वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 मे पृ. ३२
  • आपलं मन तयार करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपलं मन तयार करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या मनासारखे हृदय संपादन करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—बायबल विद्यार्थ्याला तयारी करायला शिकवणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • तुमचे शिकवणे परिणामकारक आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • यहोवाचा शोध घेण्याकरता आपले अंतःकरण तयार करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 मे पृ. ३२

अभ्यासासाठी टीप

आपलं मन तयार करा

आपण जेव्हा बायबलचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्या मनावर यहोवाच्या विचारांचा प्रभाव व्हावा अशी आपली इच्छा असते. याबाबतीत एज्राने एक चांगलं उदाहरण मांडलं. कारण त्याने “यहोवाच्या नियमशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी . . . आपलं मन तयार केलं होतं.” (एज्रा ७:१०) मग आपण आपलं मन कसं तयार करू शकतो?

प्रार्थना करा. प्रत्येक वेळी अभ्यासाची सुरुवात प्रार्थनेने करा. शिकलेल्या गोष्टी समजून घ्यायला आणि त्या लागू करायला यहोवाकडे मदत मागा.—स्तो. ११९:१८, ३४.

नम्र राहा. जे गर्विष्ठपणे स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहायचा प्रयत्न करतात, त्यांच्यापासून देव सत्य लपवून ठेवतो. (लूक १०:२१) इतरांवर छाप पाडण्यासाठी संशोधन करू नका. तुमची विचारसरणी देवाच्या विचारसरणीसारखी नसेल तर त्यात नम्रपणे बदल करा.

राज्यगीतं ऐका. संगीतात इतकी ताकद असते, की ते थेट आपल्या मनापर्यंत पोहोचू शकतं आणि त्यामुळे आपण उपासनेसाठी तयार होतो. अभ्यासाच्या सुरुवातीला राज्यगीतं गायल्यामुळे आपलं मन तयार करायला आपल्याला मदत होऊ शकते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा