Thomas Jackson/Stone via Getty Images
जागे राहा!
२०२४ मध्ये काही आशा आहे का?—बायबल काय म्हणतं?
२०२४ या वर्षातसुद्धा, आपल्या समस्यांवर काही उपाय नाही असं बऱ्याच लोकांना वाटतं. असं असलं तरी, भविष्यासाठी आपल्याला आशा मिळू शकते. पण कुठे?
बायबल एक आशा देतं
आज आपल्याला तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांमुळे काहीच आशा नसल्यासारखं वाटतं. पण देवाने बायबलमध्ये असं वचन दिलंय, की तो या सगळ्या समस्या काढून टाकणार आहे. लवकरच, देव आपल्या “डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. यापुढे कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.”—प्रकटीकरण २१:४
भविष्यासाठी बायबलमध्ये काय वचन दिलंय हे जाणून घेण्यासाठी “आनेवाला कल सुनहरा होगा!.” हा हिंदीतला लेख पाहा.
आज बायबल आपल्याला कशी मदत करू शकतं?
बायबल आपल्याला भविष्यासाठी एक आशा देतं. त्यामुळे आपल्याला निराशेशी लढता येतं आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला मदत होते. (रोमकर १५:१३) बायबलमध्ये दिलेल्या व्यावहारिक सल्ल्यांमुळे आपल्याला आजच्या समस्यांना चांगल्या प्रकारे तोंड देता येतं; जसं की, गरिबी, अन्याय आणि आजारपण.
गरिबीत वाढलेल्या एका व्यक्तीला बायबलमध्ये दिलेल्या आशेमुळे शांती आणि आनंद कसा मिळाला ते या व्हिडिओमध्ये पाहा: जोएन पाबलो झेरमेनो: यहोवाने मला एक अर्थपूर्ण जीवन दिलं.
दोषीपणाच्या भावनेमुळे, निराशेमुळे, चिंतेमुळे आणि प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे होणाऱ्या दु:खाचा सामना करायला बायबल तुम्हाला कशी मदत करू शकते, ते पुढे दिलेल्या इंग्रजीतल्या लेखात पाहा: “कॅन आय फाईंड वर्ड्स ऑफ कम्फर्ट इन द बायबल?”
बऱ्याच वर्षांपासून मिलीट्रीत असलेली एक स्त्री स्वत:बद्दल असं म्हणते, “मी खूप कठोर मनाची आणि निर्दयी होते,” पण बायबलमुळे तिला आशा कशी मिळाली ते पुढे दिलेल्या इंग्रजीतल्या व्हिडिओत पाहा: आय पूट डाऊन माय रायफल.
२०२४ या वर्षात तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने आनंदी असावं असं आम्हाला वाटतं. यासाठी बायबल तुम्हाला कसं मदत करू शकतं याबद्दल आणखी शिकून घ्या. मोफत केल्या जाणाऱ्या बायबलवरच्या चर्चेत तुम्ही भाग घेऊ शकता. देव तुम्हाला आतासुद्धा ‘शांतीचे विचार’ देऊ शकतो. तसंच, तो तुम्हाला “चांगलं भविष्य आणि आशा” कशी देऊ शकतो तेसुद्धा जाणून घ्या.—यिर्मया २९:११.