बायबलमधले वाक्यांश
येशू “आज्ञाधारकपणा शिकला”
येशू नेहमी यहोवाला आज्ञाधारक होता. (योहा. ८:२९) मग बायबलमध्ये असं का म्हटलंय, की “त्याला सोसाव्या लागलेल्या गोष्टींमधून तो आज्ञाधारकपणा शिकला?”—इब्री ५:८.
पृथ्वीवर असताना येशूसोबत अशा गोष्टी घडल्या, ज्या त्याने स्वर्गात आधी कधीच अनुभवल्या नव्हत्या. जसं की, ज्या आईवडिलांनी त्याला वाढवलं ते विश्वासू होते, पण अपरिपूर्णसुद्धा होते. (लूक २:५१) त्याला भ्रष्ट धार्मिक नेत्यांकडून आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून वाईट वागणुकीचा सामना करावा लागला. (मत्त. २६:५९; मार्क १५:१५) शेवटी त्याला वेदनादायक मृत्यू सोसावा लागला. बायबल म्हणतं: “त्याने स्वतःला नम्र केलं आणि मरण सोसण्याइतपत . . . तो आज्ञाधारक झाला.”—फिलिप्पै. २:८.
पृथ्वीवर असताना या सगळ्या गोष्टींमुळे येशू एका वेगळ्या मार्गाने आज्ञाधारक राहायला शिकला. त्यामुळेच तो असा परिपूर्ण राजा आणि महायाजक बनला, जो आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. (इब्री ४:१५; ५:९) येशूने जे काही सोसलं त्यातून आज्ञाधारक राहायला शिकून घेतल्यावर तो यहोवासाठी आणखी जास्त मौल्यवान बनला. जेव्हा आपण कठीण परिस्थितींत यहोवाला आज्ञाधारक राहतो, तेव्हा आपणसुद्धा यहोवासाठी आणखी मौल्यवान बनू शकतो आणि त्याने दिलेली कोणतीही नेमणूक पार पाडू शकतो.—याको. १:४.