वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g94 १/८ पृ. २८
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • गुंतागुंत कोठे निमार्ण झाली?
  • व्यायाम आणि वय
  • वाघाची हाडे
  • लिंगाची अडवणूक
  • चंद्राची गरज
  • गायब स्त्रिया
  • चीनच्या जननाचे कमी होणारे प्रमाण
  • संगणकाने केलेले भाषांतर
  • बुद्ध धर्मियांचे बार
  • तुमच्या हृदयाकरता थोडासा द्राक्षारस
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९७
  • खरी सुरक्षितता एक फसवे उद्दिष्ट
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
सावध राहा!—१९९४
g94 १/८ पृ. २८

जगावरील दृष्टिक्षेप

गुंतागुंत कोठे निमार्ण झाली?

प्राचीन जीव साधे होते, परंतु जसजसा काळ गेला तसतसे नैसर्गिक निवडीमुळे त्यांना अधिकाधिक गुंतागुंतीचे बनणे भाग पडले असावे, असे अनेक उत्क्रांतीवादी गृहीत धरतात. अधिकाधिक गुंतागुंतीकडे अशी प्रगती होत असल्याचे अलिकडेच केलेल्या अभ्यासात दिसून आले नाही. प्राचीन जीवशास्त्रज्ञ, डॉ. डॅन मक्शे यांनी, विविध सस्तन प्राण्यांच्या मणक्यांच्या अश्‍मीभूत अवशेषांचे परीक्षण केले; दुसऱ्‍या एका अभ्यासात कालवांच्या अश्‍मीभूत अवशेषांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. दोन्ही अभ्यासांमध्ये अधिक गुंतागुंतीकडे उत्क्रांतीजन्य प्रगती झाल्याचा पुरावा सापडला नाही. किंवा अधिकाधिक गुंतागुंत असल्यामुळे तग धरण्यात मदत मिळते असेही त्यात दिसून आले नाही. न्यूयॉर्क टाईम्सनुसार, “अशा धर्तीवर विचार करण्याची सवय झालेल्या अनेक जीवशास्त्रज्ञांना (या निष्कर्षामुळे) आश्‍चर्य वाटेल,” असे तज्ज्ञ म्हणतात. “डॉ मक्शे यांच्या मते गुंतागुंतीकडे होणाऱ्‍या प्रगतीची जाणीव ही जीवशास्त्रीय सत्य असण्यापेक्षा, उत्क्रांतीमुळे काही तरी प्रगती झाल्याचे पाहण्याच्या शास्त्रज्ञांच्या इच्छेचे प्रतिबिंब असण्याची शक्यता आहे” असे टाईम्स नमूद करते. (g93 9⁄22)

व्यायाम आणि वय

व्यायाम चालू करण्यासाठी फार उशीर झालेला असतो? पूर्व अमेरिकेत एका अलिकडच्या झालेल्या अभ्यासानुसार तसे दिसत नाही. जवळजवळ १०,००० पुरूषांच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, त्यांचे वयोमान कितीही असले तरी त्यांनी जेव्हा “समतोल जोमदार” व्यायाम सुरु केला तेव्हा वयाची त्यांची सरासरी कालमर्यादा वाढली असल्याचे दिसले. ज्यांनी हा व्यायाम ४५ ते ५४ वयादरम्यान सुरु केला त्यांना अधिक फायदा झाल्याचे दिसले; त्यांचे वयोमान दहा महिन्यांनी वाढले. पासष्ट ते चौऱ्‍याहत्तर वयोगटातील लोकांचे आयुमान सहा महिन्यांनी वाढले तसेच ७५ ते ८४ वयोमानांनामध्ये दोन महिन्यांनी सुधारणा झाली. या अभ्यासाचे संचालक, डॉ राल्फ एस. पफनबर्गर यांनी जोर देऊन सांगितले की ही केवळ सरासरी होती; यास्तव, ज्यांची पाहणी करण्यात आली त्या वैयक्‍तिकांना व्यायामामुळे इतरांपेक्षा अधिक फायदा झाला. असे दिसून आले की, त्यातील मुख्य फायदा म्हणजे, हृदयाचे झटके टाळणे हा होता. तथापि, व्यायाम करणाऱ्‍यांची इतर गोष्टींमुळे मरण्याची कमी शक्यता होती. (g93 9/22)

वाघाची हाडे

पारंपारिक पौर्वात्य औषध बनवण्यासाठी वाघांच्या हाडांच्या मागणीमुळे, वाघांच्या जागतिक संख्येला भीती आहे असे द लॅनसेट ह्‍या ब्रिटिश वैद्यकीय मासिकाने म्हटले. वाघाच्या हाडापासून बनवलेल्या उत्पादनाच्या व्यापारावर आंतरराष्ट्रीय ताबा ठेवला तरीही, वाघांच्या हाडांचा द्राक्षारस, औषधे, आणि चाटण (मध किंवा इतर गोड पाकासोबत मिसळलेली औषधाची पूड) बनवण्यासाठी उपयोग केला जातो. एका आशिया राष्ट्राने, १९९१ मध्ये वाघांच्या हाडांच्या बनवलेल्या गोळ्यांची १५,०७९ खोकी, ५,२५० किलो चाटण, आणि ३१,५०० द्राक्षारसाच्या बाटल्या निर्यात केल्या. संपूर्ण जगभरात वाघांची उरलेली संख्या अंदाजे ६,००० इतकीच असेल. (g93 9⁄22)

लिंगाची अडवणूक

“वर्घिष्णु देशात, फार कमी प्रमाणात स्त्रीच्या जीवनाचे मूल्य समजले जाते” अशी सुरवात द वॉशिंग्टन पोस्ट मधील अहवालांच्या मालिकेने केली. आफ्रिका, आशिया, आणि दक्षिण अमेरिकाच्या गरीब राष्ट्रांतील शेकडो महिलांच्या मुलाखतीनंतर पोस्टच्या बातमीदारांना असे दिसून आले की “संस्कृती, धर्म आणि नियम हे, एखाद्या स्त्रीचे मानवी हक्क नेहमी तिच्यापासून हिरावून घेतात आणि काही वेळा तर मानवापेक्षा खालच्या योनीच्या दर्जात ढकलले जाते.” उदाहरणार्थ, हिमालयाच्या खेड्यात, स्वतःच्या वजनापेक्षा एक पंचमाश वजनाचे अधिक ओझे घेऊन, दिवसाला लागोपाठ १४ तासांसाठी, ५९ टक्क्यांची कामे स्त्रियांनीच केली. एका अभ्यासाने असे पाहिले की, “दोन किंवा तीन . . . बाळंतपणानंतर, त्यांची शक्‍ती कमकुवत होते, त्या अशक्‍त होतात आणि ३६-३९ वर्षांच्या आसपास थकलेल्या आणि वृद्ध होतात, व फार लवकर मरून जातात.” सर्वसामान्यपणे बालिकांना कमी अन्‍न दिले जाते, शाळेतून काढले जाते, कोवळ्या वयातच कामाला जुंपले जाते, व त्यांच्याकडे मुलांपेक्षा फार कमी प्रमाणात वैद्यकीय लक्ष पुरवले जाते. अनेक स्त्रिया, खर्चिक जबाबदारी समजून, तान्ह्या मुलींची हत्या करतात. बातमीदारांनी असेही पाहिले की, दक्षिण भारताच्या ग्रामीण भागात, बालहत्या करण्याचा सामान्य मार्ग म्हणजे कोंबडीचे उकळते सूप बाळाच्या घशात ओतणे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना शिक्षा दिली जाते की नाही याबद्दल एका पोलिस अधिकाऱ्‍याला विचारल्यावर त्याने उत्तर दिले: “असे अनेक निकडीचे वाद आहेत. फार कमी घटना आमच्या निदर्शनास आणल्या जातात. याबद्दल क्वचितच लोक काळजी करतात.” (g93 9/22)

चंद्राची गरज

पृथ्वीला, जीवनासाठी अद्वितीय ग्रह बनवणाऱ्‍या उल्लेखनीय कारणांसोबत आणखी एक घटक खगोलशास्त्रज्ञांना त्याला जोडावा लागेल: तो आहे चंद्र. आमचा हा उपग्रह चंद्र, रात्रीच्या वेळी चंदेरी प्रकाश देणे तसेच भरती ओहोटी घडवून आणणे यापेक्षा अधिक काही करतो. फ्रेंच खगोल शास्त्रज्ञांनी संगणकाच्या साहाय्याने केलेल्या अभ्यासानुसार तो पृथ्वीच्या अक्षाच्या कलाचे नियंत्रणही करतो. असा उपग्रह नसलेल्या मंगळाच्या अक्षाचा कल काळाच्या ओघात १० ते ५० अंशांनी बदलला आहे असे दिसते, बहुधा ही अस्थिरता दोन्ही ध्रुवांवरील बर्फ वितळणे व पुन्हा गोठण्याइतका हवामानामधल्या प्रचंड बदलाला कारणीभूत झाली. संगणकाच्या साहाय्याने केलेल्या अभ्यासात असे उघड झाले आहे की, नियंत्रण करणारा प्रभाव असलेला चंद्र नसता तर पृथ्वीच्या अक्षाचा कल ८५ अंशांनी बदलला असता. त्यामुळे “चंद्र हा पृथ्वीच्या हवामानाचा संभाव्य नियंत्रक म्हणून कार्य करतो असे समजता येईल,” असा निष्कर्ष त्या फ्रेंच खगोल शास्त्रज्ञांनी काढला आहे. (g93 9/22)

