वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ijwbq article ८७
  • ख्रिस्तविरोधी कोण आहेत?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्तविरोधी कोण आहेत?
  • बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबलचं उत्तर
  • आपण ख्रिस्तविरोधी असलेल्यांना कसं ओळखू शकतो?
  • ख्रिस्तविरोधक कोण आहे?
    सावध राहा!—२००१
बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
ijwbq article ८७
एक व्यक्‍ती टीव्हीवरून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत आहे

ख्रिस्तविरोधी कोण आहेत?

बायबलचं उत्तर

ख्रिस्तविरोधी हे एखाद्या व्यक्‍तीला किंवा संघटनेला सूचित करत नाही. कारण बायबल म्हणतं, की “बरेच ख्रिस्तविरोधी आले आहेत.” (१ योहान २:​१८) ग्रीक भाषेत “ख्रिस्तविरोधी” यासाठी असलेल्या मूळ शब्दाचा अर्थ होतो “ख्रिस्ताच्या विरोधात असलेला (किंवा त्याची जागा घेणारा).” मग यात कोणकोण येतं?

  • येशू हाच ख्रिस्त (मसीहा) आहे आणि तो देवाचा मुलगा आहे हे नाकारणारे.​—१ योहान २:२२.

  • देवाच्या अभिषिक्‍ताचा, म्हणजेच ख्रिस्ताचा विरोध करणारे.​—स्तोत्र २:१, २; लूक ११:२३.

  • स्वतःला ख्रिस्त म्हणवून घेणारे.​—मत्तय २४:२४.

  • ख्रिस्ताच्या शिष्यांचा छळ करणारे. कारण येशूला वाटतं की त्याच्या शिष्यांचा छळ करणं म्हणजे त्याचा छळ करण्यासारखंच आहे.​—प्रेषितांची कार्यं ९:५.

  • ख्रिस्ती असण्याचा दावा करूनसुद्धा खोटं बोलणारे आणि इतरांची फसवणूक करणारे.​—मत्तय ७:२२, २३; २ करिंथकर ११:१३.

शिवाय असं काम करणाऱ्‍या लोकांचा एक गट म्हणून उल्लेख करतानाही बायबल त्यांना “ख्रिस्तविरोधी” असं म्हणतं. (२ योहान ७) सर्वात आधी ख्रिस्तविरोधी प्रेषितांच्या काळात आले आणि ते आजही आहेत. याबद्दल बायबलमध्ये आधीपासूनच सांगण्यात आलं होतं.​—१ योहान ४:३.

आपण ख्रिस्तविरोधी असलेल्यांना कसं ओळखू शकतो?

  • ते ख्रिस्ताबद्दल खोट्या शिकवणी पसरवतात. (मत्तय २४:९, ११) उदाहरणार्थ, त्रैक्याबद्दल आणि येशू हाच देव आहे असं शिकवणारे, येशूच्या शिकवणींच्या विरोधात असतात. कारण येशूने म्हटलं होतं, “पिता माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे.”​—योहान १४:२८.

  • देवाचं राज्य कसं काम करतं याबद्दल येशू जे म्हणाला ते ख्रिस्तविरोधी नाकारतात. जसं की, काही धर्मपुढाऱ्‍यांचं म्हणणं आहे की येशू मानवी सरकारांचा वापर करून काम करतो. पण हे येशूच्या शिकवणीच्या अगदी विरोधात आहे. कारण त्याने म्हटलं होतं: “माझं राज्य या जगाचं नाही.”​—योहान १८:३६

  • हे लोक येशूला प्रभू मानतात पण त्याच्या आज्ञा पाळत नाहीत. यात राज्याचा आनंदाचा संदेश इतरांना सांगायची आज्ञासुद्धा सामील आहे.​—मत्तय २८:१९, २०; लूक ६:४६; प्रेषितांची कार्यं १०:४२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा