जगावरील दृष्टिक्षेप
मुले मादक औषधांच्या आहारी का जातात
“आपल्या मुलांना मादक औषधे व मद्यपानाच्या आहारी जाण्यापासून आपण कसे दूर ठेवू शकतो, आणि काही मुलांना इतरांपेक्षा ‘केवळ नाही’ म्हणणे सोपे का जाते?” हे प्रश्न अलीकडेच पालक (इंग्रजी) या नियतकालिकात विचारले होते, ज्यामध्ये अमेरिकेच्या अरिझोना विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात काही अनिश्चित उत्तरे प्राप्त झाली. या अभ्यासामध्ये सहावी तसेच सातवीच्या इयत्तेतील सुमारे १,२०० मुलांचे परीक्षण करण्यात आले, व तो अभ्यास मादक औषधे व मद्याचा दुरुपयोग करण्यास मुलांना प्रभावित करण्याचा संशय असणाऱ्या दहा धोक्याच्या घटकांवर केंद्रित होता. दोन प्रमुख कारणे, “समवयस्कांच्या दबावाला बळी पडणे व मद्य तसेच मादक औषधांचा उपयोग करणारे मित्र असणे” हे होते. दुसऱ्या बाजूला पाहता, शाळेतील संपादणूक संरक्षणात्मक भूमिका पार पाडू शकते असे त्या अभ्यासाने दाखवून दिले—बहुधा यासाठी कारण ते स्वतःविषयीचे चांगले मत सुधारते व पदार्थांचा दुरुपयोग करणाऱ्यांशी क्वचितच मैत्री करण्यास उत्तेजन देते. (g95 9/8)
थरारक गोष्टींचे आकर्षण
“किशोरवयीनांना थरारक गोष्टींचे व्यसन जडले आहे,” असे वृत्त कॅनडाचे द ग्लोब ॲण्ड मेल देते. वृत्तपत्र सांगते की, “थरारक चित्रांची देवाणघेवाण करण्याची कार्डे, गंमतीची पुस्तके, कलाकृती, चित्रपट व संगीत देखील थरारक आहे आणि हे सर्व तरुणांच्या गटांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.” वाचन साहित्यातील अशी धक्कादायक आवड पूर्ण करण्यासाठी एका पुस्तकाच्या प्रकाशकाने किशोरवयीनांकरता थरारक पुस्तकांचे उत्पादन वर्षातून चार वेळ करण्यापासून दर महिन्याला एक प्रकाशित करण्याइतपत वाढवले. इतरांनी दर महिन्याला दोन थरारक पुस्तके प्रकाशित केली. थरारक गोष्टींबद्दल इतके आकर्षण का? शॉन रायन या लेखकाच्या मते, “ऐतिहासिक दृष्ट्या पाहिल्यास, धुसफूस किंवा अशांती असते त्या वेळी थरारक गोष्टी नेहमी लोकप्रिय ठरल्या आहेत.” द ग्लोब नुसार, श्री. रायन म्हणाले: “१९९० च्या दशकात, आपण निश्चितच सरकारबद्दल अतृप्त, दुःखी व गुन्हेगारीबद्दल भयभीत आहोत. अशा वेळी थरारक गोष्टी लोकप्रिय ठरतात.” (g95 9/8)
चांगल्यारितीने हात धुणे