गायब स्त्रिया

विकसित राष्ट्रे, जसे की ब्रिटन, फ्रान्स, स्वित्झरर्लंड आणि अमेरिका येथे, पुरूषांपेक्षा स्त्रिया १०५ ते १०० च्या प्रमाणात संख्येने जास्त आहेत. परंतु संयुक्‍त राष्ट्र संघाची आकडेवारी दाखवते की आशियामध्ये हजारो, लाखो स्त्रिया गायब आहेत. उदाहरणार्थ, प्रत्येकी १०० पुरूषांमागे, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथे केवळ ९४ स्त्रिया, भारतात ९३, आणि पाकिस्तानात तर ९२ आहेत. चीनमध्ये, प्रत्येकी १०० मुलींमागे, एक व दोन वयोगटातील ११४ मुले आहेत असे अधिकृत संख्या दाखवते. हा इतका फरक का? “जगण्याची संधी पुरूषांपेक्षा कमी करणारी, जी प्राणघातक हीन वागणूक स्त्रियांना सहन करावी लागते त्याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात. ती म्हणजे स्त्रीगर्भाच्या लिंगाला अनुसरून गर्भपात व बालहत्या, निकृष्ट आहार व आरोग्याची अपुरी काळजी, अनेक वेळा गर्भधारणा, कमर मोडणारी कष्टाची कामे ही आहेत,” असे द वॉशिंग्टन पोस्ट म्हणते. याच्या व्यतिरिक्‍त, काही संस्कृतींमध्ये, खानेसुमारी करणारे पुरूष एकतर स्त्रियांना टाळतात किंवा त्यांच्या सोबत बोलण्यास त्यांना मनाई असते. शिवाय काही पिता तर, त्यांना मुलांपेक्षा अधिक मुली आहेत हे सांगण्यासाठी लाजतात, व त्यांच्या मुलांच्या लिंगाविषयी ते खोटं बोलतात. (g93 10⁄8)

चीनच्या जननाचे कमी होणारे प्रमाण

चीन येथे, १९८७ मध्ये जन्माचे प्रमाण दर १,००० माणसांमागे २३.३३ होते. ते खाली येऊन, १९९२ मध्ये सर्वात कमी म्हणजे १८.२ इतके झाल्याचे आकडेवारी दर्शवते, अशी बातमी द न्यूयॉर्क टाईम्स देते. २०१० ह्‍या वर्षापर्यंत पोंहचण्याची अपेक्षा नव्हती तरी ते लक्ष्य गाठले गेले, “कारण राजनैतिक पार्ट्यांनी आणि सरकारी अधिकाऱ्‍यांनी कुटुंब नियोजनाकडे अधिक लक्ष दिले व सर्वात प्रभावकारी पद्धती स्वीकारल्या,” असे राज्य कुटुंब नियोजन खात्याच्या स्त्री मंत्री पेंग पेयुन म्हणाल्या. ह्‍या कार्यक्रमात, स्थानिक अधिकाऱ्‍यांना व्यक्‍तिगतपणे, त्यांच्या अमलाखाली असलेल्या मुलुखात जन्माचे प्रमाण कमी करण्याबद्दल जबाबदार ठरवले गेले व तसे न केल्याने त्यांना शिक्षा देखील ठरवली होती. अनेक बाबतीत याचा अर्थ, ज्या स्त्रियांना एक मूल होते त्यांना सक्‍तीने नसबंदी करण्यास भाग पाडणे व ज्यांनी अनधिकृतपणे जन्म दिला त्यांना दंड म्हणून मोठी रक्कम भरणे असा झाला. खेडूत लोक इतकी मोठी रक्कम भरू शकत नाहीत तेव्हा, त्यांच्या संपत्तीला जप्त केले जाते किंवा त्यांची नासधूस केली जाते, व अनेकदा त्यांच्या घरांना तोडले जाते. चीनची १,१७,००,००,००० लोकसंख्या आधीच जगाच्या लोकसंख्येपैकी २२ टक्के इतकी आहे. (g93 10⁄8)

