AspctStyle/stock.adobe.com
येशू युद्धांचा अंत करेल
येशूचं लोकांवर किती प्रेम आहे हे त्याने पृथ्वीवर असताना दाखवलं. इतकंच काय तर त्याने त्यांच्यासाठी स्वतःचं जीवनसुद्धा दिलं. (मत्तय २०:२८; योहान १५:१३) लवकरच, देवाच्या राज्याचा राजा म्हणून, तो आपल्या अधिकाराचा वापर करून “सबंध पृथ्वीवर युद्धांचा अंत” करेल. (स्तोत्र ४६:९) अशा प्रकारे तो पुन्हा एकदा दाखवून देईल की त्याचं माणसांवर किती प्रेम आहे.
येशू काय करणार आहे याबद्दल बायबल काय म्हणतं ते पाहा:
“कारण साहाय्यासाठी हाक मारणाऱ्या गरिबांची; दीनदुबळ्या आणि असाहाय्य लोकांची तो सुटका करेल. दीनदुबळ्यांवर आणि गरिबांवर तो दया करेल; गोरगरिबांचे जीव तो वाचवेल. तो त्यांची अत्याचारापासून आणि हिंसेपासून सुटका करेल.”—स्तोत्र ७२:१२-१४.
येशूने आपल्यासाठी जे काही केलंय आणि पुढे जे काही करणार आहे, त्याबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो? याचा एक मार्ग म्हणजे आपण ‘देवाच्या राज्याच्या आनंदाच्या संदेशाबद्दल’ आणखी शिकून घेऊ शकतो. याबद्दलच त्याने लोकांना प्रचार केला. (लूक ४:४३) आणखी माहितीसाठी “देवाचं राज्य काय आहे?” हा लेख वाचा.