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नियमितपणे हात धुण्याची साधी कृती “सर्दी, फ्लू, घसा सुजणे, पोटाच्या विकृती व अधिक गंभीर आजारांना कारणीभूत असणारे जंतू व विषाणूंचा नाश करण्यास मदतदायक ठरते,” असे वृत्त द टोरोंटो स्टार देते. हे वृत्तपत्र पुढे म्हणते: “मॉन्ट्रियल एपीडेमीयोलॉजिस्ट डॉ. कुल्यो सोटो यांच्या . . . एका . . . अभ्यासानुसार चांगल्यारितीने हात धुतल्याने विषाणूंच्या तसेच सूक्ष्मजंतूंच्या संसर्गजन्य रोगांचा—वरच्या श्वसन संस्थेच्या रोगांत ५४ टक्के व अतिसाराच्या प्रकरणांत ७२ टक्के इतपत फैलाव नाट्यमयरित्या कमी होऊ शकतो.” कॅनेडियन बालरोगचिकित्सा संस्था सुचवते की, वाहत्या पाण्याखाली हात ओले करणे, त्यांना ३० आकडे मोजेपर्यंत साबणाने चोळणे, मग ५ आकडे मोजेपर्यंत वाहत्या पाण्याखाली धुणे व शेवटी, दुसऱ्यांनी न वापरलेल्या स्वच्छ टॉवेलने किंवा कागदी रुमालाने पुसणे किंवा हँड्स-फ्री ड्रायरने सुकवणे हे सर्व चांगल्यारितीने हात धुण्यामध्ये समाविष्ट असले पाहिजे. रेस्टॉरंट, हॉट डॉगच्या टपऱ्या व भोजनगृहे असलेल्या इमारतींमध्ये भोजनाला स्पर्श करणाऱ्यांनी हात धुण्याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची विशेषकरून गरज आहे. (g95 9/8)
गरिबांची दयनीय स्थिती
सामाजिक विकासासाठी जागतिक बोलणी, या कोपेनहेगन, डेन्मार्क येथे अलीकडेच भरवण्यात आलेल्या युएन परिषदेनुसार जगभरात ग्रामीण भागातील गरीब लोक अतिशय कठीण परिस्थितींमध्ये आहेत. एक अरबपेक्षा अधिक लोक अतिशय दारिद्र्यात दिवस काढतात व यांतील निम्म्यापेक्षा अधिक लोक दररोज उपाशी पोटी असतात असे वृत्त त्या सभेत देण्यात आले. बेकारी ही या समस्येत आणखी भर घालते. बेकार किंवा न्यून रोजगार असलेल्या लोकांच्या एकूण संख्येचे अंदाज ८० कोटी इतके अधिक आहेत. सर्वकाही लक्षात घेता, रोजगार दिला जाऊ शकणाऱ्या जगातील एकूण कामगारांच्या सुमारे ३० टक्के लोकांना उपयुक्त नोकऱ्या नाहीत. १.१ अरब ते १.३ अरब लोक दर दिवशी एका डॉलरपेक्षाही (अमेरिकन) कमी पगारात दिवस काढतात. या समस्येला निश्चितच अजून बिकट करणारी निरक्षरता, आता ९०.५ कोटी इतक्या लोकांना पीडित करते. त्यांची संख्या लवकर कमी होत नाही; पात्र असूनही १३ कोटी मुले शाळेत जात नाहीत, व त्यांची संख्या सन २००० पर्यंत १४.४ कोटी इतपत वाढण्याची अपेक्षा केली आहे. (g95 9/8)
मृत्यू पश्चात जीवन की अदृश्य वस्तूंचा भास?
प्रसार माध्यम बहुधा “मृत्यूच्या दाढेत जाण्याचे अनुभव” यांचे अहवाल प्रकाशित करतात, ज्यामध्ये मृत्यूच्या दाढेत असलेल्या लोकांनी नंतर मृत्यू पश्चात जीवनाची झलक पाहिल्याचा दावा केला. जर्मन मज्जातंतू शास्त्रज्ञांच्या एका गटाच्या प्रयोगांनी अलीकडेच हे सुचवले की, अशा प्रकारचे अनुभव ऑक्सीजनच्या हानीमुळे होतात, व त्यामुळे अदृश्य वस्तूंचा भास होतो. द कोʹई एन एमʹलॉडीर या डच वृत्तपत्रानुसार, त्या गटाने ४२ सुदृढ युवकांचे परीक्षण केले ज्यांना जास्तीत जास्त २२ सेकंदांकरता ऑक्सीजन अधिक मात्रेने देऊन बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर, त्या युवकांनी उल्लेखनीयरित्या ‘मृत्यूच्या दाढेत जाण्याच्या अनुभवांसारख्याच’ काही संवेदना व दृष्टांतांचे वर्णन केले. काही युवकांनी भडक रंग व प्रकाश, विहंगम दृश्य, प्रिय व्यक्तींना सुखकारक दृश्यात पाहणे वगैरे गोष्टींचा अहवाल दिला. अनेक युवकांनी या संवेदना सुखकारक व शांतीमय असल्याचे वर्णन केले—व तेही इतके की त्यांना परत एकदा शुद्धीवर येण्याची इच्छा नव्हती. (g95 9/8)
निम्मी पृथ्वी अद्यापही अस्पर्शित
“मानवाच्या सर्वोत्तम प्रयत्नांव्यतिरिक्त, पृथ्वी ग्रहावरील निम्म्या जमिनीचा भाग अद्यापही अस्पर्शित आहे,” असा अहवाल नवा शास्त्रज्ञ (इंग्रजी) हे नियतकालिक देते. एका नवीन अभ्यासात, “नऊ कोटी चौरस किलोमीटरची जमीन, म्हणजे एकूण जमिनीच्या भागाचे सुमारे ५२ टक्के अद्यापही तशीच आहे.” सन १९८९ मध्ये ग्रहाचा केवळ एक तृतीयांश भाग जंगल असल्याची नोंद असणाऱ्या सर्वेक्षणाच्या परिणामांपेक्षा हे इतके अधिक का आहे? कारण कन्झर्वेशन इंटरनॅशनलच्या ली हॉनॉ यांच्या अलीकडील अभ्यासात, पूर्वी किमान ४,०००-चौरस-किलोमीटरचा उपयोग करण्याऐवजी त्यांनी १,००० चौरस किलोमीटरएवढ्या लहानातल्या लहान भागांचा देखील समावेश केला. “मानवांनी अद्याप पाऊल न ठेवलेल्या ग्रहाचा आणखी मोठा भाग शोधून काढणे हा संभवतः अधिक सखोल अभ्यास असेल,” असे तो लेख म्हणाला. तथापि, हॉनॉने असे दर्शवले की, या अस्पर्शित प्रदेशाचा अधिकांश भाग “खडक, बर्फ व वाहत्या वाळूचा” बनलेला असून मानव व वन्यजीवनाच्या वस्तीसाठी योग्य नाही. “ग्रहाच्या सुमारे तीन चतुर्थांश वासार्ह भागात मानवी व्यत्ययाने प्राकृतिक मूलस्थानाच्या स्थळाची पालटणी केली आहे,” असे ते म्हणाले. या सर्वेक्षणाचे तीन वर्ग म्हणजे: अस्पर्शित (५२ टक्के), अर्ध-स्पर्शित (२४ टक्के) आणि वर्चस्व असलेले (२४ टक्के). (g95 9/8)
प्राण्यांकरता वाहतुकीचे दिवे?
प्राण्यांचे रस्ते ओलांडणे मोटार चालकांसाठी व प्राण्यांसाठी, फार काळापासून एक संभवनीय धोका ठरला आहे. फ्रेंच निसर्गाविषयीचे नियतकालिक टेर सोवॉझ असा अहवाल देते की, रात्रीच्या वेळी प्राण्यांनी जंगलातील रस्ते ओलांडल्याने घडणाऱ्या पुष्कळ अपघातांमुळे, जंगलाच्या फ्रेंच राष्ट्रीय कचेरीमधील तंत्रज्ञांनी एक आश्चर्यकारक शोध लावला आहे. प्राणी लाल दिव्यांसमोर थांबतात! प्रयोगांनी हे दाखवून दिले आहे की, लाल रंगाच्या वारंवारतेमुळे प्राण्यांना तात्पुरता अर्धांगवायू होतो. फ्रान्सच्या जंगलातील रस्त्याच्या कडेने, लाल परावर्तक लावले आहेत जे येणाऱ्या वाहनांच्या समोरील दिव्यांचा प्रकाश शोषतात व तो चालकांवर परावर्तित करण्याऐवजी जंगलात परावर्तित केला जातो. तर रस्त्यावर उडी मारण्याआधी, तो प्रकाश नाहीसा होईपर्यंत प्राणी थांबून राहतात. (g95 9/8)
बिछान्यात पूर्ण विश्रांती घेण्यामुळे होणारे नुकसान
“बिछान्यात पडून दीर्घकालीन विश्रांती घेतल्याने रुग्णांना फायदा होण्याऐवजी त्यांना हानी पोहंचू शकते,” असा दावा लंडनचे द टाईम्स करते. सुमारे ५० वर्षांआधी, सर रिचर्ड अशर या डॉक्टरांनी या प्रमाणित वैद्यकीय पद्धतीबद्दल शंका केली व थ्रॉम्बोसीस, स्नायूंची बळकटी कमी होणे, अस्थींमधील कॅल्शियमचा घट, मूतखडे, मलावरोध व खिन्नता यांसारख्या आरोग्य धोक्यांकडे लक्ष वेधले. या इशाऱ्याला परीक्षणांनी त्या वेळेपासून पुष्टी दिली आहे, व थ्रॉम्बोसीसच्या धोक्यानंतर फप्फुसांमधील प्राणघातक अडथळा, मृत्यूपूर्व विश्रांतीच्या कालावधीशी थेट संबंधित आहे असे उत्तर तपासणींनी दाखवले आहे. दुसऱ्या बाजूला पाहता, सायॅटिका तसेच तीव्र पाठदुखी आणि गर्भधारणेच्या शेवटल्या स्थितीतील अडचणी असल्यास डॉक्टर पूर्ण विश्रांती घेण्याची शिफारस करतात. अर्थात, इतर तीव्र तसेच गंभीर आजारांकरता विश्रांती घेण्याव्यतिरिक्त खरोखर कोणताही पर्याय नसेल. तथापि, डॉक्टर असा विश्वास बाळगतात की, ती बिकट अवस्था निघून गेल्यावर उठून थोडी हालचाल केल्याने लवकर बरे होता येते. (g95 9/8)
मुले न होणाऱ्या जोडप्यांकरता नवीन आशा?
एक नवीन वैद्यकीय तंत्र, मुले न होणाऱ्या जोडप्यांना आपल्या वंध्यत्वावर मात करण्यास मदत करत आहे, असे वृत्त फ्रान्स-प्रेस हे फ्रेंच वार्ताहराचे कार्यालय देते. सर्वप्रथम डेन्मार्कमध्ये सुरू करण्यात आलेल्या या तंत्रामध्ये अतिसूक्ष्म काचेच्या सुईने स्त्रीच्या अंडबीजावर पुरुषाचा एकच शुक्राणू ठेवला जातो. या तंत्रासाठी अतिदक्षता व खूप कौशल्य लागत असले, (एक शुक्राणू एका मिलीमीटरच्या दोन सहस्त्रांशाइतके असते; अंडबीज एका मिलीमीटरच्या एक दशमांशाइतके असते) तरी ही पद्धत यशस्वी ठरली आहे. स्त्रीच्या शरीरात हे घडते व कोणा निनावी देणगीदारापेक्षा तिच्या पतीचा शुक्राणू वापरला जाण्याचा यात फायदा आहे—अशारितीने संवेदनशील असे नैतिक व धार्मिक प्रश्न टाळले जातात. मुले न होणाऱ्या सर्व जोडप्यांपैकी एक तृतीयांश जणांच्या वंध्यत्वाचे कारण शुक्राणूचा हलका दर्जा असतो, म्हणून हे तंत्र उपयोगात आणणाऱ्या एका डॉक्टरांना वाटते की, अनेक जोडप्यांना आता कुटुंब प्रस्थापित करण्याची पुन्हा एकदा नवीन आशा मिळू शकते. (g95 9/8)