संगणकाने केलेले भाषांतर

अलिकडेच, एका संगणकाने जपान जर्मनी आणि अमेरिकेतील संशोधकांच्या टेलीफोनवरील संभाषणाला भाषांतरीत केल्याची ही पहिली घटना आहे. बोलत असताना, योटो, मुनिच आणि पिट्टस्‌बर्ग येथील शास्त्रज्ञांनी त्यांचा शब्दभरणा प्रत्येक दिवशी ५५० शब्द आणि संमेलन तसेच हॉटेल बुकींगच्या क्षेत्रातील १५० विशिष्ट शब्दांपर्यंतच निर्बंधित ठेवले. संगणकाचा कार्यक्रम ह्‍याच शब्दांना ओळखून त्यांचे भाषांतर करू शकतो. “शास्त्रज्ञ एकत्र मिळून अशा एका संगणकावर काम करत आहेत जो विविध राष्ट्रांतील आलेल्या भागीदारांच्या संमेलन बुकींगस्‌ला हाताळू शकेल व सोप्या प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकेल” असा अहवाल मुनिचचे वृत्तपत्र सुटडोइच सिटुंग देते. (g93 9/22)

बुद्ध धर्मियांचे बार

त्यांच्या भटकलेल्या कळपाला पुन्हा बुद्ध धर्मात आणण्यासाठी ओसाका, जपान येथील बुद्ध धर्मगुरूंनी एक बार उघडले. “प्राचीन काळी, सर्व प्रकारचे लोक मंदिरांमध्ये एकत्र होऊन, खातपीत असताना बोलत असत. जसजशी शेकडो वर्षे निघून गेली, तसा बुद्ध धर्म लोकांपासून वेगळा झाला” असे एका धर्मगुरुच्या बोलण्याचा संदर्भ, ऑसॉही इव्हनींग न्यूजने घेतला. पंधरा धर्मगुरू ज्यांच्यामध्ये अनेक जण तरूण आहेत, ते त्या बारमध्ये आळीपाळीने यजमान म्हणून काम करतात व गिऱ्‍हाईकांसोबत ते देखील पितात. “आमचा बार वास्तविक पाहता एक मंदिर आहे जेथे तुम्ही एखाद्या धर्मगुरूसोबत मन मोकळेपणाने बोलू शकता” असे त्या बारचे मॅनेजर म्हणतात. तेथे धूप जाळले जाते व धार्मिक प्रतिके देखील लटकवलेली आहेत. आणि पार्श्‍वसंगीत रॉक आहे. (g93 9/22)

तुमच्या हृदयाकरता थोडासा द्राक्षारस

लाल द्राक्षारसाचे मर्यादित प्राशन हृदयाच्या झटक्यांच्या धोक्याला कमी करू शकते. काही काळासाठी शास्त्रज्ञ, “फ्रेंच विरोधाभास” ज्याला म्हणतात त्याविषयी गोंधळून गेले होते. फ्रेंच लोकांचा, कार्डीयोवासक्युलर प्रॉब्लम वाढवणारा संपृक्‍त चरबीदार आहार असला तरी, रक्‍त वाहिनी बंद पडून हृदयाच्या रोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण, औद्योगिक पश्‍चिमेच्या, फ्रेंच लोकांमध्ये सर्वात कमी आहे. ब्रिटिश वैद्यकीय मासिक द लॅसेट मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालांचा संदर्भ घेणाऱ्‍या पॅरीस वृत्तपत्रक ल फिगारोनुसार, फ्रेंच लोक सर्वसाधारणपणे त्यांच्या आहारासोबत घेणाऱ्‍या द्राक्षारसाशी याचा संबंध असेल असे वैज्ञानिक मानतात. लाल द्राक्षरसात असणारे आम्ल संयुग ज्यांना फेनॉल म्हणतात, ते, धमनीला चरबीयुक्‍त थरांनी बंद करून हृदयाच्या झटक्यांना कारणीभूत असणाऱ्‍या त्या हानीकारक कोलोस्ट्रोलला मना करते. ल फिगारो पुढे असे म्हणते की फेनॉल हे द्राक्षरसाचे मद्यार्क नसलेले घटक आहेत व दिवसाला एक अष्टमांश गॅलन पेक्षा अधिक घेतल्याने मद्यार्क शरीराला चांगला नव्हे तर घातक ठरतो. (g93 9⁄22)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा