जागे राहा!
रशियाचा युक्रेनवर हल्ला
२४ फेब्रुवारी २०२२ ला पहाटे रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला. हे युद्ध होऊ नये म्हणून जगभरातल्या बऱ्याच नेत्यांनी खूप प्रयत्न केले, पण तरी रशियाने माघार घेतली नाही. मग या युद्धाचा संपूर्ण जगावर कसा परिणाम होईल? याबद्दल बोलताना संयुक्त राष्ट्राचे महासचिव ॲन्टोनियो ग्युटारेश यांनी काही दिवसांपूर्वी असं म्हटलं, की “या युद्धामुळे लोकांना होणाऱ्या त्रासाचा आणि भयानक परिणामांचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. आणि या युद्धामुळे युरोपमधल्या आणि जगभरातल्या देशांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होईल.”
या आणि अशा घडामोडींबद्दल बायबलमध्ये आधीच काही सांगून ठेवलं होतं का?
येशूने सांगितलं होतं की, “एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल.” (मत्तय २४:७) येशूने सांगितलेली ही भविष्यवाणी कशी पूर्ण होत आहे, याबद्दल बायबल काय सांगतं हे माहीत करून घेण्यासाठी “जगाचा अंत कधी होईल?” हा लेख वाचा.
बायबलमधल्या प्रकटीकरणाच्या पुस्तकात ‘अग्नीच्या रंगाच्या’ घोड्यावर बसलेल्या एका स्वाराबद्दल सांगितलंय. त्याला “पृथ्वीवरून शांती काढून घेण्याचा अधिकार” देण्यात आलाय. हा स्वार युद्धाला सूचित करतो. (प्रकटीकरण ६:४) ही भविष्यवाणी आज होणाऱ्या युद्धांना कशी सूचित करते हे माहीत करून घेण्यासाठी हिंदीतला “चार घुड़सवार—ये कौन हैं?” हा लेख वाचा.
दानीएलच्या पुस्तकात “उत्तरेचा राजा” आणि “दक्षिणेचा राजा” यांच्यामध्ये शत्रुत्व असेल असं सांगितलंय. (दानीएल ११:२५-४५) रशिया आणि त्याची मित्र राष्ट्रं यांना उत्तरेचा राजा का म्हणता येईल, हे जाणून घेण्यासाठी दानीएल अध्याय ११—पूर्ण झालेली भविष्यवाणी हा व्हिडिओ पाहा.a
प्रकटीकरणाच्या पुस्तकात ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या युद्धाबद्दल’ सांगितलंय. (प्रकटीकरण १६:१४, १६) पण, हे युद्ध आज आपण पाहतो तसं दोन राष्ट्रांमध्ये होणारं युद्ध नाही. मग हे युद्ध नेमकं कसं असेल? हे माहीत करून घेण्यासाठी इंग्रजीतला “व्हॉट इज द बॅटल ऑफ आर्मगेडन?” हा लेख वाचा.
तुम्ही एका चांगल्या भविष्याची आशा ठेवू शकता का?
बायबल सांगतं की देव “सबंध पृथ्वीवर युद्धांचा अंत” करेल. (स्तोत्र ४६:९) देवाने चांगल्या भविष्याचं जे अभिवचन दिलंय त्याबद्दल जास्त माहिती घेण्यासाठी हिंदीतला “आनेवाला कल सुनहरा होगा!” हा लेख वाचा.
येशूने त्याच्या शिष्यांना देवाचं राज्य या पृथ्वीवर यावं अशी प्रार्थना करायला सांगितली. (मत्तय ६:९, १०) हे राज्य स्वर्गातून राज्य करेल. माणसांसाठी देवाची जी इच्छा आहे, ती ते पूर्ण करेल आणि जगात सगळीकडे शांती आणेल. तुम्हाला देवाच्या राज्यामुळे कसा फायदा होईल हे जाणून घेण्यासाठी देवाचं राज्य काय आहे? हा व्हिडिओ पाहा.
युक्रेनमध्ये १,२९,००० पेक्षा जास्त यहोवाचे साक्षीदार आहेत. इतर देशांतल्या साक्षीदारांसारखंच युक्रेनमधले साक्षीदारसुद्धा येशूचं अनुकरण करतात. ते राजकारणाच्या बाबतीत निःपक्ष राहतात आणि युद्धात कोणत्याही प्रकारे भाग घेत नाहीत. (योहान १८:३६) युद्ध आणि त्यांसारख्याच माणसांच्या इतर समस्या देवाचं राज्यच काढू शकतं, हा ‘देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश’ जगभरातले यहोवाचे साक्षीदार घोषित करतात. (मत्तय २४:१४) या आशेबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांना संपर्क करा.
a या भविष्यवाणीबद्दल जास्त माहिती घेण्यासाठी “अंताच्या समयी ‘उत्तरेचा राजा’” आणि “आज ‘उत्तरेचा राजा’ कोण आहे?” हे लेख वाचा.