ओढवून घेतला आहे असे जे आपले मत लिहून ठेवले तेच इतरजण व्यक्‍त करतात. शेवटली तीन मिनिटे (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात ते असा अंदाज लावतात: “सूर्याचा आकार मोठा होईल तसे तो पृथ्वीला आपल्या अग्निमय आवरणात व्यापून टाकील. आपला ग्रह जळून राख होईल.” पृथ्वीच्या भवितव्याविषयी काय सत्य आहे? ज्या बायबल वचनांवरून अग्निमय नाश सूचित होत असल्याचे भासते त्या वचनांचा अर्थ कसा काढावा?

देव काळजी वाहतो का?

यिर्मया १०:१०-१२ [पं.र.भा.] येथे आपल्याला असे सांगण्यात येते: “यहोवा सत्य देव आहे. . . . त्याने आपल्या शक्‍तीने पृथ्वी निर्माण केली, त्याने आपल्या ज्ञानाने जग स्थापले आणि त्याने आपल्या बृद्धीने आकाशे पसरली.” देवाने पृथ्वी निर्माण केली आणि स्थिर केली. म्हणून, बुद्धी, प्रेम आणि समंजसपणाने त्याने ही पृथ्वी मानवजातीचे अनंतकाळचे सुंदर घर राहावे म्हणून ती काळजीपूर्वक तयार केली.

देवाच्या मानवी निर्मितीबद्दल बायबल असा अहवाल देते: “नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांस आशीर्वाद दिला; देव त्यांस म्हणाला: फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.” (उत्पत्ति १:२७, २८) निर्मिती पूर्ण केल्यावर “सर्व फार चांगले आहे” असे तो बिनदिक्कतपणे म्हणू शकला. (उत्पत्ति १:३१) ती कायम राहावी अशी त्याची इच्छा होती. काही भावी पालक आपल्या अपेक्षित बाळाच्या येण्याची तयारी करतात त्याचप्रमाणे देवाने एक रम्य परिसर तयार करून आदाम या पुरुषाला तेथे त्या परिसराचा विस्तार आणि देखभाल करायला ठेवले.—उत्पत्ति २:१५.

आदामाने परिपूर्णतेकडे आणि पृथ्वीची काळजी घेण्याच्या आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवली. पण निर्माणकर्त्याने आपल्या उद्देशाकडे पाठ फिरवली का? यशया ४५:१८ सांगते की त्याने तसे केले नाही, ते म्हणते: “आकाशाचा उत्पन्‍नकर्ता . . . पृथ्वीचा घडणारा . . . तिची स्थापना [करणारा, त्याने] ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्‍न केली नाही, तर तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली; हा परमेश्‍वर म्हणतो.” (यशया ५५:१०, ११ देखील पाहा.) मानवाने पृथ्वीवर ताबा ठेवण्याच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केले असले, तरी देवाने पृथ्वी आणि तिच्या रहिवाश्‍यांसंबंधीच्या उद्देशाकडे डोळेझाक केली नाही. देवाने प्राचीन इस्राएल राष्ट्राला दिलेल्या नियमशास्त्रात प्रत्येक सातव्या वर्षी, ‘देशाला परमविश्राम मिळावा म्हणून शब्बाथाची’ तरतूद करण्यात आली होती. त्यामध्ये असे करुणामय नियम होते की ज्यांमुळे प्राण्यांना देखील थोडेफार संरक्षण मिळत होते. (लेवीय २५:४; निर्गम २३:४, ५; अनुवाद २२:१, २, ६, ७, १०; २५:४; लूक १४:५) ही बायबलमधली काही उदाहरणे आहेत ज्यांच्यावरून देवाला मानवजातीची आणि मानवाला सोपवलेल्या सर्व गोष्टींची अतिशय काळजी आहे हे स्पष्ट होते.

“पहिली पृथ्वी”

मग, परस्परविरोधी वाटणाऱ्‍या बायबल वचनांमध्ये आपण मेळ कसा बसवू शकतो? तशातले एक वचन म्हणजे, २ पेत्र ३:७; पंडिता रमाबाई भाषांतर येथे असे म्हटले आहे: “आताचे आकाश आणि पृथ्वी ही त्याच शब्दाने, न्याय ठरण्याच्या व अभक्‍तांच्या नाशाच्या दिवसापर्यंत अग्नीसाठी राखून ठेवलेली आहेत.” दुसरे एक वचन म्हणजे, प्रकटीकरण २१:१ जेथे म्हटले आहे: “मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती.”

जर पेत्राच्या शब्दांचा अक्षरशः अर्थ घेतला आणि पृथ्वी ग्रह अग्नीने भस्म होणार असे समजले, तर खरोखरचे आकाश—तारांगण आणि आकाशातील इतर घन पदार्थ देखील—अग्नीने नष्ट होतील. परंतु, हे स्पष्टीकरण, “जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छेप्रमाणे होवो,” असे म्हटलेल्या मत्तय ६:१० आणि “नीतिमान्‌ पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील,” या स्तोत्र ३७:२९ सारख्या शास्त्रवचनांमधल्या खात्रीदायक शब्दांशी खटकते. शिवाय, उष्ण सूर्य आणि ताऱ्‍यांमध्ये सततच आण्विक स्फोट होत राहतात, मग अग्नीचा त्यांच्यावर काय परिणाम होईल?

दुसऱ्‍या बाजूला पाहिल्यास, बायबल “पृथ्वी” ही संज्ञा सहसा लाक्षणिक अर्थाने वापरते. उदाहरणार्थ, उत्पत्ति ११:१ मध्ये म्हटले आहे: “सर्व पृथ्वीची एकच भाषा . . . होती.” येथे, ‘पृथ्वी’ हा शब्द संपूर्ण मानवजातीला किंवा मानवी समाजाला सूचित होतो. (तसेच १ राजे २:१, २; १ इतिहास १६:३१ देखील पाहा.) त्याचप्रमाणे, २ पेत्र ३:५, ६ यातील संदर्भ सुद्धा ‘पृथ्वीचा’ तोच लाक्षणिक अर्थ सुचवतो. तो नोहाच्या काळाला सूचित करतो जेव्हा एक दुष्ट मानवी समाज प्रलयात नष्ट झाला होता पण नोहा आणि त्याचे घराणे त्याचप्रमाणे पृथ्वी सुद्धा बचावण्यात आली होती. (उत्पत्ति ९:११) त्याचप्रमाणे, २ पेत्र ३:७ येथे, ‘अभक्‍त लोक’ नाश होतील असे म्हटले आहे. हा दृष्टिकोन बायबलच्या उर्वरित भागाच्या एकवाक्यतेत आहे. नाशाकरता राखून ठेवलेला दुष्ट समाज, पूर्वी उद्धृत केलेल्या प्रकटीकरण २१:१ येथील ‘पहिल्या पृथ्वीला’ देखील सूचित करतो.

कोणताही काळजी वाहणारा पार्थिव पिता, आपल्या घराचे नुकसान होणार नाही हे निश्‍चित करण्यासाठी ज्याप्रमाणे वाटेल ते पाऊल उचलेल त्याचप्रमाणे यहोवा देवाला देखील आपल्या निर्मितीबद्दल अतिशय चिंता आहे. एकदा, सुपीक जॉर्डन दरीतील अनैतिक आणि दुष्ट लोकांना तेथून घालवून देऊन त्याच्यासोबत करार केलेल्या त्या प्रदेशाच्या नवीन देखभालकर्त्यांना त्याने असे आश्‍वासन दिले की, त्यांनी त्याचे नियम पाळले तर, ‘त्यांच्यापूर्वीच्या राष्ट्राचा जसा ह्‍या देशाने त्याग केला तसा त्यांनी देश भ्रष्ट केल्यास त्यांचा त्याग केला जाणार नाही.’—लेवीय १८:२४-२८.

“नवी पृथ्वी”

आज, लैंगिकरित्या विकृत, हिंसक आणि राजनीतीत भ्रष्ट असणाऱ्‍या समाजाने पृथ्वीला दूषित केले आहे. फक्‍त देवच तिचा बचाव करू शकतो. तो अगदी तेच करणार आहे. प्रकटीकरण ११:१८ येथे तो “पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश” करण्याचे अभिवचन देतो. देवाचे भय असलेले आणि आपल्या सहमानवांवर मनापासून प्रीती करणारे लोक पुनर्स्थापलेल्या आणि नवीन केलेल्या पृथ्वीवर वसतील. (इब्री लोकांस २:५; पडताळा लूक १०:२५-२८.) देवाच्या स्वर्गीय राज्याखाली पृथ्वीचा असा कायापालट होईल की बायबल त्याविषयी सांगताना “नवी पृथ्वी” असा उल्लेख करते, म्हणजेच नवीन मानवी समाज.

स्तोत्र ३७:२९ सारखी शास्त्रवचने वाचल्यावर आणि मत्तय ६:१० येथील ख्रिस्ताचे शब्द समजून घेतल्यावर, आकस्मिक नैसर्गिक शक्‍तींद्वारे किंवा आपल्या नाशकारी शक्‍तीने स्वतः मानव सुद्धा आपला ग्रह बेचिराख करू शकत नाही अशी आपली खात्री पटते. ते देवाचा उद्देश हाणून पाडणार नाहीत. (स्तोत्र ११९:९०; यशया ४०:१५, २६) विश्‍वासू मानवजात सौंदर्याने ओतप्रोत असलेल्या आणि अढळ आनंदी परिस्थितीत पृथ्वीवर वस्ती करील. हेच पृथ्वीच्या भवितव्याबद्दलचे सत्य आहे कारण हाच मानवजातीच्या प्रेमळ निर्माणकर्त्याचा उद्देश आहे आणि आधीपासूनच होता.—उत्पत्ति २:७-९, १५; प्रकटीकरण २१:१-५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा